Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28
कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भांडण कुठे गं ,घना एकटाच किती
भांडण कुठे गं ,घना एकटाच किती फाडफाड बोलत होता तिला. आणि राधासारखी मुलगी ऐकत होती. आता उद्या भले ती घर सोडुन जाईल पण एवढं ऐकुन घेणच टु मच
चाणक्य, शेंडीला गाठ मारायचा
चाणक्य, शेंडीला गाठ मारायचा विचार आहे का?
कालचा एपिसोड कळस होता.
कालचा एपिसोड कळस होता. घनश्यामराव १५ वर्षे प्रयत्न करतायेत म्हणे अमेरिकेला जाण्यासाठी (इतक्या वर्षात त्यांच्याबरोबरचे अमेरिकेला जाऊन पोरा बाळांसकट सहकुटुम्ब अमेरिकन नागरीक झाले असतील ) आणि दरवेळी ते कंपनीवाले त्यांना भारतातल्या शाखेत जॉइन करा सांगतायेत. पण यांना सुरवातच अमेरिकेत करायची आहे म्हणुन अजुन घरीच बसून आहेत. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी...
आजचे त्यांचे खरे भांडण पाहून
आजचे त्यांचे खरे भांडण पाहून काहीतरी घडल्यासारखे वाटले, त्याअर्थी बरे वाटले.;)
नाहीतर तेच ते रटाळ प्रसंग पहायला लागत होते.
मानव डायरेक्ट राधाच्या बेडरूममध्ये येतो हे पटले नाही.
पंधरा वर्षे अमेरिकेत जाण्याचे प्रयत्न सफल झाले नाहीत यावर विश्वास बसत नाही.
अमेरिका काय एकच देश आहे आहे का जगात? तिथे नाहीतर दुसरीकडे प्रयत्न कर ना बाबा!
आधी मुंबईचे ऑफीस जॉइन तर कर बेट्या, पुढे काय ते बघता येईल.
मुक्ताने बर्याच भागांनंतर अभिनय केला किंवा तिला तसा करायला मिळाला.
काल घनाच्या पात्राला अचानक
काल घनाच्या पात्राला अचानक कलाटणी मिळाली. तो अचानक गुड फॉर नथिंग लुजर वाटायला लागला. मी खूप हुशार आहे, इथे मला संधी नाहीत इ.इ.मागची गोम आता कळली. या सगळ्यांसाठी घरच्यांना जबाबदार धरण्याचा प्रकारही त्यातलाच.
त्याला अमेरिकेला जायची संधी मिळेल आणि मग काळजाला पीळ पाडणारे नेहमीचा यशस्वी मेलोड्रामा होईल असे वाटत होते. आता त्याला अमेरिकेला जायला मिळत नाही आहे, राधा घना दोघांमध्ये अचानक तणाव आलाय, आपल्या अपयशाचं दु:ख तो घरात्/बाहेर अन्य कोणालाही सांगू शकत नाही, फक्त राधाशीच शेअर करू शकतो आणि त्याच वेळी आता लग्न कसं मोडायचं याचाही विचार करतो हा गुंता मस्त होईल.
त्याआधी कोलंबस, वास्को डी गामा , घनश्याम ही नावे एका वाक्यात ऐकून धक्का बसल्याने खुर्ची उलटून पडता पडता मी वाचलो.
तेव्हा वाटले हा काँप्युटरवाला असण्याऐवजी जर त्याला नासामध्ये जायचेय असे दाखविले असते तर 'मला जे करायचेय ते अमेरिकेतच करता येईल' हे त्याचे म्हणणे एक वेळ खरे वाटले असते. किंवा कथानक १५ वर्षांपूर्वी घडतेय असे दाखवले असते तर चालले असते. (म्हणजे आठवडाभर मोबाइलची रेंज मिळत नाही, तेही हैद्राबादेत असल्या गोष्टी दाखवायला लागल्या नसत्या.)
कालच्या भागात 'मनवणे' असा एक शब्द कानी पडला. आधीही ऐकला होता. मनस्विनीताईंच्या कानावर वर्षभर हिंदी पडणार नाही अशी व्यवस्था करायची गरज आहे.
कोलंबस, वास्को डी गामा ,
कोलंबस, वास्को डी गामा , घनश्याम ही नावे एका वाक्यात ऐकून धक्का बसल्याने खुर्ची उलटून पडता पडता मी वाचलो.>>:D
त्याआधी कोलंबस, वास्को डी
त्याआधी कोलंबस, वास्को डी गामा , घनश्याम ही नावे एका वाक्यात ऐकून धक्का बसल्याने खुर्ची उलटून पडता पडता मी वाचलो.<<<
अक्षरशः.
मी अर्धाच भाग पाह्यला पण कोलंबस वगैरे ऐकल्यावर धन्यच व्हायला झालं.
>>त्याआधी कोलंबस, वास्को डी
>>त्याआधी कोलंबस, वास्को डी गामा , घनश्याम ही नावे एका वाक्यात ऐकून धक्का बसल्याने खुर्ची उलटून पडता पडता मी वाचलो.
त्याआधी कोलंबस, वास्को डी
त्याआधी कोलंबस, वास्को डी गामा , घनश्याम ही नावे एका वाक्यात ऐकून धक्का बसल्याने खुर्ची उलटून पडता पडता मी वाचलो. >>> अगदी !!
कोलंबस, वास्को डी गामा ,
कोलंबस, वास्को डी गामा , घनश्याम ही नावे एका वाक्यात ऐकून धक्का बसल्याने खुर्ची उलटून पडता पडता मी वाचलो >> त्या दोघांची घनाशी तुलना नाहीच पण हा संवाद मात्र नाही खटकला. तो आपले म्हणणे पटवून द्यायचा प्रयत्न करतोय. आपणही देतोच की अशी थोरामोठ्यांची उदाहरणे - आपले म्हणणे पटवून देण्यासाठी.
राधाचे काळे कुटुंबात मिसळून जाणे छान दाखवलय आता पुढे पहायचे.
कदाचित आता राधा तिच्या
कदाचित आता राधा तिच्या पपांकडे निघून जाईल घनाच्या अशा अचानक झालेल्या ट्रान्स्फर सीन मुळे आणि जसा तो हैदराबादला गेल्यावर राधा घना ला घरातल्या घरात मिस करायला लागते तसा तो तिला करायला लागेल. एकंदरच पण घनाचे पात्र कालच्या एपिसोडनंतर अचानक इन्सेन्सिटिव्ह वाटायला लागलंय किंवा 'मुंबई-पुणे-मुंबई' चित्रपटात कसा तो तिची पूर्णवेळ गंमत करत राहतो तसंच इथेही तो आतल्या आत एक वेगळं नाटक करत असावा असं वागून... मुळात पहिल्यापासून त्याला राधा आवडलेली असेल.
मालिकेतील कालच्या भागात
मालिकेतील कालच्या भागात आवडलेल्या गोष्टी :
राधा आणि घनाचे आधीचे खोटखोटे आणि कालचे खरेखुरे भांडण.
माईला माऊ त्या दोघांच्या भांडणाबद्दल मीठमसाला चोळून कथन करते ते दृश्य.
राधा आणि (अ)मानव मधला संवाद.
न आवडलेल्या गोष्टी:
मानवचे थेट राधाच्या बेडरूममध्ये येणे.
घना १५ वर्षे प्रयत्न करत आहे अमेरिकेला जायला. जर आत्ता तो मॅक्स. ३० वर्षाचा असेल तर १५ वर्षाचा असल्यापासून तो प्रयत्न करतोय का? आणि जर तसे नसेल तर मग घनाने कॉम्पशी निगडीत शिक्षण घेतल्यानंतर २३-२५ व्या वर्षी जर त्याने प्रयत्न सुरू केले असतील. तर तो आज किमान ४० वर्षांचा आहे का?
१५व्या वर्षापासून व्हिजिटर्स
१५व्या वर्षापासून व्हिजिटर्स व्हिसा मग स्टुडंट व्हिसा असे ट्राय करत असेल.. मग शेवटी इथेच शिक्षण घेऊन एच१ साठी ट्राय..
तर तो आज किमान ४० वर्षांचा
तर तो आज किमान ४० वर्षांचा आहे का?
असु शकेल कारण दोघांचीही वये उलटुन जायची वेळ आल्यावर त्यांची लग्ने झालीत
टोक्स
टोक्स
अमेरीकेतले मायबोलीकर घनाला
अमेरीकेतले मायबोलीकर घनाला मदत करु शकतील.घना तु माबो जॉईन कर. माबोवर 1.5 वर्ष पडीक राहुन ट्राय केला तरी काम होउन जाईल.....
टोकुरिका >>>>> प्रचंड
टोकुरिका >>>>> प्रचंड अनुमोदन. हेच सगळे माझ्याही मनात आले होते.
पंधरा वर्षांपूर्वी त्याने
पंधरा वर्षांपूर्वी त्याने ठरवले असेल की अमेरिकेला जायचे. प्रॉपर प्लानिंग. कोलंबसाने केल नव्हते त्यामुळे तो भारताऐवजी अमेरिकेला पोचला.
बाकी घनाचे वय ३५ असू शकते. मग १५ वर्षे बसतील गणितात.
किंवा कथानक १५ वर्षांपूर्वी
किंवा कथानक १५ वर्षांपूर्वी घडतेय असे दाखवले असते तर चालले असते. >>>>>
मग घना जास्तीतजास्त २० चा, कमीतकमी ८,९ चा आणी राधा जास्तीतजास्त १५ , १६ ची , कमीतकमी ३,४ ची असती!
>>आणी राधा जास्तीतजास्त १५ ,
>>आणी राधा जास्तीतजास्त १५ , १६ ची , कमीतकमी ३,४ ची असती!
नाही नाही..... ते नाही चालणार... त्या वयोगटासाठी उंच माझा झोका आरक्षित आहे
स्वरुप
स्वरुप
(No subject)
कालच्या भागात चक्क चिंटू
कालच्या भागात चक्क चिंटू हजेरी लाऊन गेला !
भारीये इन्-फिल्म-जाहिरातबाजी.
ते कार्टं चिंटू का काय ते फार
ते कार्टं चिंटू का काय ते फार भयानक दिसतो हो-ना धड पोरगा ना धड बाप्या !!!
चाणक्य, काळ १९९५च्या आसपासचा.
चाणक्य, काळ १९९५च्या आसपासचा. पात्रांची वये आत्त्ताचीच. तेव्हा सॉइं आताइतके फोफावलेले नव्हते.
मलाही नाही आवडला हा चिंटू
मलाही नाही आवडला हा चिंटू
म्हातारा चिंटु
म्हातारा चिंटु
काल राधाला पाहताना खुप वाईट
काल राधाला पाहताना खुप वाईट वाटले. लग्न करुन खरे तर ती फसलीय. करीअरमध्ये नीट सेटल झालेल्या मुलीच्या गळ्यात हा असला काहीच कर्तबगारी नसलेला नवरा पडलाय. म्हणे अमेरिका पॅशन आहे माझी.. मग १५ वर्षे काय करतोय?? कर्तबगारी असली तर नोकरी कुठेही मिळते, इथे किंवा अमेरिकेत. आणि जरी इथे मिळाली तरी ऑनसाईट जाता येते. पण आधी मुळात लायकी पाहिजे ना? ज्यांच्यात ती लायकी नसते ते इतरांना दोष देवून त्यांचे लक्ष स्वतःच्या कमीपणाकडुन दुसरीकडे वळवतात. काल जेव्हा घना 'लग्न करुन मीच फसलोय' म्हणाला तेव्हा त्याचा खुप तिरस्कार वाटला.
साधना +१ पण काल 'पुढील भागात'
साधना +१
पण काल 'पुढील भागात' दाखवलं तेव्हा तो तिला सॉरी बिरी म्हणत होता, पण आता त्याच्या कमानीतून तीर सुटलेला आहे, आता राधाने चांगलं उट्टं काढलं पाहिजे. कारण तिला काहीच प्रॉब्लेम नाहीये, तिला तिचे पपा पण आहेत आणि सासरची मंडळीही तिच्याच बाजूची आहेत. आता खर्या अर्थाने घना गंडणार आहे
मला आवडला कालचा भाग. घनासारखी
मला आवडला कालचा भाग. घनासारखी माणसं असतात- स्वार्थी, स्वतःचंच बघणारी आणि लूजर्सही. पण मालिकांमध्ये एक तर काळी नाहीतर गोरीच पात्र असतात. त्यांनी आवर्जून घनाला, म्हणजेच मालिकेच्या हीरोला एक नॉर्मल माणसासारखं दाखवलं हेच आधी कौतुकास्पद.
त्यांचं भांडणही खरं वाटलं. कॅमेराचे विविध कोन आणि पार्श्वसंगीत अजिबात नाही, अनावश्यक मेलोड्रामा नाही, कोणी कान लावून ऐकतंय, खिडकीबाहेर थांबलंय असला मूर्खपणाही नाही. जे होतं तसं दाखवलं.
राधाचं वागणंही सुसंगत.
मुक्ता-स्वप्निल दोघंही मस्त काम करतायेत सध्या.
Pages