Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28
कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रिक्षा परत फिरली ..
रिक्षा परत फिरली ..:हाहा:
उद्य
उद्य
गंगा (की यमुना?) 'सुखी
गंगा (की यमुना?) 'सुखी संसाराचे पासष्ट सोपान म्हणून जे पुस्तक वाचत होता, ते मोठाल्या (quarto) गुळगुळीत पानांचे , पानभर रंगीत चित्रे असलेले होते. अशा विषयावरची पुस्तके जुनी पिवळ्या पडलेल्या तुलनेने लहानपानांची (octavo) असतात.
लग्न या विषयावर चांगल्या गंभीर चर्चा चालल्यात.
विवेक लागू न-अभिनेता शाळेतून आलेत का?
ज्ञाना चे संवाद छान होते आणि
ज्ञाना चे संवाद छान होते आणि आसावरीची रिअॅक्शन ही.
विवेक लागू न-अभिनेता शाळेतून
विवेक लागू न-अभिनेता शाळेतून आलेत का? >>> अगदी !!
ह्या मालिकेची online link
ह्या मालिकेची online link देता का गेले दोन आठवडे बघितली नाही. Thanks in advance.
मी दोन एपीसोड मिसलेत आज
मी दोन एपीसोड मिसलेत आज बघेन.
आजच्या एपिसोड मधे राधा-तिचे
आजच्या एपिसोड मधे राधा-तिचे बाबा प्रसंग मस्त होता. अतिशय हळवा आणि भावनिक अभिनय - विनय आपटे रॉक्स!!!
यांनी एकेका कलाकाराला या ना
यांनी एकेका कलाकाराला या ना त्या कारणाने सुट्टी द्यायला सुरुवात केलिये असे दिसते. सुरुवात कुहूच्या आईपासून झाली होती. आता मुलांना सुट्ट्या सुरु झाल्यात नाहीतर त्यांचा सहभाग नसायचा फारसा. साबा, साबू हेही केरळला जाऊन आलेत. आता घना गेलाय. तरी काल परवाच्या भागांमध्ये काही ना काही घडत होते म्हणून बरे वाटले.
कालच्या भागात "मी तुझी मदत
कालच्या भागात "मी तुझी मदत करणार नाही", "त्याचा अॅक्सिडंट झाला" असे संवाद होते.
२०१० मधे भारतात आले होते
२०१० मधे भारतात आले होते तेंव्हा ईटीव्ही च्या कुठल्या तरी दुपारच्या कुकरी शो मधे कायम वापरला जाणारा चुकीचा शब्द भाजी परतणे ला ' परतवणे'
दर एपिसोड मधे भाज्या 'परतवून' लावायचे
दीपांजली कालच्या भागात "मी
दीपांजली
कालच्या भागात "मी तुझी मदत करणार नाही", "त्याचा अॅक्सिडंट झाला" असे संवाद होते. >>> विनय आपटेच्या तोंडी "भारतातही त्याला अनेक संध्या उपलब्ध आहेत की" असा संवाद होता
म्हणजे ''मी तुझी मदत करणार
म्हणजे ''मी तुझी मदत करणार नाही", "त्याचा अॅक्सिडंट झाला" आणि "भारतातही त्याला अनेक संध्या उपलब्ध आहेत की" ही वाक्ये बरोबर नाहीयेत असं वाट्टंय का?
जर माझं चुकत नसेल तर, 'तुला'
जर माझं चुकत नसेल तर, 'तुला' मदत, 'त्याला अॅक्सिडेन्ट' आणि 'संधी' चं अनेक वचन बहुदा 'संधी' च आहे !
ह्म्म कालचा राधा आनि तिच्या
ह्म्म कालचा राधा आनि तिच्या बाबांचा संवादाचा भाग खुप मस्त होता....:)
विषय निघालाच आहे तर आता हेही
विषय निघालाच आहे तर आता हेही विचारते - पंतप्रधानाला मराठीत प्रधानमंत्री कधीपासुन म्हणायला लागले? रेडिओवरच्या बातम्यांमध्ये हल्ली प्रधानमंत्री असतात. पंतप्रधान हा शब्द आता अडगळीत पडला काय?
संधीचे अनेकवचन संधी.
मालिका अचानक गंभीर व्हायला
मालिका अचानक गंभीर व्हायला लागलीय. पण घनाला अमेरिकेला जायची इच्छा आहे हे घरच्यांना आधीच माहित होते ना? त्यांनी उगीचच गृहित धरले की लग्न केले की अडकला इथेच??
तुझी मदत आणि त्याचा
तुझी मदत आणि त्याचा अॅक्सिडंट हे बोली भाषेतले शब्द आहेत. संधी चे अनेकवचन संधी हे बरोबरे.
तुझी मदत आणि त्याचा
तुझी मदत आणि त्याचा अॅक्सिडंट हे बोली भाषेतले शब्द आहेत. <<
चूक.
हे हिंदीच्या प्रभावामुळे मुंबईत पसरलेलं लोण आहे.
तुझी मदत आणि त्याचा
तुझी मदत आणि त्याचा अॅक्सिडंट हे बोली भाषेतले शब्द आहेत. >>> मुळीच नाही. ते 'जेवण बनवलं'प्रमाणेच हिंदीतून (विनाकारण) भाषांतरित होऊन आलेले आहेत.
<तुझी मदत आणि त्याचा
<तुझी मदत आणि त्याचा अॅक्सिडंट हे बोली भाषेतले शब्द आहेत. संधी चे अनेकवचन संधी हे बरोबरे.> कोणत्या भागातली बोली?
या मालिकेतले संवाद प्रमाण मराठी भाषेत आहेत. व्याकरणाच्या नियमांनुसार हे प्रयोग चुकीचेच आहेत. 'मी आली' हाही बोलीभाषेतला प्रयोग असतो म्हणे. त्या बोली भाषेत 'मी आला' असा प्रयोग असतो का?
भरत
भरत
जौंद्या झालं. जे कानावर पडत
जौंद्या झालं. जे कानावर पडत सारख सारख तेच पुढे खरं वाटायला लागत. हल्ली सगळीकडेच जेवण बनवतात एकताबैंच्या कृपेने कारण त्या मराठी सिरेली पण काढतात ना. आणि इतरांनी त्यांच अनुकरण न केल तरच नवल.
पण संधीच संध्या म्हणजे रना/डिस्का/सीड्या असल हास्यास्पद आहे
संवादलेखकच धेडगुजरी भाषा
संवादलेखकच धेडगुजरी भाषा वापरू लागलेत त्याला आता कोण रोखणार भरतजी
पण ऐकताना प्रचंड खटकतं हे सर्व आणि संवादलेखकाचे नाव वाचलं की आणखीच वाईट वाटतं.......
vidarbhat mi ali asa ch
vidarbhat mi ali asa ch mhantat jasa punyat mi alele ga asa mhantat :p
पुण्यात 'मी आलेले ग' अस
पुण्यात 'मी आलेले ग' अस म्हणतात?
आलेले / गेलेले - हे
आलेले / गेलेले - हे मुंबईत...
तसंच - कॉलेज क्राऊडमधे - 'तो मला म्हणाला' याऐवजी 'तो मला बोलला' असं म्हटलं जातं. ते ही कानांना फार खटकतं. हे मी एकदा वैतागून आद्यासमोर बोलले. तेव्हापासून तो मित्रांशी बोलताना तसं बोलतो आणि माझ्याशी बोलताना 'मित्र म्हणाला' असं म्हणतो
हो आणि अजुन एक म्हणजे "मला ते
हो आणि अजुन एक म्हणजे "मला ते भेटलं नाही"
भयानक राग येतो मला हे ऐकुन
असली भाषा ऐकावी लागणार असेल
असली भाषा ऐकावी लागणार असेल तर आग लागो त्या मालिकेला
मंदार, तुम्ही आपली उंच माझा
मंदार, तुम्ही आपली उंच माझा झोका बघा. किंवा त्यापेक्षा जुन्या काळातल्या भाषेतली अजून कुठली मालिका असेल तर ती बघा. जुनं तेच सोनं, नाही का?
Pages