कैरीची झटपट कढी (ताक किंवा नारळाचे दुध न वापरता)

Submitted by uju on 1 July, 2011 - 09:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धी कैरी बारीक चिरून, लाल सूक्या मिरच्या तीन-चार, कढीपत्त्याची पान ५-६,बेसन ६-७ चमचे, मीठ चवीनूसार,गूळ कींवा साखर चवीप्रमाणे.
फोडणीसाठी तेल , हिंग, हळद, मोहरी, जिर.

क्रमवार पाककृती: 

पॅनमध्ये तेल तापवून त्यात मोहरी , जिर, हिंग, टाकून फोडणी करावी. त्यात कढीपत्त्याची पान चूरडून टाकावीत. नंतर त्यात हळद, व मिर्चीचे तूकडे टाकून,कैरीच्या फोडी टाकून चांगल परतून घ्याव.त्यात थोड पाणि घालून बारीक गॅसवर कैरी शिजूवून घ्यावी.कैरी चांगली शिजल्यावर त्यात पाणि घालून उकळत ठेवाव.थोड्या पाण्यात बेसन कालवून घ्याव व ते
त्यात हळूहळू , गूठळ्या होणार नाही ह्याची काळजी घेत टाकाव. मीठ व साखर/ गूळ चवीप्रमाणे टाकून चांगली उकळी येऊ द्यावी.थोड दाट झाल की कढी तयार.गरम गरम भाताबरोबर किंवा अशीच प्यायला ही मस्त लागते.

वाढणी/प्रमाण: 
खाऊ तसे.
माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा मीच विसरले होते की मी टाकलीये ईथे ही रेसिपी ते.
टोकूरीका अन् अनघा-मीरा विचारत होत्या ना की नारळाच्या दुधाला पर्याय काय कैरीच्या कढीत तेव्हा आठवल की टाकलीये ही रेसिपी मी. लिंक देता येत नाही म्हणून हा धागाच वर काढला.
अनघा-मीरा , केलीस की सांग आवडली का ते.

मी कैरी शिजवून गर काढून त्याची करते. तुपाची फोडणी करते बाकी सेम फोडणी प्लस मेथीदाणे घालते त्यात. बेसन लावून करते.