Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28
कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काल कुहु नॉर्मल बोलत होती.
काल कुहु नॉर्मल बोलत होती. एकदाही ते nerdish smile नव्हतं तिच्या चेहर्यावर. आणि ती चक्क नाइटवेअर मधे होती, तिच्या युनिफॉर्म शलवार कुर्ता मधे नाही.
>>>>
हो आणि गोडं दिसतही होती आणि बोलतही होती
मुक्ताचा अभिनय अतिशय सहज आहे
म्हणजे ती ते काल लाईट बंद कर इतकं सहज म्हणाली की अस वाटलं खरंच ही तीची वहिनी आणि ती हिची नणंद आहे
मुक्ता आधीपासुन मला आवडतेच.
१ आठवडा, एवढे बदलले का सर्व,
१ आठवडा, एवढे बदलले का सर्व, माझा एके काली थोडा फार टीवी इन्दुस्ट्रीशी सम्बन्ध होता तेव्हा हे schedule ३ महीने आधी शूटिंग करतात असे माहित होते
>> 3 mahine aadhi shoot?
>> 3 mahine aadhi shoot? Kahihi. Evadha advancemadhe paisa guntanar, telecast zalyavar channel paisa denar. He marathi serials chya nirmatyala paravadanyasarkha nahiye.
Generally shoot ani telecast madhe 1 wk peksha jast gap nasate.
<<
खरे तर थोडे विषयांतर आहे पण नीधप, तुम्ही टेलिविजन मालिका आणि हा 'व्यवसाय' कसा चालतो ते जरा समजवून सांगणार का वेगळ्या धाग्यात? कुणी हे आधीच लिहिले असेल तर कृपया लिंक द्या.. वाचायला आवडेल..
बघत नाहिये का कोणी आता ही
बघत नाहिये का कोणी आता ही मालिका?
घना आल एकदाचा हैद्राबादहून परत!
आचरटपणाचा कहर आहे Quality
आचरटपणाचा कहर आहे
Quality Walls Selection Ice-cream चा अमुक फ्लेवर आणि तमुक फ्लेवर चांगला हे इतक्या वेळा ऐकलं मागच्या दोन भागात की ही मालिका आहे की अर्ध्यातासाची Quality Walls Selection Ice-cream ची जाहीरात हेच समजेना. "Quality Walls Selection Ice-cream" हे शब्द वीट येईपर्यंत ऐकवले.
Quality Walls Selection
Quality Walls Selection Ice-cream चा अमुक फ्लेवर आणि तमुक फ्लेवर चांगला हे इतक्या वेळा ऐकलं मागच्या दोन भागात की ही मालिका आहे की अर्ध्यातासाची Quality Walls Selection Ice-cream ची जाहीरात हेच समजेना. "Quality Walls Selection Ice-cream" हे शब्द वीट येईपर्यंत ऐकवले.
>>>>
अति अति प्रचंड अनुमोदन
मला पण फार राग आलेला
कालचा भाग आवडला मला
अरे त्यांना तिकडे सेट वर फुकट
अरे त्यांना तिकडे सेट वर फुकट मधे मिळायलं असणार ना, त्याचे असे परतफेड केले
त्याला इन-फिल्म
त्याला इन-फिल्म अॅडव्हर्टायझिंग असे म्हणतात.
हल्ली अनेक सिरीयल्समधे किंवा चित्रपटांच्यातही अनेक वेळेला हे बघायला मिळते. सर्व मालिकांचा खेळ हा स्पॉन्सर्सकडून मिळणार्या पैशांवर चालतो. म्हणून त्याला प्रायोजित मालिका असे म्हणतात.
सर्व लोकप्रिय आणि समकालीन मालिकांमधे हे होत असते.
"Quality Walls Selection
"Quality Walls Selection Ice-cream" हे शब्द वीट येईपर्यंत ऐकवले.>>>> अरे ९ फ्लेव्हर नाही टाकलेस पाठ झालाय आता
१०००
१०००
ते सहज येत असेल तर ठीक. पण
ते सहज येत असेल तर ठीक. पण मुद्दामून इतक्या वेळा म्हणतात की वीट येतो (याला कदाचित इन-फिल्म इरिटेटिंग द ऑडीयन्स म्हणत असावेत). प्रायोजित करायचं असेल तर जाहीराती असतातच की.
वीट येईल इतक्या वेळा ऐकून आम्हाला इतका वैताग आला मी तरी या जन्मात क्वॉलिटी वॉल्स सिलेक्शन आइस्क्रीम खाणार नाही.
बर मग नका खाऊ आणि मालिकाही
बर मग नका खाऊ आणि मालिकाही बघू नका. माझं काय जातंय?
मी आपलं त्या प्रकाराला टेक्निकली काय म्हणतात ते सांगितलं. ते तुम्हाला कसं वाटतं, नाही वाटत याबद्दल मला वैयक्तिकरित्या काहीच म्हणायचे नाही.
(No subject)
राधा घनाच्या प्रेमात पडलिये
राधा घनाच्या प्रेमात पडलिये आणि टिपिकल बायकोसारखी एकीकडे त्याने विचाराव तिला महत्व द्याव अशी अपेक्षाहे करतिये आणि दुसरीकडे स्वतःला समजावतिये सुद्धा की त्यांच सगळ वेगळ आहे
जबरदस्त मालिका आहे......as
जबरदस्त मालिका आहे......as far as फालतुपणा is concerning...
आजचा एपिसोड निव्वळ टीपी...
आजचा एपिसोड निव्वळ टीपी...
अगदी बावळटपणा चालू आहे आज
अगदी बावळटपणा चालू आहे आज
काल मला अभिनेत्री मुक्ता
काल मला अभिनेत्री मुक्ता बर्वे दिसली. ..
आवडत नसेल तर रिमोट आहे ना
आवडत नसेल तर रिमोट आहे ना हातात.... बघत का बसतात तुम्ही ..?
ओळखीतल्या सगळ्याच जणींना
ओळखीतल्या सगळ्याच जणींना अचानक "राधा हे कॅरॅक्टर बर्यापैकी माझ्यासारखं आहे" असं म्हणताना ऐकून आता मग नक्की राधाच्या कॅरेक्टरमध्ये आहेत तरी किती शेड्स असा प्रश्न पडलाय मला बहीण, बायको, मैत्रीण सगळ्यांना आपण राधासारखे आहोत असं वाटतय
नशीब आईला आपण ईला भाटे आहोत असं नाही वाटतय
मी सर्वांना एकच सांगतो मग.... "कुहू जैसी कोई नही"
भंुगा...... रीया नावाच पात्र
भंुगा...... रीया नावाच पात्र आहे ना... आपल्या इथे....
...
भुंग्या
भुंग्या
उद्य मी कुहु नाहिये असुच शकत
उद्य
मी कुहु नाहिये
असुच शकत नाही
हो की नाही रे भुंग्या
हो हो...तुझ्या पेक्शा ती
हो हो...तुझ्या पेक्शा ती सुसाह्य आहे
कोंबड्या
कोंबड्या
आवडत नसेल तर रिमोट आहे ना
आवडत नसेल तर रिमोट आहे ना हातात.... बघत का बसतात तुम्ही .>>>>>>>>>>> +१
तुम्ही ह्या धाग्यावर भांड्त नका बसु रे..बाकीच्यांना उगीच बोअर नका करत जाउ
आनि खरंच कुहु जसै कोई नहीं
कालचा एपिसोड थोडा बोअर होता..कधी कधी आठवण आली माझी ???असे टीपिकल प्रश्न विचारणे म्ह्ण्जे प्रेमात पडल्याचे लक्षणच.
भांडणाचा सीन मस्त झाला आनि तिला समजव्ण्याचा प्रसंग तेवढाच बोअर
जबरदस्त मालिका आहे.
जबरदस्त मालिका आहे. मनोरंजनामधुन समाजसेवेचा संदेश योग्यपणे दिला जात आहे. प्रभावी मांडणी, उत्तम दर्जेदार संवाद, विषयाची समज यात अगदि नेमकेपणाने मांडले आहे. हिंसाचाराचा अतिरेक कोठेहि नाहि. सुंदर शब्द, नादमधुर संगीत जुन्या काळाचीच आठवण करुन देते. प्रत्येकाने आपापली भुमिका चोख सांभाळली आहे. सर्वात कळस चढवला आहे तो राधाच्या आत्याच्या मिस्टरांनी (आतोबांनी) आपल्या वाटेला आलेल्या भुमिकेचे त्यांनी चिज केले आहे आणी त्याला योग्य तो न्याय दिला आहे. आपल्या अप्रतिम अभिनयाने त्यांनी सर्वांचीच मने जिंकली आहेत. त्यांची देहबोलि आणी संवादफेक हे योग्य जागी येतात. त्यांची वेषभुषा आणी मेकअप यांबद्दल गोडबोले यांचे कौतुक.
जाता जाता ...... केरळ चे उत्तम चित्रीकरण, आत्तापर्यत सिनेमा, मालिकांमध्ये न दाखवल्या गेलेल्या निसर्गसुंदर ठिकाणांची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. तसेच घनश्याम हैदराबादला गेलेला असताना त्याची जी मनस्थिती दाखवली आहे ति फारच नैसर्गिक. केवळ घनश्यामवरच आणी त्याच्या हैदराबादेतील वास्तव्याबद्दल जरि मागचे सात/आठ इपिसोड चित्रीत झाले असले तरी ते कथेच्या साठी आवश्यकच होते असे वाटते. हैदराबादचेहि उत्तम चित्रीकरण. घनश्याम ज्या होटेल मध्ये रहातो ते पाहुन याची खात्री झाली कि मराठी मालिकाहि आता कोटिच्या कोटी उड्डाणे करु लागल्या आहेत.
हलकेच घ्या!
चाणक्य.
चाणक्य.
(No subject)
आज खरे खरे भांडण झाले घना आणि
आज खरे खरे भांडण झाले घना आणि राधाचे !
स्वप्नील आणि मुक्ता दोघांची अक्टिंग आवडली.
Pages