"सत्यमेव जयते" - भाग २ (Child Sexual Abuse)

Submitted by आनंदयात्री on 13 May, 2012 - 06:45

दुसर्‍या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील या भागाची लिंक -
http://www.satyamevjayate.in/issue02/

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला आजचा एपिसोड खूप आवडला. एक पालक म्हणून जेव्हा मी विचार करते. तेव्हा या विषयाहून महत्त्वाचा विषय मलातरी कोणताही वाटत नाही.

खूपच सुरेख हाताळणी केलेली आहे विषयांची. विषयाचे सगळेच पैलू नाही स्पर्शू शकत. पण निदान हे विषय पुढे तरी आणले जात आहेत, हेही नसे थोडके. Happy

थोडेसे अवांतर -
आमीर खान खूपच संयत आणि जबाबदारीने अँकरिंग करतो. भाषा, हातवारे यांवर खूप मेहनत घेतलेली दिसते. त्याचा वावर छान वाटतो. एक अभिनेता म्हणून त्याला वेगवेगळ्या भुमिकांमध्ये पाहिले आहे, पण या कार्यक्रमात 'आमीर खान' म्हणूनही तो भावून जातो. खूप सहजतेने, कोणताही आरडाओरडा न करताही लक्ष वेधून घेता येते, हे दाखवून देतो. एपिसोडचा जो अजेंडा आहे, त्याबद्दल त्याने माहिती करून घेतलेली आहे, उगाच लिहून दिलेले संवाद बोलत नाहीये हे सतत जाणवतं.
ग्रेट!!!!!

प्राची, थोडेसे अवांतर>>>
+१

नीट लक्ष देऊन ऐकलं की आमिरचं सूत्रसंचालन आणि इतर कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळणार्‍या सूत्रसंचालनामध्ये qualitative फरक खूप मोठा आहे, हे कळतंय. त्याचा रोल विषयाशी पूर्ण समरस होऊन केलेलं काम वाटतं.

आमीर ने आपल्या पहिल्या पत्नी ला डिवोर्स दिला तेव्हा त्याच्या पहिल्या २ मुलांवर जे इमोशनल अत्याचार झाले त्याचा विचार त्याने केला होता का हो? हा सुद्धा चाईल्ड अब्युज होत नाही का?

>>>>>>अहो १० वर्षाच्या मुलीला शाळेतल्या मुलाशी "तसले" संबंध चालतात ,आणि तुम्ही चाईल्ड सेक्स अब्युज च्या गोष्टी करता?<<<<<<

ह्या दोन्हि वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एकीकडे (कितीहि चुकीचा असला तरी) कंसेंट आहे आणी दुसरीकडे अजाण वयामध्ये झालेले अत्याचार आहेत. शिवाय "तसले" संबंध कुठेहि होत आहेत म्हणुन हे चालेल असं अजीबातच मान्य करता येणार नाहि.

मंदार कात्रे- इतका वेळ तुम्ही सातत्याने आपले मत मांडत होता ते ठीक होते पण आता मात्र शेवटच्या पोस्टमध्ये कहर केला. १० वी तल्या मुलीने ----------इ. ----कहर आहे हो तुमच्या तुलनाशक्तीचा- तुम्ही हे म्हणत आहात का की आजच्या एपिसोडमध्ये दिलेले लोक 'बळी' नव्हते पण त्यांच्या इच्छेने ते घडले होते??
कसली विकृत, अन अघोगामी विचारसरणी ही? आपला मुद्दा दामटायला या थराला उतरू नका हो!!! त्या बळी पडलेल्या लोकांशी संवेदनाशीलता दाखवायला नको असेल तर राहू द्यात पण निदान काही तरी बकू नका.

मुळात गर्भहत्या झाली नाही तर बालकं जन्माला येणार. त्यांना सुरक्षित बालपण मिळणं हा पुढला अतिशय महत्त्वाचा टप्पा. मग शिक्षण, पाण्याचा प्रश्न हे सगळे येणार. असो.

आमीर ने आपल्या पहिल्या पत्नी ला डिवोर्स दिला तेव्हा त्याच्या पहिल्या २ मुलांवर जे इमोशनल अत्याचार झाले त्याचा विचार त्याने केला होता का हो? हा सुद्धा चाईल्ड अब्युज होत नाही का? >>> मीरा जोशी, हे असं सरसकट विधान नाही करू शकत. आईवडिलांच्या मतभेदामुळे जर घरातील वातावरण बिघडत असेल तर मुलांवर तेवढाच वाईट परिणाम होऊ शकतो. घटस्फोट हा काही उपाय नाही पण त्याबद्दल प्रत्येक केसप्रमाणे वेगळे निष्कर्ष काढता येतील.

लहान मुलनना आपण जोराने ओरडलो तरि त्यान्च्या मनावर गम्भीर परिनाम होतात .....................
पण .....समजाला शिस्त जो पर्यन्त लाग्त नाहि ...तो पर्यन्त अस्ले शोस म्हन्जे निव्वल मनोरन्जन .............

सगले बेशिस्त

घाम -- शिस्त कोण लावणार- आपणच- समाज अभियानातून, अन हा कार्यक्रम तुम्हाला मनोरंजन वाटतो तर दुर्दैव आहे

सामाजिक समस्यान्वर नुस्ते ति.व्हि.शोस ..करने वेगले .......आनि खरोखर ...समाजिक कार्य करने वेगले ..................आमिर खान ला १ शो चे ३.७७ करोड रुपये मिल्तात ........त्यातिल किति पैसे तो समाजिक कामाला लावनार आहे ?

या दोन्हीतील तुम्ही कुठले करता व ह्या प्रथा तोडण्यासाठी तुम्ही स्व्तः करणार आहात ते सांगा. मी माझ्या वैयक्तिक पातळीवर माझ्या ओळखीच्या लोकांचा ग्रूप बनवून प्रबोधन करणार आहे, व त्यांना परावृत्त करणार आहे, एस एम एस पाठवित आहे, सरकारला पत्र पाठविणार आहे. तुम्ही असे काही तरी करा मग एवढे नकारात्मक विचार येणार नाहीत

भारतिय मानसाच्या भावना लगेच जाग्रुत होतात्.............याच गोश्तिचा फाय्दा घेउन .पैसे कमावन्याचा धन्दा आहे हा ..............कारन शेवति निश्पन्न काहिच होनार नाहि .....लोक ४ दिवस दयालु मायालु होतिल्. नन्तर एखद्या गरिबाला १ वेलचे अन्न द्याय्ला पन कोनि तयार होनार नाहि.....

Speechless ! अतिशय संयत सादरीकरण. आमीर, सहभागी होणारे लोकं, श्रोते इतकंच नव्हे तर सरप्राईज पाहुणी श्रीदेवी हिलाही विषयाच्या गांभीर्याची पूर्ण जाणीव होती हे अतिशय आवडले.
चर्चेतले सगळेच मुद्दे ( मुलांच्या वर्कशॉपसकट ) महत्वाचे होते पण जो लैंगिक शोषणाला बळी पडतो त्याने कुठल्याही प्रकारच्या लाज आणि अपराधी भावनेला मनात थारा देऊ नये, लाज शोषण करणार्‍याला वाटली पाहिजे हा संदेश फार फार महत्वाचा आहे. केवळ लोकं काय म्हणतील ह्या भावनेपायी लैंगिक शोषणावर बोलणे टाळायची, लपवून ठेवायची वृत्ती आपल्या समाजात दिसते. हे त्या व्यक्तीचे दुहेरी शोषण आहे आणि ह्यामुळे अ‍ॅब्यूज करणार्‍याचे फावते. ही मानसिकता बदलणे ही शोषणाला आळा घालण्याची पहिली आणि फार मोठी पायरी आहे.

लैंगिक शोषण हे जवळच्या व्यक्तींकडून होतेच पण खुद्द वडिलांकडूनही झाल्याच्या बर्‍याच केसेस वाचल्या आहेत. ह्या मुद्द्यावर मात्र अजिबातच बोलले गेले नाही. कदाचित भलत्याच वादाला सुरुवात होऊन मूळ मुद्दे मागे राहतील असे वाटले असावे.

माझ्या प्रतिक्रियेवर त्रागा होणारच ,हे माहित होतेच,, पण हेही विसरू नका कि मी पहिल्या भागा बद्दल आमिरची तोंड फाटे पर्यंत स्तुती केलेली होती ,

तुषार तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभार ....जर खरोखर आमीर ला समाजात बदल अपेक्षित असेल तर त्याने अधिक महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे

मीराजी इथे आमोर च्या वैयक्तिक आयुष्यावर टीका करण्या पेक्षा आजच्या विषयाबद्दल बोलणे अधिक जरुरीचे आहे

असो

हो पण त्याची पहिली आणि दुसरी पण पत्नी हिंदूच होती नां ? या लव्ह-जिहाद ला बळी पडलेल्या हिंदू महिलांना कोणी त्राता आहे का?शाहरुख ची पण पत्नी हिंदूच ! या मुस्लीम लोकांना हिंदूच मुली का आवडतात?

मीराजी तुम्ही विषयाला निराला रंग देत आहात , मंदार कात्रे जी तुमचा मुद्दा काही अंशी खरा आहे , चाईल्ड सेक्स अब्युज हा मुद्दा महत्त्वाचा आहेच ,पण इतर मुद्दे ज्यास्त महत्त्वाचे ही आहेत

<<<<<आमीर ने आपल्या पहिल्या पत्नी ला डिवोर्स दिला तेव्हा त्याच्या पहिल्या २ मुलांवर जे इमोशनल अत्याचार झाले त्याचा विचार त्याने केला होता का हो? हा सुद्धा चाईल्ड अब्युज होत नाही का? >>>

असं असेल तर कोणालाच काहिच बोलण्याचा हक्क राहणार नाही. म्हणजे त्या गोष्टीतल्या सारखं होईल ना की जो कधीच खोटं बोलला नसेल त्यानेच दगड मारावा.

शिवाय घटस्फोटीत असणं हा काहि गुन्हा असु शकत नाहि. काहि वेळा एकत्र राहल्यामुळे जास्त नुकसान होउ शकतं मुलांचं.

हा अगदीच ओढुन ताणून केलेला प्रयत्न वाट्तो आहे समर्थन न देण्याचा.

या मुस्लीम लोकांना हिंदूच मुली का आवडतात?

शाहरुख, आमीर.. सलमानला का विसरलात हो? सलमानचे वडील मुस्लिम, आई हिंदु , तोही लव जिहादच का? Proud

आणि बाजीराव - मस्तानी याला काय म्हणायचे हो?

विषय बदलतो आहे. मुळ विषय Child Sexual Abuse हा आहे.
घटस्फोटाने इमोशनल अब्युस झाला असेल / होत असेल तरीही सध्याचा विषय तो नाही. लहान मुलांचे लैंगिक शोषण हा मुद्दा आहे.
आजचा भाग पाहीला. टक्केवारी पाहुन पुन्हा एकदा धक्का बसला. खरे अनुभव सगळ्यांसमोर सांगणार्‍यांच्या हिंमतीला दाद.

चाईल्ड सेक्स अब्युज हा मुद्दा महत्त्वाचा आहेच ,पण इतर मुद्दे ज्यास्त महत्त्वाचे ही आहेत>>> कोणते मुद्दे जास्त महत्त्वाचे आहेत, आणि ते तुम्ही कसे ठरवले?

मीरा कोणाला कोण आवडेल याचा आमीर खान च्या कालच्या एपिसोड शी काय संबंध? शिवाय घटस्फोटा मुळे मुलांवर होणारे भावनीक अन्याय आणि चाईल्ड अब्यूस हे पण फार वेगळे विषय.
काही वेळा एकत्र न राहता वेगळे राहून आई वडील मुलांना जास्त चांगली अपब्रिंगिंग देऊ शकतात.

पहिल्या आणि या भागातदेखील, न्यायाधिशांनी काढलेले उदगार अतिभयानक होते. असे उदगार सांगणारे वकीलच होते त्यामूळे ते खरेच असणार. खरे तर असे उदगार कुठेही रेकॉर्डवर येत नाहीत.
(पण साक्षीदाराचा पिंजर्‍यात ऊभे राहून बोललेले सर्वच रेकॉर्डवर घेतले जाते.)

हा प्रश्न एवढा गम्भिर असेल असे वाटले नव्हते. शिक्शण व सन्स्कार ह्या कडे आपण दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम समाजात सर्वान्नाच भोगावे लागणार. अगदि लहान मुलान्ना सुद्धा.

एक पालक म्हणून जेव्हा मी विचार करते. तेव्हा या विषयाहून महत्त्वाचा विषय मलातरी कोणताही वाटत नाही. >>>अगदी
फुलपाखरासारखी बागडणारी मुले, पाच मिनिटे नजरेआड झाली तर, मनात काय चलबिचल होते, याचा
अनुभव आपण सगळ्यांनी घेतलाच आहे,>>>अनुमोदन

सामाजिक समस्यान्वर नुस्ते ति.व्हि.शोस ..करने वेगले .......आनि खरोखर ...समाजिक कार्य करने वेगले ..................आमिर खान ला १ शो चे ३.७७ करोड रुपये मिल्तात ........त्यातिल किति पैसे तो समाजिक कामाला लावनार आहे ?>>>>>१० करोड मिळाले तरी हरकत नाही. जाहिरात आणि फालतू कार्यक्रम करणार्या लोकांनाही मिळतात कि करोड रुपये.. मग लोकांनसमोर प्रश्न मांडले, प्रबोधन केले तर बिघडले कुठे?
child abuse चे बिल पडुन आहे गेले १ वर्ष राज्यसभेत आमीर त्याबद्दल पाठपुरावा करणार आहे.......आणि आजच्या भागाचा परिणाम म्हणून लवकरात लवकर ते बिल पास झाले तरी खुप आहे.

.

Pages