गीत गाया पत्थरोने...

Submitted by जिप्सी on 10 May, 2012 - 01:44

बिर्ला मंदिर (शहाड)
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११
शिवमंदिर (अंबरनाथ)
प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८
महालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)
प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१
कान्हेरी गुंफा (बोरीवली, मुंबई)
प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०
कमलानारायण मंदिर (कर्नाटक)
प्रचि ४१
कार्ला लेणी (लोणावळा)
प्रचि ४२

प्रचि ४३
भाजे लेणी (लोणावळा)
प्रचि ४४
[

गुलमोहर: 

सुंदर !

अप्रतिम!!! पहिलं प्रचि तर क्लास आहे. कमनिय बांधा, अर्धोन्मिलीत नेत्र अशी आपल्याकडल्या शिल्पकलेची खासियत.
प्रचि ६ मधली पाठमोरी स्त्री पायातला काटा काढतेय का? Happy तिच्या अंबाड्याची स्टाईल, त्यावरचं/ की कानातलं ते फुल ..किती बारकावे पकडलेत शिल्पकाराने!! व्वा!

एक तर या माणसाला काही कामधंदा नसावा किंवा ह्याला घरच्यांनी कॅमेर्‍यावर सोडून दिल असाव... कित्ती त्रास सहन करायचा आम्ही.

हॅ. असे नसते रे जिप्स्या. आम्ही हे सगळे पहातो तेव्हा ते एकतर दिसत नाही वा इतके सुंदर असल्याचे लक्षात येत नाही. तेच तु कॅमेरातुन दाखवतोस अन दिसते वर सुंदर पण दिसते.

काय करतोस काय तु?

एक तर या माणसाला काही कामधंदा नसावा किंवा ह्याला घरच्यांनी कॅमेर्‍यावर सोडून दिल असाव... कित्ती त्रास सहन करायचा आम्ही.

हो ना... आम्ही भटकाय्ला गेल्यावर तर मनात आधी येतं की जिप्स्या आजुबाजुला नै ना. उगाच आम्ही फोटो टाकाय्च्या आधीच हा टाकुन मोकळा. मग आमचे फोटो आम्हालाच लाजवतात. Sad

(एकदा अ॑संच भटकायला गेल्यावर चक्क भेटलाय सुद्धा तो, तेव्हा पासुन मी फोटोच काढत नाही कुठं गेल्यावर. Sad जाउदे, काढुन काय कराय्चे योग्यासुद्धा इथेच कुठे तरी असेल म्हणुन. )

एक तर या माणसाला काही कामधंदा नसावा किंवा ह्याला घरच्यांनी कॅमेर्‍यावर सोडून दिल असाव... कित्ती त्रास सहन करायचा आम्ही.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>

Proud

तेव्हा पासुन मी फोटोच काढत नाही कुठं गेल्यावर
>>>>>>>>>>>>

मी पण आता गणपतिपुळे आणि कोकण ट्रीपचे नाहि काढलेत..... कारण जिप्स्याने आधीच सगळे टाकलेत. त्याचेच जुने लेख वाचून मित्राला मांसाहारी खायचं होतं म्हनून जिप्सीने सांगितलेल्या "आमंत्रण" मध्ये नेलं रत्नागिरीला........ जिप्सीला सगळ्यांनी भरभरून धन्यवाद दिले.....

मी गणरायाला साकडं घातलय....... लवकर लग्न कर रे जिप्सीचं..... सालं बघवत नाही दर शनिवार रविवार कुठेतरी भटकून फोटो टाकतो ते Proud Sad

जिप्सीच्या प्र.चि. ना आता केवळ 'सुंदर' म्हणणे म्हणजे त्या विशेषणाच्या व्याप्तीत न बसणारी प्रतिक्रिया होईल.

मी प्रत्यक्ष पाहिली आहेत पहिली दोन्ही ठिकाणे (शहाड आणि अंबरनाथ) शिवाय कोल्हापूरचाच असल्याने अंबाबाई मंदिराबाबत प्रश्नच नाही. या निमित्ताने मी सांगू इच्छितो की जिप्सींच्या प्र.चि.त दिसणारी ही तिन्ही मंदिरे 'हेमाडपंथी' बांधकामाची उत्कृष्ट नमुने आहेत. शिल्पकलेचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अशी मंदिरे म्हणजे एक प्रकारचे 'विद्यापीठ' च होत...आजही आहेच.

१३ व्या शतकातील रामदेवरायांच्या दरबारी असलेले हेमाद्री पंडित याना राज्यकारभाराबरोबरीनेच साहित्य आणि शिल्पकलेत विशेष रुची होती...अर्थात खोलवर अभ्यासही होताच. देशबांधवात असलेला ईश्वराप्रती भक्तीभाव लक्षात घेऊन हेमाड पंडितानी 'देवालये' हा विषय आपल्या शिल्पकलेसाठी निवडला ज्याला वेळोवेळी राजसत्तेनेही आवश्यक ती सर्व मदत केली. ....त्यांच्या स्मृतीसाठीच या बांधकामांला 'हेमाडपंथी देवालय' असे नाव प्रदान करण्यात आले.

भारतीयांची धार्मिकवृत्ति व तीर्थयात्रेमागील भक्तिभाव लक्षात घेवून त्यानी ठिकठिकाणी, देवालय बांधण्याचचे व्यापक कार्य हाती घेतले. त्यात स्वत:चा खास असा ठसा उमटविला. मंदिर बांधकामात चुन्याचा वापर न करता केवळ दगडात मंदिर बांधण्याची पद्धत हेमाद्री पंडिताने सुरु केली. ही देवालये ' हेमाडपंथी' म्हणून शिल्प वैशिष्ट्यांनी प्रसिद्ध झाली. महाराष्ट्र व अन्य प्रांतात आजही ही देवालये बाराव्या-तेराव्या शतकातील वैभवशाली शिल्पकलेचा, स्थापत्याचा उत्तम बोलका पुरावा आहे. आपल्या बांधकामासाठी हेमाड पंडिताने जी वैशिष्ट्ये जोपासली ती आज काळाच्या ओघातही बांधकामाच्या टिकावूपणाचा एक आदर्श मानली जातात. हेमाड पंडितानी मूर्त्यांच्या बांधणीत घडवलेल्या दगडांमध्ये चुना किंवा त्याप्रकारचा दर्जा न भरता दगडच वेगवेगळ्या कोनातून कापून, त्यांनाच खुंट्या आणि खाचा पाडून ते एकमेकांत घट्ट बसू शकतील अशी रचना केली...जी कालौघात एकसंध उभीही राहीली आणि आश्चर्यकारकरित्या टिकाऊही बनली.

(खास जिप्सीसाठी एक सूचना : या विषयाच्या प्रकाशचित्रांची तुम्हाला अधिक ओढ लागावी म्हणून खालील मंदिरांची नावे तुमच्या वहीत नोंदवून ठेवा. मी पाहिली आहेत ही स्थळे....पण दुर्दैवाने तुमच्या कॅमेर्‍याची जादुमय लेन्स माझ्या डोळ्यांना नसल्याने मी या स्थळांच्या ठिकाणी असलेल्या देखण्या मूर्तींचे सौंदर्य रेकॉर्ड करू शकलो नाही....तुम्ही ते जरूर कराल.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, आणि झोडगे [इथेच आणखीन् एक आहे, पण आता या क्षणी नाव विसरलो त्या गावाचे....पण सिन्नर इथेच ती माहिती मिळू शकते]
नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे, रतनवाडी.
धुळे जिल्ह्यातील बलसाणे आणि मेथी.
जळगाव जिल्ह्यातील चांगदेव व वाघाळी. [मी गेलो होतो पाचोर्‍याच्या एका मित्रासमवेत, त्यावेळी रस्ते खूप खराब होते....जावे की परत फिरावे असेही मनात आले, पण रेटून गेलोच. आज ती परिस्थिती नसावी अशी आशा आहे.]
सातारा जिल्ह्यातील फलटण.....हे तर खूप सुंदर आहे.

तुम्हाला आणि तुमच्या कॅमेर्‍याला भावतील ही सारी शिल्पकलेची उत्कृष्ठ उदाहरणे.

अशोक पाटील

मी गणरायाला साकडं घातलय....... लवकर लग्न कर रे जिप्सीचं..... सालं बघवत नाही दर शनिवार रविवार कुठेतरी भटकून फोटो टाकतो ते >>> ये हुइना बात. ( @भूंगा, गणराया पेक्षा वीणा पाटिलांना साकड घाल असे जिप्सी म्हणेल बहुदा, म्हणजे मग तो नी त्याच्या दोन्ही बायका फुकट फिरत बसले तर इथे सगळे अजुन बोंबा मारतील.)

हो ना... आम्ही भटकाय्ला गेल्यावर तर मनात आधी येतं की जिप्स्या आजुबाजुला नै ना. >>> +१. आजकाल कुठेही फिरताना हाच विचार येतो मनात की योगेशला सांगुन इथे धाडला पाहीजे फोटो काढुन ये म्हणुन.

सुंदरच! अप्रतिम! Happy
शिल्प, कलाकारी आणि प्रचिकारी सर्वच स्मित>>>>>>>>>>+१ Happy
अशोक पाटील धन्यवाद! खूप छान माहिती दिलीत. Happy

अप्रतिम!!! पहिलं प्रचि तर क्लास आहे. कमनिय बांधा, अर्धोन्मिलीत नेत्र अशी आपल्याकडल्या शिल्पकलेची खासियत.
प्रचि ६ मधली पाठमोरी स्त्री पायातला काटा काढतेय का? स्मित तिच्या अंबाड्याची स्टाईल, त्यावरचं/ की कानातलं ते फुल ..किती बारकावे पकडलेत शिल्पकाराने!! व्वा!>>>>> मी _आर्या - अनुमोदन....

हॅ. असे नसते रे जिप्स्या. आम्ही हे सगळे पहातो तेव्हा ते एकतर दिसत नाही वा इतके सुंदर असल्याचे लक्षात येत नाही. तेच तु कॅमेरातुन दाखवतोस अन दिसते वर सुंदर पण दिसते.

काय करतोस काय तु?>>>>> मोनालिप - अनुमोदन...
अशोकजींनाही खूप धन्यवाद - एरव्ही सगळ्या जुन्या देवालयांबद्द्ल स्थानिकांना विचारल्यास - "पांडवांनी एका रात्रीत बांधलंय... माहितीये का" या वाक्यापलिकडे जात नसत......

अप्रतिम प्रचि आणि अत्यंत समर्पक शीर्षक! जियो जिप्सी. Happy

जिप्सी, शहाडच्या मंदिराच्या पायर्‍या चढताना दोन्ही बाजूला असलेलं ते सुप्रसिध्द शिल्प आहे त्याचा फोटो काढला असशील तर टाक ना. हत्ती आणि सिंहाचं एकत्र असलेलं शिल्प. एका बाजूनं पाहिलं तर हत्ती सिंहाला गिळत आहे असं दिसतं तर सिंहाच्या बाजूनं पाहिलं तर सिंह हत्तीला गिळत आहे असं दिसतं.

शहाडच्या मंदिराच्या बाहेर थोड्या थोड्या अंतरावर दहा अवतारही कोरलेले आहेत. देवळाला पूर्ण प्रदक्षिणा घातल्यावर ते दहा अवतार दिसतात.

अनबिलेवबल!!!!!! या आर्ट बरोबर जिप्स्याची आर्ट पण मति गुंगवून टाकणारीये..

अशोकजी, आभार ,खूप छान माहिती!!

@ इंद्रधनुष्य
~ 'अमृतेश्वर' ? अरेच्या हे मी पाहिले नाही. सुटले की काय नगरच्या भ्रमंतीत. नेमके कुठे आहे हे सांगाल प्लीज ?

[नाशिक जिल्ह्यातही सिन्नर आणि झोडगे या दोन गावाशिवाय आणखीन् तिसरे एक गाव आहे अशा हेमाडपंथी शिल्पकलेच्या अभ्यासकांसाठी....ते गाव इथे कुणाला माहीत असल्यास कृपया प्रतिसादात उल्लेख करावा.]

अशोक पाटील

Pages