ऑल फॉर चॅरिटी बेकिंग चॅलेंज -"बेस्ट इन शो"
दर वर्षी मे महिन्यात आमच्या ऑफिसमधे चॅरिटी साठी बेकिंग चॅलेंज असते. यावर्षीही जास्तीतजास्त लोकांनी या चॅलेंजमधे भाग घ्यावा म्हणून मागच्या तीन एक आठवड्यांपासुन सोशल क्लबच्या रिमाईंडर इमेल्स येत होत्या.
मागची दोन-तीन वर्ष मी भाग घेइन घेइन म्हणायचे पण जमलं नाही कारणं त्यासुमारासचं माझ्या लेकीचाही वाढदिवस असतो आणि त्याचे केक (किमान २ तरी - एक शाळेसाठी आणि एक घरच्यासाठी) करण्यात माझा सगळा दम निघालेला असतो पण यंदा लेकीचा वाढदिवस आणि हे चॅलेंज यात आठवडाभर वेळ होता त्यामुळे फायनली या चॅलेंज मधे भाग घेतला.....
....आणि त्यात मला चक्क पहिले बक्षिस तसचं 'बेस्ट इन शो' चं अवॉर्ड पण मिळालं
तुमच्या बरोबर माझे हे पहिले वहिले केक बेकिंग - डेकोरेटिंग अवॉर्ड शेअर करत आहे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
बेक ऑफ साठी 'सध्या बातम्यात असलेले इश्युज, मुख्य घटना इ.' अशी सर्वसाधारण थीम होती.
मागच्याच महिन्यात आमच्या लोकल गव्हर्नमेंटने 'सोलर फार्मिंग' करता जागा उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली. मग मी हिच थीम घेऊन केक डेकोरेट करायचे ठरवले सस्टेनेबिलिटी / एनर्जी एफिशियन्सी - हा देखिल सर्वात चर्चिला जाणारा मुद्दा आहेच.
१. सर्वप्रथम 'चॉक वॅनिला स्वर्ल' केक बनवला. केक मुद्दाम लेव्हल केला नाही कारण फार्मवर थोडे चढ उतार हवेतच ना? फार्मवर गवत म्हणून हिरवे बटर आयसिंग चोपडले... आता फार्म आहे म्हणजे जमिन एकदम गुळगुळीतही नको आणि लॉन पण एकदम मॅनिक्युअर्ड नको... म्हणुन आयसिंग थोडे खडबडीतच केले...
२. सोलर फार्मिंग करायचे मग त्या निर्मीत उर्जेचा कुठेतरी वापर झालेला दाखवायला हवा ना??? म्हणून मग घर बांधायचे ठरवले हे आमचे प्रिकास्ट घर रिसाय्क्लेबल (पुठ्ठ्याचे) आहे बर का घर ठेवायला पाया/प्लिंथ हवी म्हणून फार्मात जागा करुन त्यावर प्लिंथ बांधली.
३. सोलर पॅनल्स ची जागा निश्चित केली आणि फार्मात वायरींग करुन घेतले.
४. घराच्या जागेवर देखिल 'कन्सिल्ड' वायरींग करुन घेतले. त्याचे टेस्टिंग देखिल केले
५. घर आणि परीसर सुंदर दिसायला हवा म्हणुन घराभोवती 'लँडस्केपिंग' देखिल केले
६. शेवटी सगळी सोलर पॅनल्स बसवली, तयार घर क्रेन ने उचलुन पायावर चिकटवले आणि वायरी कनेक्ट केल्या
७. एक बटण दाबताच आमचे घर सौर्य उर्जेच्या प्रकाशाने उजळुन निघाले
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
* यंदाची चॅरिटी होती 'लाईफ लाईन'. चॅलेंज मधे केलेले केक्स्/पेस्ट्रीज इ इ ऑक्शन करतात. यंदा ३० एक एंट्रीज होत्या. एकंदर $९०० जमा झाले. मझ्या केकला $९५ देऊन विकत घेतले
'लाईफ लाईन' ही चॅरिटी क्रायसिस सपोर्ट, स्युसाईड प्रिवेन्शन, मेंट्ल हेल्थ सपोर्ट, डिप्रेशन, अँग्झायटी इ इ साठी ऑन लाईन आणि टेलिफोन काऊन्सेलिंग देते. काम करणारे सगळेच वॉलेंटीयर्स असतात. आणि सर्व संभाषण कॉन्फिडेन्शियल असते. बोलणारा आणि ऐकणारा दोघांनाही एकमेकांची ओळख नसते.
'लाईफ लाईन' बद्दल http://www.lifeline.org.au/ इथे अधिक माहिती मिळेल.
*केक व डेकोरेशन यात काय मुख्य घटक आहेत ते लिहीणे बंधनकारक असते कारण इथे बर्याच लोकांना डेअरी, नट्स इ इ च्या अॅलर्जी असतात.
मी पैली .........मी
मी पैली .........मी पैली!
लाजो..........धन्य आहेस बाई!
वा !
वा !
अभिनंदन, अभिनंदन!! सोलर
अभिनंदन, अभिनंदन!!
सोलर पॅनल्स कशाची आहेत?
वॉव लाजो, लय भारीये हे सगळं,
वॉव लाजो, लय भारीये हे सगळं, खूप खूप अभिनंदन
व्वा मस्त ! ती सोलार पॅनल्स
व्वा मस्त ! ती सोलार पॅनल्स गट्टम करता येतील.
अभिनंदन लाजो !
अप्रतिम डोकॅलिटी! अभिनंदन!
अप्रतिम डोकॅलिटी! अभिनंदन!
वॉव ला>>जो.. तुला कडकडून मिठी
वॉव ला>>जो.. तुला कडकडून मिठी मारून अभिनंदन...
सो सो सो हॅप्पी न प्राऊड ऑफ यू!!!!!!!!!!!!
व्वॉव ! लाजो अभिनंदन.
व्वॉव !
लाजो अभिनंदन.
अभिनंदन लाजो! सुंदर केक! भारी
अभिनंदन लाजो!
सुंदर केक! भारी कल्पना आहेत!
लाजो अहं साष्टांग नमस्कारम
लाजो अहं साष्टांग नमस्कारम करीश्चे!
किती गं बाई ती खटपट! केक दिसायला भारीच आहे....खायला मिळाला तर दुग्धशर्करा योगच म्हणायचा
असेच सुंदर सुंदर केक बनवत जा आणि आम्हाला (किमान) नेत्रसुख तरी मिळूदेत!
केक आणि त्यावरच्या सजावटीची
केक आणि त्यावरच्या सजावटीची कल्पना एकदम मस्त आहे. अभिनंदन.
बाकीच्यांच्या केकचे फोटो काढलेस की नाही, जमले तर ते पण डकव इकडे.
अभिनंदन. फॅब्युलस केक्स मध्ये
अभिनंदन. फॅब्युलस केक्स मध्ये शोभण्यासारखा आहे. प्रोफेशनल बनण्याचा जरूर विचार करा.
अभिनंदन
अभिनंदन लाजो!!!!!!!
__/\__
फॅब्युलस केक्स मध्ये शोभण्यासारखा आहे. प्रोफेशनल बनण्याचा जरूर विचार करा>>>>+१
अभिनंदन लाजो. अप्रतिम
अभिनंदन लाजो.
अप्रतिम इनोव्हेशन आहे.
भारी कल्पना लाजो. तुझ्या
भारी कल्पना लाजो. तुझ्या कल्पनाशक्तीची पुन्हा एकवार प्रचिती दिलीस. आणि केकही नेटका दिसतोय. मस्तच.
लाजो, अभिनंदन अफाट
लाजो, अभिनंदन अफाट कल्पनाशक्ती आहे तुझी.
अभिनंदन लाजो !!!!!!
अभिनंदन लाजो !!!!!!
तुझ्या कल्पनाशक्तीला सलाम
तुझ्या कल्पनाशक्तीला सलाम !
अभिनंदन
धन्य हो माते !!! अप्रतिम आहे
धन्य हो माते !!! अप्रतिम आहे हा केक
सुपर्ब ! अभिनंदन लाजो
सुपर्ब ! अभिनंदन लाजो
लोटांगण __/\__
लोटांगण __/\__
सही लाजो अभिनंदन!
सही
लाजो अभिनंदन!
बापरे...लाजो! ____/\___
बापरे...लाजो! ____/\___ दंडवत.
आणि हार्दीक अभिनंदन!
लाजो प्रचंड कल्पक आहेस तू. हे
लाजो प्रचंड कल्पक आहेस तू. हे सगळं एकटीने केलस? आणि टोटल किती वेळ लागला? स्पर्धेच्या ठिकाणी घेऊन कसं गेलिस?
हॅट्स ऑफ्फ!
काय डोकेबाज अन मेहेनती आहेस ग
काय डोकेबाज अन मेहेनती आहेस ग तू ? खूप कौतुक अन अभिनंदन.
लाजो ________/\________
लाजो ________/\________
अभिनंदन लाजो...अमा+१
अभिनंदन लाजो...अमा+१
लाजो, अभिनंदन!! मूळ कल्पना
लाजो, अभिनंदन!!
मूळ कल्पना आणि तुझे सादरीकरण दोन्ही एकदम मस्त
मस्त! मस्त!!! लाजो,
मस्त! मस्त!!!
लाजो, मनःपुर्वक अभिनंदन!!
अग येणारच तू पहीली कलाच आहे
अग येणारच तू पहीली कलाच आहे तुझ्याकडे अशी बेकींगची. तुझे हार्दिक अभिनंदन. आता आमचे इथे क्लासेस चालू कर.
Pages