ऑल फॉर चॅरिटी बेकिंग चॅलेंज २०१२ -"बेस्ट इन शो"

Submitted by लाजो on 7 May, 2012 - 22:27

ऑल फॉर चॅरिटी बेकिंग चॅलेंज -"बेस्ट इन शो"

दर वर्षी मे महिन्यात आमच्या ऑफिसमधे चॅरिटी साठी बेकिंग चॅलेंज असते. यावर्षीही जास्तीतजास्त लोकांनी या चॅलेंजमधे भाग घ्यावा म्हणून मागच्या तीन एक आठवड्यांपासुन सोशल क्लबच्या रिमाईंडर इमेल्स येत होत्या.

Bake off.png

मागची दोन-तीन वर्ष मी भाग घेइन घेइन म्हणायचे पण जमलं नाही कारणं त्यासुमारासचं माझ्या लेकीचाही वाढदिवस असतो आणि त्याचे केक (किमान २ तरी - एक शाळेसाठी आणि एक घरच्यासाठी) करण्यात माझा सगळा दम निघालेला असतो Proud पण यंदा लेकीचा वाढदिवस आणि हे चॅलेंज यात आठवडाभर वेळ होता त्यामुळे फायनली या चॅलेंज मधे भाग घेतला.....

....आणि त्यात मला चक्क पहिले बक्षिस तसचं 'बेस्ट इन शो' चं अवॉर्ड पण मिळालं Happy

तुमच्या बरोबर माझे हे पहिले वहिले केक बेकिंग - डेकोरेटिंग अवॉर्ड शेअर करत आहे Happy

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बेक ऑफ साठी 'सध्या बातम्यात असलेले इश्युज, मुख्य घटना इ.' अशी सर्वसाधारण थीम होती.

मागच्याच महिन्यात आमच्या लोकल गव्हर्नमेंटने 'सोलर फार्मिंग' करता जागा उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली. मग मी हिच थीम घेऊन केक डेकोरेट करायचे ठरवले Happy सस्टेनेबिलिटी / एनर्जी एफिशियन्सी - हा देखिल सर्वात चर्चिला जाणारा मुद्दा आहेच.

solar6.JPG

१. सर्वप्रथम 'चॉक वॅनिला स्वर्ल' केक बनवला. केक मुद्दाम लेव्हल केला नाही कारण फार्मवर थोडे चढ उतार हवेतच ना? फार्मवर गवत म्हणून हिरवे बटर आयसिंग चोपडले... आता फार्म आहे म्हणजे जमिन एकदम गुळगुळीतही नको आणि लॉन पण एकदम मॅनिक्युअर्ड नको... म्हणुन आयसिंग थोडे खडबडीतच केले... Happy

२. सोलर फार्मिंग करायचे मग त्या निर्मीत उर्जेचा कुठेतरी वापर झालेला दाखवायला हवा ना??? म्हणून मग घर बांधायचे ठरवले Happy हे आमचे प्रिकास्ट घर रिसाय्क्लेबल (पुठ्ठ्याचे) आहे बर का Happy घर ठेवायला पाया/प्लिंथ हवी म्हणून फार्मात जागा करुन त्यावर प्लिंथ बांधली.

३. सोलर पॅनल्स ची जागा निश्चित केली आणि फार्मात वायरींग करुन घेतले.

४. घराच्या जागेवर देखिल 'कन्सिल्ड' वायरींग करुन घेतले. त्याचे टेस्टिंग देखिल केले Happy

solar8.jpg

५. घर आणि परीसर सुंदर दिसायला हवा म्हणुन घराभोवती 'लँडस्केपिंग' देखिल केले Happy

solar4.JPG

६. शेवटी सगळी सोलर पॅनल्स बसवली, तयार घर क्रेन ने उचलुन पायावर चिकटवले आणि वायरी कनेक्ट केल्या Happy

solar5.JPG

७. एक बटण दाबताच आमचे घर सौर्य उर्जेच्या प्रकाशाने उजळुन निघाले Happy

solar7.JPG

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

* यंदाची चॅरिटी होती 'लाईफ लाईन'. चॅलेंज मधे केलेले केक्स्/पेस्ट्रीज इ इ ऑक्शन करतात. यंदा ३० एक एंट्रीज होत्या. एकंदर $९०० जमा झाले. मझ्या केकला $९५ देऊन विकत घेतले Happy

'लाईफ लाईन' ही चॅरिटी क्रायसिस सपोर्ट, स्युसाईड प्रिवेन्शन, मेंट्ल हेल्थ सपोर्ट, डिप्रेशन, अँग्झायटी इ इ साठी ऑन लाईन आणि टेलिफोन काऊन्सेलिंग देते. काम करणारे सगळेच वॉलेंटीयर्स असतात. आणि सर्व संभाषण कॉन्फिडेन्शियल असते. बोलणारा आणि ऐकणारा दोघांनाही एकमेकांची ओळख नसते.

'लाईफ लाईन' बद्दल http://www.lifeline.org.au/ इथे अधिक माहिती मिळेल.

*केक व डेकोरेशन यात काय मुख्य घटक आहेत ते लिहीणे बंधनकारक असते कारण इथे बर्‍याच लोकांना डेअरी, नट्स इ इ च्या अ‍ॅलर्जी असतात.

गुलमोहर: 

मस्तच Happy

वॉव! ़किती मस्त बनवलाअयेस. लाइट्सची कल्पना खूप आवडली. चॅरटीतया ९०० डॉलर्समधले ९५
तुझ्या केकचे... ग्रेट

भयंकर जबरदस्त... Happy कसली उत्साही आणि नाविन्यपुर्ण आहेस तु. दरवेळी काही ना काही नविन. Happy

खुप खुप अभिनंदन.. Happy

लाजो बाई तुझी पावलं कुठे आहेत? दे इकडे नमस्कार करते. सुंदर! (हे पावलांसाठी नाही पुढे लिहीलय त्यासाठी. या शर्मिलामुळे पाकिजा जामच डोक्यात घुसलाय सध्या.) ही थीम, केक, सजावट सगळं अप्रतिम!

जो...प्रथम _________/\____________ Happy
आणि अभिनंदन Happy

वा... मस्त!! अभिनंदन.. फार कल्पक आहेस. (पुढील वर्षीची कल्पना डोक्यात आली की नाही अजुन? Happy )

खुप खुप धन्यवाद मंडळी Happy

श्रुती Lol

पुढील वर्षीची कल्पना डोक्यात आली की नाही अजुन?<<< ते पुढच्या वेळेस काय हॅपनींग असेल त्यावर किंवा काही वेगळी थिम दिली तर त्यावर अवलंबुन Happy

Pages