एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"टीव्ही मालिकांतून मी पैसे कमविण्यासाठी फक्त पाट्या टाकतो, आणि मी स्वतः कित्येक वर्षांत टीव्ही पाहिलेला नाही." असे दस्तुरखुद्द विकीदादांनीच सांगितले होते.
('त्या' दु:खांना आवतण देणार्‍या आणि फोडणीचा भात म्हणजे स्वर्गसुख असा संदेश मालिकेत त्यांचे नाव 'दादा'च होते.)

मला तर अस वाटत की मालिका मध्ल्या कलाकारांनी आनि लेखकांनी आपल्या ह्या धाग्याला भेट द्यावी.....
मस्त वाटेल त्यांना Lol

रोमातुन वाचत असतील कुणीनाकुणीतरी म्हणुनतर मुक्ताचे कपडे, स्पप्नीलचा आळशीपणा, मुक्ताच्या केसांची स्टाईल, सासुसुनेतला अती गोडवा जाऊन आता रुसवेफुगवे असे बदल झालेत.

कालचा भाग आवडला. राधाला हळूहळू होणारा प्रेमाचा साक्षात्कार, ती आणि आत्यामधला, ती आणि माऊकाकूमधला प्रसंग एकदम मस्त. घनाची आठवण येऊन ती खाली येऊन झोपते हे तर गोडच. दिग्दर्शक कधीकधी चांगले बारकावे दाखवतो, फारसं काही न बोलता. त्यासाठी राजवाडेला फुल्ल मार्क.

पण त्याने अमेरिका, सॉफ्टवेअर ह्या टॉपिक्स खाली जो काही घोळ घातला आहे ना की बास! Lol

नारायण, नारायण

मायबोलीवर येऊन तुमची फुटकळ मते वाचून दिग्दर्शक/पटकथालेखकू/इत्यादी त्यान्चे धोरण ठरवतात असा गैरसमज दिस्तोय इथे अनेकान्चा Rofl

नारायणा, मूर्खांचे नन्दनवन रे!

नारदमुनी ,साक्षात आपण नाही का वाचत आमची फुटकळ मते? ते दिग्दर्शकू, लेखकू तर मर्त्य मानव की.

Lol
नारदमुनी ,साक्षात आपण नाही का वाचत आमची फुटकळ मते? ते दिग्दर्शकू, लेखकू तर मर्त्य मानव की.>>>>>> +१
लोक्स चला एलदुगो वर या आता Happy

अति होतेय मालिका, बर्याचदा ओढून ताणून भाग संपवताहेत. दिग्या काका तर हल्ली डोक्यात जातोय, ओढून ताणून आणलेले विनोद, कविता करणारी बहिण...देवकी काकू, फारच खोट वाटायला लागलाय सगळ आणि नाटकी. त्यापेक्षा मुंबई पुणे मुंबई चा सिक्वल करायला हवा होता. सुरवातीला मालिकेने अपेक्षा खूप वाढवल्या होत्या आता भट्टी बिघडत चाललेय.

घना गायबच आहे सद्ध्या, १ मेच्या फूबाईफूच्या एपिसोडमधे पण नव्हता. मकरंद अनासपुरेंना आणलेले पाहुणे परिक्षक म्हणुन Happy
राधामधला चेंज अगदी सहज आल्यासारखा वाटतो. बाकी अमेरिकेचं प्रकरण कायच्याकाय चिघळुन ठेवलय. मालिका पाहणार्‍यांमधे कुणाची मुले-मुली (अगदी मित्र/नातेवाईकही) जाणार असतील अमेरिकेला तर मालिकेतून धास्ती घेतील असले संवाद आहेत इमोशनल ब्लॅकमेलिंगचे. Lol

मायबोलीवर येऊन तुमची फुटकळ मते वाचून>>>> तुझ्या प्रतिसादा पेक्षा तरी कमीच फुटकळ आहे. तुझ्यासारख्या फुटकळ व्यक्तिला फुटेज मिळण्यासाठी इथे बोंब मारत बसु नकोस आता

बहुतेक गना (त्याची आई असाच उच्चार करते) ऑलरेडीच प्रेमात पडलाय राधाच्या. त्यालाही ते उमजलय म्हणुन ते दूर रहाणं/ टाळणं चाललं असावं. फोन आऊट ऑफ रेंज वगैरे.
या सगळ्यात राधालाही (आत्या बाईंच्या मदतीनं) प्रेमाचा साक्षात्कार होईल. आत्याबाई लग्नासाठी तयार होतच आहेत त्या राधेला 'बंधनातलं स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याचे बंध' वगैरे समजावतील बंध बरकां बंधन नव्हे. Wink एकमेकांना भेटले की ते या ना मार्गानं दोघांना कळेल आणि मग अमेरीकेला जाणं कॅन्सल. मग 'जब वी मेट' स्टाईल कुणालाही कॉन्ट्रक्टबद्दल नकळता आनंदी आनंद गडे, माझ्या दारी सुखाचे हे सडे Wink
पण मला आत्या आणि राधाच्या गप्पा खूप आवडतात. घना आणि राधेचे बाबा, राधा आणि तिचे बाबा यांच्यातलं नातंपण मस्त दाखवलय.

घनाची आत्या आणि विनय आपटेचं जमवणार का मग अता Happy ?
दुसर्‍या लग्नाची एक गोष्ट ?
तसही राधा आणि अत्याच ट्युनिंग छान आहे आणि विनय आपटे-असावरी जोशी २ च कॅरॅक्टर्स सेन्सिबल वागणारी माणसं आहेत सिरिअल मधे !

कालचा भाग आवडला. राधाला हळूहळू होणारा प्रेमाचा साक्षात्कार, ती आणि आत्यामधला, ती आणि माऊकाकूमधला प्रसंग एकदम मस्त. घनाची आठवण येऊन ती खाली येऊन झोपते हे तर गोडच. दिग्दर्शक कधीकधी चांगले बारकावे दाखवतो, फारसं काही न बोलता. त्यासाठी राजवाडेला फुल्ल मार्क.

>>> +१००

मला उलट गेले दोन तीन भागातली इला भाटे आवडली. छान काम झालयं.

>>हायला, मग तर मालिका बघून "परमेश्वरा उचल" असं म्हणायची पण सोय नाही, तो सगळ्यांना एकदमच उचलणार आहे

नाही नाही. झी वरच्या दिल्या घरी, पवित्र रिश्ता वगैरे दळणं काढणार्‍या लेखक-दिग्दर्शकांना खालीच ठेवणार आहे तो. उगाच वर त्रास नको म्हणून. ते पण वर येणार असतील तर मात्र देवाने वरसुध्दा 'मायबोली'ची सोय ठेवावी Proud

घना कॉंपचे एएमसी घेतो म्हणजे हार्डवेअरवाला आहे. (पहिल्या भागात त्याचा कलीग राधाच्या बॉसचा पीसी रिपेअर करायला राधाच्या ऑफिसात गेला होता हे आठवलं.)
त्यामुळे त्याला इमेल वगैरे काही येत नसावं. (हे फक्त घनालाच लागू आहे, अन्य कोणी हाइंनी अंगाला लावून घेऊ नये.)

घनाची आत्या आणि विनय आपटेचं जमवणार का मग अता ?
दुसर्‍या लग्नाची एक गोष्ट ?
>>>>>>>>>>>बाप रे! हे नव्हतं कधी लक्षात आलं.

घना गायब म्हणजे किती तो गायब. परवा फुबाईफु नजरेसमोरुन जाताना त्यात कोठारेंसोबत घनाचे आई बाबा बसलेले. Uhoh

रच्याकने, आम्ही लग्नानंतर २ महिन्यांनी अमेरिकेत गेलो तर कुण्णी कुण्णी जाउ नका असं म्हणालं नाही. Uhoh Proud

अमृता :फिदी:......ही सिरियल पाहिली तर कोणाचाही असाच समज होईल की अमेरिकेत इमिग्रेशन चेकला अधिकारी भारतातून येणार्‍या सग्ळ्यांनाच आरती दाखवून, टिळा लावून हातात मेंबरशिप कार्ड ठेवावं तसं ग्रीन कार्ड ठेवतात. काय ती रडारड.....मला तर 'ओ दूरके मुसाफिर हमको भी साथ ले ले रे' हे गाणं ब्याकग्राऊन्डला लावलं नाही ह्याचंच आश्चर्य वाटतंय. रच्याकने, हिलरीबाई कोलकत्त्यात आल्यात म्हणे. जाताना घनाला घेऊन जा म्हणावं बरोबर.

शनिवारी या मालिकेला विसरून गेले होते. हळूहळू पूर्ण विसरले तर बरे होईल.;)
त्या अमानवाला घरी पाठवायला हवे. किती फालतूपणा करतो.

माबोवर नक्कीच कुणीतरी एलदुगो शी संबंधित आहे. कुहुडी चक्क सुधारलेय Happy नो ओवरअ‍ॅक्टींग, नो ओवेरकविता Happy

दोन काका = मिलिंद फाटक आणि राया अभ्यंकर (बहुतेक ऑफिशियली सुनील असे खरे नावच लावतो!)
दोन काकू = मंजुषा गोडसे आणि लीना भागवत
माई = रेखा कामत
मानव = संदीप पाठक

मायबोलीकरांनो इथे बोलल्यामुळे बदल होतायत एवढं क्रेडीट घेऊ नका लोकहो. Happy
या सगळ्या रिअ‍ॅक्शन्स बहुतेक सर्वच प्रेक्षकांच्या असणार. त्या समजून घेऊन योग्य त्या ठिकाणी पोचवणे यासाठी जनरली चॅनेल किंवा निर्मात्याची यंत्रणा कार्यरत असते हे एक आणि सिरीयल चालू व्हायच्या आधी सगळंच नवीन असतं. अभिनयापासून गेटप्सपर्यंत सगळंच. ते रूळायला, प्रेक्षकांच्या अंगवळणी पडायला, काय गोष्टी जास्त होतायत, कुठे कमी पडतंय याचा अंदाज यायला वेळ जातोच. नाटकासारखंच आहे ते. जनरली १०-१२ व्या प्रयोगाला खरोखरीची सफाई येते सगळ्यात. तसलाच प्रकार आहे. Happy

मुळात प्रत्येक डेली सोप चे ३ महिने पुढचे चित्रीकरण आधीच झालेलेच असते,
कारण unpredictable gaps किंवा breaks येवू शकतात शूटिंग मध्ये, बाकी रिसर्च टीम हि असतेच

मुळात प्रत्येक डेली सोप चे ३ महिने पुढचे चित्रीकरण आधीच झालेलेच असते,
<<
कायमच असेल असं नाही, किती तरी हिंदी डेली सोप अगदी आठवडा भर आधी करतत शुट्स.. दैनंदिन घटनांचच्या संदर्भा वरून लक्षत येतं :).
एका सिरियल मधे तर ते आजोबा मुद्दाम (ओसामाच्या थाटत किती अपडेटेड शुटिंग आहे दाखवायलाच जणु) पेपर वाचतानाचा सीन दाखवायचे, ठळक बातम्यां सकट न्युज पेपर चा क्लोज अप, मुद्दाम कि प्रेक्षकांना लक्षात यावे अगदीच ३-४ दिवसांपूर्वीचं शुट आहे ते !

काल कुहु नॉर्मल बोलत होती. एकदाही ते nerdish smile नव्हतं तिच्या चेहर्‍यावर. आणि ती चक्क नाइटवेअर मधे होती, तिच्या युनिफॉर्म शलवार कुर्ता मधे नाही.

एलदुगो मधे प्रेमाचा सिझन चालु आहे वाटतं. कुहु, मानव, सॉनियाची लागण आत्या, राधा, घना पर्यंत पोचते असं दिसतं आहे. Happy आता मी ही सिरियल रोज बघणार.

3 mahine aadhi shoot? Kahihi. Evadha advancemadhe paisa guntanar, telecast zalyavar channel paisa denar. He marathi serials chya nirmatyala paravadanyasarkha nahiye.
Generally shoot ani telecast madhe 1 wk peksha jast gap nasate.

Pages