एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'स्वयंपाक करणे' ऐवजी 'जेवण करणे' हा वाक्प्रचार सर्वत्र रूढ होऊ पहात आहे.

सर्व मराठीभाषाप्रेमींना विनंती आहे की, तुम्ही स्वतः चुकीचे बोलू नका आणि इतरांना बोलू देऊ नका.

धन्यवाद !
>>>>>>>>>>> हे काय नवीनच.

अवनी, मी असंच बोलते "जेवण करतेय" जेवण बनवलं" आणि मला त्यात काहीच चुकीचं वाटत नाही. कारण माझ्या घरात असच बोलल जातय. मराठी भाषा खुप बदलते ठीक ठीकाणी. त्यामुळे हे चुक नी हे बरोबर हे तुम्ही तुमच्या भाषेनुसार ठरवु नका. आणि 'दुसर्‍याला बोलु देउ नका' हे म्हणजे धन्यच.

मराठी भाषा खुप बदलते ठीक ठीकाणी.>>>>>

खरं आहे. आपण अनेकदा लेखी आणि बोली भाषेची गल्लत करतो. बोलताना अनेक शॉर्ट्कट मारले जातात जसे " चाललय" " बोलावलय" आर्थात ते अति वापरातले संधी म्हणुन खपुन जातात.

पुणा मुंबईचं मराठी आणि इतर ठिकाणी वापरलं जाणारं मराठी ह्यात खुप अंतर आहे. माझ्या साबां कडे सगळे

केले आहे ला "केलेनी"
लावले आहे ला "लावलेनी"
ठेवले आहे ला " ठेवलेनी"

असच म्हणतात. पहिले माझ्या कानांना फार खटकायचं. पण ती एक प्रकारची बोली झाली. माझा नागपुरचा कलीग "मी बघतो" असं आपण म्हणतो त्या ठीकाणी " मी पाहुन घेइन" असे म्हणाल्यावर आम्ही आश्चर्य चकीत झालो होतो. " पाहुन घेइन" ही आपण धमकी समजतो. पण नागपुर मध्ये असेच बोलतात हे त्याच्या बोलण्या वरुन वाटले. जसे सोलापुरी भाषेत अनेक तेलगु शब्द मिसळलेले असतात, तसेच नागपुरी भाषेत हिंदी. माझी नागपुरची मैत्रिण दुधी भोपळ्याला "लवकी" च म्हणायची. हा तिकडे अगदी प्रचलित शब्द आहे. माझा सातारचा मामा बोलताना "बरं" ला "बारं" असच म्हणतो. लिहिताना "बरं" असच लिहितो.

अनेक लोकांना स्वयंपाक हा शब्द माहिती असतो पण प्रचलित नसतो. ते "जेवण" हाच शब्द वापरतात.

अनेकदा आपण सुद्धा बोलताना अनेक वचनांचे घोळ घालतो. वरील सीरीयल मध्ये हा भाषेचा बारकावा संवाद लेखकालाच न्हवे तर विनय आपटे, विवेक लागु आणि दिग्दर्शक ह्यां पैकी कोणालाही खटकला नाही ह्या वरुनच एवढा बारकावा त्यांच्याही लक्षात आलेला नाही. नाहीतर आपटे आणि लागु दोघेही नाटकातले, अनेक वर्ष रंगभुमी वर काम केलेले सीनीयर लोकं. संवाद लेखक चुकला असेल, तरी ह्यांनी बोलताना सावरायला हवा होता.

<< उंमाझो मधे इतके भीषण अक्षम्य घोळ आहेत की त्यापुढे हे अगदीच फुटकळ ठरावेत. >>

तुम्हाला उन्च माझा झोकावर इतका का हो राग?
उन्च माझा झोकाच्या कॉस्ट्युम डिझायनिंगचे कॉन्ट्रॅक्ट मिळाल नाही म्हणून का Light 1

सुमित्राताई,
याची काय गरज?
काय आक्षेप आहेत ते आधीच लिहीलेत ना त्या बाफ वर.

मोकिमी,
ते मान्य पण जे आणि ज्या प्रकारचे कुटुंब असेल त्या प्रकारचेच बोलले गेले पाहिजे ना?

जो सगळा माहौल उभा केलाय तश्या प्रकारच्या कुटुंबांच्यात प्रमाण भाषा असते.
जेवण बनवणे नसते स्वैपाक करणे असते.
माझी मदत, माझा अ‍ॅक्सिडेंट नसतो. मला मदत, मला अ‍ॅक्सिडेंट असतो. मुळात माझी मदत, माझा अ‍ॅक्सिडेंट हे कुठल्याही ठराविक ठिकाणाच्या बोली भाषेचे उदाहरण नाहीये. मुंबईत हिंदीचा अतिरेक होऊन पसरलेले लोण आहे.

भुंगोबा, नावापुढे जी लावणे हासुद्धा हिंदीचाच प्रभाव आहे. मराठीत पार्ले याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही नावापुढे जी लावायला माझा सक्त विरोध आहे.
शरच्चंद्ररावजी हा एक अपवाद काही मंडळींना क्षम्य आहे. Wink

भरत, तुम्हाला अनुमोदन. मला अगदी कानांना टोचतं ते. हल्ली सगळ्या मराठी कार्यक्रमांमधे सर्रास वापरतात नावापुढे 'जी'.
( आता माझंच मराठी शुद्ध नसल्याने, पुढे मागे मला कुठल्यातरी धाग्यावर कोणीतरी धोपटणार हे नक्की. पण तरीही म्हणतेच मी. मला अगदी अगदी आवडत नाही मराठीत तो 'जी'. एकापेक्षा एक मधे सचिन सगळ्या स्पर्धकांच्या नावापुढे 'जी' लावायचा किंवा सारेगमप मधेही तेच. )

जो सगळा माहौल उभा केलाय तश्या प्रकारच्या कुटुंबांच्यात प्रमाण भाषा असते.
>> +१
काम केलेले सीनीयर लोकं. संवाद लेखक चुकला असेल, तरी ह्यांनी बोलताना सावरायला हवा होता.>> अगदी हेच मनात आलं ते बघताना. की भले संवादलेखकाची चूक असेल, त्याला लक्षात आली नसेल पण ह्या ज्येष्ठ अनुभवी नट मंडळींना ती शब्द उच्चारताना नको लक्षात यायला? की आली असली तरी ती बदलण्याची त्यांना मुभा मिळत नाही? Uhoh

punyat mi alele ga asa mhantat >>> पुण्यात? छे!
हम्म, आता बाहेरून पुण्यात आलेले म्हणत असतील तर माहिती नाही Proud Light 1

बिल्वा, मी तरी पुण्यात आल्यावरच हे ऐकलं. कोथरुडात तर खूपच. "मी मामाकडे गेलो होतो ना, तेव्हा जेम्स बाँडचा सिनेमा पाहिला. मस्त मजा आली." याचं रुपांतर असं ऐकलंय - "मी मामाकडे गेलेलो ना, तेव्हा जेम्स बाँड चा पिच्चर पाहिलेला ना, तेव्हा असली भारी मजा आलेली ना... " अन हे सगळं तो एक टिपिकल हेल काढत. आई गं..खरंच असं बोलतात आजकाल मुलं.. खरं म्हणजे आजकालच नाही, आधीही बोलत असतील. मंगला बर्वेंच्या "झुळुक" मध्ये तसा उल्लेख वाचलाय. आमच्या नागपूरला नाही बॉ असं बोलत कुणी.:;) Light 1

अरे, पण मला एक कळत नाहिये. कुठली कंपनी नुस्तं शॉर्टलिस्टींग झालेल्या लोकांनाही ट्रेनिंग देते? ट्रेनिंग सिलेक्ट झालेल्या लोकांनाच देतात ना? मग ती शॉर्टलिस्ट कशी? फायनल लिस्ट नाही का? उलझन सुलझे ना, रस्ता सुझे ना, जाऊ कहा मै, जाऊ कहा.

आणि आता मारे सगळ्या काक्या (हे नक्की काकू/काकीचं अनेकवचन आहे ना? नाहितर इथे लोक मला धोपटायचे) 'आम्हाला घना अमेरिकेला जायला नको आहे' असं म्हणताहेत. उद्या राधा टिपिकल सुनेप्रमाणे डोक्यावर मिर्‍या वाटायला लागली की 'उसगावाला गेले असते तर बरं झालं असतं' असं म्हणायची वेळ येईल. आत्ताचं चित्र आणि भविश्यातलं चित्र ह्यात 'हे चित्र पहा आणि ते चित्र पहा' एव्हढा फरक असू शकतो.

नुस्तं अमेरिकेत जॉब मिळाला म्हणून तिथे सेटल होणार वगैरे मनोराज्यं रंगवायला हे काही ९०चं दशक नाहिये. हे लोक पेपर्स वाचतात की नाही? Uhoh

पुढील ३ महिन्यांचे भविष्य :
मे - भयंकर भावनिक अत्याचार असलेले एपिसोड. घरच्याना कॉन्ट्रयाक्ट म्यारेज समजणार. घना चालला..कदाचित एखादा हार्ट अट्याक संभवतो..
जून -भयंकर म्हज्जे अगदी भयंकर भावनिक अत्याचार..आत्या परत (नवर्याच्या) प्रेमात.. कुहु चे लग्न जमणार.. घना राधा घटस्फोटासाठी अर्ज करणार .. कोर्ट मुदत देणार.. घना गेला..
जुलै - हा महिना छान जाईल.. प्रेमाचा साक्षात्कार.घना राधा एकमेकाना प्रेमाचा 'इजहार' करणार...

मग साधारण, अंदाजे, ढोबळ मानाने कुठल्या वर्षीच्या कुठल्या महिन्यात ही मालिका संपेल हो? Smiley

मंदारदा संपेल की पुढच्या एक दोन महिन्यात. लेखकांना लवकरच कळेल अमेरिकेत येऊन स्थायिक होण हे काही पूर्वी सारख सोप्प काम नाही आहे........Immigration च्या फार कटकटी आहेत.

मग घना जवळच पुण्या मुंबईत सेटल होईल. आहे काय आणि नाय काय Happy

अनन्या Happy

मला तरी त्याचा आळस बघून वाटत तो अमेरिकेत येऊन कंटाळेल. उगाच सुखाचा जीव कशाला दुखात घालतोस? त्या पेक्षा घानाने तिथेच भारतात रहाव घरच्यान कडून सेवा करून घेत.

>>मग साधारण, अंदाजे, ढोबळ मानाने कुठल्या वर्षीच्या कुठल्या महिन्यात ही मालिका संपेल हो?>><<
पंत, डिसेंबरात जग संपतेय, मालिकेचे कसले घेऊन बसलांत?

हायला, मग तर मालिका बघून "परमेश्वरा उचल" असं म्हणायची पण सोय नाही, तो सगळ्यांना एकदमच उचलणार आहे Rofl

स्वप्निल जोशी लिव्ह वर किती दिवस आहे त्यावर त्याचं ट्रेनिंग, परस्पर अमेरिकेत जाणं, इकडे राधाचा जीव तळमळणं, आणि इथे पोष्टींचा पाऊस पडत राहणं अवलंबून आहे. तो परत आला तर कदाचित थोडे विनोदी प्रसंग येउ शकतील.

पाणी ओतण्यास सुरुवात झाली आहे असं दिसतंय.

मोबाईलफोन आउट ऑफ रेंज असणं किती चाललय? आता बास म्हणावं. बाहेर टेलीफोन बूथ असतात. नोकरी मिळायच्या आधीच जे काही ट्रेनिंग देतायत त्यात रात्रीही लोकांना बाहेर फोन करायला जाऊ देत नाहीत काय?;) अमेरिकेला जाणं म्हणजे इतकं काही गंभीर प्रकरण करून ठेवलय की सगळ्यांचे चेहरे उतरलेले. आता परदेशी नोकरीसाठी जाणं कितीसं रडारडीचं उरलय? घराघरात कोणीतरी सख्खे नाहीतर शेजारी नाहीतर नातेवाईक बाहेर कुठे असतात किंवा जाऊन आलेले तरी असतात.

काकूचं अनेकवचन माझ्या माहितीप्रमाणे काकवा व्हायला पाहिजे. जसं सासू --> सासवा त्याप्रमाणे.

परवाच्या भागात राधाने वडिलांना "मी आणि घना आळीपाळीने वर/खाली झोपतो" असं कसं सांगितलं? त्याचा वडिलांनी काय अर्थ काढला आणि त्यावर काय प्रतिक्रिया दिली ते बघण्यासाठी तो भाग पुन्हा बघायचाय.

की भले संवादलेखकाची चूक असेल, त्याला लक्षात आली नसेल पण ह्या ज्येष्ठ अनुभवी नट मंडळींना ती शब्द उच्चारताना नको लक्षात यायला? की आली असली तरी ती बदलण्याची त्यांना मुभा मिळत नाही? अ ओ, आता काय करायचं
>>>>>>>>>>>

यातून विक्रम गोखलेही सुटलेले नाहीत....... त्यांची ती एक जुनी मालिका होती ना.... शीर्षकगीतात माना वळवून वळवून प्रेक्षकांकडे बघायचे ते Proud ती. त्यातही असंच वाटायचं की विक्रम गोखलेंना पण कळत नाही संवाद धेडगुजरी मराठीत आहेत ते Sad

Pages