यापूर्वी वाचा -
भाग १. प्राथमिक माहिती आणि पुरूषांमधील वंध्यत्व.
भाग२. स्त्रीयांमधले वंध्यत्व आणि मासिकपाळीचे सामान्य चक्र.
............. पुरूषांमधील वंध्यत्वाविषयी चर्चा करणे जेवढे सोपे होते,तेवढेच स्त्रीयांबद्दल चर्चा करणे कठिण. कारण बाळाच्या जन्मामध्ये तिचा हिस्सा मोठा. स्त्री-पुंबीज मिलनापासून ते बाळ गर्भाशायात वाढून , जन्माला येपर्यंतच्या सगळ्याच गोष्टी स्त्रीच्या शरीरात घडतात. त्यामुळे अपत्य जन्मापूर्वीच्या प्रत्येक पायरीतील चूक स्त्रीयांमध्ये वंध्यत्वाचा दोष निर्माण करू शकते.
स्त्रीयांमधील वंध्यत्वाची मुख्य कारणे खालीलप्रमाणे-
- १.बीज तयार होऊन बीजांडातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेतील दोष (disorders of follicle maturation and ovulation) - जवळजवळ ४०% दोष या प्रकारचे. यात बीजांडातील दोषांबरोबरच मुख्य प्रजनन संस्थेबाहेर असणाया अंतर्स्त्रावी(endocrine glands) ग्रंथींचा उदा. हायपोथॅलॅमस, पिच्युटरी, थायरॉईड यांचा मोठा प्रभाव असतो
- २.बीजनलिकेतील दोष (disorders of fallopian tubes) - बीजांडापासून सुटणारे बीज आपल्या बोटांसारख्या फ़िंब्रिआंनी (fimbriae) पकडून त्यांना गर्भाशयापर्यंत आणायचे काम या बीजनलिका करतात. जन्मत:च त्या बंद असू शकतात (stenosis) किंवा काहीवेळा जंतूसंसर्गामुळे किंवा इतर काही कारणांनी बंद होतात.
- ३.एंडोमेट्रिऑसिस (endometriosis)
- ४.गर्भग्रीवेचे /गर्भाशयमुखाचे दोष (disorders of cervix)-चुकीच्या पद्धतीने तयार होणारा सर्वायकल म्युकस(गर्भग्रीवा स्त्राव), स्टिनोसिस.(गर्भग्रीवेतून गर्भाशयात जाणारा मार्ग काही कारणांनी बंद असणे.
- ५.इतर (multiple or unknown causes) - जवळपास २०% स्त्रीयांमध्ये नेमके कुठले दोष आहेत हे कळूनच येत नाही किंवा वरिलपैकी विविध प्रकारचे दोष एकत्र असू शकतात
- सर्वसाधारणतः गर्भाशयाच्या आत असणार्या आवरणाच्या पेशी (एंडोमेट्रियम) ओवरी,गर्भनलिका किंवा ओटीपोटात इतरत्र आढळणे. ज्यामुळे चुकीच्या ठिकाणी ब्लॉकेजेस किंवा रक्तस्त्राव होउन पाळीच्या काळात अतिशय वेदना होतात आणि नंतर राहिलेल्या ब्लॉकेजेसमुळे (scaring and stenosis) वंध्यत्व येते.
.
स्त्रीयांमधल्या वंध्यत्वाचा विचार करण्यापुर्वी आपल्याला स्त्री प्रजनन संस्थेची प्राथमिक ओळख करून घ्यावी लागेल. आजकाल हाताशी नेट असल्याने आपण ही माहिती कधीही मिळवू शकतो म्हणा. पण पुढे कारणांची आणि उपायांची चर्चा करण्यापूवी सगळे संदर्भ एकत्र असावेत म्हणून इथे सुरुवातीसच थोडक्यात माहिती देत आहे.
निसर्गाने स्त्री शरीराची रचना बरिच गुंतागुंतीची केली आहे. स्त्रीला केवळ अपत्य प्राप्ती होण्यासाठीच नव्हे तर स्त्री म्हणून योग्य शारिरीक विकास साधण्यासाठीही विविध प्रकारच्या अवयवांचे, आंतर्स्त्रावी ग्रंथींचे(हॉर्मोन्स), मेंदू आणि मज्जासंस्थेचे योग्य आणि नियमित कार्य असणे हे गरजेचे आहे.
स्त्री भ्रूणाच्या आईच्या पोटातील आयुष्याच्या बाराव्या आठवड्यातच तिच्या बीजांडात जवळजवळ ६० ते ७० लाख बीजे अर्धपक्व अवस्थेत असतात. मुलगी जन्मताना त्यातील किमान २० लाख बीजे शिल्लक राहतात. तिच्या पहिल्या पाळीच्या वेळी फ़क्त ५ लाख बीजे दोन्ही बीजांडात मिळून शिल्लक असतात. उरलेली बीजे बीजांडाच्या (ओवरीच्या) आतच नष्ट होतात. या जवळपास ४-५ लाख बीजांतून केवळ एकच बीज दर महिन्याला पूर्ण पक्व अवस्थेत बीजनलिकेत येणं ही निसर्गाची अफ़ाट किमया आहे.
होतं काय की दर महिन्याला एखादी स्पर्धा असल्याप्रमाणे ४०-५० बीजांचा समूह परिपक्व व्हायच्या तयारीला लागतो. प्रायमरी फॉलिकल आणि सेकंडरी फॉलिकल या दोन पायर्या बीजांडातच होतात. पण या सेकंडरी फॉलिकलचं परिपक्व / मिलनोत्सुक स्त्रीबीज बनवण्यात मात्र प्रजनन संस्थेच्या बाहेर असणार्या बाकीच्या घटकांचा प्रभाव असतो.
यातील मुख्य अवयव आहे हायपोथॅलॅमस ग्रंथी (Hypothalamic gland) आणि तिच्या हुकुमाबरोबर वागणारी पिच्युटरी ग्रंथी (Pituitary gland). मासिकपाळीच्या पहिल्या दिवशी ही हायपोथॅलॅमिक ग्रंथी जीएन.आर.एच. (GnRH) नावाचे हॉर्मोन सोडते. हे हॉर्मोन जवळच असणार्या पिच्युटरी ग्रंथीला अजून दोन प्रकारची हॉर्मोन तयार करायला लावते. पैकी एक म्हणजे एफएसएच (FSH-Folicle stimulating hormone) आणि
दुसरे एलएच (LH- leutinizing hormone). यांपैकी FSH लगेच रक्तात सोडले जाते तर LH काही काळाकरिता पिच्युटरितच साठवून योग्य वेळ येताच रक्तात सोडले जाते.
१.मासिक पाळीची फॉलिक्युलर फेज- रक्तात मिसळलेले FSH ओवरीत पोचताच एका किंवा दोन्ही ओवरीतील मिळून ७-८ फॉलिकल्स मोठी होऊ लागतात आणि इस्ट्रोजेन (estrogen) तयार करतात. हे इस्ट्रोजेन रक्तात मिसळते. काही नैसर्गिक संकेत मिळून या इस्ट्रोजनमुळे या सात आठपैकी बाकीची फॉलिकल वाढायची थांबतात व एकच फॉलिकल वाढते ज्याला डोमिनंट फॉलिकल म्हणतात. हे अधिकाधिक इस्ट्रोजेन तयार करत जाते. सुरूवातीला यामुळे रक्तात मिसळणारे इस्ट्रोजेन पिच्युटरीला निगेटिव फीडबॅक देवून आणखी FSH तयार करण्याचे प्रमाण कमी करते मात्र शेवटीशेवटी इस्ट्रोजेन इतके वाढते की पिच्युटरिला पॉजिटिव्ह फीडबॅक मिळून FSH चा शेवटचा मोठा स्त्राव होतो. इस्ट्रोजनमुळे गर्भाशयाचे आतले अस्तर जाड होते आणि त्यात रक्तवाहिन्या वाढतात.
२. ओव्युलेशन फेज- पिच्युटरी जीएनारएचला जास्तच सेंसिटिव्ह होऊन पूर्वी साठवलेले LH रक्तात मिसळायला सुरूवात होते. हे LH रक्तातून ओवरिकडे येऊन डॉमिनंट फॉलिकलला बीज मुक्त करण्यास (ओव्युलेशन) भाग पाडते. ओवुलेशन प्रेडिक्शन किट हे एलेच सर्ज (LH SURGE))द दाखवतात. (एल एच सगळ्यात जास्त प्रमाणात र्क्तात मिसळले गेल्याचा दिवस)तर एल एच सर्जच्या दिवशी सर्वायकल म्युकस सगळात जाड आणि योग्य (स्वागतोत्सुक गर्भग्रीवा स्त्राव- fertile mucus) होतो, गर्भग्रीवा (cervix)गर्भाशयाजवळ म्हणजे वर सरकते आणि मऊ पडून थोडिशी उघडते. थोडक्यात ज्यामुळे वीर्यातील शुक्रजंतूंचा स्त्री शरिरातील प्रवास निर्धोकपणे पार पडेल अशा सगळ्या गोष्टी घडतात. स्त्रीयांमध्ये या काळात शरिरसुखाची आसक्तीही वाढलेली असते.
तर या एलेच सर्जनंतर एक (किंवा क्वचित दोन बीजे)ओवरीतून मुक्त होतात.
बीजांडातील (ओवरीतील) स्रीबीजाची वाढ दाखवणारी ही एक आकृती बघा.
३.ल्युटिअल फेज- पाळीच्या साधारण १४ व्या दिवशी हे ओव्युलेशन होऊन मग ल्युटिअल फेज चालू होते. मुक्त ओवम २४ तास योग्य शुक्रजंतूची वाट बघत फॅलोपिअन ट्यूबमध्ये जीवंत राहाते. गर्भशयात बीजाच्या वाढितिल शिल्लक राहिलेल्या भागाला कॉर्पस ल्युटिअम असे म्हणतात. ओव्युलेशननंतरच्या काळात LH कॉर्पस ल्युटिअमला अधिकाधिक इस्ट्रोजेन आणि एक नविन हार्मोन प्रोजेस्टरॉन तयार करण्यास भाग पाडते. या प्रोजेस्टरॉनमुळे शरिराचे तापमान ( बेजल बॉडी टेंपरेचर) वाढते. तसेच गर्भाशयाच्या आतील पेशींचे आवरण (एंडोमेट्रियम)मधे रक्तप्रवाह वाढतो आणि ते तयार बाळाचे संगोपन करण्यास अधिकाधिक सक्षम बनते. प्रेग्नन्सीच्या किंवा ल्युटिनायजिंग फेजच्या काळात येणारे इमॅजिनरी प्रेग्नन्सी सिम्टमही प्रोजेस्टरोन घडवते. जर ओवम फलित झाले तर त्यापासून तयार होणारे HCG-Human Chorionic Gonadotropin ओवरीत शिल्लक असलेल्या कॉर्पस ल्युटिअमला LH प्रमाणेच अधिकाधिक इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन तयार करणास भाग पाडते. मात्र जर ओवम फलित झाले नाही तर हे कॉर्पस ल्युटिअम पाळीच्या तीन दिवस आधी नष्ट होते. इस्ट्रोजेन प्रोजेस्ट्रॉन कमी झाल्याने बाहेर पडलेले ओवम व गर्भाशयाने केलेली गर्भरपणाची तयारीही हळुहळू नष्ट होत नविन मासिक स्त्रावाच्या रुपाने गर्भाशयाबाहेर पडते. यालाच आपण पुढच्या पाळीचा पहिला दिवस म्हणतो आणि चक्रनेमीक्रमे स्त्रीशरीर परत पहिल्यापासून हा सगळा कार्यक्रम परत सुरू करते.
ह्या खालच्या चित्रातून आंतर्स्त्रावी ग्रंथींच्या प्रभावाची माहिती मिळेल.
याला स्त्रीयांचे हायपोथॅलॅमिक-पिच्युटरी-गोनॅडल अॅक्सिस असे म्हणतात.
हुश्श! एवढं लिहितानाच थकून गेले मी तर निसर्ग हा चमत्कार कसा घडवुन आणत असेल कुणास ठाऊक. त्यात हे सगळे घडत असताना शरीरातिल साखरेचे प्रमाण योग्य हवे, थायरॉईड हार्मोन्सचे प्रमाण योग्य हवे, नाहीतर स्त्रीबीजाची वाढच होणार नाही किंवा अपेक्षित वाढ होणार नाही.
या वरच्या चर्चेवरुन ओवुलेशन प्रेडिक्क्षनकरिता
१. बेजल बॉडी टेंपरेचर मेथड
२. सर्वायकल म्युकस सेल्फ एक्जामिनेशन मेथड
३. ओव्युलेशन कीट मेथड
हे कसे वापरतात हे कळले असेल अशी आशा आहे. अर्थात वंध्यत्वनिवारण या ४थ्या भागात आपण त्या विषयी चर्चा करू. तर यापुढिल तिसर्या भागात स्त्रीयांमधील वंध्यत्वाच्या काही विशिष्ट महत्त्वाच्या कारणांवर चर्चा करू.
फॉलिक्युलर स्टडी या प्रकारात साधारणपणे पाळीच्या नवव्या दहाव्या दिवसापासून पुढे ६-७ दिवस पोटावरून (transabdominal) किंवा योनीत (transvaginal) सोनोग्राफिचा प्रोब घालून त्याद्वारे फॉलिकल योग्य प्रकारे तयार होते की नाही हे बघितले जाते.
*****************************************************************************************************
१.इतका किचकट भाग सोप्या भाषेत समजावून सांगायच्या प्रयत्नात माझी फॅफॅ उडालेली आहे तरी कुणाला समजण्यात काही अडथळा असेल तर कळवावे, पुन्हा एकदा प्रयत्न करेन.
२. हा भाग समजल्याखेरिज पुढच्या असंख्य चाचण्या आणि उपचार कळणे शक्य नाही त्यामुळे थोडंफार डिटेलात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
३. शक्यतो मुख्य इंग्रजी शब्द तसेच ठेवले आहेत. त्यामुळे भाषांतर उगाच पुस्तकी किंवा क्लिष्ट होणार नाही. तसेच आपल्या डॉक्टरशी चर्चा करताना आपल्याला भाषेचा/शब्दांचा अडथळा येणार नाही. तसेच नेटवरून इंग्रजी संकेतस्थळावर संदर्भ शोधणे सोप्पे होईल.
४.माझ्या ज्ञानाला मर्यादा आहेत किंवा मला जे माहिती आहे ते सगळेच इथे लिहिणे शक्य नाही तेव्हा योग्य संदर्भ मिळवून सखोल माहिती पाहिजे असल्यास ती मिळवायला हे प्राथमिक ज्ञान म्हणून उपयोगी पडेल. बाकी बाबतीत आपले डॉक्टर आपल्याला मदत करतीलच.
५. माझी ही माहिती पुरवायची धडपड आणि कष्ट लक्षात घेता कुणी ही माहिती कॉपी पेस्ट करुन वापरल्यास/ फॉर्वर्ड केल्यास कृपया "मायबोलीवरिल डॉ. साती " या आयडीला थोडंसं क्रेडिट द्यायला विसरु नका.
६. कृपया मुद्रितशोधनातील चुका कळवा, मला वेळ मिळताच योय तो बदल करेन.
७. सर्व आकृत्या आणि चित्रे नेटवरून साभार. संदर्भ पाहिजे असल्यास देईन.
उत्तम लेख साती. Diagram खूपच
उत्तम लेख साती. Diagram खूपच मदत करतात समजून घेण्यासाठी.
ताई आपले खुप खुप अभिनंदन. एका
ताई आपले खुप खुप अभिनंदन. एका नाजूक वेगळ्या विषयाला आपण समजावून दिलेत.
khup chan mahiti. thanks Sati
khup chan mahiti. thanks
Sati tai, i want to ask u a question.
mi september madhe abortion kelyanantar mazi pali ajun aali nahi. mazi Hypothyroid chi treatment suru aahe. Dr. says after abortion it will take some time. please guide me.
साती, पुन्हा एकदा माहितीपुर्ण
साती, पुन्हा एकदा माहितीपुर्ण लेख! धन्यवाद!
धागा शुद्धीकरणाबद्दल
धागा शुद्धीकरणाबद्दल व्यवस्थापनाचे आभार.
देवकु,अॅबॉर्शन झाल्यावरसुद्धा सप्टेंबर ते एप्रिल गॅप जास्त आहे.
थायरॉईड नॉर्मल लेवलवर आता आलेय का?
थायरॉईड नॉर्मल नसेल तरी काही वेळा पाळी येत नाई.
साती, दोन्ही लेखांसाठी,
साती, दोन्ही लेखांसाठी, त्यामागच्या कळकळीसाठी आणि कष्टांसाठी मनःपूर्वक धन्यवाद.
उत्तम लेखमाला, साती. स्वाती
उत्तम लेखमाला, साती.
स्वाती +१.
शाबास. just try to avoid
शाबास.
just try to avoid online consultations. its tempting, but do avoid it.
साती, दोन्ही लेख वाचले.
साती, दोन्ही लेख वाचले. नमस्कार आहे, साष्टांग!
तुमची कळकळ, मेहनत... सगळ्याचसाठी.
साती, polycystic ovaries हे
साती, polycystic ovaries हे पण वंध्यत्वाच कारण आहे ना? polycystic ovaries syndrome विषयी माहिती द्याल का?
Thanks Sati. TSH 98 to 9.3 वर
Thanks Sati.
TSH 98 to 9.3 वर आलय. normal नाहि अजुन.Treatment सुरु आहे. मी आता काय करयला हवे?
नमस्कार साती, गेल्या शनिवारि
नमस्कार साती,
गेल्या शनिवारि माझे फिलोपिन ट्युबचे ऑपरेशन झाले. तुम्हि सागितल्यामुळे लवकरात लवकर योग्य उपयोग झाला. आता माला एक मदत करा मला सान्गा कि आता नोर्मल ट्राय करु कि IUI करुन घेवु.
माला तुम्च्य्या उत्तराचि गरज आहे
डॉ साती.. माफ करा. मध्यंतरी
डॉ साती..
माफ करा. मध्यंतरी ऑनलाईन नसल्याने महत्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष झाले. खूप लोकांना आज या माहितीची गरज आहे. मी देखील दोन तीन वर्षे हे सगळं केलं आहे. तुम्ही आणखी थोडे कष्ट घेऊन मराठीत एक छानसं पुस्तक का लिहीत नाही ? सोप्या भाषेतल्या पुस्तकाची खूप गरज आहे आज.
भाग्यश्री,बरं झालं.या लेखाचा
भाग्यश्री,बरं झालं.या लेखाचा तुम्हाला थोडाफार उपयोग झाला.
तुमचे डॉक्टर सविस्तर सांगतीलच पण फॅ.ट्यू वर कुठलीही सर्जरी झाल्यास काही काळासाठी बेबीमेकिंग प्रयत्न थांबवावे लागतात अन्यथा एक्टॉपिक प्रेग्नन्सीची शक्यता वाढते.(कृपया या बाबत तुमच्या डॉक्टरशी सविस्तर बोला)
किरण,धन्यवाद. बहुदा मराठीतही याबाबतीत सोप्पी पुस्तके आहेत.संदर्भ सापडल्यास नावे इथेच लिहेन.
इब्लिस,आहात कुठे?
ऑनलाईन कंसल्टेशन शक्यच नाहिये.आणि ही तर माझी ब्रँचच नसल्याने टेंप्टिंगही नाही.
बाकी सर्व प्रतिसादकांना धन्यवाद.
इथेच आहे, अन 'रोम' मधे
इथेच आहे, अन 'रोम' मधे आहे.
सल्ले विचारणारे प्रतिसाद पाहिले, म्हणून ते ऑनलाईन कन्सल्टेशनचं बोललो. बाकी छान आहे. चालू द्या!
खुप छान माहिती साती. धन्यवाद
खुप छान माहिती साती.
धन्यवाद
धन्यवाद साती , एवढा अवघड विषय
धन्यवाद साती , एवढा अवघड विषय इतका सोपा करुन सांगायची तुझी हातोडी आवडली. महत्वाचं म्हणजे आमच्यासारख्यांच्या ज्ञानात (?) अमुल्य भर घातली आहेस.
साती, दोन्ही लेख छान झाले
साती, दोन्ही लेख छान झाले आहेत.
मराठीकरण करताना चांगलीच धांदल उडाली असेल ना.
साती, खूप सोप्या पध्दतीने आपण
साती,
खूप सोप्या पध्दतीने आपण माहिती सांगितली आहेत.
माहिती अतिशय आवडली.
कृपया, या मालिकेचे पुढील भाग लवकर टाकावे.
माहीतीपुर्ण लेखन !
माहीतीपुर्ण लेखन !
बेबीमेकिंग साठि काहि माहिति,
बेबीमेकिंग साठि काहि माहिति, वेब साईड, अॅनलाईन काहि वाचण्यासाठि मराठितुन माहित असेल तर याबद्दलमाहिति सागाल का कोणि प्लीझ.
छान माहिति
छान माहिति
मी माय्बोलिवर नविन आहे पण
मी माय्बोलिवर नविन आहे पण वाच्क जुनीच आहे मला साती म्दत क्रा मी फोलिक अँसिङच्या गोळया बन्द करु का?
प्रतिसाद द्या प्लिज
प्रतिसाद द्या प्लिज
पिओडिस चा प्रेग्नसिमध्ये काहि
पिओडिस चा प्रेग्नसिमध्ये काहि अड्चण येते का कोनि सगु शकेल का ?
अमृता, फोलिक अॅसिड
अमृता,
फोलिक अॅसिड गर्भधारणेपूर्वी चालू करून गर्भावस्थेतील पहिले तीन महिने ४०० मायक्रोग्रॅम ह्या डोसमध्ये घ्यायच्या असतात.
जास्त धोकादायक गर्भावस्थेमध्ये (मधुमेह, फिटसचा त्रास-एपिलेप्सी, लठ्ठपणा) जास्त डोसमध्ये म्हणजे ५ मिलिग्रॅम इतक्या डोसमध्ये घ्यायच्या असतात.
४०० मायक्रोग्रॅमच्या गोळ्या बर्याचदा सहज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे भारतात बर्याचदा सर्वच स्त्रियांना ५ मिलिग्रॅमचा डोस दिला जातो.
त्याने गर्भाशयावर विपरीत परिणाम होत नाही. क्वचित कोणाला उलटी-मळमळ असा त्रास होऊ शकतो.
भाग्यश्री,
तुम्हाला पिसीओडी म्हणायचं आहे का ?
इथे त्याची सविस्तर माहिती आहे.
सर्वसाधारणतः गर्भाशयाच्या आत
सर्वसाधारणतः गर्भाशयाच्या आत असणार्या आवरणाच्या पेशी (एंडोमेट्रियम) ओवरी,गर्भनलिका किंवा ओटीपोटात इतरत्र आढळणे. ज्यामुळे चुकीच्या ठिकाणी ब्लॉकेजेस किंवा रक्तस्त्राव होउन पाळीच्या काळात अतिशय वेदना होतात >>>>>>>>> या वर काय उपाय आहे हे सांगशिल का साती,
कारण पाळीच्या काळात माझ्य़ा मुलीच्या पोटात खूप दुखते ; अगदी तळमळते....उपाय सांग, वाट पहात आहे...:)
रुणुझुनु आभारि आहे मि त्या
रुणुझुनु आभारि आहे मि त्या गोळ्या बंद केल्या आहेत.गर्भधारणेनंतरच चालु करेन.उगाच मनात भिति बसली आहे
अतिशय उत्तम माहिती व उत्तम
अतिशय उत्तम माहिती व उत्तम उपक्रम साती
नमस्कार डॉ. साती, डॉ. मला
नमस्कार डॉ. साती,
डॉ. मला पिसीओडीचा त्रास सागितला. आता त्याचे म्हण्णे आहे कि मि IUI करुन घ्यावे. हे योग्य आहे का .
आणि हो रुणुझुणू मला पिसीओडीच म्हणयचे होते .
Pages