आता लक्ष्य सागरमाथा..

Submitted by सेनापती... on 25 April, 2012 - 19:50

पुण्याच्या ‘गिरिप्रेमी’ संस्थेची एव्हरेस्ट मोहीम आता प्रत्यक्ष चढाईला सुरुवात करत आहे. देशातील ही पाचवी नागरी मोहीम!

http://epaper.loksatta.com/34801/loksatta-pune/25-04-2012#page/16/2

"या साऱ्या तंबूंच्या मधोमध आमचा राष्ट्रध्वज तिरंगाही मानाने फडकतो आहे. ‘गिरिप्रेमी’तर्फे नुकतेच या बेसकॅम्पच्याच खाली असलेल्या गोरक्षेप या एकमेव गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. जगातील हा सर्वात उंचीवरचा शिवपुतळा!

छत्रपती शिवरायांचा इतिहास हा असाच दऱ्याखोऱ्यातला! तो इथल्या शेर्पा बांधवांना समजताच ते स्वत:च या पुतळ्याच्या उभारणीत पुढे आले. या पुतळ्याची भविष्यातील सर्व देखभाल हे शेर्पा बांधवच घेणार आहेत.

‘छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक प्रकल्प’ नावाने राबवल्या जाणाऱ्या योजनेअंतर्गत या दुर्गम भागात राहणाऱ्या शेर्पा बांधवांच्या घरातील अंधार दूर करण्यासाठी ‘गिरिप्रेमी’च्या वतीने सौर कंदील वाटण्यात आले आहेत. गिर्यारोहण हा फक्त छांदिष्ट, हौसे-मौजेचा खेळ नाहीतर त्यातही सामाजिक जाणिवेचा धागा आहे, हे दाखवणारे हे काम!"

हा धागा सर्व गिर्यारोहकांना शुभेच्छा देण्यासाठी सुरु करत आहे.. Happy

आपल्या शुभेच्छा प्रत्यक्ष बेस कॅम्प पर्यंत काही मध्यस्थांमार्फत (थेट माझ्याकडुन नाही) पोच्तील याची व्यवस्था करत आहे.. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच ह्या पुतळ्याच्या उभारणीचे फोटो बघितले फेसबुकवर. मोहिमेसाठी मनापासून शुभेच्छा

'गिरीप्रेमी' [ खरेखुरे ' पुणे वॉरिअर्स' ]व इतर मोहिमेतील सार्‍यानाच मनःपूर्वक शुभेच्छा.
[ सुटले पुण्याच्या कडक उन्हाळ्यातून आणि पाणी टंचाईतून ! Wink ]

भाउ..:)

मनापासून शुभेच्छा !
'गिरीप्रेमी' पुण्यातून निघाल्यापासून वर्तमानपत्रातुन त्यांच्या मोहिमेचा पाठपुरावा करण्याचे व्यसनच जडले आहे सद्ध्या.:)

सेनापती,

सर्व गिर्यारोहकांना मन:पूर्वक शुभेच्छा! गौरीशंकर सर होणारच!

अवांतर : लोकसत्तेच्या दुव्यावर बाजूला अकुमचा लेख दिसतोय. त्यातला अरुण सावंत कँपफायरचा का?
आ.न.,
-गा.पै.

पैलवान,
अरुण सावंत हल्ली कँपफायरचा आहे की नाही माहिती नाही. पण पूर्वी त्याचा 'केव्ह्ज एक्सप्लोरर्स' नावाचा ग्रुप होता. मस्त ग्रुप होता. दुर्दैवाने फुटला तो ग्रुप! बरीच वर्षं झाली.

बित्तुबंगा,

बहुतेक तोच! ज्याम जिद्दी माणूस आहे. प्रचिही उत्तम काढतो.

मी १९९० च्या आसपास त्याच्याबरोबर हरिश्चंद्रगडावर नाळेच्या वाटेने गेलो होतो. पावसाळा असला तरी तो सोबत असल्याने वाट एकदम सोपी वाटली होती. Happy

आ.न.,
-गा.पै.

पैलवान,
मी त्याच्याबरोबर काही ट्रेक्स केले होते. नंतर संपर्क तुटला.
नेहरु इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनिअरिंग वगैरे गाजवून आलेला भाई आहे तो. तो हिमालयात चढाईसाठी का गेला नाही ते काही मला समजले नाही. तो अगदी एव्हरेस्ट मटेरिअल होता!

ह्या मोहिमेबद्दल माहिती नव्हती... पण एक वाईट बातमी...

जगातील सर्वोच्च शिखर सर करण्याचे स्वप्न घेऊन ‘माऊंट एव्हरेस्ट’ मोहिमेवर गेलेले गिर्यारोहक रमेश गुळवे यांचे आज निधन झाले. या मोहिमेदरम्यान ‘बेसकॅम्प’ वरच अर्धागवायूचा त्रास झाल्याने त्यांना सुरुवातीस काठमांडू आणि त्यानंतर पुण्यात उपचारांसाठी हलवले होते. हे उपचार सुरू असतानाच आज पहाटे त्यांचे निधन झाले. अवघ्या तेहतीस वर्षांच्या रमेश यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा आणि भाऊ असा परिवार आहे.

पिंपरी-चिंचवड मधील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या वतीने यंदा ‘माऊंट एव्हरेस्ट’ मोहिमेचे आयोजन केलेले आहे. या मोहिमेसाठी गुळवेंसोबत अन्य चारजण सहभागी झाले आहेत. या सर्वानी या मोहिमेसाठी आवश्यक सराव करून नुकतेच २० एप्रिल रोजी बेसकॅम्पहून पुढील चढाईस प्रारंभ केला. यावेळीच श्री. गुळवे यांना अर्धागवायूचा झटका आला. भारतीय सेनेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करत पुढील उपचारांसाठी काठमांडूला हलविण्याची सूचना केली. यासाठी हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली. परंतु खराब हवामानामुळे या हेलिकॉप्टरला बेसकॅम्पला उतरता आले नाही. शेवटी शेर्पा बांधवांच्या मदतीने श्री. गुळवे यांना पायथ्याहून काठमांडूंला हलविण्यात आले. काठमांडू येथे उपचारानंतर त्यांना ‘एअर अ‍ॅम्बुलन्स’ ने गुरुवारी पुण्यात आणले. येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच शनिवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर भोसरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी गिर्यारोहण, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. एक तरुण आणि चांगला गिर्यारोहक हरपल्याबद्दल यावेळी सर्वानी दु:ख व्यक्त केले.

अरुण सावंत हा प्रचंड भारी माणुस आहे.. Happy पण त्याला बहुदा हिमालयाचे आकर्षण नव्हते तो सह्याद्रितीत बिकट प्रस्तरारोहणासाठी पर्फेक्त माणुस होता आणि आहे.. Happy

केव्ह्ज एक्सप्लोरर्स मधुन तेंव्हा रेवदंडा किल्ल्याच्या खालची सर्व भुयारे गळाभर पाण्यातुन आणि गाळातुन अनेक वर्षापुर्वी त्याने पार केलेली आहेत.

बापरे. गुळवेंचा मृत्यू अकल्पित आहे! Sad
कांचनजंगा मोहीमेची आठवण झाली. तेव्हा संजय बोरोळे निवर्तले होते.
देव करो आणि असे काही परत न घडो!
खरा धोका ८००० मीटर्स (~ २६००० फूट) नंतर सुरू होतो. आपले लोक तयारीत असतीलच म्हणा!
-गा.पै.

कांचनजंगा मोहीमेची आठवण झाली. तेव्हा संजय बोरोळे निवर्तले होते.
>>> गामा.. मी ही गोष्ट त्या मोहिमेतील सदस्यांकडुन ऐकलेल्या आहेत. आपण कोणाला व्यक्तिगतरित्या ओळखता का? चारु जोशी, श्रीकांत ओक वगैरे...

आज सकाळची बातमी...
दोघे शिखरावर पोचले होते...बाकीचे तासाभरात पोचणार होते.

हार्दिक अभिनंदन! Happy

ग्रेट... सर्व एव्हरेस्टवीरांचे हार्दिक अभिनंदन Happy

Pages