“हर्ष हर्ष” एयरपोर्ट वरून बाहेर पडतोय तोच पाठीमागून हाक मारणारा ओळखीचा वाटणारा आवाज आला. मागे वळून बघितल तर मागे नेहा उभी होती. आज पाच वर्षानी हर्ष यूएस हून परत येत होता. रंग उडालेल्या, पडझड झालेल्या एखाद्या जुन्या बंगल्यागत नेहा दिसत होती.. अगदी बघवत न्हवते तिच्या कडे. हीच ती रसरशीत, प्रसन्न नेहा हे सांगूनही कोणाला पटले नसते. तिला बघताच हर्षच्या मनात अनेक वर्ष खदखदत असेलेला राग उफाळून बाहेर येऊ पाहत होता. पण अताची तिची ती केविलवाणी व्यक्तीछाया बघून काय करावे हर्षला कळेना. अनाहूत पणे त्याच्या हाताच्या मुठी वळल्या पण तोंडातून शाब्द बाहेर पडेना .. "हर्ष अरे कुठे होतास येवढे दिवस? कसा आहेस?" हर्ष भेटल्याचा झालेला अत्याआनंद कुठल्याही प्रकारे न लपवता नेहा विचारात होती.
काही बोलणार येढ्यात "कसा आहेस हर्ष? डोळे एकदम ठीक ना?" असे म्हणत डों पटवर्धनानी हर्षचा हात हातात घेतला. "डों काका हाच तो हर्ष ह्याच्या डोळ्याचा ट्रीटमेंट साठीच बाबांनी तुम्हाला काही वर्षान पूर्वी फोन केला होता"... "तुझ्या बाबांनी? हर्ष साठी? हा तर पाच सहा वर्षान पूर्वी माझ्या कडे डों वाडियानचे रेकमेनडेशन घेऊन आला होतो. काय रे मन्या? तू फोन केला होतास?" आपला खजील चेहरा लपवायचा प्रयत्न करणार्या नेहाच्या वडलांकडे बघत डों पटवर्धन म्हणाले.
"हो ... नाही म्हणजे' असे काही तरी पुटपुटत ते ईकडेतिकडे बघू लागले. "डों मी चलतो. आय विल कॉनटॅक्ट यू लेटर" म्हणत हर्ष वळला. हे सगळे ऐकून एकदम नर्वस झालेल्या आणि डबडबलेल्या नजरेने आपल्याकडे बघणार्या नेहाशी बोलव म्हणून हर्ष क्षणभर घुटमळला पण न बोलतच चालू लागला.
नेहा....... नेहा आणि हर्ष बीएससीला एकाच दिवशी कॉलेज मध्ये दाखल झाले होते. कॉलेजच्या पाहिल्या दिवशी पहिल्या लेक्क्चर मध्ये प्रोफेसर हजेरी घेत होते. "रोल नंबर एक्कावन" "यस सर".... हजेरी लावयला हात वर केलेला हर्ष आश्चर्ययाने यस सर म्हणर्या आवाजाच्या दिशेने बघायला लागला कारण तो आवाज मुलीचा होता. सरांनी परत एकदा एक्कावन कॉल केला. परत तेच. आता मात्र सरांनी नाव घेतले.. "हर्ष खळदकर" रोल नंबर एक्कावन" "यस सर" म्हणत हर्ष आता उभा राहिला . "आपण बायकी आवाजात का हजेरी देत होतात?" "सर मी हजेरी दिली. ..चुकून" "आपण?" " सर मी नेहा खळदकर " "आपला रोल नंबर बावन्न आहे" "ह्या पुढे लक्षात असू द्या". खजील झालेल्या नेहा ने खाली घातलेली मान होकार अर्थी हलवली.
पुढली तीन वर्ष हर्ष आणि नेहा एकाच तुकडीत होते. पुढे मागे असलेल्या रोल नंबर्स मुळे प्रॅक्टिकल्स, परीक्षा वगैरे सर्व ठिकाणी दोघे कायम शेजारी शेजारी. त्यामुळे हळू हळू संगत वाढत गेली. नेहा दिसायला खूप सुंदर नसली तरी स्मार्ट होती. एक सात्विक सौन्दर्य होत तिच्या चेहर्यात. सर्व गोष्टी जिथे आणि जश्या पाहिजेत तश्या होत्या.. आणि सावळी असली तरी तिच्या कायेला एक प्रकारचे तेज होत. कायम हसर्या चेहर्यामुळे तिचे व्यक्तीमत्व प्रसन्न वाटायचे. पण हे प्रसन्न व्यक्तीमत्व एकदम वेंधळ होत. वह्या, जर्नल्स, नोट्स, ठीक ठिकाणी विसरणे, स्कूटरच्या किल्या हरवणे हे तिचे नित्याचे होते. पण ह्या सगळ्यान पेक्षा गाजले होते ते तिचे केमिस्ट्रि लॅब मधले "प्रयोग". निशिबाने लॅब मध्ये तिच्यामुळे आज पर्यंत तरी कोणतेही घातक अपघात झाले न्हवते.
तरीही नेहा हर्षला फार आवडत असे. आवडत कसली, त्याचे तीचावर प्रेमच होते. नेहाही आपल्यावर प्रेम करते असे हर्षला मनोमन वाटत असे पण आपल्या घरच्या सुमार परिस्तितीचा विचार करून त्याने आपले प्रेम कधीच व्यक्त केले न्हवते.
“नाही डॉक्टर नाही... डोळे उघडणेही शक्य नाही.” डोळ्यांवरचे बॅंडेज काढताच हर्ष कळवळून ओरडला. आज आठवड्याने पहिल्यांदाच हर्षच्या डोळ्यांवरचे बॅंडेज काढून डोक्टरांनी त्याला डोळे उघडायला संगितले होते.
एका फ्रीक अपघातात हर्षच्या डोळ्यांना इजा झाली होती. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शेवटचे केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकल चालू होते. प्रयोग करताना नेहाच्या हातून अॅसिडची बाटली लवंडली. नेहाच्या विरुद्ध बाजूला टेबला वाकून आपल्या प्रयोगात मग्न असलेल्या हर्षला मान वर करायला वेळे नाही मिळाला. काही समजायच्या आत अॅसिडच्या फुम्स त्याच्या डोळ्यात गेल्या.
"आता पुढे काय डॉक्टर?" कावर्याबावर्या चेहर्याने हर्षच्या वडीलानी डॉक्टरांना विचारले... "मी म्हंटले होते आपण प्रयत्न करुयात पण इलाजाची खात्री नाहीये. मला वाटत तुम्ही त्याला यूएसला न्यावेत अधिक इलाजा साठी." "यूएस ला?" चिंतयुक्त स्वरात हर्षचे वडील म्हणाले. "हो यूएसला. तिथे डों. पटवर्धन म्हणून आहेत न्यू जर्सी मध्ये, त्यांचाशी बोलेन मी. तुमचे ठरले की सांगा मला" ... "डों. पटवर्धन? ते बाबांचे अगदी जवळचे मित्र आहेत, बाबांनी डॉ पटवर्धनाना सांगितलं तर सगळीच सोय होईल हर्षची तिकडे. मी आत्ताच बाबांना सांगते त्यांच्याशी बोलायला" इतका वेळ अतिशय रडव्या चेहर्याने उभी असेलेली नेहा थोडी उल्हसित होऊन म्हणली आणि लगबगीने घरी निघाली.
"यूएस ला पाठवा ट्रीटमेंटला" हे ऐकून खचलेल्या हर्षच्या वडलांनी दुसर्या दिवशी मात्र कंबर कसली. राहत घर विकून आलेल्या आणि प्रीम्याचुयर रीटायरमेंट घेऊन ग्र्याचुइटी , प्रोविडेंट फंडातुन आलेले पैशातून हर्षची यूएसला ट्रीटमेंट साठी रवानगी केली. मित्र, अप्तेष्ठानी, शेजार्यपाजार्यांनी जमेल तसा हातभार लावला. कॉलेज मॅनेजमेंटनेही काही मदत केली. हे सगळे होत असताना नेहा कडून किंवा तिच्या वडलांनकडून काहीच निरोप नाही आला. ते डों पटवर्धन ह्यांच्याशी बोलले किंवा कसे हे कळले नाही.
यशस्वी ट्रीटमेंट नंतर हर्षने स्पेशल परवानगी घेऊन यूएस मधूनच ऑनलाइन बीएससी फायनलची परीक्षा दिली.
आधीच्या इंटेरेरनेट व इतरत्र पब्लिश केलेल्या रिसर्च पेपेर्स मुळे हर्ष केमिस्ट्रिच्या जगतात थोडाफार ओळखला जाऊ लागलेला होता. युनिव्हर्सिटी मध्ये पहिला आल्यावर मॅसाच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी, केंब्रिज, मध्ये त्याला लगेचच रिसर्चर म्हणून काम मिळाले. त्याच्या रिसर्च मुळे आज त्याच्या क्षेत्रात हर्षने आता चांगलाच मान मिळवला होता.
"हर्ष हर्ष " आता परत कोण हाक मारताय म्हणून मागे बघेस्तोवर नेहाचे वडील हर्षच्या जवळ पोचले. "हर्ष हर्ष प्लीज ..... मला माफ कर. पुढची जवाबदारी आपल्यावर येऊ नये म्हणून मी पुळचटपणे डों पटवर्धनना फोन कारायचे टाळले होते तेव्हा. माला खरच माफ कर..... प्लीज" अतिशय आरततेने नेहाचे वडील बोलत होते. दोन मिनिटे कोणीच काही बोलले नाही. शरमेने मान खाली घालून उभे असलेले नेहाचे वडील कशीबशी हिमत करून म्हणाले " गेल्या पाच वर्षात बरेच काही घेडले. तुला झालेल्या अपघाता नंतर नेहा खूप खचली. त्यांतून तुझा काही ठावठिकाणा मिळेना. तू ट्रीटमेंटला यूएस ला गेल्याचे कळले पण तेव्हढेच. नेहा पार खचली. बीएससीपण पूर्ण करू नाही शकली. तिचे आत्ताचे रंग उडलेले रंगरूप पाहतो आहेस ना?....... पार पार खचलीये रे ती. ह्या काळात ती तुझ्या वर किती प्रेम करते ते मला समजले. आणि आपण किती मोठी चूक केली तेही उमगले. ....... आज मी तुला कळकळीची विनंती करतो की तू नेहाशी लग्न कर"
राग अनावर झालेला हर्ष मुठी अवळत स्व:ताला अवरायचा प्रयत्न करत इकडे तिकडे बघू लागला. येवढ्यात सविता शेजारी येऊन उभी राहिली आणि "है हर्ष" म्हणत ती हर्षला बिलगली. "काका ही सविता. पुढच्या आठवड्यात आमचे लग्न आहे" म्हणत हर्ष वळला आणि आश्चर्याने त्याच्या कडे बघणार्या सवितला जवळजवळ खेचतच घेऊन चालू लागला. “आपले लग्न”...”नंतर बोलू.. मी घुसमटतोय इथे चल लवकर”... म्हणत त्याने सविताला गाडीत जवळजवळ ढकललेच.
दुरून नेहा हे सगळे हताश पणे बघत होती. आताही केमिस्ट्रि लॅब मध्ये डोळ्यांवर हात दाबून कळवळत लोळणारा हर्ष तिच्या डोळ्यां समोरून जात न्हवता.
उगवणार्या लाल बुंद सूर्याच्या गोळ्या कडे हर्ष एकटक बघत होता. मनात ह्या पूर्वीच्या घटनानची शृंखला चालू होती.
"अरे हर्ष चहा...... चहा घेतोस न? गार होतोय किती वेळा सांगायचे?” नेहाच्या आवाजाने हर्ष भनावर आला. चहा घेतघेता परत विचारांची मालिका सुरू झाली.
पाच वर्षान पूर्वीचा तो रविवार आठवला. त्या दिवशी सुद्धा हर्ष असाच उगवत्या त्या लाल गोळ्याकडे बघत विचार करत होता. पाच वर्षानी हर्ष त्याच्या आई, वडीलानना भेटत होता. आजचा संपूर्ण रविवार आई, वडलान बरोबर घालवायचा असे हर्षने ठरवले होते. पूर्वी प्रमाणे सकाळी सकाळी प्याटीस आणण्यासाठी बाहेर पडायला दार उघढायला गेला तेवढ्यात दार वाजले. दारात नेहा प्याटीस घेऊन उभी होती. काहीच न बोलता हर्ष वळला आणि आत येऊन बसला. नेहा ही आत आली आणि “नमस्कार करते काकू” म्हणत हर्षच्या आईवडलाना तिने नमस्कार केला.
“अरे नेहा, बर्याच वर्षांनी? बसना. काशी आहेस?” हर्षचे वडील म्हणाले. नेहाच्या मागोमाग तिचे वडीलही आत आले. एक प्रकारची अस्वस्थ शांतता पसरली होती हॉल मध्ये. कोणीच कोणाशी बोलत न्हवते ना नजरेस नजर मिळवत होते. सर्व जण खाली मान घालून बसले होते. हर्ष उठून “जरा बाथरूमला जाऊन येतो” म्हणून निघाला. “हर्ष, बस जरा” हर्षचे वडील म्हणाले आणि हर्षच्या आई कडे वळून म्हणाले तू जरा प्याटीस घेवुन आत जा, चहा कर सगळ्यांसाठी”.
नेहाही आत गेली, सगळ्यांसाठी पाणी घेऊन आली..... “आनंद साहेब, आम्हाला माफ करा... फार मोठी चूक झाली माझ्या कडून” पाणवलेल्या डोळ्यांनी नेहाचे वडील हर्षच्या वडलांना म्हणाले. परत नीरव शांतता. कोणीही काही बोलेना. अशीच काही मिनिटे गेल्या वर नेहा म्हणाली.. “हर्ष अरे बाबांनी डॉ पटवर्धनाना फोन केला नाहीये हे मला माहीत न्हवते.. आजी आजारी आहे असे म्हणून आईने मला पालघरला पाठवून दिले...माझा काहीच कॉनटॅक्ट उरला नाही इथल्या जगाशी..परत आल्यावर मी तुला शोधायचे खूप प्रयत्न केले.. परीक्षेच्या काळात पण इथे नव्हते त्यामुळे माझा कोणाचीश कॉनटॅक्ट न्हवता .. मला पुण्याला दोन वर्षान नंतर आणले... तुझा कसलाही कॉनटॅक्ट न्हवता.. मी तरी काय करू सांग? तुमच्या घरी गेले तर तिथे कोणी दुसरेच राहत होते. तुझा पत्ता कोणाकडुच मिळेना”
“तीथे दुसरेच असणार होते नेहा” अजूनही रागात असलेला हर्ष म्हणाला..”ट्रीटमेंट साठी बाबांना घर वीकायला लागल होते.. चाळी मध्ये दोन खोल्यांच्य ब्लॉक मध्ये शिफ्ट व्हावं लागला त्यांना.” "आता जाऊदे ते सगळे.... नेहाने काही मुद्दाम केले न्हवते.. तो अपघात होता.. आता झालयना सगळे ठीक? मग सोड आता जुन्या गोष्टी” "आई त्या अपघाता विषयी नाही दुखा: पण हिच्या बाबांच्या एका फोनने हे बर्याच गोष्टी टळल्या असत्या. इतका पुळचटपणा काय कामाचा? पुळचटपणा कसला, स्वार्थी पणा. माझं करियरच नाही, जीवन टांगणीवर होते येवढे साधे त्यांना कळले नाही?”
“जाऊदे आता” हर्ष ची आई परत म्हणाली. “हर्ष तुझे सगळे म्हणणे मला मान्य आहे... माझ्या ह्या चुकी मुळे आम्ही पण खूप भोगले आहे.. धंदयातले माझे लक्ष्य उडाले, धंदा बुडाला. हिची आई हाय खाऊन गेली. नेहाची स्थिति तू बघतोच आहेस.. ती अढ्याकडे नजर लावून बसलेली असते. पार खाचली आहे ती. डॉ पटवर्धनान कडे सुधा तू काही पत्ता सोडला न्हवतास.”
“हर्ष जाऊदेत आता सर्व गोष्टी.. तू नेहाशी सर्व गोष्टी विसरून लग्न कारावस असे मला वाटते.. तसेही सविता विषयी आपण अजून काही बोललो सुद्धा नाहीये. त्यामुळे तो विषय इथेच थांबवू. नेहाशी तुझा साखरपुडा आजच उरकून घेऊ.” हंसहमशि रडणार्या नेहाने हे आइकून हर्षला मिठी मारली. त्याच दिवशी संध्याकाळी साखरपुडा झाला. आज ह्या गोष्टीला दहा वर्षा झाली होती.
“नेहा चहा गार झालाय. नवीन कर” नेहाच्या गळ्यात हात टाकत म्हणाला. “कसला विचार करत होतात इतका?” “असच. आज दहा वर्ष झाली.. माझ्या दुसर्या पुनरजन्माला.” “दूसरा?” “हो दूसरा. पहिलं झाला डॉ पटवर्धनान मुळे.” “आणि दूसरा?” “तुझ्या मुळे.. मी खूप चिडलेला होतो पण तरीही तुझ्या शिवाय जगू शकलो नसतो नेहा.”
“आईकते आहेस ना?” कुठून तरी ऐकू येणार्या “तेरे बिना जिंदगी लेकिन जिंदगी तो नाही जिंदगी नाही” गाण्या कडे नेहाचे लक्ष वेधत हर्ष म्हणाला ...
---00---
(No subject)
(No subject)
(No subject)
जरा विस्कळीत वाटतेय.. म्हणजे
जरा विस्कळीत वाटतेय..
म्हणजे मधूनच लिंक लागेनाशी होतेय!
बाकी, छान आहे!
शुध्ध लेख ना कडे बघा. बाकी
शुध्ध लेख ना कडे बघा. बाकी छान जमली आहे!
<<जरा विस्कळीत वाटतेय.>> +
<<जरा विस्कळीत वाटतेय.>> + १
कथाबीज चांगले आहे. पण जमली नाही असे वाटते.
<<जरा विस्कळीत वाटतेय.>> + २
<<जरा विस्कळीत वाटतेय.>> + २
पण प्रयत्न चांगला. लिहीत रहा.
कथाबीज चांगले आहे. पण जमली
कथाबीज चांगले आहे. पण जमली नाही असे वाटते. >>>+१
विस्कळीत
विस्कळीत
विस्कळीत
विस्कळीत
Thik ahe
Thik ahe
हर्षचे करिअर घडणे, ट्रीटमेंट,
हर्षचे करिअर घडणे, ट्रीटमेंट, सविता हे जरा जास्त खुलवून सांगता आले असते..पण लिखाणशैली चांगली आहे, परिपूर्ण बनवता येईल