Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28
कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे मालिका. मी तसा सिरीअल
छान आहे मालिका.
मी तसा सिरीअल वगैरे पाहत नसतो कधीही, पण आमच्या मातोश्री हे लाऊन बसतात आणि फक्त ब्रेकमध्ये आयपीएल पाहू देतात म्हणून मग काही भाग पाहिले. मला तरी बर्यापैकी आवडली. अन्य कुठलीच टीव्ही मालिका मी पाच-दहा मिनिटाच्यावर पाहू शकत नाही. त्यांच्या तुलनेत ही कितीतरी उजवी आहे.
हा धागा आताच वाचला. भलतेच लॉजिकल डिसेक्शन चालू आहेत.
रिलॅक्स व्हा मित्रांनो, टीव्ही आहे तो.
आजचा एपिसोड फारच घोर लावून
आजचा एपिसोड फारच घोर लावून गेला. आम्ही दोघेही गेलोत ना या प्रसंगातून त्यामुळे इतरांना त्रागा वाटेल पण आम्हाला कुठेतरी आतल्या जिव्हारी लागून गेला.
असो, जरा सहनशील होवून पाहिली तर खूप सुंदर जागा आहेत ,उदा. विनय आपटेंचा अभिनय्-आजचा!!!
बहुतेक मालिकांत संयुक्त
बहुतेक मालिकांत संयुक्त कुटुंबे असतात आणि त्यांच्या घरातले डायनिंग टेबल तेवढे संयुक्त कुटुंबाला साजेसे असते. स्वैपाकाची भांडी चौकोनी कुटुंबाच्या बेताचीच असतात.
देवकीबाईंनी आणलेले पुट्टुपात्र काही दाखवले नाही. (बजेटमध्ये बसत नसेल )
आता मालिका छान पकड घेऊ लागली आहे.राधा-घनाचा स्वैपाक करण्याचा प्रसंग मस्त रंगला. पहिल्यांदा पुर्या तळण्याच्या वेळचे राधाचे भावही भार. कढईखाली चक्क विस्तव पेटत होता.(जुन्या गजरा कार्यक्रमातला ड्रायव्हिंग शिकणार्या बाईने गाडी चालू लागल्यावर स्टिअरिंग सोडून टाळ्या पिटल्याचा प्रसंग आठवला.)
मज पामरास एक सांगा - घनाला
मज पामरास एक सांगा - घनाला एका कंपनीकडून ऑफर आली आहे असं राधा वडिलांना सांगते. मग घना आता हैदराबादला कशाला गेलाय? दुसर्या कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी का?
>>पण नेह मी होते तेच घडत आहे.
>>पण नेह मी होते तेच घडत आहे. टीआर्पी वाढू लागला की पाणीच् पाणी चोहुकडे ग गेला घना कुणीकडे असं होउ लागले आहे.
अगदी, अगदी.
>> मुळात ही फार्सिकल ढंगाने जाणारी मालिका आहे.
होsssssss?? डिस्क्लेमर दिसला नाही "ही फार्सिकल ढंगाने जाणारी मालिका आहे, यास्तव मालिकेवर इथे टीका करु नये"
>>त्यात पाणी-बिणी कुठेही घातल्याचं जाणवत नाही... पाहताना स्वतःला जरा निराळ्या मोल्डमधे टाकून मग पहा.
हत्ती आणि त्याला चाचपणारे आंधळे यांच्या गोष्टीची आठवण झाली. एक पायाला खांब म्हणतोय, दुसरा शेपटीला धरून साप म्हणतोय वगैरे वगैरे आणि
फक्त हत्ती म्हणणारा डोळस वेडा ठरतोय.
ते दोन काका आणि त्यांनी तोडलेले बिनकामाचे तारे हेच मोठ्ठं पाणी आहे.
चालुद्या.
मज पामरास एक सांगा - घनाला
मज पामरास एक सांगा - घनाला एका कंपनीकडून ऑफर आली आहे असं राधा वडिलांना सांगते. मग घना आता हैदराबादला कशाला गेलाय? दुसर्या कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी का?
>>>>>>>>>
स्वप्ना, किती प्रश्न पडतात ग तुला
पण ज्यांना आवडत नाही ते लोकं
पण ज्यांना आवडत नाही ते लोकं का बघतात ही मालिका? सीरीयसली विचारत आहे.
हं आता ज्यांना घरातल्या सदस्यांमुळे नाईलाजाने बघावी लागते त्यांची गोष्ट निराळी. एखादा प्रसंग न आवडणे, एखादं पात्रं न आवडणं हे समजू शकतो पण..?
भुंग्या सांग की घनाला खुलासा
भुंग्या सांग की घनाला खुलासा करायला
कसला रे मित्र तू
भुंग्या सांग की घनाला खुलासा
भुंग्या सांग की घनाला खुलासा करायला
कसला रे मित्र तू
>>>>>>>
त्यापेक्षा कुहूला सांगू का
अगदी अगदी लगेच कवितेसकट उत्तर
अगदी अगदी
लगेच कवितेसकट उत्तर मिळेल
खरच इथले प्रतिसाद वाचतात
खरच इथले प्रतिसाद वाचतात बहुदा.. 'रिक्षा' 'भुंगा' वगैरे झालच शिवाय राधाच्या नाकातली चमकी, घोळदार मिसमॅच ड्रेसेस बदलले, आळशी लोळत पडणार्या घनाला स्वयंपाकात काम करण्या साठी हात पाय हलवायला लावले, परवा मटार सोलण्यावर पण काहीतरी जोक होता :).
इथलं वाचून अता त्या कुहुचं पण काहीतरी करा प्लिज.. सध्या आपल्या माराठीच्या कृपेने कुहुला , काका पब्लिक ला आणि त्या मुक्ताच्या ऑफिस मधल्या त्या महा इरिटेटिंग मित्राला फॉरवर्ड करता येते !
आत्तापर्यंत एका लग्नाची दुसरी
आत्तापर्यंत एका लग्नाची दुसरी गोष्ट ही मालिका मला मस्त वाटत आहे.
मला त्यातले सासू सुनेचे, सुनेचे सासर्यान बरोबरचे नाते, सुनेचे चुलत सासूबाई बरोबरचे, राधाचे वाहिनी म्हणून कुहू वन्स बरोबरचे नाते, आजी सासूबाई आणि सुनेचे नाते....... हे सगळे पाहताना मला खूप हेवा वाटतो. ज्यांच्या आयुष्यात ही सगळी नाती इतक्या जवळून आणि प्रेमाने रोजच्या आयुष्यात अनुभवायला मिळत असतील ते खरच नशीबवान म्हण्याला हवेत.
सगळ कस न हळुवार.....स्वप्नातल्या सारख !!!
मंदार आंधळ्यांना ही भावना
मंदार आंधळ्यांना ही भावना असतात व अन कित्येकदा ते डोळसांपेक्षा सूज्ञ ठरतात
आता बोला
Sarcasm is not known to be one of the best virtues!!
>>>मला त्यातले सासू सुनेचे,
>>>मला त्यातले सासू सुनेचे, सुनेचे सासर्यान बरोबरचे नाते, सुनेचे चुलत सासूबाई बरोबरचे, राधाचे वाहिनी म्हणून कुहू वन्स बरोबरचे नाते, आजी सासूबाई आणि सुनेचे नाते....... हे सगळे पाहताना मला खूप हेवा वाटतो. ज्यांच्या आयुष्यात ही सगळी नाती इतक्या जवळून आणि प्रेमाने रोजच्या आयुष्यात अनुभवायला मिळत असतील ते खरच नशीबवान म्हण्याला हवेत.
सगळ कस न हळुवार.....स्वप्नातल्या सारख !>>>>>>>>अगदी अगदी. +१
एका लग्नाची दुसरी गोष्ट ही
एका लग्नाची दुसरी गोष्ट ही मालिका माझी आई सुरवाती पासून पहाते. दोन तीन आठवड्यान पूर्वी मला म्हणाली "अग अनु राधा ला बोलताना बघून ती तूच बोलते आहे अस वाटत मला वाटत. अगदी ह्याच कारणासाठी मी ही मालिका पाहते", मी आईच बोलण मनावर नाही घेतल. कारण मी इतकी काही हे नाही आहे.......
आई ने हेच आमच्या ह्यांना सुधा सांगितले. कधी न्हावे ते आकाश सुधा आपलीमराठी वर मालिका पाहायला लागले. आणि वर हे पण ऐकवल "राधाच कॅरेक्टर आणि तुझ्यात खूप साम्य आहे." मला थोडी गम्मत वाटली कारण मला तर अस कधीच जाणवल नाही.
आज आत्ता तर कमाल झाली मुंबईहून माझी मोठी ताई मला फोन करते ते ही हे सांगण्या साठी की ती ही मालिका पाहते कारण राधाला बघताना तिला क्षणोक्षणी माझी आठवण येते. तीच बोलण, तिचे विचार, तिची केशरचना हे तिला माझ्यासारखं वाटत. गम्मत बघा तिचा फोन ठेवते तर माझी NY ची एक मैत्रीण (बालमैत्रीण) तिच्या लंच च्या वेळेस हेच सांगत होती. अगदी माझ्या ताई सारखंच .
आत्ता खरच कमाल झाली बाई………मला कळत नाही मी खरच अशी आहे? माझ्या जवळच्या इतक्या सगळ्यांन समोर माझी प्रतिमा अशी आहे?
आत्ता माझ मीच स्वतःला समजावते आहे……मी दुसऱ्या कुणा सारखी असूच शकत नाही….कारण मी वेगळी आहे !!!
>>स्वप्ना, किती प्रश्न पडतात
>>स्वप्ना, किती प्रश्न पडतात ग तुला
अरे, 'इंटरव्ह्यूच्या कॉल'ला आजकाल 'ऑफर' म्हणायला लागले का काय अशी शंकेची पाल चुकचुकली मनात म्हणून खुलासा विचारला बरं. तसे ह्या मालिकेतले सिन्स अधूनमधून पाहताना आणखी अनेक प्रश्न पडतात. इथे विचारत नाही एव्हढंच.
विचारा विचारा....तुमची टिपणी
विचारा विचारा....तुमची टिपणी मजेशीर असते
अनन्या, माझ्या मातृदैवताचं
अनन्या, माझ्या मातृदैवताचं देखील हेच मत आहे. मला स्वतःलाही राधाच्या आणि माझ्या काही विचारांत बरंच साम्य जाणवतं. असं ही मालिका पहाणार्या बर्याच जणींना वाटत असेल. पण म्हणून आपण तिच्या डिट्टो कॉपी नाही. कारण आपण सगळ्या जणी बाकी बाबतीत तिच्याहून भिन्न विचार करत असणार.
उदा. राधा म्हणते की मला मुलं पहायचा कार्यक्रम करून करुन कंटाळा आला आहे. म्हणून ती घनाबरोबर हे सोयीचं तात्पुरतं लग्न करते. दुसरी एखादी मुलगी वडिलांना निक्षून सांगेल की मला लग्न करायचं नाही, एन्ड ऑफ डिस्कशन.
दुसरं उदाहरण घ्यायचं तर मी खोटं बोलत नाही असं म्हणणारी राधा सासरच्या सगळ्या मंडळींना मला स्वयंपाक येत नाही म्हणून स्वच्छ सांगत नाही. दुसरी एखादी मुलगी कबूल करून मोकळी होईल. राधाचं कॅरेक्टर फसलं असं आपल्याला वाटू शकतं. पण खर्या आयुष्यात माणसांच्या स्वभावात विसंगती आढळते. म्हणून तर आपण सगळे वेगवेगळे आहोत
स्वैपाक करताना घना राधा भोवती
स्वैपाक करताना घना राधा भोवती हात टाकतो तो प्रसंग ५-१० सेकंद जास्त हवा होता .. राधा चे हात त्याचा हात काढण्यासाठी जातात पण ती काढ्त नाही किंवा ति त्याचा हात नकळत पकडते आणि नंतर घनाच्या लक्षात आल्यावर तो पटकन हात काढतो असे दाखवले असते तर एक 'नॉच' वर गेला असता एपिसोड..
सुलु, तुम्ही म्हणता तेच
सुलु, तुम्ही म्हणता तेच दिग्दर्शकाला दाखवायचे आहे. त्यांनी ते कृतीतून न दाखवता पार्श्वसंगीतातून सांगितले आहे. घनाच्या स्पर्शाने राधा मोहरुन ( पु. लं. च्या नाथा कामत च्या भाषेत, 'महिरुन' ) जाते हे जेव्हा दाखवायचे आहे त्या प्रत्येक प्रसंगाला दिग्दर्शकाने विशीष्ट म्युझीक पीस वाजवला आहे. उदा. गृहप्रवेशाच्या वेळेला घना राधाचा हात पकडतो तेव्हा, दोघांच्या नाचाचा सीन आहे त्या वेळेला, वगैरे...
मला ही दिग्दर्शनातली कल्पकता वाटली.
कालचा भाग,आजचा भाग व पुढच्या भागाची झलक खूप सूचक आहेत. राधा घनाच्या प्रेमात पडू लागली आहे. स्वतःच्याच नकळत. त्यामुळे घनाच्या जवळिकीला तिनी दिलेला रिस्पॉन्स घनाला दुखावून जातो का ? कारण तो तिला न सांगताच हैद्राबादला निघून गेलाय. पुन्हा एकदा दिग्दर्शन रॉक्स.
अनेक गंडलेल्या गोष्टींबरोबरच काही कल्पक आणि झटकन अपील होणार्या गोष्टी देखील ते दाखवतात. कदाचित म्हणूनच आपण बर्याच गोष्टी खपवून घेऊन उत्सुकतेने नवा भाग बघतो.
हे सर्व अर्थातच माझं वैयक्तीक मत.
स्वप्ना_राज | 26 April, 2012
स्वप्ना_राज | 26 April, 2012 - 13:30
~खर्या आयुष्यात माणसांच्या स्वभावात विसंगती आढळते. म्हणून तर आपण सगळे वेगवेगळे आहोत ~
स्वप्ना बरोबर बोलता आहात. खरच खूप छान विश्लेषण केलत.
कधी कधी काय होत न......"तू आमच्या भावनांचा थोडा तरी विचार कर किवां शोनू तू ही गोष्ट फक्त माझ्या साठी कर नंतर सगळ तुझ्या मनाप्रमाणे होईल"........अशी अजूनही खूप वाक्य असतील की जी आपल्या स्वतःच्या प्रामाणिक आणि प्रक्टिकल विचारांना अक्षरशा गुंडाळून टाकतात.
अश्या वेळेस काय होत एकीकडे आपल्याला स्वतःच्या प्रिन्सिपल्स बरोबर प्रामाणिक तर रहायचं असत पण त्याच वेळेस आपण आपल्या जवळच्या माणसांच्या भावनांचा सुद्धा तेवढाच प्रामाणिक पणे विचार करत असतो. आणि मग ह्या सगळ्या गोंधळात ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडतात ते म्हणजे राधाच character आहे.
अस थोडस मला वाटत.
अनेक गंडलेल्या गोष्टींबरोबरच
अनेक गंडलेल्या गोष्टींबरोबरच काही कल्पक आणि झटकन अपील होणार्या गोष्टी देखील ते दाखवतात. कदाचित म्हणूनच आपण बर्याच गोष्टी खपवून घेऊन उत्सुकतेने नवा भाग बघतो. >>>>> +१
काल चा भाग चांगला होता
काल चा भाग चांगला होता
'स्वयंपाक करणे' ऐवजी 'जेवण
'स्वयंपाक करणे' ऐवजी 'जेवण करणे' हा वाक्प्रचार सर्वत्र रूढ होऊ पहात आहे.
सर्व मराठीभाषाप्रेमींना विनंती आहे की, तुम्ही स्वतः चुकीचे बोलू नका आणि इतरांना बोलू देऊ नका.
धन्यवाद !
<<इतरांना बोलू देऊ नका. >>
<<इतरांना बोलू देऊ नका. >> कसे?
वगैरे या शब्दाचा उच्चारच काय लेखनही वैगरे, वैगेरे असे केले जाते. 'मी आली' यातही कोणाकोणाला काहीही चूक वाटत नाही.
अवनी, अनुमोदन.
अवनी, अनुमोदन.
यांचं काही वेगळं
यांचं काही वेगळं नाहिये
सगळ्या घरात असच आई वडिल लांब जाऊ देत नाहीत
सगळ्या घरात एक्मेकांना इमोशनली ब्लॅकमेल केलं जात
सगळीकडे लग्नामुळे करिअरची वाट लागते
सगळीकडे सगळे आपलं मत चुकिचं ठरवतात
सगळ्यांना घर सोडुन लांब जाणं हे माणसांपासुन तुटण्यासारखं वाटतं
सगळीकडे अशीच मोठ्यांची मत आपल्यावर लादली जातात
आणि निव्वळ
कालचा भाग जरा बरा वाटेपर्यंत
कालचा भाग जरा बरा वाटेपर्यंत आज पुन्हा घोळ झाला.
बायकांना सिक्स्थ सेन्स नावाचा प्रकार असतो. तो अमानव राधावर दुसर्याशी लग्न झाल्यानंतरही प्रेम करतोय. आणि छुप्या पद्धतिने पप्पांना त्रास देतोय तरी हीला कळत नाही. कळल्यासारखे दाखवले तरी इतकी रोखठोक बोलणारी मुलगी मानवाला का सांगत नाही? पप्पा तरी इतका कसा दुसर्यावर विश्वास ठेवतात कोण जाणे. राधा आणी घनाचं भांडण हे एकमेव लक्ष्य आहे काय नातेवाईकांचं? अमेरिकेला जाणं इतकं अवघड करून ठेवलय या लोकांनी. आम्ही अमेरिकेला निघाल्यावर सुटकेचा निश्वास टाकलेले नातेवाईक आठवतात.;)
रंग भरू लागलेत आता मालिकेत
रंग भरू लागलेत आता मालिकेत इला भाटेंचं काम आवडतंय मला , सहज वाटतं अगदी. मालिकेतील संवाद तर पहिल्यापासूनच आवडताहेत विनय आपटे तर कमाल !
देवकीबाईंचा राधाशी बोलताना
देवकीबाईंचा राधाशी बोलताना तुटकपणा चांगला दाखवला....
आता कशी ती रिअल सासू वाटतेय.
Pages