वारली चित्रकला-काचेवर

Submitted by .अदिती. on 25 April, 2012 - 07:51

घरचे कॉफी टेबल / सेंटर टेबल खराब होऊ नये म्हणून वरून काच ठेवली आहे. पण त्या काचेवरही ओरखडे पडले व दिसायला लागले. त्यावर एक वारली चित्र काढायचे मनात होते. काल अबोलीचा धागा वर आला व त्यावरुन आमचे कॉफी टेबल असे दिसायला लागले.
ct_1.JPG

बाजूची जागा जरा रिकामी वाटत होती. पण काय काढावे ते सुचत नव्हते. नेहमीची वारली चित्र काढावीशी वाटत नव्हती म्हणून माझ्या मुलांवरुन काही - बाही चित्र काढली. माझ्या मुलीचे केस लांब आहेत म्हणून चित्रातल्या मुलीलाही लांब वेण्या काढल्या.
कशी वाटत आहेत?
ct_2.JPG

गुलमोहर: 

सर्वांना धन्यवाद.

श्री हो काचेवर काढलेय.

वर्षू साधे पोस्टर कलर्स आहेत. कसे दिसेल त्याची खात्री नव्हती त्यामुळे फार यातायात न करता पुसता येईल असे बघितले. Happy
आणि हेच चित्र कायम न ठेवता नंतर बदलत ठेवायचा विचार आहे.

ओ वॉव.. साधे पोस्टर कलर्स??
मग ते काचेवरचे पुसून काढायला काय वापरायचं? टरपेंटाईन ????

मस्त Happy

सर्वांना धन्यवाद.

कृपया वारली कलेत इतक्या निष्णात मायबोलीकरांनी इथे शिकवायचं मनावर घ्यावं!>>
मृण्मयी हे तू मला बोलतेय असं समजून लिहितेय Wink

मंडळी माझं हे पहिलच वारली चित्र आहे.
माझी चित्रकला ठिक ठाकच आहे. जस्त करुन माझ डूडलींगच चालतं.
वरच चित्र चांगले वाटण्याचे कारण वारली चित्रकलेची तिच तर मजा आहे. रेखाटनात बर्‍याच तृटी असल्या (ज्या वरील चित्रात बर्‍याच आहेत) तरी संपूर्ण चित्र चांगले वाटते. विषेशतः बॉर्डर्स काढुन साध्या चित्रातही फार फरक पडतो.

तर मग उचला ब्रश्,पेन, पेन्सिल आणि करा सुरुवात. Happy

Pages