वारली चित्रकला-काचेवर

Submitted by .अदिती. on 25 April, 2012 - 07:51

घरचे कॉफी टेबल / सेंटर टेबल खराब होऊ नये म्हणून वरून काच ठेवली आहे. पण त्या काचेवरही ओरखडे पडले व दिसायला लागले. त्यावर एक वारली चित्र काढायचे मनात होते. काल अबोलीचा धागा वर आला व त्यावरुन आमचे कॉफी टेबल असे दिसायला लागले.
ct_1.JPG

बाजूची जागा जरा रिकामी वाटत होती. पण काय काढावे ते सुचत नव्हते. नेहमीची वारली चित्र काढावीशी वाटत नव्हती म्हणून माझ्या मुलांवरुन काही - बाही चित्र काढली. माझ्या मुलीचे केस लांब आहेत म्हणून चित्रातल्या मुलीलाही लांब वेण्या काढल्या.
कशी वाटत आहेत?
ct_2.JPG

गुलमोहर: 

सुंदर.

आणि हेच चित्र कायम न ठेवता नंतर बदलत ठेवायचा विचार आहे.>>> हे जास्त आवडेश Happy
तेच ते टेबल रोज रोज पाहण्यापेक्षा नवनवा बदल नक्कीच सुखावणारा असेल Happy

खूप सुंदर झालंय, खरंच, पुसवेल तुम्हाला एवढी सुंदर कलाकृती, एवढ्या तासांची मेहनत? मला रांगोळी पुसतानापण कससंच होतं.

मला इथे यायला बराच उशीर झाला... (माझा वाढदिवस होता २५ ला.. मग उशीर होणारच किनै.. Happy )

अदिती, अप्रतिम! पहिला प्रयत्न? अजिबात विश्वास बसत नाहिये! मला आवडेल तुमची वारली चित्रे पहायला.. अजुन येऊ देत!

अभिप्रा, मलाही वाईट वाटते प्रत्येक वेळी रांगोळी पुसताना...

मस्त Happy

अभिप्रा, अग काढायला साधारणतः १.५ - २ तास लागले असतील.
पुसुन टाकायला वाईट तर वाटेलच पण काय आहे की काही दिवस मी टेबल सांभाळेन. नंतर यथावकाश मुलं त्यावर पाण्याने भरलेला पेला सांडतील..पाणी काच व टेबलाच्या फटीत जाईल व चित्र खराब होईल मग पुसुन टाकण्याशिवाय गत्यंतर रहाणार नाही. Proud

अबोली तुझी वारली चित्र अप्रतिम आहेत. आम्हालाच तुझी आणखी चित्र बघायला आवडतील.
मी फक्त अजून एकच (भिंतीवर लावण्यासाठी) वारली चित्र काढण्याची शक्यता आहे. Happy

Pages