Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28
कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सानी, सही.. मला अजय अतुल,
सानी, सही..
मला अजय अतुल, शंकर एहसान लॉय, वगैरे सारखे वाटले होते. माहितीबद्दल धन्यवाद.
विषयांतराबद्दल क्षमस्व.
असेल मंदार मग. तो योगायोगही
असेल मंदार मग. तो योगायोगही असू शकतो.
गजानन
अरे या घनाला किती तो वेळ
अरे या घनाला किती तो वेळ मिळतो घरात
स्वयंपाक वैगेरे करायला
मलाच काय तो वेळ मिळत नाही
"..माझी भाजी जळली ना, तर मी
"..माझी भाजी जळली ना, तर मी जीव घेईन तुमचा.."
मी कालचा आणि आजचा भाग थोडा
मी कालचा आणि आजचा भाग थोडा थोडा पाहिला. आश्चर्य आहे घना एकत्र कुटुंबातला मुलगा असुन त्याला स्वयंपाक बनवायला येतो.
कुहुच्या ड्रेसचा पॅटर्न (जराही बदल नाही एकाही भागात) तिच्या फिगरला अजिबात शोभत नाही. खरंतर ती मला आवडलीच नाहीए. तिचा रोल काय इरिटेटिंग आहे. ती मुक्ताला ज्याप्रकारे पिडत होती किचनमधे, मला वाटलं मुक्ता घनाच्या प्रेमात पडली तरी कुहुला वैतागुनच त्याला डिवोर्स देइल.
कुहुला उनिफॉम घातल्यासारखे का
कुहुला उनिफॉम घातल्यासारखे का चुडिदार देतात?
बावळट दिसते ती. खूपच नकली वाटते अभिनय करताना.. उगाच ते लाजणे... आजकाल इतक्या बावळट मुली असतात काय ज्या अश्या कविता करत फिरत असतात पराकोटीच्या भावना बाळगून?
मी परत बघायला लागले आता ही
मी परत बघायला लागले आता ही सिरियल... कालपासून बघतेय.. घना जेवण करताना लॅपटॉपचा आवाज एकदम मोठा करून पाहिला. इकडचा पण स्वैपाक चालला होता.
मने
मने
काकू रागावून नवर्याला काय काय
काकू रागावून नवर्याला काय काय फेकून मारते, भांडते ते नाटकी वाटले. त्या दोन्ही काकांनी वैताग आणलाय नुसता. सारखे आपले सल्ले आणि भाषणं. आजकालच्या महागाईच्या दिवसात पहावे तेंव्हा दोन्ही काका आणि तो घना कमाई करण्याऐवजी जमाई असल्यागत घरात बसून असतात. आता मालिका जरा पुढं सरकवावी असं इथंच सांगते म्हणजे वाचलं जाईल. नाहीतरी माबोवरचे शब्द तिथे वापरल्यामुळे आपल्याला शंका आहेच.;) कुहूच्या कपड्यांबाबत सहमत. बदला आता ते कपडे.
मला वाटलं मुक्ता घनाच्या
मला वाटलं मुक्ता घनाच्या प्रेमात पडली तरी कुहुला वैतागुनच त्याला डिवोर्स देइल.>एक्च नंबर माउ तुझ परीक्षण खरच भारी अस्त ग
आनि लोकहो इथे एलदुगो वरच चर्चा करा ना
मने
मने
कालच्या भागात अजिबात न पटलेली
कालच्या भागात अजिबात न पटलेली गोष्ट -
राधा 'अरे कुकरमधुन नुसती भसा भसा वाफ जातेय'
घना 'अग कुकरला शिटी लावलीस का?'
राधा 'घना मी तुला इतकी मुर्ख वाटते का?'
थोडक्यात कुकरला शिटी लावायची असते हे तिला माहीती आहे मग त्याच कुकरला रींग लावायची असते हे तिला माहीत नसेल ???? म्हणे हे हे कुकरमध्ये पडलं होत.... आणि पोळ्या करता येत नाहीत हे मान्य पण एका पोळी करता भिजवलेल्या कणकेतल्या अर्ध्या कणकेचा गोळा ???
हा आचरटपणा वाटतो.
तसं काय, म्हटलं तर संपूर्ण
तसं काय, म्हटलं तर संपूर्ण १०-१२ जण असलेल्या कुटुंबाचा स्वयं पाक एकट्या सुनेवर टाकणं हेही पटत नाहीच ना
कुहूवर वैतागू नका रे. ते पात्रच एक्सेन्ट्रिक दाखवलंय. तरीही गोड आहे ती. निरागस. आणि तिच्या कविता केवळ विनोदनिर्मितीसाठी आहेत. त्यावरून स्पृहाची असेसमेन्ट करू नका आणि प्लीज!
थोडक्यात कुकरला शिटी लावायची
थोडक्यात कुकरला शिटी लावायची असते हे तिला माहीती आहे मग त्याच कुकरला रींग लावायची असते हे तिला माहीत नसेल ????>> हे शक्य असू शकते स्निग्धा.
त्या स्पृहानी अग्निहोत्र नंतर
त्या स्पृहानी अग्निहोत्र नंतर अशी भूमिका स्विकारली हे धाडसाचं वाटतं. मला आवडते तिची पर्सनालिटी ( अग्निहोत्र पाहिल्यापासून) .
हे शक्य असू शकते स्निग्धा.
हे शक्य असू शकते स्निग्धा. >>> स्वानुभवाचे बोल का?
प्राची, समझा करो.
प्राची, समझा करो.
प्राची, समझा करो. >>>>>>
प्राची, समझा करो. >>>>>>:D
कुहूवर वैतागू नका रे. ते
कुहूवर वैतागू नका रे. ते पात्रच एक्सेन्ट्रिक दाखवलंय. तरीही गोड आहे ती. निरागस. आणि तिच्या कविता केवळ विनोदनिर्मितीसाठी आहेत. त्यावरून स्पृहाची असेसमेन्ट करू नक>>>>>>>>>>>> +१
कुकर संवादावर कुणीही हसू नका.
कुकर संवादावर कुणीही हसू नका. मी सुद्धा हा पराक्रम केलाय. पण फरक इतकाच की रिंग सैल झाल्याने झाकणातुन निघुन आली होती जे मला लक्षात आलेले नव्हते व मी डोळसपणे कुकर गॅसवर चढवला होता.
पोळ्यांच मात्र कैच्याकैच. पण मला तो कॉन्सेप्ट आवडला. मी कणीक भिजवतो तू पोळ्या कर, मी भाजी चिरतो तू कुकर लाव, मी कोशिंबीरीची तयारी करतो तू भाजी फोडणीला टाक. नाहीतर नेहमी नेहमी काय तेच ते 'आज मैने आपकी पसंदका सुजी का हलवा, मुलीके/गोभीके/आलुके पराठे बनाये है'
मालिकेची सुरवात चांगली झली.
मालिकेची सुरवात चांगली झली. पण नेह मी होते तेच घडत आहे. टीआर्पी वाढू लागला की पाणीच् पाणी चोहुकडे ग गेला घना कुणीकडे असं होउ लागले आहे.
पाहू अजून किती पाणी घालतात ते!
कॉन्सेप्ट आवडला >> +१
कॉन्सेप्ट आवडला >> +१
शुकु पौर्णिमा +१. मुळात ही
शुकु
पौर्णिमा +१.
मुळात ही फार्सिकल ढंगाने जाणारी मालिका आहे. त्यात पाणी-बिणी कुठेही घातल्याचं जाणवत नाही... पाहताना स्वतःला जरा निराळ्या मोल्डमधे टाकून मग पहा.
येस्स. लॉजिकल फंडे बाजुला
येस्स. लॉजिकल फंडे बाजुला ठेवुन बघितली की जाम मजा येते एकुण एक पात्र स्वत:चा वेगळेपणा टिकवुन आहे.
घरातल्या १५ माणसांच्या
घरातल्या १५ माणसांच्या स्वैपाकाचे अंदाज पाहता यांच्यापैकी कुणीही कधीही सैपाक केला असेल असे वाटत नाही.
मुळात ही फार्सिकल ढंगाने
मुळात ही फार्सिकल ढंगाने जाणारी मालिका आहे. त्यात पाणी-बिणी कुठेही घातल्याचं जाणवत नाही... पाहताना स्वतःला जरा निराळ्या मोल्डमधे टाकून मग पहा.
>>>>>>>ललिता +१
तरीही नव्या सुनेवर एकदम इतक्यांच्या स्वयंपाकाची जबाबदारी टाकणे हे काही पटत नाही.
रैना +१ भाजिच भांड बघुन मी
रैना +१
भाजिच भांड बघुन मी हब़कलेच! एवढिशी भाजी १५ जणांना? पण लॉजिक बा़जुला ठेवुन पाहिल की बरिच सुसह्य..
मी ही मालिका आपलीमराठी वर बघते त्यामूळे कुहु आणी तो तिचा माळी (तोच तिला सारख फुलांच्या नावाने हाक मारणारा बॉ.फ्रे) आला की भाग पुढेच सरकवते..लाईव्ह बघणारांच्या त्रासाची मी कल्पनापण नाही करु शकत..
राधाचा मेकओव्हर बराच चांगला जमलाय्..आधीचा तिचा मेकप आणी ती नाकातली रिंग हॉरिबल होत..
लाईव्ह बघणारांच्या त्रासाची
लाईव्ह बघणारांच्या त्रासाची मी कल्पनापण नाही करु शकत..>>> अगदी अगदी
त्यामुळे आमच्याकडे एकावेळी २-३ मालिका बघितल्या जायच्या. कंटाळवाणी पात्रे समोर आली कि चॅनल बदलायचा.
माझी जाऊबाई अश्या मधल्या वेळेत स्वयंपाक करुन घेते म्हणे. देशात गेले तेव्हा संध्याकाळनंतर सगळे tv समोर असायचे, मला तर tv बघायलाही नकोसा होतो.
घरातल्या १५ माणसांच्या
घरातल्या १५ माणसांच्या स्वैपाकाचे अंदाज
अगदी अगदी.
ही मालिका आता मनोरंजनासाठी न पाहता त्यातल्या चुका काढण्यासाठी पाहते की काय अशी टीका आधी मीच माझ्यावर करत होते. कितीही डोकं बाजूला ठेवून बघायची म्हटली तरी इतका बालीशपणा सहन होत नाही. याआधी सुदैवाने एकही मराठी मालिका पाहण्याची वेळ माझ्यावर आली नव्हती म्हणून मैत्रिणाग्रहास्तव पहायला सुरुवात केली आणि........
कितीही डोकं बाजूला ठेवून
कितीही डोकं बाजूला ठेवून बघायची म्हटली तरी इतका बालीशपणा सहन होत नाही.>> मग का देता जीवाला त्रास?
मुळात ही फार्सिकल ढंगाने जाणारी मालिका आहे. त्यात पाणी-बिणी कुठेही घातल्याचं जाणवत नाही... पाहताना स्वतःला जरा निराळ्या मोल्डमधे टाकून मग पहा.
>> +१
Pages