एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

समाज प्रबोधनाचा वसा घेतलेली मालिका!!!! two thumbs up!!! हो हो मी एलदुगो बद्दलच बोलतेय!! आजचा एपिसोड बघाच सगळे. स्वयंपाकात राधाला मदत करणारा घना!!! काय छान होता एपिसोड (२४ एप्रिलचा).
घना-सुप्रिया काकुचा सीन तर वेळ-वसूल सीन होता. बायकोला किचनमधे मदत करणे, तिच्या कामाबद्दल आदर, इ. इ. स्फोटक विषयांवर घनाचे मत ऐकून काही जणांच्यात जरी फरक पडला तरी या मालिकेचा तो विजय आहे. Happy Happy

. स्वयंपाकात राधाला मदत करणारा घना!!! धनश्री ताई , हे इथल्या बहुतेक मायबोलीकरांच्या मागच्या पीढीसाठी समाज प्रबोधन ठरू शकेल. सध्याच्या मायबोलीकरणी नवर्‍याने स्वयपाकात मदत नव्हे तर ते स्वतःचे काम समजुन करावे असे मानतात. खायला लागते ना , मग करायला नको ? Happy

आणि परत घनाला अमेरिकेला जायचेय ना, मग तिथे कोण घालणारे त्याला खायला करून ? त्यामुळे शिकायला पाहिजेच की त्यालाही.

रच्याकने , त्याच्या इन्टरविह्यु चे काय झाले?

अगदी अगदी धनश्री Happy , जाम मजा आली पूर्ण भागातच Happy . मला तर क्षणोक्षणी असं वाटत होतं की कोणी नेहमीच्या मायबोलीकरानेच , ज्याला इथे कोणत्या चर्चा होतात हे माहित्ये , त्यानेच / तिनेच संवाद लिहिलेत Happy

मला तर क्षणोक्षणी असं वाटत होतं की कोणी नेहमीच्या मायबोलीकरानेच , ज्याला इथे कोणत्या चर्चा होतात हे माहित्ये , त्यानेच / तिनेच संवाद लिहिलेत स्मित
<< टोटली :).

संपदा+१. (अर्थात अशा चर्चा फक्त जालावर आणि मायबोलीवरच होतात असे नाही....तरीपण).
कालच्या भागात घेतलेल्या घनाच्या मित्राच्या नावावरूनही संशय बळावला.
---
घनाच्या व्यक्तिरेखेचा एक अनपेक्षित पैलू समोर आला.(की दोघांचे जवळ येणे दाखवण्यासाठी हा बदल घडवला?)
---
पाय बरा झाला हे दाखवण्यासाठी उड्या मारून काही दिवस झाले ना? हैद्राबादच्या इंटरव्ह्युचे काय झाले?

कालच्या भागातल्या कुहुच्या रोमान्टिसिझमच्या कल्पना बघून मला वाटतंय की, राजवाडे आता लवकरच 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन येतील - कुहु आणि तिच्या त्या बॉयफ्रेंडची.

कुहुच्या रोमान्टिसिझमच्या कल्पना बघून मला वाटतंय की>?>>>>>>>>>>>>>>>>>>छे आता माझी चिडचिड होत आहे कालचा भाग न पाहील्याबददल...
प्लीज मला कोणी कुहुचा सीन सांगता का ?????

मला तर क्षणोक्षणी असं वाटत होतं की कोणी नेहमीच्या मायबोलीकरानेच , ज्याला इथे कोणत्या चर्चा होतात हे माहित्ये , त्यानेच / तिनेच संवाद लिहिलेत >>> हो हो, मला तर ती सगळी वाक्य स्वयंपाकाच्या व्य. च्या बीबीवरुन उचलल्यासारखीच वाटत होती, अग्दी डीट्टो.

कालच्या भागात घेतलेल्या घनाच्या मित्राच्या नावावरूनही संशय बळावला > उजेड प्लीजच.

संपदा >>> +१०००००००

कालच्या भागात घेतलेल्या घनाच्या मित्राच्या नावावरूनही संशय बळावला.
>>>
अगदी मी हाच विचार करत होते काल
आज त्याला सांगणार पण आहे मी
Proud

ते जर माबोवरुन शिकत असतील तर सांगाव की त्यांनी
आपण अजुन दुरुस्त्या सुचवु Proud

सध्या रविवारच्या ऐवजी शनिवारी सकाळी रिपिट टेलिकास्ट असतं आणि ते पण ब्याक टू क्याक ...... Happy

मी बहुतेक वेळा तेच बघतो........ Happy

संवादकाराचे नाव पडद्यावर दाखवत नाहीत का? >>> दाखवतात की, मनस्विनी लता रविंद्र

दाखवतात की, मनस्विनी लता रविंद्र <<< [लोकदोन्हीतोंडांनीबोलतात मधलं दुसरं तोंड सुरू] बापरे, हे पण लक्षात आहे! Proud

सही. (या तीन व्यक्ती असाव्यात असं नाव वाचून वाटतंय पण.)

एक.

सही. (या तीन व्यक्ती असाव्यात असं नाव वाचून वाटतंय पण.)>>>
गजानन, मनू तिच्या आई आणि वडलांचे नाव लावते. आडनाव नाही लावत. सुधारक विचारांच्या आई-वडलांची मुलगी आहे ती. मी ओळखते तिला.
म्हणूनच कदाचित ही मालिका तिने अशी आधुनिक विचारांची लिहिलीये. कुठलेही विचार रुजवण्याचे सगळ्यात प्रभावी माध्यम टिव्ही हेच आहे. तिने ह्या माध्यमाचा खुपच चांगला वापर केलाय. मस्त गं मनू. कीप इट अप... Happy

मध्यंतरी बोअर झालेल्या मालिकेने छान पिक-अप घेतलाय आता. खुपच मजा येतेय हल्ली.

आणि हो! कालच्या भागात भुंगा नाव ऐकून एकदम धक्काच बसला.

Pages