Submitted by जयदीप. on 21 April, 2012 - 01:07
कोणी नाही, तो आणि ती
पाऊस मात्र नावाला
दोघे भिजलेले आणि
हात हाती विसावला..
स्पंदनेच हृदयाची
स्पर्शातून ऐकायला
तास तासभर जसा
एक क्षण थांबलेला
आवाज फक्त श्वासांचा
आणि मोजक्या थेंबांचा..
नजराही गुंफलेल्या,
जणू हारच मोत्यांचा
भुवई खाली येऊनी
पापण्यांत थांबलेला
व्याकुळलेल्या ओठांनी
थेंब त्याने टिपलेला
हात घट्ट पकडून
तिचा ओठ हललेला
पाऊस आठवणींचा
नंतर न थांबलेला..
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
पाऊस आठवणींचा नंतर न
पाऊस आठवणींचा
नंतर न थांबलेला...
>>
छान भावुक कविता आहे
धन्यवाद बेफिजी...
धन्यवाद बेफिजी...
छान कविता
छान कविता
धन्यवाद स्मितू..
धन्यवाद स्मितू..
छानच !
छानच !
धन्यवाद मुक्तेश्वर....
धन्यवाद मुक्तेश्वर....
अष्टाक्षरी आवडली
अष्टाक्षरी आवडली
धन्यवाद निंबुडा..
धन्यवाद निंबुडा..
छान
छान
धन्यवाद !
धन्यवाद !
सुरेख.
सुरेख.
धन्यवाद शशांकजी.
धन्यवाद शशांकजी.