एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल चा मस्त होता............. वडील आणि राधा मधले संवाद छान होते...............जास्त मेलोड्रामा न करता दोघांनी सुंदर निभावले >>>> अगदी, अगदी

मला पण विनय आपटे चे सीन्स सर्वात जास्तं आवडतात..>>>> मला पण !

हुश्श अरूण.. धन्सच रे!
मला वाटलं आता मालिकेतल्या सगळ्याच लोकांच्या आजी-माजी सिग्निफिकंट अदर्सचा उद्धार होतो की काय? Happy

....

मलाही कालचा एपिसोड आवडला.. नणंद आणि वहिनी च नातं खरच खुप नाजुक असतं. त्यात सिक्रेट शेअर करण्यापासुन एकमेकांना ओरड्णे सल्ले देणे वगैरे अस्तच आणि राधा व कुहु ने अगदी छान साकारलय.. राधाची चिडचिड ही सहज वाटतेय.. त्यानी घेतलेला निर्णय एक वेगळ वळण घेणार एवढ नक्की. इतर मालिकांतील कुरघोडी, कुणी काहिही बोलल की उपस्थितांच्या चेहर्‍यावरचे फलतु अ‍ॅक्स्प्रेशन्स, आणि एकमेकांबद्दल असलेला द्वेष बघण्यापेक्षा एलदुगो नक्कीच बघायला आवडते..:)

कालचा भाग (जे मी आज पाहिला) बरा वाटला. राधाचा अभिनय (वैतागाचा) चांगला झालाय. आता जरातरी अर्थपूर्ण, जे होणारच होतं ते पहायला मिळेल अशी आशा. कुहूबै सुधारणा दाखवतील असे वाटते. तीला नुसतं लहान आहे म्हणण्यापेक्षा घरच्यांनी काळजी केलेली पाहणे संयुक्तीक वाटेल.

आज पुन्हा एकदा छान एपिसोड. उल्काआत्या राधाला नातेसंबंधांविषयी ची जी फिलॉसॉफी सांगते ती आवडली व पटली.
रच्याकने, या सिरियल च्या संबंधीत लोकांपैकी कुणीतरी मायबोलिकर असावेत. आज घनाने चक्क " रिक्षा फिरवणे" हा खास मायबोलि वाक्प्रचार योग्य संदर्भात वापरला.
( तो तिकडे सर्रास रूढ आहे का हे माहित नाही. नसावा असे वाट्ते.)

उल्काआत्या राधाला नातेसंबंधांविषयी ची जी फिलॉसॉफी सांगते ती आवडली व पटली.

येस्स्स. मलाही आवडली.

राधा विवेककाकांना भेटायला जाते तेव्हा माझ्या लेकीने 'आता विवेककाका दाखवणार की तिथेही बजेट आडवे येणार?' असे उद्गार काढले आणि नेमके बजेट आडवे आलेच Happy

कालचा एपिसोड मलाही आवडला. Happy

साधना, मलाही वाटलेलंच नाही दाखवणार काका. तरी नशिब साखरपुड्याला दाखवलेले. Happy

दाखवलेत विनोदकाका. गिरीश जोशी आहेत त्या भूमिकेत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सध्याच्या बायकोशी झालेले भांडण कसे सोडवावे ही समस्या माजी बायकोकडे घेऊन आलेले दाखवले होते.

गिरीश जोशी, मिलिंद फाटक आणि मुक्ता या तिघांना बघून मला रसिका जोशीची आठवण येत रहाते Sad

मुक्ता सुरेख अभिनय करते! चेहर्‍यावरचे सूक्ष्म बदल, आवाजातले चढउतार सुपर्ब! आत्ताच्या काही भागात मुक्ता दिसली.
विनय आपटेंची लाईफटाईम भूमिका झालीये ही! एकूणएक सीन सुरेख! 'भात होईपर्यंत कॉफी घेणारेस का?' ह्यावर तिचं 'हं'- किती सटल पण गोड! आणि विनोदकाकांची फिलॉसॉफीही.

संवाद चिमांचेना? ह्या कालच्या दोन सीनसाठी त्याला सर्व काही माफ आहे! Happy

असतील. चांगले संवाद आले की मला चिमांचेच वाटतात Blush Lol

नवीन वाक्य- संवादलेखकाला कालच्या संवादांसाठी १०० मार्क! Happy

hmm mala raya abhyankar tyachya role chya manane ani leena chya pudhe barach lahan vatato. 'natashreshtha' svapnil joshi yanchyapudhe tar to tyacha kaka na vatata dhakata bhau vatato.
Ajun kunala vatate ka ase?

पूनम Lol

मनस्विनी ल्.र.

कालचा भाग खरेच सुंदर. विनय आपटेनी कमाल भुमिका केलीय ही. राधा डिवोर्सचा निर्णय कसा काय ऐकवणार अशा वडलांना ते तीच जाणे...

हो हो
सुप्रियाच्या पुढे दिग्या लहान वाटतो खरा !
मुक्ता आता जरा कुठे खुलायला लागलीय
इतके दिवस फार अवघडलेली होती.
इथे विनय आपटे काय किंवा झोका मधे नीना काय ..सिनिओरिटी लपत नाही हेच खरे !

आसावरी जोशी छान दिसलीय कालच्या भागात... तिचे आणि राधाचे संवाद पण मस्त Happy

बरेचसे चांगले कलाकार असूनही मालिकेची म्हणावी तशी छाप पडत नव्हती.
काल जरा बरं वाटलं. मुक्ताची अभिनय ताकद दाखवणारा एखादा सीन जरी सीन आला तरी बरे. विनय आपटेही चांगले काम करतात.

डोक्यात गेला आजचा भाग. शुद्ध आचरटपणा. दोन काका पुतण्याचा संसार अधिक मसालायुक्त (भांडण, चिडचिड वगैरे) कसा व्हावा यावर विचारविनिमय करतात Rofl काही च्या काही मालिका वाटते आहे ह्यामुळे. अरे किती लुडबुड? ह्या दोन काकांना काही नोकरी कामधंदा वगैरे असावा असं वाटत नाही. सदैव या दोघांच्या संसाराबद्दल चर्चा.

संध्याकाळी ७ ते रात्री १० लोडशेडींग पायजेल!!

रिक्षा फिरवणे>> हो हो अगदी Lol
कथानक लिहीणारे माबोकर आहेत की काय? Happy
त्या काकांना आवरा रे, ओव्हर्व्हेल्मींग आहे वागणे त्यांचे!!

मुक्ता, स्वप्नील, आपटे बापू, उल्कात्या, कालच्या अ‍ॅक्टींग नंतर कुहूही मस्त काम... Happy

मुक्ताचा खरा अभिनय अत्ता दिसतोय, अता चांगला डेव्हलप झालाय तिचा रोल, मधे फार गंडलं होतं तिचं कॅरॅक्टर :).
मुक्ता अता थोडी बारीक पण झालीये का एकदम सुरवातीच्या एपिसोड्स पेक्षा?

मी नुकतेचं बरेचसे भाग युट्युब वर पाहीले (आधी बघत नव्हते, इथली चर्चा वाचून बघायला लागले) , त्यात काँट्रक्ट मॅरेजचा कधी उल्लेख नाही दिसला, राधा आणि घना नक्की काय ठरवतात ? आपलं वेगळं आहे असा उल्लेख येतो म्हणून उत्सुकता Proud

त्यात काँट्रक्ट मॅरेजचा कधी उल्लेख नाही दिसला, राधा आणि घना नक्की काय ठरवतात ? >>>>> ते ह्या काँट्रॅक्ट मॅरेजचं पहिल्या भेटीतच ठरवतात. पण ही ठरवाठरवी दिग्दर्शक प्रेक्षकांना तेव्हा दाखवत नाहीत. तर आपल्याला ते समजतं त्यांच्या लग्नाच्या पहिल्या रात्री.

Pages