प्रथम १ किलो स्वच्छ निवडलेला गहु एक रात्रभर भिजवावा.
दुसर्या दिवशी सकाळी, तो गहु उपसुन कुकरमधे पाण्यात ४-५ शिट्ट्या घेउन शिजवावा. यात काळजी एकच घ्यायचीये की गहु जास्त शिजवायचा नाही. फक्त त्याची तोंडं उलुन येइपर्यंत शिजवायचा आहे.
कुकर थंड झाला की गहु ३-४ वेळेस थंड पाण्यातुन काढावा म्हणजे एकेक दाणा मोकळा होईल. नंतर गव्हातील उरले सुरले पाणी काढुन टाकावे व त्याला आपल्याला रुचेल इतके मीठ व पापडखार चोळुन ठेवावा. नंतर हे गहु कपड्यावर पसरवुन कडक उन्हात वाळवावे.
पुर्ण वाळले की गहु असे दिसतात.
वाळवल्यावर कोरड्या केलेल्या स्वच्छ डब्यात भरुन ठेवावेत. हे असे वर्षभर राहु शकतात.
नंतर लागेल तेव्हा, थोडे थोडे काढुन कोरड्या कढईत (तेलात नाही) भाजुन घ्यावेत.
आख्खे शेंगदाणे थोडे लालसर तळुन घ्यावेत.
लसूण बारीक चिरुन तोही खरपुस तळुन घ्यावा.
हिरवी मिरची आवडत असली तर तीही बारीक चिरुन तळुन घ्यावी
यानंतर एका कढईत फोडणी साठी तेल ठेउन त्यात जीरं मोहरी, कढीपत्ता, थोडे हिंग, हळद, लाल तिखट टाकुन त्यात हे भाजलेले गहु परतुन घ्यावेत.
झाला गव्हाचा पौष्टीक आणि खुसखुशीत चिवडा तयार!
डबा भरुन करुन ठेवला तरी आठवड्याभरात फस्त होतो.
हा चिवडा लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही आवडतो.
खान्देशात पाहुण्यांना ज्वारीच्या हळद मीठ लावलेल्या लाह्यांबरोबर हा चिवडा खायला देतात.
mast.pahilyandach baghitala
mast.pahilyandach baghitala ha prakar.
सही वाटतय! पण निगुतीनं करायला
सही वाटतय! पण निगुतीनं करायला पाहिजे..
कुणी केलत तर मला बी द्या..
खान्देशातल्या मित्र मैत्रिणींनी पिडणार
मी हि कृती शोधतच होतो. छान
मी हि कृती शोधतच होतो. छान लागतो हा चिवडा !
करुन पहाते पण हा बुटका गहु
करुन पहाते
पण हा बुटका गहु कुठे मिळेल मला?
आई खुष होणारेय माबोवर
मी नविन नविन पदार्थ करुन पहायला लागलेय आजकाल
मस्तच दिसतोय. <खुसखुशीत चिवडा
मस्तच दिसतोय.
<खुसखुशीत चिवडा तयार> खुसखुशीत की कुरकुरीत?
नानबा, तुम्हाला बी कशाला हवंय?
प्रिया..सेम पिंच... छान ग
प्रिया..सेम पिंच...
छान ग आर्या...करुन पाहेन..पण मला मदत लागेल ह्यासाठी
आनि मला फोटो दिसत नाही आहे
धन्यवाद मंडळी! नाही हो
धन्यवाद मंडळी!
नाही हो भरतजी...कुरकुरीत नाही होत. शिजवलेले गहु असल्याने खुसखुशीतच होतो.
सुरेख.
सुरेख.
नाहीच जमले तर धुळे / नंदुरबार
नाहीच जमले तर धुळे / नंदुरबार येथुन भाजके गहु आणुन फोडणी करायची. यम्मी. आता गावाहुन कोण येतय ते शोधायला हवे.
आर्यातै, मला खुप आवडला चिवडा,
आर्यातै, मला खुप आवडला चिवडा, नक्की करुन बघेन..
अय्या, नंदुरबार म्हणजे
अय्या, नंदुरबार म्हणजे मंदारची सासुरवाडी..!!
मंदार, भाजके गहू...
आह्हा..मस्त दिस्तोय
आह्हा..मस्त दिस्तोय कुरकुरीत..
हा चिवडा पुण्यात मिळतो.. कुठे
हा चिवडा पुण्यात मिळतो.. कुठे सांगते .. बरं.. आता आठवत नाही. आयेला विचारलं पाहिजे.
बाजारात 'लो कॅलरी गहू/ बाजरी/
बाजारात 'लो कॅलरी गहू/ बाजरी/ सोयाबीन/ चवळी/ ज्वारी मिळते- 'खाण्यासाठी तयार' प्रकाराची. ती ह्याच पद्धतीने करत असावेत. बचत-गटांकडून असतात विकायला. अतिशय खुसखुशीत असतात.
ही पाककृती मस्तच आहे. करणार नक्की. धन्यवाद आर्या.
मस्तच! मी सुद्धा करणार आहे.
मस्तच! मी सुद्धा करणार आहे.
अरे व्वा मला माहिती नव्हते
अरे व्वा मला माहिती नव्हते ..गव्हाचा सुद्धा चिवडा असतो म्हणुन
बघावा लागेल... पण हे बुटके गहु काय प्रकार आहे ?
मस्त रेसिपी
मस्त रेसिपी
भारी आवडायचा. माझ्या एका
भारी आवडायचा. माझ्या एका मैत्रिणीची आई धुळ्याकडची होती. ती नेहमी करायची आणि आम्हालाही द्यायची. आता करून बघेन.
आर्या, चिवडा केलास तर डबा
आर्या, चिवडा केलास तर डबा भरून माझ्यासाठी पाठव. मी चक्क विकत घ्यायलाही तयार आहे.
अरेsss लय भारी चिवडा.. पण ते
अरेsss लय भारी चिवडा.. पण ते वाळवणं सुकवणं खुप आहे.. छान वाटतोय.. कष्ट करावे लागतील थोडे
धन्स सगळे. मंद्या...मला तोच
धन्स सगळे.
मंद्या...मला तोच बिजनेस सुरु करायचाय!
स्मितु, प्रिया...बुटक्या आकाराचा गहु कुठेही मिळेल गं वाण्याच्या दुकानात. उदा.वरती गव्हाची व्हरायटी दिलीये ना 'एच डी २१८९' तो ही चालतो.
सह्ह्ही आहे गं..... बुट्के
सह्ह्ही आहे गं.....
बुट्के गहु (कस्लं गोड नाव आहे ) मिळाले की करुन पाहिन...
ही पाककृती मस्तच
ही पाककृती मस्तच आहे..........
मी सुद्धा करणार आहे.................
वॉव, मस्त तोंपासु दिसतोय
वॉव, मस्त तोंपासु दिसतोय
आर्ये, माझी आर्डर घेउन टाक अत्ताच अॅडव्हान्स मधे...मी देशात आले की दे मला
छान पाकृ! डुबुक वड्या पाकृपण
छान पाकृ!
डुबुक वड्या पाकृपण टाक नं!
मस्त.. मस्त!!
मस्त.. मस्त!!
चिवडा मस्त लागतो हा आणि नुसते
चिवडा मस्त लागतो हा आणि नुसते खारे गहु पण भारी लागतात.
लहानपणी आजोळाहुन (नंदुरबार) येणार्या खाऊत हा खाऊ हमखास असायचा! सोबत काबुली चणे, २-३ प्रकारच्या वाळवलेल्या बिया पण असायच्या. आम्ही त्या बिया खाऊन टरफलांचा पसारा केला की वडील हमखास म्हणायचे, काय नंदुरबारच्या थेटरसारखी घाण करताय?
धन्स आर्या!
करायला हरकत नाही तर !
करायला हरकत नाही तर !
मस्त दिसतोय. गव्हाचा चिवडा
मस्त दिसतोय. गव्हाचा चिवडा पहिल्यांदाच पाहिला.
<नंतर हे गहु कपड्यावर पसरवुन
<नंतर हे गहु कपड्यावर पसरवुन कडक उन्हात वाळवाव> याला पर्याय हवाय. लो पॉवरवर मायक्रोवेव्ह केले तर होईल का?
Pages