गव्हाचा पौष्टीक चिवडा!

Submitted by मी_आर्या on 19 April, 2012 - 00:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

DSC01745

याला कुठलाही बुटका गहु चालतो. कल्याण सोना, किंवा लोकवन चालत नाही. पण एच डी २१८९ चालेल.
स्वच्छ निवडलेले गहु: १ किलो
मीठः रुचेल तेवढे
पापडखारः मीठाच्या प्रमाणात
शेंगदाणे: मुठभर
कढीपत्ता
लसुणः तळणीसाठी: ७-८ पाकळ्या चिरुन
फोडणीसाठी: जीरं, मोहरी, हळद,
लाल तिखट/ हिरवी मिरची: आवडीप्रमाणे

क्रमवार पाककृती: 

प्रथम १ किलो स्वच्छ निवडलेला गहु एक रात्रभर भिजवावा.
दुसर्‍या दिवशी सकाळी, तो गहु उपसुन कुकरमधे पाण्यात ४-५ शिट्ट्या घेउन शिजवावा. यात काळजी एकच घ्यायचीये की गहु जास्त शिजवायचा नाही. फक्त त्याची तोंडं उलुन येइपर्यंत शिजवायचा आहे.

कुकर थंड झाला की गहु ३-४ वेळेस थंड पाण्यातुन काढावा म्हणजे एकेक दाणा मोकळा होईल. नंतर गव्हातील उरले सुरले पाणी काढुन टाकावे व त्याला आपल्याला रुचेल इतके मीठ व पापडखार चोळुन ठेवावा. नंतर हे गहु कपड्यावर पसरवुन कडक उन्हात वाळवावे.
पुर्ण वाळले की गहु असे दिसतात.

DSC01690

वाळवल्यावर कोरड्या केलेल्या स्वच्छ डब्यात भरुन ठेवावेत. हे असे वर्षभर राहु शकतात.
नंतर लागेल तेव्हा, थोडे थोडे काढुन कोरड्या कढईत (तेलात नाही) भाजुन घ्यावेत.

DSC01694

आख्खे शेंगदाणे थोडे लालसर तळुन घ्यावेत.
लसूण बारीक चिरुन तोही खरपुस तळुन घ्यावा.
हिरवी मिरची आवडत असली तर तीही बारीक चिरुन तळुन घ्यावी
यानंतर एका कढईत फोडणी साठी तेल ठेउन त्यात जीरं मोहरी, कढीपत्ता, थोडे हिंग, हळद, लाल तिखट टाकुन त्यात हे भाजलेले गहु परतुन घ्यावेत.
झाला गव्हाचा पौष्टीक आणि खुसखुशीत चिवडा तयार! Happy
डबा भरुन करुन ठेवला तरी आठवड्याभरात फस्त होतो.

हा चिवडा लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही आवडतो.
खान्देशात पाहुण्यांना ज्वारीच्या हळद मीठ लावलेल्या लाह्यांबरोबर हा चिवडा खायला देतात.

वाढणी/प्रमाण: 
तुम्ही किती खाणार त्यावर अवलंबुन आहे. :)
माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेसबुकवर फ्रेन्डलिस्ट मधे नसेल तर त्यान्च्या प्रोफाएल वर जाता येत नाही ना? मेसेज ही स्पॅममधे जातो.>>तुमच्या पेज वर लिहा कि तिने पाकृ चोरली आणि तिला टॅग करा..

आर्या, सोनाली बरोबर म्हणतेय, असेच करता येईल. आणि या रेसिपीची लिंक पण त्यासोबत दे.

रेसिपी चोरली ते चोरली वर फोटो क्राॅप करून ढापलेत. लाज कशी वाटली नाही. Angry

हेच फेसबुक पेज का? वरची चोरलेली रेसिपी दिसत नाहीये.>> त्यांच्या ब्लाॅगवर टाकलीय त्यांनी. मागच्या पानावर भरत. यांनी लिंक दिलिय त्याची.

काल मी पण कमेंट करुन आले. पण तिथे एकही कमेंट दिसत नाहीये.

ब्लॉगवर कमेण्ट्स नाही दिसत पण फेसबुकवर ह्या रेसिपीखाली दोन मायबोलीकरांच्या कमेंट्स आणि मायबोली रेसिपीची लिंक दिली आहे.

looks like she has taken it down from both places.
I had written there "चोर्‍यामार्‍या करून मोठे व्हायचा प्रयत्न करू नका. मूळ रेसिपी <लिन्क> इथे आहे. त्यांना क्रेडीट द्यायला शिका"
चला. हे ही नसे थोडके, की तिथून काढून टाकली.

फेसबुकवर ब्लॉगची लिंक होती.
पोस्ट दिसत होती. पण लिंक उडाली आहे.
त्यांचे दोन व्हिडियो पाहिले. ते स्लाइड शोज होते.

Pages