घटनाकार हा जनतेने उस्फूर्तपणे दिलेला आणि आता कोणाच्या देण्याघेण्यापलिकडचा एकमेव आणि अद्वितीय गौरव ज्यांना प्राप्त झाला आहे अशा डॉ.आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!
डॉ.आंबेडकर जयंतिनिमित्त सर्व भारतीयांना शुभेच्छा!
माझ्या अष्टविनायकदर्शन या फेब्रुवारी २०११ मध्ये विनामुल्य डाऊनलोड करण्यासाठी प्रकाशित केलेल्या ई-बुकात एका पानावर डॉ.आंबेडकर आणि स्वा.सावरकर यांची छायाचित्रे देऊन त्यांना खालीलप्रमाणे अभिवादन केले आहे. तेच येथे पुन्हा उद्धृत करतो.
स्वातंत्र्यवीर सावरकर व डॉ.आंबेडकर
समकालीन गाढे विद्वान, कायदेतज्ञ, थोर समाज सुधारक, ज्ञानपिपासू, इतिहासाबद्दल समान दृष्टिकोन बाळगणारे इतिहासाचे गाढे अभ्यासक, धर्मांचा तौलनिक अभ्यास करणारे पुरोगामी विचारवंत, इस्लाम धर्माचे विशेष अभ्यासक, थोर राजकीय नेते अशी दोघांचीही ख्याती. दोघेही त्यांचे कार्य व त्याग पाहाता त्यांच्या त्यांच्या हयातीत तुलनेने कमी अधिक प्रमाणात उपेक्षित राहिलेले. संपूर्ण समाजाचे नेतृत्व करण्याची क्षमता असूनही तसे करण्यात निरनिराळ्या कारणांनी यश मिळवू न शकलेले थोर नेते. धर्मसुधारणेबाबतच्या डॉ.आंबेडकरांच्या प्रत्येक उपक्रमाला सावरकरांनी समर्थन तर दिलेच पण त्याशिवाय स्वतंत्रपणे प्रचंड कार्यही केले. त्या काळातील मुस्लिम प्रश्न व मुस्लिम राजकारण या बाबतचे दोघांचेही निष्कर्ष एकसारखे होते. बहुतेक प्रश्नांचे बाबतीत निष्कर्ष एकसारखे पण योजावयाच्या उपायात भिन्नता होती. तरी एकमेकांचे कट्टर विरोधक असे चित्र नव्हते. सावरकर अतिरेकी अहिंसेच्या विरुद्ध असले तरी गौतमबुद्धाचा आदरच करीत. सहाव्या शतकात शिवोपासक मिहिरगुल राजाने पंथ प्रेरित राजकारण करून बौद्धांचा छळ केला होता. त्याला बौद्ध धर्मीय यशोधन राजाने पराभूत केले होते. सहा सोनेरी पाने या ग्रंथात इतिहासातले चवथे पान यशोधनाला अर्पण केले आहे.
दा.सु., अगदी मनातलं
दा.सु., अगदी मनातलं लिहिलंत!
आ.न.,
गा.पै.
सातवे पान आपण लिहिलेत ड्वाले
सातवे पान आपण लिहिलेत
ड्वाले पानावले..
सोनेरी आसू निघ्ले
धन्य वाद!
-(भर्पूर वर्गन्या दिलेला) इब्लिस
ओपम फोरम मध्ये काही न लिहीणे
ओपम फोरम मध्ये काही न लिहीणे हेच इष्ट. मायबोली हा अपवाद आहे हे गौरवाने म्हणावेसे वाटते. इतर ठिकाणी निव्वळ टिंगल आणि टवाळी असते. अशा ठिकाणी भावनाशील लेख लिहीणे टाळावेच अशा निष्कर्षाप्रत आलेलो आहे.
छान .. ( आंबेडकर, बुद्ध,
छान .. ( आंबेडकर, बुद्ध, भगतसिंग .. कुठलाही विषय आला की याना सावरकराना आठवण्याची संधी मिळते हेही एक सोनेरी पानच .
)
शेवटुन महामानवते त्याच्या
शेवटुन महामानवते त्याच्या सारख व्यक्तिमत्व भविष्यात पण निर्माण होणार नाही!!!!!
छान .. ( आंबेडकर, बुद्ध,
छान .. ( आंबेडकर, बुद्ध, भगतसिंग .. कुठलाही विषय आला की याना सावरकराना आठवण्याची संधी मिळते हेही एक सोनेरी पानच . )
----- तुम्ही का त्रास करवुन घेता ? तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का ?
उद्या ओबामा किंवा कार्ल
उद्या ओबामा किंवा कार्ल मार्क्स वर पण लेख लिहिला तरी त्यात तुम्ही सावरकर घुसवणार.निव्वळ वाद निर्माण करण्यासाठीच दामोदर फुटकळ लेख लिहित आहेत..नंतर गळा काढायला मोकळे..
एकटाच, >> उद्या ओबामा किंवा
एकटाच,
>> उद्या ओबामा किंवा कार्ल मार्क्स वर पण लेख लिहिला तरी त्यात तुम्ही सावरकर घुसवणार.
हो घुसवणारच! भारताच्या हिताशी संबंधित असलेल्या कुठल्याही बाबीत आम्ही सावरकर घुसवणार!
आ.न.,
-गा.पै.
नुकताच डॉ. बाबासाहेब
नुकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिचित्रण असलेला एक ब्लॉग वाचाला. (ब्लॉगची माहिती कानोकानीवर दिली आहे)
बाबासाहेबांची व्यक्ति म्हणुन दर्शन घडवणारी पुस्तके (धनंजय किर यांचे पुस्तक सोडुन) कोणी सांगु शकेल का?
http://kanokani.maayboli.com/node/890
महागुरू, वर उल्लेख केलेला लेख
महागुरू,
वर उल्लेख केलेला लेख वाचला. प्रसाद चिकश्यांनी बरीच मेहनत घेतलेली दिसते. मात्र यात बाबासाहेबांची मुस्लिमांबद्दलची मते अंतर्भूत केली नाहीत. त्यांच्या Thoughts on pakistan या ग्रंथाचा उल्लेख व्हायला हवा होता. त्यांना भारताची फाळणी अमान्य होती. मात्र जर झालीच तर लोकसंख्येची अदलाबदल व्हावी या मताचे ते होते.
तसेच बाबासाहेबांना आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांतही फारसा पटला नव्हता. याचाही उल्लेख हवा होता.
बाकी लेख खरोखरच चांगला आहे. बर्याच गोष्टी नव्याने कळल्या.
आ.न.,
-गा.पै.
दामोदरसुत, "सावरकर" या
दामोदरसुत,
"सावरकर" या शब्दाची तसेच कॉमनसेन्स व सेन्सिबिलिटीची तीव्र अॅलर्जी असलेले काही रूग्ण इथे आहेत. त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून लिहित रहा.
मुळात 'भारताचे हित' हे
मुळात 'भारताचे हित' हे सावरकरांच्या विचारांचा गाभाच होय. डॉ. आंबेडकरही त्यापैकीच असल्याने व त्यांचा एकमेकांशी संपर्कही असल्यानेच सावरकरांच्यावर लिहिलेल्या पुस्तकात डॉ. आंबेडकरांचाही गौरवाने उल्लेख येणे हे आम्हाला नैसर्गिक वाटले. त्यामुळे ' ओढून्ताणून' हा विषय आल्याचे 'कावीळग्रस्त' लोकांनाच वाटते.
>>हो घुसवणारच! भारताच्या हिताशी संबंधित असलेल्या कुठल्याही बाबीत आम्ही सावरकर घुसवणार<<
गामा पैलवान यांचेशी पूर्ण सहमत.
त्यामुळे 'भारताचे हित' जिथे दूरान्वयाने का असेना चर्चेत आले असेल तेथे आम्ही येणार! अलर्जीग्रस्तांनी सेट्रीझिन वा तत्सम गोळ्या खाऊन अवतीर्ण व्हावे.
रविवारच्या लोकसत्तेतून साभार!
रविवारच्या लोकसत्तेतून साभार!
दामोदरसुत
दामोदरसुत
इब्लिसा, प्रथमच तुला
इब्लिसा, प्रथमच तुला मनःपूर्वक धन्यवाद!
हा फोटो /बातमी द्यायचे माझे मनात होते, पण माझे काम तूच केलेस.
दामोदरसुत, सावरकर व बाबासाहेब
दामोदरसुत, सावरकर व बाबासाहेब यांच्या कार्यातील साम्य याचे दर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद. हे दोन नेते एकत्र झाले असते तर.......असो!!
त्यामुळे 'भारताचे हित' जिथे
त्यामुळे 'भारताचे हित' जिथे दूरान्वयाने का असेना चर्चेत आले असेल तेथे आम्ही येणार>>>>>>> अतिषय विनोदी विचार आहेत .हसायला आले फार..:हाहा:
एकटाच, यात हास्यास्पद काय
एकटाच,
यात हास्यास्पद काय आहे?
आ.न.,
-गा.पै.