आयपीएल चे पाचवे पर्व सुरू झाले आहे.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... यंदा पुण्यात मॅचेस होणार असल्यामुळे पुणेकरांच्यात विशेष उत्साह दिसुन येत आहे.... जिकडे तिकडे नवीन स्टेडिअमच्या आणि कोण कुठल्या मॅचेस बघायला जाणार या चर्चांना रंग चढू लागला आहे.
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात....
हा धागा आयपीएल-५ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी
या स्पर्धेत सहभागी झालेले संघ खालीलप्रमाणे:
संघ: मुंबई इंडियन्स
कर्णधार: हरभजनसिंग
संघमालक: मुकेश अंबानी
टॅगलाईन: दुनिया हिला देंगे
संघ: पुणे वॉरिअर्स
कर्णधार: सौरव गांगुली
संघमालक: सुब्रतो रॉय
टॅगलाईन: सहारा
संघ: राजस्थान रॉयल्स
कर्णधार: राहुल द्रवीड
संघमालक: मनोज बडळे, सुरेश चेल्लाराम, राज कुन्द्रा, शिल्पा शेट्टी
टॅगलाईन: हल्लाबोल
संघ: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
कर्णधार: डॅनिअल व्हेटोरी
संघमालक: विजय मल्ल्या
टॅगलाईन: जीतेंगे हम शानसे, गेम फोर मोअर
संघ: चेन्नई सुपर किंग्स
कर्णधार: महेंद्रसिंग धोनी
संघमालक: इंडिया सिमेंट
टॅगलाईन: रोअर विथ प्राइड
संघ: दिल्ली डेअरडेव्हिल्स
कर्णधार: विरेंद्र सहवाग
संघमालक: जी एम आर ग्रुप
टॅगलाईन: खेलो फ्रंट फूट पे
संघ: कोलकता नाईट रायडर्स
कर्णधार: गौतम गंभीर
संघमालक: शहारुख खान, जय मेहता
टॅगलाईन: कोरबो लोरबो जीतबो
संघ: किंग्ज इलेव्हन पंजाब
कर्णधार: अॅडम गिलख्रिस्ट
संघमालक: नेस वाडिया, प्रिती झिंटा, मोहित बर्मन
टॅगलाईन: बॉर्न टू विन, धूम पंजाबी
संघ: डेक्कन चार्जर्स
कर्णधार: कुमार संगकारा
संघमालक: वेंकटरामा रेड्डी
टॅगलाईन: द अनस्टॉपेबल्स
आता पुढचे दोन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया
रहाणे - काय मस्त खेळला आज !
रहाणे - काय मस्त खेळला आज ! नाबाद १०३ ! ६० चेंडूत !! सिक्सर मारून शेवटच्या षटकात शतक. ओवाईस शाह २६ चेंडूत ६० ! आरआर १९५-२. द्रविड खूष असेलच.
भाऊ, आर आरची फलंदाजी चांगली
भाऊ,
आर आरची फलंदाजी चांगली आहेच पण आज त्यांची गोलंदाजीही छान झाली.... कदाचित तो १९५च्या दडपणाचाही परिणाम असावा पण तरीही द्रवीडने त्यांच्या तरुण नॉन-स्टार गोलंदाजांवर दाखवलेला विश्वास आणि पंकज सिंग, त्रिवेदीने त्याला दिलेला प्रतिसाद सुखावुन गेला
मयंक आगरवालची पहिली विकेट पडल्यावर आर आर ने अजिबात ढील दिली नाही!
द्रवीडने कालच सांगितलेय की तो शेन वॉर्नच्या स्टाईलने कॅप्टन्सी करतोय....
"I noticed Warnie keeping things simple and giving players, especially youngsters, to express their views in last the IPL. I am doing a bit the same this year.
"We don't over-complicate things, neither have long meetings and practice sessions. We do things with intensity,"
गुड जॉब द्रवीड
बंगलोरमध्ये येउन मल्ल्याच्या संघाविरुद्ध द्रवीडला जिंकताना बघायला फार मजा आली.
धन्यवाद फारेंड
धन्यवाद फारेंड
"We don't over-complicate
"We don't over-complicate things, neither have long meetings and practice sessions. We do things with intensity,">>> हे खरे म्हणजे तो व चॅपेल होते तेव्हा जे करत होते त्याच्या उलटे आहे. त्यामुळे मग आता द्रविड कप्तान म्हणून नक्की कसा आहे याबद्दल शंका येते. हा खरा अवतार असेल तर चांगलेच आहे, पण म्हणजे मग चॅपेल च्या प्रभावाखाली तो वेगळेच काही करायला बघत होता असे वाटेल. आठवते का - Systems, processes, results ई? प्रत्येक मॅच नंतर तो निकाल कोणत्यातरी Abstract स्वरूपात विश्लेषण करून सांगणे वगैरे?
<< हा खरा अवतार असेल तर
<< हा खरा अवतार असेल तर चांगलेच आहे, >> 'खेळाचा आनंद' हा कुठल्याही स्तरावरच्या खेळाचा आणि प्रत्येक खेळाडुच्या सहभागाचा गाभा असला पाहिजे; डांवपेंच, विश्लेषण इ.इ. सारं कांही महत्वाचं असलं तरीही दुय्यम, हें आपलं माझं वैयक्तीक मत. चॅपेल गुरूजीनी ह्या गाभ्यावरच घाव घातला होता. म्हणूनच खेळाडू ओव्या न म्हणतां जातं ओढल्यासारखे त्यावेळी खेळत असावेत. द्रविडला जर हें आतां उमगलं असेल, तर तो प्रेरणादायी नेतृत्व करेल, हें नि:संशय; कारण मुळातच तो एक सच्चा खेळाडू व माणूस आहेच !
सचिन आज तरी खेळणार आहे का
सचिन आज तरी खेळणार आहे का नाही? पोलार्ड, रहाणे, शाह इ. मंडळी खोर्याने धावा करत असताना सचिन तंबूत नुसता बसून असल्याचे पाहवत नाही.
सचिन नाहीच खेळत आज ! मुंबई
सचिन नाहीच खेळत आज ! मुंबई ७-२ [४ षटकांत !]
मुं.इं. ८०-८ !!! चला, झोपायला
मुं.इं. ८०-८ !!! चला, झोपायला जातों !!!
मुम्बई इंडियन्स वजा सचिन = O
मुम्बई इंडियन्स वजा सचिन = O
मास्तुरे +१ सचिनच्या जागेवर
मास्तुरे +१
सचिनच्या जागेवर भज्जीला अगदीच बघवत नाही
त्या जेकब्ज आणि लेव्हीला
त्या जेकब्ज आणि लेव्हीला फिरकी गोलंदाजी अजिबातच खेळता येत नाही. आज जेकब्जने १० चेंडूत O आणि लेव्हीने ४ चेंडूत १ धाव केली. सचिन नसल्यामुळे मुम्बईला चांगली सुरूवात मिळतच नाहीय्ये. मुम्बईकडे मागच्या वर्षापर्यंत चांगला यष्टीरक्षक नव्हता. या वर्षी यष्टीरक्षक आहे पण आघाडीची जोडी बेकार आहे.
सचिनबाबा,
लवकर बरा हो आणि खेळायला सुरूवात कर.
>>तो व चॅपेल होते तेव्हा जे
>>तो व चॅपेल होते तेव्हा जे करत होते त्याच्या उलटे आहे
मुळात चॅपेल जसा संघावर लादला गेला होता तसा द्रविडवरही असणार.... आणि द्रविडचा स्वभाव बघता त्याने बंड वगैरे करण्याची शक्यता कमीच होती.
आणि मुळात २००७च्या विश्वचषकापर्यंत जे काही होत होते ते बरेचसे चांगलेच होते..... भारत सातत्याने जिंकत होता... नवीन तरुण खेळाडूंची फळी तयार होत होती.... काही किरकोळ कुरबुरी असल्या तरी द्रविडसारखा समंजस खेळाडू त्याचा बाऊ करण्याऐवजी तिकडे दुर्लक्षच करण्याची शक्यता अधिक होती!
पण खेळाडूंना देवत्व देणार्या भारतासारख्या देशात चॅपेलसारखा कडक मास्तर फार दिवस टिकणारा नव्हता.... वाईट इतकच वाटत की या सगळ्यात मधल्या मध्ये द्रविड भरडला गेला
चॅपेलपेक्षा जॉन राईट किंवा गॅरी कर्स्टन सारखे कोच द्रवीडच्या जातकुळीच्या जवळ जाणारे होते.... ते कदाचित द्रविडला लाभले असते तर चित्र फार वेगळे दिसले असते!
द्रविड हा स्वताची स्टाइल संघावर लादण्यापेक्षा संघ आणि संघ व्यवस्थापनाप्रमाणे स्वताला अॅडजेस्ट करणारा कर्णधार वाटतो.... याला गुण म्हणायचे की दोष हा ज्याचा त्याचा प्रश्न.... पण आर आरच्या संघात द्रवीडला बंगलोरच्या संघापेक्षा अधिक रिसपेक्ट आहे.... त्याच्यावर भरवसा करणारे सहकारी आणि संघ व्यवस्थापन आहे म्हणून कर्णधार म्हणून तो जास्त प्रभावी वाटतोय!
(No subject)
अरेच्चा, आजची राजस्थान वि.
अरेच्चा, आजची राजस्थान वि. डेक्कन कोण बघत नाहीय ? डेक्कनने १९६ केलेत व राजस्थान १३ षटकात ११९-२ ! द्रविड २४ चेंडूंत ४२ करून बाद; रहाणे ३० चेंडूत ४२ करून खेळतोय !! सामना रंगणारसं दिसतंय.
(No subject)
What a match !!! २चेंडू व ५
What a match !!! २चेंडू व ५ गडी राखून आरआर विजयी ! राहुले रचिला पाया, हॉज झालासे कळस !!!
ब्रॅड हॉज २१चेंडूत नाबाद ४८ [ १९व्या षटकात वाईड लाँग ऑफला अफलातून षटकार !]. अर्थात राहाणे [३१ चेंडूत ४४] व शेवटच्या षटकात याज्ञिक यांचा महत्वाचा हातभार. द्रविडला असा खूष पहाणं हाही एक आनंद !!
>>आजची राजस्थान वि. डेक्कन
>>आजची राजस्थान वि. डेक्कन कोण बघत नाहीय ?
अहो असे कसे होईल.... पण ऑफिसात असल्यामुळे काही पोस्टता नाही आले.... अप्रतिम मॅच!
बॉलर्सनी माती खाल्ली पण द्रवीड, रहाणे आणि हॉजने मस्त काढली मॅच....याज्ञिकने पण डेल स्टेनसमोर न डगमगता मस्त शेवट केला:)
>>द्रविडला असा खूष पहाणं हाही एक आनंद !!
अगदी अगदी
भाऊ व्यंगचित्र मस्त
भाऊ व्यंगचित्र मस्त
पुणे वॉरिअर्स खरंच अटकेपार
पुणे वॉरिअर्स खरंच अटकेपार झेंडा लावायला निघालेत कीं काय ! १८२ -६ .
>>संगकाराला अश्या कठीण
>>संगकाराला अश्या कठीण सिच्युएशन्स हाताळता येत नाहीत हे परत एकदा सिद्ध झाले!
आणि आज अजुन एकदा ते सिद्ध झाले
गेल पेटलाय.... राहुल
गेल पेटलाय.... राहुल शर्माच्या एका ओव्हरमध्ये ३१ धावा!
अररा शेवटच्या ओव्हरमधे २४
अररा शेवटच्या ओव्हरमधे २४ रन्स, पुणे वारियर हारली ...........
शेवटच्या चेंडूवर पुणे हरले !
शेवटच्या चेंडूवर पुणे हरले ! शर्माचे ते षटक घातक ठरले !!
शुभरात्री.
सुपर्ब मॅच झाली..... आरसीबी
सुपर्ब मॅच झाली..... आरसीबी साठी मस्ट विन सिच्युएशन होती!
नेहराने आपला लौकिक राखला
डिंडाला शेवटच्या षटकासाठी
डिंडाला शेवटच्या षटकासाठी राखून ठेवायचं सोडून दादाला शेवटचे षटक नेहरूला का द्यावेसे वाटले? नेहरूने अत्यंत घाण चेंडू टाकून सामना घालवला.
डेक्कनच्या स्टेनने सुद्धा घाण गोलंदाजी करून मॅच घालविली.
नेहरा जरी आपली नेहमीची छबी
नेहरा जरी आपली नेहमीची छबी घेऊनच या स्पर्धेत आला असला तरीही पूण्याच्या अपयशाचं श्रेय पूर्णतः त्याला देणं, किंवा कोणत्याही गोलंदाजाला देणं, टी-२० फॉरमॅटमधे योग्य नसावं. 'जिंकू किंवा मरूं' या परिस्थितीत टी-२०मधे फलंदाज इतके अनपेक्षित, अतर्क्य व अशक्य फटके मारतात कीं नीट बसले नाहीत तरी चेंडू सीमापार जातो. ब्रॅड हॉजने परवां १९व्या षटकांत त्याची बॅट पोहोचूं शकत नव्हती इतका ऑफ स्टंपबाहेरचा चेंडू ओणवा राहून, दांडपट्टा फिरवतात तशी बॅट फिरवत वाईड मिडॉफला हवेतून सीमापार धाडला ! पूर्वी 'यॉर्कर' हें फलंदाजाना रोखण्याचं प्रभावी अस्त्र होतं पण आतां फलंदाज त्याचाही 'फुलटॉस' बनवून टोलवतात ! In T-20, the spell of last two overs has become a really difficult mind-game with batsmen holding most of the trump cards !
[ मी पण टी-२० मुळे हल्ली तंत्रशून्य असे आडवे-तिडवे फटके मारायला लागलोय, हें लक्षात आलं असेलच ! ]
माझ्या स्कीन वर २३५ नवीन अस
माझ्या स्कीन वर २३५ नवीन अस दिसल आनि वाटल चला आता या धाग्यावर जाऊच या....:)
मी ही पुणे ला सपोर्ट करते...
आनि मुबंई vs दुसर कोणी असेल तर मुबंई ला
कालची मॅच माझी किचन टु हॉल अशी पळत पळत झाली......
मस्त मॅच...गेल चे फटके आनि मी माझ्या भाऊचे आवाज ह्यामुळे बाजुचे वैतागले
>>मुळात २००७च्या
>>मुळात २००७च्या विश्वचषकापर्यंत जे काही होत होते ते बरेचसे चांगलेच हो>>
तीव्र आक्षेप
चॅपेल आणि किरण मोरे ने मिळुन दादाची कारकीर्द संपवली आणि द्रवीड-सचिनने या सगळ्याला अजिबात विरोध केला नाही.... सुंठीवाचून खोकला गेला असच म्हणाले असतील ते.
पण दादा इज बॅक. अजुन त्याच्या धावा होत नाहीत पण त्याच्या कुशल नेतृत्वाखाली पुणे जिंकतय ना!
काल मात्र त्या नेहराने घाण केली
<< सुंठीवाचून खोकला गेला असच
<< सुंठीवाचून खोकला गेला असच म्हणाले असतील ते. >> म्हणजे त्यानाही तो खोकल्यासारखा त्रासदायक वाटतच होता, असंही असूं शकेल ! व्यक्तीशः, मला गांगुली फलंदाज म्हणून खूपच आवडायचा पण कप्तान म्हणून मात्र तितकासा नाही ; त्याचा आक्रमकपणा कांहीसा दिखाऊपणाचा व बराचसा चिडखोरपणाचा वाटायचा, निदान मला तरी. अर्थात, प्रत्यक्षात तो तसा होता का, हें त्याच्या संघात खेळलेलेच सांगू शकतील. त्याच्या कारकिर्दीत भारताची कामगिरी चांगलीच होत होती , हें मात्र निर्विवाद व तें श्रेय कुणीही त्याच्यापासून हिरावून घेऊं शकणार नाही.
चेन्नई सुपर किंग्ज - १६४-५.
चेन्नई सुपर किंग्ज - १६४-५. आज बद्रिनाथ व ड्यू प्लेस्सी यानी अप्रतिम फलंदाजी केली. प्लेस्सीच पदलालित्य पहाण्यासारखं होतं. बघूं दादाचा संघ कसं प्रत्युत्तर देतो तें !
Pages