Submitted by सीमा on 19 March, 2012 - 10:58
यावेळी आपल्याकडे स्प्रिंग खुपच लवकर आलाय. तापमान छान उबदार व्हायला लागल आहे. तुम्ही बागकामाला सुरुवात केली असेलच. इथे आपण बीया कुठल्या रुजवल्या आहेत , फळझाडे, फुलझाडे कुठली लावली आहेत त्यांची चर्चा ,अपडेट्स करुया का? पोस्ट्स मध्ये झोन लिहिला तर तुमच्या आसपासच्या मायबोलीकरांना पण त्याचा उपयोग होईल. तसेच बीया,झाडे आणण्यासाठी लोकल दुकाने, वेबसाईट्स लिहिल्या तर व्यवस्थित डाटाबेस तयार व्हायला मदत होईल. शीर्षकात 'अमेरिका' लिहिल असलं तरी इतरत्र रहाणार्या मायबोलीकरांनीही लिहायला हरकत नाही.
अमेरिकेत कडिपत्ता लावण्याची माहिती अंजलीने इथे लिहिली आहे.
http://www.maayboli.com/node/18243
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अवांतर : शिवराकचा अर्थ 'कोकणी
अवांतर : शिवराकचा अर्थ 'कोकणी शिका'वर वाचला, तरी मला का कोण जाणे ती शिवीच वाटते.
अरे देवा. मी तो स्पिनॅचचा
अरे देवा. मी तो स्पिनॅचचा गावठी प्रकार समजत होते इतके दिवस. मायाळु फार "रागीट" दिसतो रुपामुळ.
मेधा बघून सांगते तुला मला कुठल्या बीया पाहिजेत ते.
मृ , 9a म्हणजे , Sage , Salvia,, Aster , झेंडु , Knock out Roses इत्यादी चांगले यायला पाहिजेत तुझ्याकडे.
बघितलेस का ट्राय करुन.
सीमा,धन्यवाद! बर्याच
सीमा,धन्यवाद! बर्याच बागांमधे झेंडू दिस्ताहेत. बाकी फुलं मला ओळखता येत नाहीत. या यादीतली सगळी आणते.
मी गेली ५ वर्षं या घरात आहे, पण बाग करायच्या फंदात पडले नाही, कंटाळा केला. एक गोडलिंब, एक ५ सोंडांचा पाम, एक अगम्य पिवळ्या फुलांचं लहान झाड, लाल जास्वंद आणि १ लिली एवढा ऐवज आहे.
परवाच घरात सगळ्यांना, 'यंदा जरा बागकामात लक्ष घालू' म्हंटलं आणि तुझा बाफ निघाला. अर्थात बाकी मंडळी कामाला लागली तरच. सध्यातरी 'माझ्या स्वतःच्या आनंदासाठी मी बाग लावते, बाकी कुणाची गरज नाही' म्हणण्याइतकी भारी स्थिती नाही.
माझ्याकडे अंगण नाही (म्हणजे
माझ्याकडे अंगण नाही (म्हणजे आहे, पण ते माझ्या मालकीचं नाही). कुंड्यांमधून काय काय लावता येईल? मी झोन ६अ मध्ये राहते. गेल्या उन्हाळ्यात बेझिल, पुदीना आणि रोजमेरी हे हर्ब्ज लावले होते ते चांगल्यापैकी जगले. यंदा मिरच्या, टोमॅटो लावावेत का? जवळच्या नर्सरीत बी मिळेल का? अजून काय काय लावता येईल? गेल्या वर्षीच्या कुंड्या बेसमेंटमध्ये पडून आहेत त्यातली माती बदलावी लागेल का?
माती टाकू नकोस. नवीन झाडं
माती टाकू नकोस. नवीन झाडं लावणार असलीस तर सगळ्या कुंड्यांत तळाला ती जुनी माती घाल.
कुंड्यांत मिरच्या, टोमॅटो लागतील ना. वर डिस्कस केलेली सगळी चालतील कुंड्यांत. गुलाब, गार्डिनिया वगैरेही वाढतात.
थँक्स स्वाती. हो, मागच्या
थँक्स स्वाती. हो, मागच्या उन्हाळ्यात दोन्-तीन फुलझाडं आणली होती (नावं आठवत नाहीत) ती पण छान वाढली होती. यंदा गुलाब आणून पाहीन इथे मोगरा मिळतोय का पहायला हवं.
मी झोन ८ब मध्ये आहे.. मला
मी झोन ८ब मध्ये आहे.. मला केव्हा प्लान्टिंग चालू करता येइल? या वर्षी मिरच्या, वांगी आणि टोमॅटो लावायचा विचार आहे. मेधा हरकत नसेल तर मलाही बीया चालतील...
माझ्या दारातला Azalea
माझ्या दारातला Azalea
मृण्मयी, मेधा , सीमा Thanks
मृण्मयी, मेधा , सीमा Thanks for the info.
सीमा, काय सुरेख फुललाय
सीमा, काय सुरेख फुललाय गुलाब!
बीएस, छान! अझेलिआ आहे का?
इथे कुणी कॉर्न ग्लुटीन वापरलय
इथे कुणी कॉर्न ग्लुटीन वापरलय का लॉनसाठी? आमच्याकडे लॉनकेअरवाले केमिकल फवारून जातात पण मनासारखे रिझल्ट्स नाहीत.
स्वाती , लॉन फर्टिलायझर
स्वाती , लॉन फर्टिलायझर वापरतो आम्ही पण बघून सांगते कुठलं ते.
BS , मस्त फुललाय अॅझेला. मनी ८ ब, म्हणजे प्लँटिग लगेचच सुरु करा. वांगी ,टोमॅटो थोडा वेळ झाला तर चालेल. पण पालेभाज्या , गाजर , वाटाणा १ एप्रिलच्या आता बीया पेरायला पाहिजेत अस मला वाटत.
सप्रि , लेट्युस लाव. पॉट मध्ये छान येईल.
धन्यवाद सीमा. हे कॉर्न
धन्यवाद सीमा. हे कॉर्न ग्लुटिन विड कंट्रोलसाठी वापरतात.
मेस्क्युलन मिक्स मिळत, तेही छान होतं पॉटमधे.
झोन ५बी गेल्या वर्षी मेथी,
झोन ५बी
गेल्या वर्षी मेथी, बेसिल, टोमॅटो, मिरच्या, रॅडिश, बीट, चार्ड्, बीन्स आणि पालक चांगले झाले. झुकिनी आणि बटरनट स्क्वाशचे बिनसले. घरात तुळस, आळू, गवतीचहा, रोझमेरी आणि पुदीना कुंड्यात आहे.
फुलांसाठी डॅफोडेल्स, डे लिली, एशियन लिली, कोरिऑप्सिस हे नेहमीचे भरवशाचे. उस्तवार करावी लागत नाही.:)
गवती चहा कसा लावला? कुठे
गवती चहा कसा लावला? कुठे मिळाला?
स्वाती, एशियन ग्रोसरी
स्वाती, एशियन ग्रोसरी स्टोअरमधे लेमन ग्रासची जुडी मिळते ती बाटलीत पाण्यात उभी करून ठेवली. डायरेक्ट उन्हात नाही ठेवायची. एक दिवसाआड पाणी बदलायचे. खाली धाग्यासारखी मूळं आली की कुंडीत लावायचा.
स्वाती२, अझेलिआच आहे बर्ड
स्वाती२, अझेलिआच आहे
बर्ड फिडर आणि भाज्या एकत्र लावणे bad idea आहे का? कोणाला काही अनुभव?
हो का? मी खरंतर गेल्या वर्षी
हो का? मी खरंतर गेल्या वर्षी अशी ठेवली होती पाण्यात, पण मुळं आली नाहीत.
मी पाणी बदललं नव्हतं पण. पुन्हा प्रयत्न करते. धन्यवाद.
हिवाळी भाज्या (मटार, कोबी,
हिवाळी भाज्या (मटार, कोबी, गाजरं) तयार झाल्या आहेत त्या काढणे चालू आहे.
बाकी टोमॅटो, चार्ड, आळू रोप लहान आली आहेत. बाकी (वांग, बीन्स, भेंडी, कलींगड, दुधी , मका, मिरची, सिमला मिरची ई.)बिया अजून लावायच्या आहेत, थोड अजून गरम व्हायची वाट बघतोय.
आमच्याकडे फेन्सिंग होईपर्यंत
आमच्याकडे फेन्सिंग होईपर्यंत एकही भाजी लावता येत नाहीय. हरणांचा नि सशांचा खूप त्रास आहे मागच्या वर्षी वांगी टोमॅटो लावलेले ते सगळे गट्टम केले.
लोकहो, मला कडक उन्हाळ्यातही मस्त जगतील अशा अमेरिकेतल्या फुलझाडांची नावं हवी आहेत. माझ्या बॅकयार्ड मधे प्रचंड ऊन येतं. अगदी संध्याकाळपर्यंत. त्यामुळे बहुतेक फुलझाडं कोमेजून जातात अगदी कितीही पाणी दिलं तरी. कोणी देऊ शकेल का लिस्ट मला?
या वीकांताला लावायचा प्लान आहे.
सुमॉ, ६ तासांपेक्षा जास्त उन
सुमॉ, ६ तासांपेक्षा जास्त उन येत असेल तर गुलाब बेस्ट .
गुलाब लावणार असाल तर जिथे लावणार तिथे निदान ८ इंच अन शक्य असल्यास १२ इंच चांगली माती + कॉम्पोस्ट मिसळून घालणे . गुलाबाला जास्त ऑरगॅनिक मॅटर, अन पाण्याचा निचरा होणारी जमीन हवी.
( आमच्या इथे चिकण माती अन ६-८ इंचाच्या खाली दगड धोंडे आहेत त्यामुळे १२ इंच रिप्लेस केले होते ) .
नॉक आउट म्हणून हाय्ब्रिड गुलाब मिळतात ते बर्यापैकी डिसीज रेजिस्टंट , स्टर्डी आहेत. पर्किन्स कंपनीचे पण गुलाब छान आहेत. ४-६ दुकानांमधे फिरून किमती, रंग , व्हरायटी यांची तुलना करून मगच रोपं घ्याल .
गुलाब फार दाटीवाटीने लावू नयेत. पानांमधून वारा खेळायला जागा हवी. मुळाशी इंच दीड इंच खोल आळे करावे.
पाणी घालताना मुळाशी घालावे, पाने ओली होऊ नयेत.
डे लिलीज , हायड्रेंजिया सुद्धा भरपूर उन लागणारी झाडं आहेत
अजून आठवेल तसं लिहीन .
मेधा, आमच्या इथे जापनीज बीटल
मेधा, आमच्या इथे जापनीज बीटल किंवा जूनबगचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. गुलाब लावले तर झुंडीच्या झुंडीनं येतात आणि आख्खी बाग खाउन टाकतात :(. काही गुलाब मात्र जूनबग रेजिस्टंट आहेत? तू सांगितलेले गुलाब तसे आहेत का? नेटवरपण शोधून बघते.
होम डिपो मधे जे जपानी बीटल
होम डिपो मधे जे जपानी बीटल करता बेट मिळते त्याचा मला तरी खूप फायदा झाला. गुलाबांपासून दूर, कुंपणावर लावते मी दरवर्षी. आमच्या इथे पण त्यांचा उपद्रव आहेच.
हरणे, ससे, खारी , बीट्ल, शेजार्यांच्या कोंबड्या , कुत्रे मांजरी, अन आमच्या पिल्लांचे खेळ या सर्वांच्या तडाख्यातून वाचतील ती फुले / भाज्या नशिबात असतात
अंजली, मी लावले आहेत नॉक आऊट
अंजली, मी लावले आहेत नॉक आऊट गुलाब समोरच्या यार्डात. अजून तरी नाही झालेला ग तू म्हणतेस तसा प्रॉब्लेम. आता यावर्षी होईल की काय?
मेघा, गुलाब लावलेले मागच्या वर्षी. तू म्हणतेस तेच. पण अर्धे वाळून गेले. माझं लॉन पण समोर हिरवंगार नि मागे सुकलेलंच असतं नेहेमी. कितीही पाणी घातलं तरी.
बहुतेक सूर्यफुलांचीच शेती करेन यंदा बॅकयार्डात
मधुरीमा, अगं जून बग्ज आत्ता
मधुरीमा, अगं जून बग्ज आत्ता येत नाहीत. मे एंड, जून मधे येतील.
आमच्याकडे 100 F महिनाभरतरी
आमच्याकडे 100 F महिनाभरतरी असु शकत. आतापर्यंत वेगवेगळ्या sage or Salvia , Knock out Roses (मेधाने लिहिलय वरती) चांगले आलेत. झिनिया , झेंडु ,कॉसमॉस, इतर गुलाब, लॅन्टानानी पण चांगल सक्सेस दिलय. बरीच झाड उन्हान करपून पण गेली आहेत.
मेक्सिकन sage सुरेख दिसते. (फोटो नेटवरचा आहे. माझा नाही. )मी आणली आहेत चार झाड यावेळी. बघू काय होतय.
स्वाती , Organic लॉन फर्टिलायझर विथ वीड कंट्रोलर आहे घरात.
धन्यवाद सीमा. इथे मिळते का
धन्यवाद सीमा. इथे मिळते का बघते.
यावर्षी लायलॅकला पहिल्यांदा फुलं आली.
बर्ड फ़िडर आणि बाग काही वाईट
बर्ड फ़िडर आणि बाग काही वाईट आयडिया नाहीए फ़क्त मी तो बागेपासून थोडा दूर ठेवला होता..बागेवर हल्ला करणारे लोक म्हणजे ससे आणि खारी...निदान तेव्हातरी आमच्याकडे...
मी कधीच वाटाणे, स्क्वाश लावले नाहीयेत...आता झोन ८ अ/ब मध्ये आहे....बियांची पाकीटं आहेत घरी आधी छोट्या कुंडीत लावुन मग मोठ्या जागी लावतात का? साधारण माहिती मिळेल का??
माझ्या शेजारणीची टीप बागेच्या भोवती संपुर्ण झेंडुच्या सुकलेल्या फ़ुलांच्या पाकळ्या टाकायच्या....म्हणजे खूप सारा झेंडू उगवतो...किटकांचा त्रास होत नाही आणि फ़ुलं हवी तर मिळतात शिवाय छानही दिसतं......
तुमच्याइथे फ्रॉस्ट डेट संपली
तुमच्याइथे फ्रॉस्ट डेट संपली असेल तर वाटाणे , स्क्वाश सरळ जमिनित लावले तरी चालेल.
माझ्या इथली फ्रॉस्ट डेट टॅक्स डे च्या आसपास .
टॉमेटो, वांगी, वाटाणे ,पापडी तयार आहेत रोपं. झिनिया अन कॉसमॉस पण बरेच उगवलेत. या आठवड्यात कधी तरी अंगणात नेऊन लावणार सगळी.
मी विचार करत होते की अळू चे
मी विचार करत होते की अळू चे कांदे लावावे ह्या वर्षी. इथे तुम्हा सर्वांची चर्चा वाचून सहज मनात अळूवडी च्या roots बद्दल काही माहिती मिळू शकेल अशी आशा वाटते आहे.
अळूवडीच्या अळू चे roots शोधताना पुढील माहिती मिळाली:
1) Colacasia /Taro leaf roots : हे म्हणजेच अळूवडी च्या अळू चे roots असावेत का? जर हे खर असेल तर मला ते कुठून खरेदी करता येवू शकतील?
२) Lowe's मध्ये Elephant leaf roots पाहण्यात आले………पण मला जरा सुधा कल्पना नाही आहे की हेच अळू आपण अळूवडी करताना वापरतो की नाही?
Pages