चक्का १/२ किलो
आमरस (वाटीच्या मापाने जेव्हढा चक्का तेव्हढाच आमरस)
साखर (आमरसा प्रमाणेच वाटीच्या मापाने जेव्हढा चक्का तेव्हढीच) (आटीव रस असेल आणि त्यात साखर असेल, तसच चक्का किती आंबट आहे, आपल्याला किती गोSड आवडतं त्याप्रमाणे साखरेच प्रमाण कमी अधिक करावं)
पाणी - साखर जेमतेम भिजेल इतपतच
वेलची, जायफळ स्वादा करिता
आंब्याच्या बारिक चिरलेल्या फोडी (ऐच्छीक)
चक्का वाटीने मोजुन घ्यावा, जितके वाटी चक्का तितकेच वाटी साखर एका पातेल्यात घेऊन त्यात साखर जेमतेम भिजेल इतपतच पाणी घालुन साखरेचा पक्का पाक करायला ठेवावा.
एकिकडे पाक होत असताना मोजुन घेतलेला चक्का दुसर्या पातेल्यात ब्लेंडर वापरुन एकजीव करुन घ्यावा. त्यातच आमरस घालुन पुन्हा एकदा ब्लेंडर फिरवुन एकजीव करुन घ्यावं
त्यातच वेलची पूड, जायफळ इ. घालावं (स्वादापुरेसं)
साखरेचा पक्का पाक झाला की तो पाक ह्या एकजीव करुन घेतलेल्या मिश्रणात ओतून पुन्हा एकदा ब्लेंडर झिंदाबाद म्हणत सगळे एकजीव करावे.
हे ब्लेंड केल्यावर पण सुरुवातीला पातळच दिसते (पळीवाढे पातळ नव्हे पण श्रिखंड असते तितके घट्ट दिसत नाही) पण काळजी नसावी. पाएलं उचलून सरळ डिप फ्रिजर मधे रात्रभर ठेवावे. दुसर्या दिवशी घट्ट, बाहेरच्या प्रमाणे शाईन करणारं असं श्रिखंड तय्यार झालेलं असेल.
आंब्याचे तुकडे घालणार असाल तर फ्रिज मधे ठेवण्यापुर्वी हलके मिक्स करुन घालावेत. मग पातेलं डिप फ्रिजर मधे ठेवावे.
ब्लेंडर चा फायदा म्हणजे हे श्रिखंड कमी कष्टात बाहेरच्या इतकेच चकचकीत, गुळगुळीत होते. शिवाय घासायला ताप कमी.
मला बेसिक श्रिखंडाची रेसिपी अश्विनिने सांगितली तेव्हा तिने हाताने भराभरा एकजीव करायला सांगितले होते पण त्या प्रकारे केल्यावर टेस्ट बेस्ट आली तरी ते मॉडीफाईड दहीच वाटत होतं, बाहेरच्या सारखा गुळगुळीत पणा/चकाकी नव्हती. पण कमी कष्टात हवा तो परिणाम मिळवायला ब्लेंडरचीच मदत झाली. फुड प्रोरेसर पण चालेल पण ब्लेंडर पेक्षा त्यानेही घासायची भांडी वाढतातच शेवटी
फक्त आम्रखंडाचा फोटोच काढायचा राहिला म्हणून हा पुर्ण ताटाचाच फोटो टाकतेय
वर्षाबाय दरवेळी इमेलुन इचारु
वर्षाबाय दरवेळी इमेलुन इचारु नकोस आता. इथेच वाचुन कर
वॉव. मस्त दिसतेय पुर्ण ताटच.
वॉव. मस्त दिसतेय पुर्ण ताटच.
सहीए ताट!!
सहीए ताट!!
छान. बघुनच पोट भरले.
छान. बघुनच पोट भरले.
फ्रीजरमधून काढलेलं गार..
फ्रीजरमधून काढलेलं गार.. गार..च खायचं का?
दुसर्या चौकोनी वाटीत काय आहे?
ताटंच गट्ट्म कराव असं
ताटंच गट्ट्म कराव असं वाट्तय!!! मस्त!!
कवे, झक्कास दिसतंय अगं पाकात
कवे, झक्कास दिसतंय
अगं पाकात पुरणयंत्रातून आधीच काढलेला चक्का हळूहळू टाकताना एकीकडे भराभरा घोटत जायचं. मस्त गुळगुळीत आणि चमकदार होतं. तुझी पद्धत खरंच कमी कष्टांची आहे.. मस्त !
ताटाचा फोटो छानच.
ताटाचा फोटो छानच.
फर्मास!!! सगळं ताटचं एकदम
फर्मास!!! सगळं ताटचं एकदम झक्कास दिसतय
अत्ता, जेवायला बसावं वाटतयं... आमचा लंच टाईम झालाच आहे ऑलमोस्ट
ती त्रिकोणी पुरी आहे का?
'चव' वेगळी लागते का केश्विनी/
'चव' वेगळी लागते का केश्विनी/ कविता?
खरंच विचारते आहे.
कविता ब्लेंडर म्हणजे? हँड ब्लेंडर म्हणतेस का ?
ते ताट काय सुंदर दिसतेय. फुल्लं मार्क.
पाकातले असल्यामुळे "चितळे"
पाकातले असल्यामुळे "चितळे" आम्रखंड सारखीच चव येणार.खुपच मस्त..पक्का पाक थंड व्ह्यायला लागला तर त्याची साखर होणार व ती खडेवजा साखर काहीकेल्या चक्क्यात विरघळणार नाही म्हणुनच
साखरेचा पक्का पाक गरम असतानाच चक्का+आमरसात मिक्स केला तर मिश्रण एकजीव होते.
धन्स लोक्स. बनवुन बघाच एकदा.
धन्स लोक्स. बनवुन बघाच एकदा. अजिबात बिघडत नाही. फक्त एकजीव नीट व्हायला हवं.
साखरेचा पक्का पाक गरम असतानाच चक्का+आमरसात मिक्स केला तर मिश्रण एकजीव होते.>>> हो ग असच करायचं
एकदा सेट झालं की मग फ्रिजर मधुन खालच्या शेल्फ मधे शिफ्ट करायला हरकत नाही. पण शक्यतो फ्रिज मधेच ठेवावं. अगदीच गार आवडत नसेल तर खायच्या आधी १५-२० मि. बाहेर काढून ठेवायचं. मला गारच आवडतं म्हणून मी फ्रिज मधुन वाटीत घेतलय.
दुसर्या वाटीत सोया चंक्सची भाजी आहे
@रैना, वेगळी चव नाही लागत. नेहमीचच श्रिखंड पण कमी कष्टात होणारं इतकच. मला ते पुरण यंत्र माळ्यावरुन काढा, त्यात चक्का घालुन तो लडबडाट नंतर आधी चाटुन पुसुन खा फुकट जाऊ नये म्हणून मग ते पु.यं. धुवा, कोरडं करुन तेलाचा हात लावून ठेवा इ. खटपटी पेक्षा दोनच पातेली वापरुन नी हॅन्ड ब्लेंडर वापरुन केलेलं हे श्रिखंड कमी कष्टात अपेक्षित चव देणार वाटलं
अगं हा मेन्यु गुढीपाडव्याचा. आधी ठरवलेलं मस्साला स्पर्धेत भाग घेवुयात. मुद्दाम स्पर्धे साठी काही करायला नको, केलेल्याच ताटाची रिसिपी देऊ हा कविन्+विवन असा जॉइंट प्रोजेक्ट होता. डिश च्या आधी वेलकम ड्रिंक पण होतं पण फोटुच इस्सरलो काढायला.
पुलाव+ वेलकम ड्रींक विवनने केलेलं आणि सोलकढी, पुरी भाजी नी श्रिखंड मेरा बनाया.नंतर स्पर्धेत टाकायला वेळच नाही झाला. ह्या त्रिकोणी पुर्या बच्चेकंपनीत एकदम हिट होतात. नेहमीसारख्याच पुर्या पण गुजराथी फुलक्यां इतक्या लाटायच्या आणि मग सुरीने अधिकच्या आकारात त्याच फुलका पुरीच्या त्रिकोणी ४ पुर्या करायच्या. पुन्हा इथेही कष्ट कमी
कवडे टाकलेस एकदाचे.. नक्की
कवडे टाकलेस एकदाचे.. नक्की सेंचुरी करणार हा धागा. लोकांनो कराच या पध्दतीने श्रीखंड्-आम्रखंड. विकतच्यापेक्षा छान होते
सुलेखा, अगदी अगदी. रैना,
सुलेखा, अगदी अगदी.
रैना, सेम चितळ्यांच्या श्रीखंडासारखी चव येते. फ्रिजमध्ये ८ दिवसही चांगलं राहतं. साधं श्रीखंड उद्या परवाला फसफसायला लागतं.
छान आहे हा प्रकार. ताटही
छान आहे हा प्रकार. ताटही सुंदर सजवलेय.
ताट छानच दिसत आहे. पुर्यांची
ताट छानच दिसत आहे. पुर्यांची आयडीया पण छान.
जबर्या! आलोच्च जेवायला
जबर्या! आलोच्च जेवायला
यंदाच्या आंबा गटगला कविताच्या
यंदाच्या आंबा गटगला कविताच्या नावावर पाकातलं आम्रखंड टाकून ठेवा आयोजकांनी आणि विवनच्या नावावर पुलाव!!
चितळ्यांच्या श्रीखंडाची चव
चितळ्यांच्या श्रीखंडाची चव घेतल्यापासुन तसे चकचकीत श्रीखंड तयार करताना माझे ही खुपदा प्रयत्न फसले.कितीवेळा तरी साखर जमलेला पाक पुन्हा-पुन्हा पातळ केला अन श्रीखंडात मिक्स करताना पाकाची साखर वेचुन काढली.शेवटी जमले एकदाचे..
चालेल की पण पुलावा पेक्षा
चालेल की पण पुलावा पेक्षा जास्त भारी वेलकम ड्रिँक होत तेच त्याला करु दे
मस्त.
मस्त.
कवे, विवन ला सांगुन त्या
कवे, विवन ला सांगुन त्या 'वेलकम ड्रि़ंक' ची रेसिपी योजाटा च
मस्त!
मस्त!
मस्त...
मस्त...
काल केला परत हा उद्योग. घरात
काल केला परत हा उद्योग. घरात मॅगो पल्प कमी होता. म्हणून निम्म्याच चक्क्यात टाकले. आणी उरलेले केशर्-वेलची केले.
सकाळी पाहिले तर केशर्-वेलचीचे छान झाले. पण आम्रखंड कडक झाले होते. फ्रीजरबाहेर काढल्यावर आम्रखंड पातळ झाले. आणि केश-वेलची छान.
माकाचु
मला वाटते पल्प पातळ असल्यामुळे आणी पाक त्या मानाने थोडा कच्चा, असे झाले असेल.
निश्कर्ष : आम्रखंड करताना श्रीखंडाच्या मानाने पाक जात पक्का असावा
श्रीखंड डीप फ्रिजर मध्ये
श्रीखंड डीप फ्रिजर मध्ये ठेवल्याने बर्फ नाही होत कां?
ताट काय सुंदर
ताट काय सुंदर दिसतेय......
पुर्यांची आयडीया पण छान.......
उफ्फ ! दोन दिवस हा धागा दिसत
उफ्फ ! दोन दिवस हा धागा दिसत असुन उघडला नाही, आता उघडला तर लंच टाइम मधे. प्रचंड भूक लागली असताना. आता मला श्रीखंडाचीच भुक लागली आहे. त्यातही ते संपुर्ण ताट दाखवायची काय गरज होती? ते तर इतकं जीवघेणं आहे.
मनी, मी केलय आत्ता पर्यंत
मनी, मी केलय आत्ता पर्यंत तेव्हा तरी नाही झाला बर्फ फ्रिजर मधे. हे वर फोटोत दिसतय ते ही असच केलय. सकाळी उठून तसही मी खालच्या खणांमधे ठेवते पातेलं. जर कंझिस्टन्सी खुप पातळ नाही वाटली तर फ्रिजर मधे न ठेवता नुसतच फ्रिज मधे ठेवुन सेट होईलही.
वर्षे, पुढच्या वेळी फ्रिजर मधे न ठेवता फ्रिज मधे ठेवुन बघ, मिश्रण जास्त पातळ नव्हतं का वाटत फ्रिज मधे ठेवताना?
त्यातही ते संपुर्ण ताट
त्यातही ते संपुर्ण ताट दाखवायची काय गरज होती? >>> क्रॉपायचा आळशीपणा दुसरं काय
Pages