चक्का १/२ किलो
आमरस (वाटीच्या मापाने जेव्हढा चक्का तेव्हढाच आमरस)
साखर (आमरसा प्रमाणेच वाटीच्या मापाने जेव्हढा चक्का तेव्हढीच) (आटीव रस असेल आणि त्यात साखर असेल, तसच चक्का किती आंबट आहे, आपल्याला किती गोSड आवडतं त्याप्रमाणे साखरेच प्रमाण कमी अधिक करावं)
पाणी - साखर जेमतेम भिजेल इतपतच
वेलची, जायफळ स्वादा करिता
आंब्याच्या बारिक चिरलेल्या फोडी (ऐच्छीक)
चक्का वाटीने मोजुन घ्यावा, जितके वाटी चक्का तितकेच वाटी साखर एका पातेल्यात घेऊन त्यात साखर जेमतेम भिजेल इतपतच पाणी घालुन साखरेचा पक्का पाक करायला ठेवावा.
एकिकडे पाक होत असताना मोजुन घेतलेला चक्का दुसर्या पातेल्यात ब्लेंडर वापरुन एकजीव करुन घ्यावा. त्यातच आमरस घालुन पुन्हा एकदा ब्लेंडर फिरवुन एकजीव करुन घ्यावं
त्यातच वेलची पूड, जायफळ इ. घालावं (स्वादापुरेसं)
साखरेचा पक्का पाक झाला की तो पाक ह्या एकजीव करुन घेतलेल्या मिश्रणात ओतून पुन्हा एकदा ब्लेंडर झिंदाबाद म्हणत सगळे एकजीव करावे.
हे ब्लेंड केल्यावर पण सुरुवातीला पातळच दिसते (पळीवाढे पातळ नव्हे पण श्रिखंड असते तितके घट्ट दिसत नाही) पण काळजी नसावी. पाएलं उचलून सरळ डिप फ्रिजर मधे रात्रभर ठेवावे. दुसर्या दिवशी घट्ट, बाहेरच्या प्रमाणे शाईन करणारं असं श्रिखंड तय्यार झालेलं असेल.
आंब्याचे तुकडे घालणार असाल तर फ्रिज मधे ठेवण्यापुर्वी हलके मिक्स करुन घालावेत. मग पातेलं डिप फ्रिजर मधे ठेवावे.
ब्लेंडर चा फायदा म्हणजे हे श्रिखंड कमी कष्टात बाहेरच्या इतकेच चकचकीत, गुळगुळीत होते. शिवाय घासायला ताप कमी.
मला बेसिक श्रिखंडाची रेसिपी अश्विनिने सांगितली तेव्हा तिने हाताने भराभरा एकजीव करायला सांगितले होते पण त्या प्रकारे केल्यावर टेस्ट बेस्ट आली तरी ते मॉडीफाईड दहीच वाटत होतं, बाहेरच्या सारखा गुळगुळीत पणा/चकाकी नव्हती. पण कमी कष्टात हवा तो परिणाम मिळवायला ब्लेंडरचीच मदत झाली. फुड प्रोरेसर पण चालेल पण ब्लेंडर पेक्षा त्यानेही घासायची भांडी वाढतातच शेवटी
फक्त आम्रखंडाचा फोटोच काढायचा राहिला म्हणून हा पुर्ण ताटाचाच फोटो टाकतेय
इफेक्टिव्ह = परिणामकारक.. जसा
इफेक्टिव्ह = परिणामकारक.. जसा की हा फोटो..! आजच बाबा गावाहून आंबे आणि टिन आमरस घेऊन आलेत.. प्रयत्न करण्यात येईल.. आणि इफेक्ट = परिणाम बरे .. जसा माझ्यावर ह्या रेशिपीचा झालाय !:फिदी:
इफेक्ट = परिणाम >>>धन्स ग
इफेक्ट = परिणाम >>>धन्स ग जाजु बदल करुन शब्द लिहिलाय (आता गप्पांच्या पानावर काही लोकं खवचटपणे लिहितील सारखं सारखं आम्रखंड बदलतय म्हणून :P)
वाहव्वा! ताट इतकं छान दिसतय!!
वाहव्वा! ताट इतकं छान दिसतय!!
आणि वेगळच वाटतय श्रीखंड! मस्तच.. करुन बघेन!
त्यांना म्हणावं.. फ्रिजमधून
त्यांना म्हणावं.. फ्रिजमधून बाहेर आलेले सगळेच पदार्थ बदलतात.
महाराष्ट्रदिनानिमित्त काले या
महाराष्ट्रदिनानिमित्त काले या कृतीने आम्रखंड केले. मस्त गु़ळगुळीत, चकचकीत झाले. हँडब्लेंडर वापरण्याची कल्पना मस्त आहे.
Pages