गेल्या उद्योगात आपण गाव वसवला पण त्या गावाला "फेअरी गॉडमदरची" फार गरज आहे म्हणुनच आजचा आपला उद्योग आहे "परी" बनवण्याचा
साहित्य :
चला आता कामाला सुरुवात करुया. प्रथम आईसक्रिमच्या चमच्यावर नाक, डोळे, तोंड काढून घ्या.
आता एका कागदावर दोन-तीन हेअर स्टाइल्स काढून कापून ठेवा. (काळा घोटीव पेपर देखील वापरु शकता)
आता स्टीकच्या गळ्याला घोटीव पेपरचा त्रिकोण मफलर प्रमाणे चिकटवा.
आता घोटीव पेपरचा २ बाय ३ इंचाचा तुकडा कापून घ्या.
त्याची दाखवल्या प्रमाणे घडी घाला.
आता गाउनचा हवा तसा गळा कापून घ्या.
हा गाउन परीला घालुन घ्या.
मागुन हे असे दिसेल.
तिला सुट होइल अशी हेयर स्टाइल चिटकवून घ्या.
आता गिफ्ट रॅपिंग पेपरचे पंख व मुकुट कापून चिटकवून घ्या.
झाली आता आपली "परी" तयार. तिला तुम्ही तुम्हाला हवं तसं सजवा.
ही आली मिक्स अॅन मॅच करुन तिची मैत्रीण.
चला तर मग, बनवा आपापल्या पर्या आणि टाका त्यांचे फोटो इथे.
माहितीचा स्त्रोत : ज्योत्स्ना प्रकाशनचे "आर्ट अॅन्ड क्राफ्ट" पुस्तक.
या आधीचा उद्योग : http://www.maayboli.com/node/34224
अरे वा मस्तच..........
अरे वा मस्तच..........
मस्तय्,अजून क्राफ्ट्स नक्की
मस्तय्,अजून क्राफ्ट्स नक्की लिहा,वाचतेय.आम्ही घर ,झाडं केली,गाव वसलं की फोटो चिकटवते
खुप गोड. अर्ध्यापेक्षा जास्त
खुप गोड. अर्ध्यापेक्षा जास्त श्रेय चेहरा रंगवणार्या कलाकाराला !
दिनेशदा, संपुर्ण कलाकृतीचा
दिनेशदा, संपुर्ण कलाकृतीचा कलाकार एकच आहे (आपला नेहमीचाच ). माझ काम फक्त पुस्तकातल्या ज्या स्टेप तिला कळत नाहीत त्या समजावून सांगणे आणि त्यासाठीचे साहित्य जमवणे.
वृषाली नक्कीच टाक फोटो.
मस्त
मस्त
अतिशय कल्पक आणि गोड पर्या
अतिशय कल्पक आणि गोड पर्या
विनार्च मस्तच उद्योग आहे सुट्टीचा.
खूप सुंदर करताय जी काही करताय
खूप सुंदर करताय जी काही करताय ते.
कस्लं गोड.... मस्तं पर्या
कस्लं गोड.... मस्तं पर्या आहेत या..
मस्तच!
मस्तच!
अरे! हा उद्योग जास्त कोणी
अरे! हा उद्योग जास्त कोणी पाहिला नाही की आवडला नाही ? आवडला नसेल तरी तसं सांगा म्हणजे कोणते उद्योग टाकावेत याचा साधारण अंदाज येइल.
मस्त पर्या आहेत. सुट्टी
मस्त पर्या आहेत.
सुट्टी लागली कि करुन बघणार
किती गोड झाल्या आहेत! मस्त!
किती गोड झाल्या आहेत! मस्त!
सुरेख!
सुरेख!
केव ढी गम्म्त येत असेल
केव ढी गम्म्त येत असेल तुमच्या परीला/यक्षाला !! अतिशय कल्पक काम..