थोडे माझे अनुभव अधिक थोडा मसाला, लघुकथा म्हणा नाहीतर अंमळ टवाळगिरी, "आमच्या हॉस्टेल वर" ढोबळमानाने आधारित. असा माझा हॉस्टेल मधला एक दिवस, (आमचे हॉस्टेल पिक्चरातले नाही खरे आहे, त्यामुळे "पोरे" वापरतात तसले "ग्राम्य" शब्द "चवीपुरत्या मीठासारखे" वापरले आहे, कारण हॉस्टेल्स अशीच असतात, सिनेमाछाप नसतात).........(* कथेतील सगळी नावे काल्पनिक)
सकाळी सहाला उठलो, ते हेम्याच्या शिवीने ," उठ भोसडीच्या, कोब्राच्या प्रॅक्टीकलला काय बंड्या (माझे वडील ) येणार काय????, उठतानाच तिर्थरुपांचा उद्धार ऐकला अन आम्ही पण पेटलो हो, पण आम्ही मुलखाचे मिष्किल आमचा सिक्सर डायलॉग हेम्याला "बाळ मोठ्यांशी असे बोलु नाही एकनाथ महाराजांनी (ह्याचा बा एकनाथ अन अड्नाव पण कुलकर्णी!!!) शिकवले नाही वाटते शेंडेफ़ळास "...... तसेही सद्ध्या तीन दिवस अगोदरच पैशे आले होते त्यामुळे मला बाबा प्रेम भरभरुन आले होते, तरी बरे अदल्या रात्री त्यांच्याच पैश्यानेच ह्या हरामखोराला मी ओल्ड मॉंक पाजली होती!!!!(इति स्वगत संपुर्ण) "हेम्या माणुसकीत उठवत जा यार, स्वप्न पडले होते झकास!!!!!"
"तुला काय स्वप्नात कॅटरीना येते काय रे भिकारचोट!!!!, चल उठ" (ह्या हेम्याला सोन्याच्या थाळीत चांदीची भाकरी जरी घातली तरी भाड्या लाडाने समोरच्याला भिकारचोट म्हणतो, आम्ही लक्ष देत नाही कारण आम्ही खरंच भिकारी झाल्यावर ह्याच्याच एन.सी.सी च्या पैश्यात दारु पितो!!!).....
अंघोळीचा प्रश्न नव्हता, परवाच केली होती!!!!!, (रेक्टर ने गरम पाणी बादली चा रुपया पर बादली जास्त घ्यायला लागल्या पसुन आम्ही आठवड्यात दोनदा अंग धुवुन त्याचा निषेध केला होता)... मी ओल्ड स्पाईस मारला, डार्क निळी डेनिम घातली मळखाऊ शर्ट अडकवलं अन निघालो, मी अन हेम्या बाहेर पडत नाही खोलीच्या की मारवाड्याचा बन्सी (ओरीजिनली ह्यो बंसी गडोदिया पण हॉस्टेलात मारवाडी) अबे इधर क्या कर रहे हो यार उधर टॉयलेट मे देखो!!!!!, मला वाटले विक्या बिबेकरची मासिके सापडली असतील ह्याला... गेलो तर ड्रेनेज मधे उंदिर अडकलेला अन त्यात सगळ्या हॉस्टेलला रात्रीच मुतायची हौस, मिश्र दुर्गंध, मी सरळ ओल्ड्सपाईस मारलेल्या बगलेत तोंड खुपसले माझे, "तु अभी मॅनेज कर बंश्या शाम को देखलेंगे"- इति हेम्या.
वर्गात गेलो तर कुठल्यातरी मोर्चा मुळे कॉलेज बंद केले होते, आमचं प्रिंसी शामळुच होतं मी हेम्याबरोबर दाढी वाढवुन गेलो अन दरडावले तर आम्ही हॉस्टेलाईट आहोत हे ही न ओळखता हे बेनं कॉलेज बंद करणार!!!!, परत हॉस्टेल ला येता येता, शाम माने भेटला, कपाळातुन रक्त... खोक पडली होती, आम्ही शाम्यावर फ़ार जळायचो!!!, कबड्डी चॅंप, बॉडी बिल्डर, पोरी मुद्दाम "शाम आपण सोबत प्रॅक्टिस करु रे" म्हणायच्या, आता ह्या पैलवानाचे डोके फ़ुटले म्हणजे "अजि म्या ब्रह्म पाहीले सारखे होते" पण शेवटी शाम्या यार होता, कुठे कडमडला भड्व्या!!! (हेम्याच्या शिवीसंग्रहाला तोड नाही चपखल देतो) "कोणीतरी कबड्डी कबड्डी करत बसली असेल डोक्यावर ह्या फ़ुकण्याच्या!!!" (आमचा टवाळपणा, कारण शाम्या पोरी जरा जास्तच लाडवून ठेवतो हा आमचा आरोप असतो कायमचा), शाम्या म्हणाला "नाही यार, प्रॅक्टीस बद्दल बोललो म्हणुन शिलीच्या छाव्याने गज घातला डोक्यात , माझे टाळके हलले, हेम्याकडे फ़क्त पाहीले, अस्मादिक कधी चिडत नाहीत अन चिडले की सोडत नाहीत अशी आमची ख्याती होती, हेम्या डीप्लोमॅट बोलबच्चनवर भांड्ण मांडवलीत घ्यायचा, "तु गप रे", "हं राजे तुम्ही जा हॉस्टेल ला मी पाहतो "
"हेम्या ,हिजड्या, आपल्या शाम्याचे डॊके फ़ोडले, आज मेलो तरी चालेल, शाम्या हलकटा तु फ़ोडू कसे दिले डॊके कुत्र्या????"
"अरे मी ४ झोपवले, उरलेल्या तिघांनी माझी गेम केली....., तु मोबाईल काढ पैला"
"काय करतो आहेस" (हेम्या)
तिरीमिरीत सगळ्या हॉस्टेल ला मॅसेज टाकले गॄप मधे, इंजिनियरींग पासुन ते फ़ार्मसी अन अकरावी ते फ़ायनल सगळी पोरे गोळा (अंदाजे ३५!!!!), हेम्या उखडला
"तुम्हाला अकला नाहीत का बे, शिलीच्या छाव्याचा बा पॉलिटीकली वेल कनक्टेड आहे"
"तु येणार की नाही?????" अश्या वेळी माझा आवाज थंड होत असे, हेम्या गार "राजे आम्ही नाही म्हणालोय का??"
अर्धी पोरे कॉलेज कॅंटीन ला गेली हॉक्या आणायला, अर्धी राधा चहा सेंटर वर, गांधी चौकात तो धरला, का रे शाम "माने ला तुम्ही मारले का?"
तोवर सगळी पोरे तुटुन पडली, चौक फ़ुल धतिंग मधे!!!!!, तो अरे अरे म्हणे पर्यंत मी शाम्या कडुनच त्याचे तोंड फ़ोडुन घेतले, जरा माणसात आलो सगळे, प्रजापती टी स्टॉल वर बैठक जमली, मी गोल्डफ़्लेक जळवली, तो
"हरामखोरांनो एक फ़ोन फ़िरवला तर घरी मढी जातील" काड्ड्ड्ड्ड्ड्ड "(मी अश्यावेळी मुस्काड्फ़ोडून बोलतो)
"नीट बोलायचं" ..... "अरे पण शिली माझी आहे प्रेम आहे आमचे" परत काड्ड्ड्ड्ड्ड्ड "तुला शाम्यावर भरोसा नाही ओके, साल्या जिच्यावर प्रेम आहे म्हणतो तिच्यावर पण नाही का रे " आमच्या गुगलीवर हेम्या आऊट झाला अन समोरची पार्टी तर भोटासारखी पहातच राहीली, "जाऊ द्या न यार", आता हेम्याचे डोस देण्याचे काम
"हे बघ गड्या तुला वाटत असेल हॉस्टेलाईट पोरे आहेत, बाहेरची आहेत पण एक लक्षात घे, हे आमचे घर आह्रे अन इथला प्रत्येक पोरगा आमचा भाऊ, परत आमच्या हॉस्टेल च्या पोराकडे बघायचे नाही कळले का, अन तु ज्याला फ़ोन करतो म्हणला न तो प्रचाराच्या वेळी गाड्या पाठवतो आम्हाला प्रचारात यायचे आंद्ण देऊन कळले का?"आता पर्यंत १०.३० अकरा झाले होते, समोरचा पण आंबला ,शाम्याची माफ़ी मागितली, (पुढे हा आमचा जिगरी लोकलाईट मित्र झाला!!!!!)...... शाम्याला पण सांगितले "ह्यातले काही शिलीला बोलला अन हिरो ट्रेजडी किंग वगैरे झाला असे कानावर आले तर हॉस्टेल च्या कॅनपीवर रात्री नागडा उभा करीन" तो पण मानला.
गांधीचौकात भजी खाऊन , पिल्याच्या दुकानात बसुन हॉस्टेल वर येता येता १२ झाले, येतानाच मेस ला गेलो, "आज काय आहे गण्या जेवायला?" (आमचा नको तो प्रश्न) "म्म्म्म्म्म्म्मालक आआआआआज क्क्क्क्किक्किक्किनाई मम्म्म्म्म्म्ट्की आहे" हेम्या पेटलं "अरे साल्या ४ दिवस झाले रोज मटकीच!!!!!??? तुझ्या मालकिणीला विचार हायवेवर मटकीचा ट्रक उलटलाय का म्हणावं!!!!" असे म्हणून गिळायला बसला, मावशी लागल्या हसायला!!!!!
"अरे बाळांनो मी अशी बरी उपाशी ठेवेन तुम्हाला, मटकी नको का थांबा जेवणात देते एक एक आंबा सिझनचा पैला आहे हो ,आमच्या आमराईतला आहे!!!" मावशी इतक्या जीव लावायच्या की आई आठवावी, आम्ही पण अडी अडचणी ला रात्र-बेरात्र जात असु त्यांच्या मदतीला, इतके कोणीतरी परक्यागावात विचारते आहे हेच आम्हाला भरपुर वाटे, बिचा~या एकतर विधवा त्यात त्यांचा नाना आमच्याच कॉलेज ला एस.वाय ला, तरी बरे मागच्या वर्षी ह्यांच्या मुलीचे म्हणजे लताताईचे लग्न लागले , विचार केला डोळे ओलावले, मुकाट जेवलो, साधारण एक वाजता परत गेट मधुन हॉस्टेल ला परत जातो आहे ते अकरावी कॉमर्स चा निशांत धावत आला "दा दा, हेमंत दा, अर्जुन दा लवकर चला गंमत" "तु पैला श्वास घे बरं नीट निश्या!!!!" "दा लवकर चला!!!!" गिरीश साने गर्दीत पाहुन मला कळले ह्याने काहीतरी केले, गि~या झकास आर्टीस्ट आहे आमचा ,आहे लोकलाईट पण हॉस्टेल मेंबर असतो, रम्या टाकायला, प्यायला, घरी डायरेक्ट सांगतो, "होस्टेल च्या दोस्तांबरोबर पिणार आहे, रात्री येणार नाही गरज पडली तर रुम नं.५ (माझी) ला निरोप पाठवा मी येईन"... ह्याचा मामा मर्चंट नेव्हीत आहे, येताना आमच्या साठी यार्डले, कॅमल, कॅप्स्टन जमैकन रम सिगार असली भारी पाकिटे आणतो तो सुट्ट्याची, ह्याची पिक्चर मेमेरी भारी आहे, ह्याने मला मागच्या वर्षी गॅदरींग मधे माऊ (आमचं "लव्ह"!!!! , त्या लव्हचं आज लग्न होऊन तिस पोर देखील झाले आहे!!!, कारण आमचे लव्ह पुर्ण पाच वर्षे वनसायडेड्च होते) जशी दिसत होती ते आठवुन पोर्ट्रेट काढुन दिले होते. हे लोकांना काड्या करायला सांगे व लोक गोत्यात आले की मजा बघे, आम्ही उगीच नाही त्याला "आवली आर्टीस्ट म्हणत असु". ह्याने दोन ज्युनियर पोरांना सांगितले की तुम्हाला भारी पोरी पहायच्या असतील तर केमेस्ट्री च्या खिडकी खाली बसा, आता ही पोरे येडी तिथे बसुन कुठली बरी ह्यावर चर्चा करु लागली, पुर्ण कॉलेजला माहित होते इथे अंबर्डे सर ( रावण) सकाळचा चहा पित असत, ही पोरे बसली डबल मिनींग चविष्ट बोलत, सरांनी जसे ऐकले तसे दोघांना त्यांनी मानगुट धरुन खिडकीतनच आत घेतले व खिडकी ची कवाडे बंद करुन फ़ुल खर्चापानी!!!!!, पोरे बाहेर आली रडवेली तर आम्ही इतके जोरात हसलो की ह्या पेक्षा रावणाचा मार बरा असे झाले त्यांना.
परत रुम ला आलो तर(२ वाजता), हेम्या डायरेक्ट विकेट फ़ेकुन झोपला (अदल्या रात्रीच तो फ़ुकटची म्हणुन खुप प्याला होता!!!), मी सरळ म्यु.पी काढले व ए.एल.पी लिहित बसलो, प्रोग्रॅमेबल कंट्रोलर कस्टमाईझ्ड फ़ॉर हॉटेलिंग अप्लिकेशन. माझा प्रोजेक्ट होता, ह्याच्या आधी एक असाच टी.पी केला होता खते व बियाणे दुकानासाठी तो गमती गमतीत ४५००० ला विकला!!!!!, ६.३० पर्यंत अभ्यास केला उठलो तोंड धुवायला गेलो तर संडासाचे पार वाटोळे झालेले, तसाच कार्यक्रम केला अन खोलीत आलो ते हेम्या अजुन झोपलेलाच, आता माझी बारी!!!!, फ़र्मास लाथ घातली कमरेत!!! "उठ भडव्या!!!!!" हेम्या उठला "६.३० राजे तुम्ही उठवले म्हणुन बरे, हे इयर आमचे झोपुन निघणार बहुतेक आता!!!" खाली गेलो चहा प्यालो, एक एक सिगरेट मारली थोडे फ़्रेश झालो, हेम्या आज मस्त अभ्यास झाला माझा!!!!! हेम्याने लगेच तोंड आंबट केले, "तु बस आता अभ्यास करत मी येतो जीमला जाऊन" हेम्या खुष, त्याने दिवसात पंधरा मिनिट्स अभ्यास करुन "युनिव्हर्सिटी टॉपर" असा काढलेला रिझल्ट आम्ही पाहीला होता सो हेम्याला तास-दिड तास म्हणजे तो आठवड्याचा अभ्यास करणार!!!!!" ८ ला परत आलो, हेम्या-"मावशींना सांग आज नाही" "काआअय्य्य हेम्या कालच तर प्यालोय यार आपण रेग्युलर बेवडे नाही हेम्या" हेम्याने गुमान एक खाकी एन्व्हलप काढले मी वाचु लागलो
"Mr.H.E.Kulkarni,
we are happy to inform you that you have been selected for the training at the INDIAN MILITARY ACADEMY ,Dehradun under the prestegious 63 RR batch, if you wish to join, report on XX/XX/XX at XX.XX o'clock at new delhi station your Movement co-ordination officer will be Major. XXXXXX who will assist you furthur, no reporting after 5 in the evening will be reported.
XXXX
General headquarters(recruitment) Indian Army (New Delhi)
हेम्याचे स्वप्न साकार झाले होते, हेम्या एम.एस्सी अर्धे सोडून अन हॉस्टेल कायमचे सोडुन लेफ़्टनंट. हेमंत.ए.कुलकर्णी होण्यासाठी जाणार होता, हेम्याच्या डोळ्यात पाणी होते, "आज तरी पी भोसडीच्या ,एका दिवसात कोणी नाही होत बेवडा अन उद्या नंतर परत मी तरी कुठे आहे तुला बेवडा करायला" म्हणत हेम्या गळ्यात पडला व ढसाढस रडु लागला "राजे अकरावीत आपण हे दार ओलांडून हॉस्टेलाईट झालॊ, हे घर आहे ,राजे हे घर आहे!!! खुप आठवाल यार तुम्ही!!!!" मी पण अवघडलो,
"चुप, पोरगी आहेस का आसवे गाळायला? आर्मीमेन नेव्हर क्राय!!!!"
"हेम्याने, मुकाट, चक्क कपाटातुन शिवास रिगलचा खंबा काढला, शेंगदाणे सोडा ग्लास (फ़िल-फ़्री बार मधुन चोरलेले!!!!) सगळे काढले, कॅनपी वर गेलो तिथे शाम्या आधीच आला होता, गि~या होता , अन सगळ्यांचेच डोळे चक्क ओले होते!!!!, गि~याने हेम्याला त्याचे पोर्ट्रेट गिफ़्ट केले, शाम्याने डॉ.कलामांचे पुस्तक, मला वेळेवर माहीत झाले तरी मी धावत खाली गेलो माझा कॅम घेतला, लाल टाय घेतला टाय हेम्याला गिफ़्ट केला सगळे शांत बसलो, एक एक घोट, आठवणी जागवत होता, अन मुख्य म्हणजे त्या नजरेतुनच कळत होत्या, हे हॉस्टेल, इथे आम्ही काय नाही शिकलो, सरकार कायद्याप्रमाणे डीग्र्या शिकलोच, पण इथे मैत्री शिकलो, जीवाला जीव देणे शिकलो, विश्वास शिकलो, एकीचे बळ शिकलो,....... थोडक्यात जिंदगी शिकलो यार.........
सकाळचे चार वाजले, हेम्या आज घरी जाणार कायमचा, अकरावी पासुनची साथ सोडुन आमची, संध्याकाळची गाडी, मी सगळे आणुन खाली झोपवले, शिवास ची बॉटल आडवी झालेली सहज ती उचलली, बेसीन ला नेली कागदाने ओले करुन त्याच्यावरची रॅपर्स काढली गोल्डन मार्कर ने त्याच्यावर डीझाईन काढले खाली लिहिले
"may the golden memories cherish for ever, may our friendship become mature like this authentic whisky!!!" खाली माझी शाम्याची व गि~याची सही, पुर्ण हॉस्टेल ने त्या बाटली वर सोनेरी सह्या केल्या संध्याकाळी देऊ आम्ही ही स्टेशन वर हेम्याला, ,सोबत काल रात्री काढलेला गृप फ़ोटो फ़्रेम करुन देणार मी ह्या सोनेरी रिकाम्या बाटली सोबत.
अरेच्या....... लेक्चर संपले. बरे आहे ह्या वासुनानाच्या लेक्चरातच रोजनिशी लिहिली पाहीजे, उगा नोट्स काढल्याचा पण आव आणता येईल डियर डायरी, कालचे इमोशन ओव्हर, आज नवा दिवस आहे ,आजचा दिवस तुझ्या पानांवर उद्या उमटवेन आता , बाय बाय, फ़क्त उद्या हेम्याचा सी ऑफ़ लिहिताना एखादा थेंब पाणी तुझ्या पानावर पडले तर फ़क्त न रागावता मॅनेज कर........कारण शेवटी तो देखील असेल , हॉस्टेल मधला..... एक दिवस...
अर्जुन
चांगलं लिहिलयसं !
चांगलं लिहिलयसं !
मस्त! होस्टेलचे दिवस आठवले.
मस्त! होस्टेलचे दिवस आठवले.
मस्तच
मस्तच
खुप मस्त लिहीलय!! हॉस्टेलचे
खुप मस्त लिहीलय!! हॉस्टेलचे दिवस आठवले!
छान लिहिलय
छान लिहिलय
छान लिहिलय
छान लिहिलय
सगळ्यांना धन्यवाद हुरुप
सगळ्यांना धन्यवाद हुरुप वाढवलात माझा लेखनाचा
छान लिहिलंय. आवडलं.
छान लिहिलंय. आवडलं.
छान लिहिलय.
छान लिहिलय.
छान लिहिलंय. आवडलं.
छान लिहिलंय. आवडलं.
मजा आली.... मस्त लिहिलंय
मजा आली....
मस्त लिहिलंय टोल्याभाउ.
धन्यवाद मित्रहो!!!!
धन्यवाद मित्रहो!!!!
छान लिहिलयं
छान लिहिलयं
खुप मस्त लिहीलय
खुप मस्त लिहीलय
चांगलं आहे ,थोडे सुटे सुटे
चांगलं आहे ,थोडे सुटे सुटे लिहिल्यास आणखी चांगले वाटेल
सुरेख.
सुरेख.
छान लिहलेय..
छान लिहलेय..
सुरेख........... निशब्द करुन
सुरेख...........
निशब्द करुन टाकणारे लेखन...............
आभार!!!!!
आभार!!!!!
मस्त लिहलय राव कॉलेजचे ते
मस्त लिहलय राव कॉलेजचे ते सोनेरी दिवस मजा येते भाउ
धन्यवाद शैलेशराव
धन्यवाद शैलेशराव
चांगलं लिहिलय पण फार घाईत
चांगलं लिहिलय पण फार घाईत लिहिलय असं जाणवतय व वाचताना ही घाई होतेय.
बरोब्बर ओळखले तुम्ही!!!!!!!.
बरोब्बर ओळखले तुम्ही!!!!!!!.
sahheech !!
sahheech !!