शाळेला सुट्टी पडून दोन दिवस नाही झाले तोपर्यंत "आई आता काय करू?" हा प्रश्न दिवसातुन हजारवेळा विचारुन, लेकीने माझा जीव नकोसा करुन सोडला. हिला कशात गुंतवता येईल याचा विचार करताना मला ज्योत्स्ना प्रकाशनचे "आर्ट अॅन्ड क्राफ्ट" पुस्तक हाती लागलं. त्यात दिलेल्या वस्तू तिच्या वयाच्या (आठ वर्ष) मुलांना सहज जमण्याजोग्या वाटल्या म्हणुन प्रयत्न करुन पाहीला. हे घर करताना तिला इतकी मजा आली की तिने घरं बनवण्याचा सपाटाच लावला आणि मला थोडा मोकळा वेळ मिळाला.
मायबोलीवर माझ्या सारख्या बर्याच आया (आईच अनेक वचन ) असतील म्हणुन इथे ते घर बनवण्याची कृती फोटोसहित देत आहे आवडली तर ऩक्की सांगा मग पुढच्या उद्योगांबद्द्लही लिहिन (कारण आमचा एकदिवसाआड नविन वस्तू बनवण्याचा करार झाला आहे)
साहित्य :
कार्डपेपरचा ६ बाय ६ इंचाचा चौरस कापून घ्या.
त्याच्या पुढील फोटोत दिल्या प्रमाणे घड्या घालून घ्या.
पुढील फोटोत दाखवलेल्या तुटक रेषा कात्रीने कापाव्यात.
आता आर्कीटेक्ट्ला बोलवून दारं खिडक्यांची पोझिशन ठरवून घ्या.
नंतर सुताराला सांगुन दारंखिडक्या बसवुन घ्या.
आता रंगवलेल्या भागावर गम लावा.
आता शेजारचा चौकोन गम लावलेल्या भागावर चिटकवा.
आता हे असे दिसेल. त्याच्या रंगवलेल्या भागावर परत गम लावा व शेजारचा चौकोन दाखवल्याप्रमाणे त्यावर चिटकवा.
हे झालं बेसिक घर तयार.
आता छपराचं काम चालू करा.
हे आपल घर छप्पर लावून तयार.
आणि हा माझ्या लेकीने वसवलेला गाव (हे काम तिने स्वत:च्या कल्पनेने मी ऑफीसला गेल्यावर केलं)
किती मस्त आहे हे घर!
किती मस्त आहे हे घर!
आमच्याकडे रिकाम्या शू बॉक्स मधे लेगो अन लाकडी ब्लॉक्स वापरुन स्टफ्ड प्राण्यांकरता अपार्टमेंट बनवायची फॅक्टरी आहे . आता अशा घरांची प्रॉडक्षन लाईन सुरु करायला हवी.
सुंदर......
सुंदर......
सहीए!!
सहीए!!
मस्त
मस्त
मस्तच!!
मस्तच!!
मस्त आमच्याकडे आर्ट आणि
मस्त
आमच्याकडे आर्ट आणि क्राफ्टच्या नावाने आनंद आहे
विनार्च,प्लिज "उद्योग"
विनार्च,प्लिज "उद्योग" लिहा,आमच्याकडेही "काय करू" जप चालू असतो.माझ्या लेकीलाही क्राफ्ट आवडतं खूप.आज हे घर बनवून बघतो आम्ही पण.
सोप्पं वाटतंय करून पाहिन.
सोप्पं वाटतंय करून पाहिन.
कस्लं मस्तं केलंय सगळंच! झाड,
कस्लं मस्तं केलंय सगळंच!
झाड, घरं, सूर्य, कोंबडी आणि मोर..गावात आणाखी काय लागतं? फर गोड!
मस्त!!! विनार्च, इथे
मस्त!!!
विनार्च,
इथे 'सुट्टीतील उद्योग' गृप आहे. तुला हवे तर हा धागा तिकडे हलवं
लाजो, कसा हलवायचा हा धागा
लाजो, कसा हलवायचा हा धागा तिथे?
विनार्च, आधी तुला या गॄपचे
विनार्च,
आधी तुला या गॄपचे सभासद व्हावे लागेल बहुतेक. त्यासाठी ग्रूप च्या मेन पेजवर जा आणि उजवीकडे 'सभासद व्हा' वर टिचकी मार. १५ सेकंदात सभासद होशिल.
मग या धाग्याच्या संपादनात जा आणि खाली ग्रूप लिहीले आहे तिथे 'सुट्टीतील उद्योग' सिलेक्ट कर
छानच उद्योग आहे हा !!
छानच उद्योग आहे हा !!
गाव फारच सुंदर झालय.
गाव फारच सुंदर झालय.
मस्तच
मस्तच
ह्या ग्रूपच सभासदत्व घेतलं पण
ह्या ग्रूपच सभासदत्व घेतलं पण संपादनात मला ग्रूप दिसतच नाही आहे
हम्म... अॅडमिन ना साकडं घालं
हम्म... अॅडमिन ना साकडं घालं मग... अन्यथा राहु दे इथे.
पुढच्या वेळेस तिकडे धागा काढ
वॉव! अप्रतिम.
वॉव! अप्रतिम.
"आई आता काय करू?" हा प्रश्न
"आई आता काय करू?" हा प्रश्न सुट्टीसोबतच सुरु झालय माझ्याकडेही.
छान उद्योग. अजुन लिहा.
किती मस्त! आजच लेकीला दाखवते!
किती मस्त! आजच लेकीला दाखवते!
मस्त!!
मस्त!!
घरं बनवायचा मस्त उद्योग...
घरं बनवायचा मस्त उद्योग...
किती छान आहे हे घर !! नक्की
किती छान आहे हे घर !!
नक्की लिहित राहा. माझे डोकेही असेच उठवले आहे लेकीनी.
तिलाही आवडेल हे बनवायला.
ओह सो स्विट!! मस्तयं एकदम..
ओह सो स्विट!! मस्तयं एकदम..
मस्तय विनार्च. सिंडी+१. मला
मस्तय विनार्च.

सिंडी+१. मला स्वतःलाच ते जमत नाही. त्यामुळे आनंद.
मस्त झालं आहे घर
मस्त झालं आहे घर
सुंदर.
सुंदर.
खुपच मस्त बनवलय
खुपच मस्त बनवलय
कसलं क्युट आहे!
कसलं क्युट आहे!
विनार्च, भारीच एकदम. आम्हाला
विनार्च, भारीच एकदम. आम्हाला शिकवल्याबद्दल धन्यवाद.
मी करून पण पाहिलं. मस्त दिसतय एकदम.
झाड, घरं, सूर्य, कोंबडी आणि मोर..गावात आणाखी काय लागतं? फर गोड!>> +१
एक छोटीशी सुधारणा.. ती छतावरून दरवाजाच्या मध्यात जी घडी येतेय तेवढी टाळली जावू शकते.
Pages