सर वळवाची

Submitted by अज्ञात on 25 May, 2008 - 08:15

सर वळवाची सोनेरी
म्रुदगंध मदन शर मनोहरी
कोकीळ स्वरांची जरतारी
नक्शी काळीज जिव्हारी

चांदण्या विखुरल्या लिंबाच्या
झुळुकेत सुगंधी जल लहरी
स्पर्शात जिव्हाळा पुनवेचा
मन संमोहित दरबारी

पाऊलखुणा गत शकुनाच्या
कप्पा व्र्हुदयाचा माजघरी
मिटल्या डोळ्यांची गाठ पडे
एकांतातील विहारी

माझाच मला वाटे हेवा
किती कळ्या उमलल्या गाभारी
थेंबात सुखावे अश्रू
दंव हिरवळलेल्या संसारी

.................अज्ञात
११९०,नाशिक

गुलमोहर: 

अप्रतिम कविता... चालीत गुणगुणले तर गाणेच आहे..

ज्याला हवी त्याला पोहोचली की सार्थक झाले म्हणायचे .. !
धन्यवाद.

त्या आठवणींचाही हेवा वाटावा... अप्रतिम!