एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डोसे राधानेच केले. तव्यावर पीठ ओतायला डावाऐवजी कालथा वापरला. पुढे आणखी काही दाखवायला दिग्दर्शकाची कल्पनाशक्ती तोकडी पडली. (सगेफू किंवा लॅपटॉप धुऊन सुकत घालणार्‍यांकडे ट्रेनिंग का घेत नाहीत?)
राधाने सगळ्या पुरुष मंडळींच्या समोर तुकडे अक्षरशः टाकले. खावे की खाऊ नये अशा विचारात असताना देवकीबाई अवतीर्ण झाल्या आणि त्यांनी मी डोसे केले पण फसले असे सांगितले. ते खरे मानल्याचा सगळ्यांनी अभिनय केला.
पपांना राधाने आपले डोसे कसे फसले, करपले, चिवट झाले, इ.इ. वर्णन फोनवर सांगितले.
मग राधा आणि देवकीबाईंचे हितगूज. राधाने अश्रू पुसायला टिश्युपेपरचा स्टॉक संपवला (तिने माहेरून आणला असणार, नंतरही ती किचनमध्ये टिश्युपेपर घेऊनच येते).(सासूच्या पदराने डोळे पुसणे मे बी अनहायजीनिक)

स्वप्नील जोशीला मोकळा सोडल्यासारखा सुटलाय. अलीकडे काही दिवस पूर्णविरामाच्या जागी 'राव' हा शब्द वापरतोय. आधी बॉस म्हणायचा बहुतेक.

आज हनीमून टाळण्यासाठी कोणीतरी पडणार. बहुतेक राधा, कारण स्वप्नील पडला तर हैद्राबादेस इंटर्व्ह्युसाठी कसा जाईल?

सॉफ्टवेअर विंजीणियरचा इंटरव्यु आयएसच्या इंटरव्युपेक्षा पण टफ असतो राव!

५. कितीही आचरट्ट असली तरी कुहू फार गोड वाटली.>> Lol
मला तिचं ते "प्रभातड्या" ऐकलं की खूप्प हसायला येतं Lol

software Engineer च्या interview साठी धना हैदराबाद ला चालला आहे. कोणत्या काळातला आहे हा??????????? video conferencing वगैरे चा जन्म व्हायचा होता वाटतं !!!!!!! Happy
किंवा मग कदाचित, मुंबईत राहून सुद्धा धनाला अमेरिकन कौन्सुलेट च्या हैदराबाद ब्रांच ची अपॉइंटमेंट मिळाली असावी.

प्र९ तुझ्या पाचही मुद्द्यांना +१ Happy
software Engineer च्या interview साठी धना हैदराबाद ला चालला आहे. कोणत्या काळातला आहे हा?>>>
का? ऑनसाईट इंटरव्ह्यूज होत नाहीत का देशात?

तो माउली कुठे गायब झाला?
मोहन जोशींची तब्येत बरी नसते म्हणुन त्यांनी विश्रांतीसाठी बहुतेक सर्व मालिकांमधुन अंग बाहेर काढले आहे. सारेगमा मधुन पण अचानक एक्झिट घेतली.

मोहन जोशींच्या 'पुरुष' नाटकाचे प्रयोग सुरू झाले, अशी बातमी होती परवा होती.

अवंतिका नंतर हेच एक सिरियल मी बघते आहे. अर्थात त्याचं श्रेय "उंच माझा झोका" ला. उंमाझो मात्र अजिबात मिस करत नाहीये. Happy
एलदुगो जरा आचरट आहे खरं पण टीव्हीवर बघण्यासाठी माझ्यासाठीही काही असु शकतं हीच मोठी गोष्ट वाटतेय मला.
वरच्या प्रतिक्रिया वाचून कलाकारांची नावं कळली. मला तरी मुक्ता आणि स्वप्निल दोघंही मस्त वाटले. आधी त्यांचं काही काम बघितलं नसल्याने असेल. तो घना खरंच राधाच्या प्रेमात पडलेला वाटतो. Happy
पण त्याची आई किती बोअर आहे. (खरं म्हणजे एक ती सुप्रियाकाकू सोडली तर काळे परिवार म्हणजे नगच आहेत सगळे) पण तरी आई का अशी लाडावत बोलते? पण तिचे डायलॉग्ज आणि इतर अ‍ॅक्टिंग भारी असते.
माबोकर पुरुषांना चक्क कुहू आवडते, हे पाहून तिला का घेतले असावे याचं उत्तर मिळालं Proud Light 1
पुर्ण मालिकेचं यश डायलॉग्ज आणि अभिनय यातच आहे. स्टोरी ठीकठाकच आहे. माझ्या जर कुणी इतकं मध्येमध्ये केलं असतं तर मी तर पळच काढला असता घरातनं. इन्टरफेअरन्स नको म्हणून लग्न नको तर हे मूर्ख राधा-घना प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाचं इन्टरफेअरन्स का खपवून घेतात? असो. पण म्हणून तर मालिका आहे ना.. वेळ मिळेल तेव्हा बघावं झालं. Happy

कुहू म्हणजेच स्पृहा जोशी ही खर्‍या आयुष्यात कवयित्री, लेखिका, इ. इ. आहे असं ऐकलंय. मला आठवतय की लिटील चॅम्पचा आठवा सूर या अल्बम मधे पण स्पृहाचे एक गाणे आहे पण ही ती तीच हे मात्र नाही माहित. तसे असेल तर त्या मधे मधे येणार्‍या काव्यपंक्ती तिच्या स्वतःच्याच असू शकतील.

बरेच वर्षांनंतर मराठी मालिका पाहतिये म्हणून असेल क्दाचित पण ती मालिका लवकर पुढं सरकवा आता दिग्दर्शकसाहेब असं म्हणावसं वाटतं.
आ आणि ऊं असलं ऐकण्यातच वेळ जातोय सगळा.
कितीही हलकी फुलकी किंवा विनोदी म्हटली तरी पात्रं बरेचदा बावळट वाटतात.
कुहू या पात्राच्या कवितांचा अतिरेक होतो. खर्‍या मनुष्याच्या आयुष्यात एव्हाना डॉ. कडे ट्रीटमेंट सुरु झाली असती.;)
आपलीमराठी डॉट कॉमवर सगळे भाग पाच मिनिटात बघून संपवता येतात. पुढच्या भागात मागचं बघायचं राहून गेलय असं अजिबात वाटत नाही. सुप्रियाकाकूनं किती दिवस मालिकेचा तोल सांभाळायचा?;)
उंच माझा झोका ही मालिका मात्र छानच आहे.

राधाच्या व्यक्तिरेखेबाबत प्रचंड घोळ आहे. मालिकेच्या पहिल्या भागात ती स्वतःच्या घरात प्रवेश करताच फर्निचरवर धूळ आहे का ते तपासते. काचेचा ग्लास टिश्युपेपरने पुसून मग पाणी पिते. (बाहेरून आल्यावर हातपायतोंड धुवायची पद्धत मालिकावाल्यांच्या मॉडर्निटीत बसत नसावी). अशी मुलगी दुसर्‍या व्यक्तीचा बिछाना कशी काय शेअर करेल? किमान स्वतःची वेगळी चादर तरी वापरेल.

--
कुहूचे चाळे बघून आता हसूही येत नाही.

दहा मित्रांच्या दहा हार्डडिस्कमध्ये महत्त्वाचा डेटा ठेवायला घनश्याम काय व्हॉल्डेमार्ट आहे का?

दहा मित्रांच्या दहा हार्डडिस्कमध्ये महत्त्वाचा डेटा ठेवायला घनश्याम काय व्हॉल्डेमार्ट आहे का? >>>> Rofl

भरत Proud हे काय आणखी नवीन? आणि हा काय डेटा आहे म्हणे एव्हढा महत्त्वाचा? राजवाडेंनी सॉफ्टवेअर इंजिनियर हा प्राणीविशेष पाहिला नसावा असं वाटतंय एकूणात. ती कुहू लग्नाला एव्हढी आतुर झाली आहे की मला तर तिची काळजीच वाटते. लग्नाबद्दल असल्या अतिरोमॅन्टिक कल्पना असलेल्यांचा नंतर अतिभ्रमनिरास होतो. माझ्या पाहण्यात अशी उदाहरणं आहेत. तिच्या आईने तिचे कान उपटायला हवेत. बाकी ही बया कॉलेज वगैरे मध्ये जात नाही का?

आता देवकीमाऊली राधा बेडवर आणि तू खाली का झोपला आहेस म्हणून घनाला विचारत होती. काय म्हणावं ह्या बाईला? किती ते मायक्रोमॅनेजींग! घनाने सांगून टाकावं की मी कूस बदलताना सगळा पलंग दणादणा हलवतो आणि राधा घोरते ते तर तुम्हाला माहितच आहे. म्हणून आम्ही एक्मेकांशेजारी झोपत नाही. एकमेकांशेजारीच झोपलं पाहिजे असं कुठे लिहिलं असेल तर आणून दाखव. वैतागच आहे!

त्या सिकंदराने जग जिंकायला जाताना एव्हढी बोंबाबोंब झाली नसेल तेव्हढी हे दोघे हनिमूनला जाताना होतेय. काय रे देवा!

दहा मित्रांच्या दहा हार्डडिस्कमध्ये महत्त्वाचा डेटा ठेवायला घनश्याम काय व्हॉल्डेमार्ट आहे का?>>> Proud

घनाने सांगून टाकावं की मी कूस बदलताना सगळा पलंग दणादणा हलवतो>>> Lol

कालच्या एपीसोड मध्ये कुहू आणि राधाचा संवाद फुल्ल टाईमपास...
"कुहू, काही दुखतंय का?" राधा Lol
"मला ना..आता खुप लाजावसं वाटतंय!" कुहू Lol

दहा मित्रांच्या दहा हार्डडिस्कमध्ये महत्त्वाचा डेटा ठेवायला घनश्याम काय व्हॉल्डेमार्ट आहे का?>>> भरत!>>>>>>>>>
मला तर हे जे काही सॉफ्ट्वेअर इंजि. त्याचा तो इंटर व्हू आणि जे काही त्या घनाचं चाललंय ते बघून
"आमचा मुलगा "कँपूटर" करतो असं सांगणार्‍या गावाकडच्या गरीब बिचार्‍या अशिक्षित मंडळींचीच आठवण आली.
राजवाडेंनी सॉफ्टवेअर इंजिनियर हा प्राणीविशेष पाहिला नसावा असं वाटतंय एकूणात. >>>>>>>
भरत आणि स्वप्ना .........तुम्हाला +१००

Lol

काल कुहू जाम सुटलेली. राधा तिला 'तु प्रेमात पडलीय्स की काय' विचारते तेव्हा तर कमालच केली तिने..

स्वप्निलला काहीतरी दुसरा जॉब दिला असता तर बरे झाले असते.

सुप्रियाकाकु एमेविथ्लिटरेचर करुन कुकबुक्स लिहिते... वाचायला हवित तिची कुकबुक्स.

या गोष्टींवर आम्ही केलेल्या काही आरोळ्या. पहा आवडतात का ?

१) प्राईम टाईम-

प्राईम टाईम साडेआठचा !
रंगलाय 'लग्नाच्या गोष्टीत' !
सासू सुना घराघरातल्या !
पहात बसल्यात ऐटीत !!

) लग्नाच्या २ गोष्टी
टिआरपी वाढवण्यास
झीटीवी लागली
तयारीला !
म्हणुनच आज बोहल्यावर
चढवणार आहेत
राधा आणि यमीला !!

अमोल केळकर
इतर काही आरोळ्या इथे पाहू शकता

त्या सिकंदराने जग जिंकायला जाताना एव्हढी बोंबाबोंब झाली नसेल तेव्हढी हे दोघे हनिमूनला जाताना होतेय. काय रे देवा!
>>>>>>>>>>>>>>

करेरेरेरे क्ट....... Wink

आता "दुसर्‍या लग्नाची गोष्ट" नावाचं सुयोगचं नाटक आलय...... लंडनला शुभारंभाचा प्रयोग आहे.
आनंद ईंगळे, मधुरा वेलणकर आणि संजय नार्वेकर Happy

किती लग्नांच्या किती गोष्टी बाहेर येणारेत आता. Uhoh

शनीवारच्या भागात कहर केला. घना पडला तर कोणी नव्या नवरीला एकटीला त्याच्या बरोबर पाठवेल का? काही लॉजीक नाहीच. स्वप्नील खुप छान दिसतो आणि एकदम अ‍ॅट इझ काम करतो आहे. बघायला मस्त वाटतय. मुक्ता बर्वे जरा अवघडलेली वाटते. थोडं हातच राखुन वाटते.

खोटा रीपोर्ट वगैरे जरा अति होतय. विनोद निर्मीती साठी ठीक आहे.. तरी काही लॉजिक्स पटत नाहीत.

स्वप्नील खरच तिच्या प्रेमात आहे अस वाटतं . त्याचे डोळे हा त्याचा खुप मोठा अ‍ॅसेट आहे.

पण मला एक कळत नाहिये की केरळला जायला प्रॉब्लेम काय आहे ह्यांना? तिथे जाऊन हनिमून केला नाही तर फ्रन्ट पेज न्यूज होणार आहे का? व्हेकेशन म्हणून चार दिवस फिरायचं आणि करमलं नाही म्हणून परत यायचं. तसे इथेही एकाच खोलीत रहाताहेत ना? म्हणजे तिथे जाऊन एका खोलीत रहायला लागेल वगैरेही प्रश्न नाही. बरं तिथे गेल्यावर एकत्र फिरायचं वगैरेही बंधन नाही. फिरले दोघं वेगळे वेगळे म्हणून कोण बघायला येणार आहे? एव्हढं पडायचं वगैरे नाटक कशासाठी?

पण मला एक कळत नाहिये की केरळला जायला प्रॉब्लेम काय आहे ह्यांना? तिथे जाऊन हनिमून केला नाही तर फ्रन्ट पेज न्यूज होणार आहे का? व्हेकेशन म्हणून चार दिवस फिरायचं आणि करमलं नाही म्हणून परत यायचं. तसे इथेही एकाच खोलीत रहाताहेत ना? म्हणजे तिथे जाऊन एका खोलीत रहायला लागेल वगैरेही प्रश्न नाही. बरं तिथे गेल्यावर एकत्र फिरायचं वगैरेही बंधन नाही. फिरले दोघं वेगळे वेगळे म्हणून कोण बघायला येणार आहे? एव्हढं पडायचं वगैरे नाटक कशासाठी?
>>>>>>>>>>>>>>>>>

स्वप्ना, त्यावरच एक अतर्क्य एक्स्प्लेनेशन आहे घनाचं की दहा मित्रांच्या दहा डिस्कवर ह्याचा डेटा आहे म्हणे प्रोजेक्टचा........ पुन्हा एकदा मोठ्या गोष्टी कौशल्याने हाताळतात आणि लहान लहान गोष्टीत प्रेक्षकांना गृहित धरून वाट्टेल ते लॉजिक देतात चिकटवून "राजवाडे आणि प्रभृती" Happy Sad

Pages