१ किलो चिंबोर्या (४-५ नग)
१/२ किलो कांदे (४-५ नग)
१ वाटी सुक्या खोबर्याचा कीस
१ वाटी आलं-लसूण पेस्ट
२ मोठे चमचे तेल (फोडणीसाठी)
२ टेबल स्पून गरम मसाला
१ टेबल स्पून लाल मिरची पावडर
मीठ - चवीप्रमाणं
कोथिंबीर - बारीक चिरलेली
एक मोठा कांदा उभा कापून तेलावर छान गुलाबीसर भाजून घ्यावा. किसलेलं खोबरंही गुलाबीसर भाजून घ्यावं आणि त्याची बारीक पेस्ट करावी.
मध्यम आकाराच्या दोन लसणीच्या कांड्या सोलून घ्याव्यात. एक इंच लांबीचा आल्याचा एक तुकडा घेऊन दोन्हींची बारीक पेस्ट करून घ्यावी.
चिंबोरीचे पाय वेगळे काढून मिक्सर मध्ये वाटून घ्यावेत. त्यामध्ये भरपूर पाणी घालून गाळून घ्यावं.
कांदे बारीक चिरून गरम तेलात लालसर होईपर्यंत परतावेत. कांदा लाल झाल्यावर त्यामध्ये चिंबोर्या घालून चांगलं परतावं, मग आलं-लसूणची पेस्ट घालावी व खमंग वास येईपर्यंत परतून घ्यावं. आता गरम मसाला, मिरची पावडर, हळद व मीठ घालावं. त्यानंतर कांदा व खोबर्याचं वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावं. आता गाळून घेतलेलं चिंबोरीचं पाणी घालून कालवण उकळावं. कोथिंबीर घालून सजवावं.
कालवण तयार झाल्यावर थोडा वेळ मुरू द्यावं आणि नंतर सर्व्ह करावं.
चिंबोरीचं कालवण चवीष्ट तर असतंच, तसंच ह्यात कॅल्शियमही भरपूर असतं.
सहीच... हे माझे फेव्हरेट...
सहीच... हे माझे फेव्हरेट...
पावसाळा... अमावास्या आणि खेकडे हे काँबी तर काय अहाहा!!!
मस्तच! चिंबोरीचे काढून
मस्तच!
चिंबोरीचे काढून पाय
मिक्सरमध्ये वाटले जाय
कांदा लाल झाला काय
मस्साल्याचा नादच नाय
खमंग वास सुटल्यावर
कोथिंबीर भुरभुरल्यावर
सहीच लागेल मुरल्यावर
भेटू आता पोट भरल्यावर
चिंबोरीचे पाय वेगळे काढून
चिंबोरीचे पाय वेगळे काढून मिक्सर मध्ये वाटून घ्यावेत...
हे अगदी ट्राय केलं पाहिजे...बाकी रेसिपी मस्तच..पण गैरसमज नको फ़ोटोमध्ये काहीच कळत नाहीये मला काय आहे ते...की इथेच अंधुक दिसतंय???
छान रेसिपी मी खात नाही
छान रेसिपी
मी खात नाही त्यामुळे तोंपासु नाही म्हणू शकत
फोटो थोडा ब्लर आलाय.
धन्यवाद सेनापती!
धन्यवाद सेनापती!
धन्यवाद अक्षर्मन! कविता झकास
धन्यवाद अक्षर्मन!
कविता झकास जमलीये...:)
एकदाच खेकडा खाल्ला होता,
एकदाच खेकडा खाल्ला होता, आवडला होताच.
हे खूप महाग असते का? की कसे?
मस्त पाककृती
शुभेच्छा
धन्यवाद वेका! चिंबोरीचे पाय
धन्यवाद वेका! चिंबोरीचे पाय वाटून त्याचा वापर केल्यामूळे मसाला छान घट्ट होतो.
माझ्याकडे तर फोटो क्लिअर दिसतोय, दुसरा एखादा अपलोड करून बघते.
धन्यवाद लाजो!
धन्यवाद लाजो!
खेकड्याचा रस्सा(काळ्या - खास
खेकड्याचा रस्सा(काळ्या - खास करून खडकाळ भागातल्या पाण्यात सापडणार्या) म्हणजे...अहाहा!!
सर्दी गायब............
माझ्या घरी फेव्हरीट डीश आहे
माझ्या घरी फेव्हरीट डीश आहे ही. मस्र रेसिपी.
पण फोटो बरोबर नाही आलाय.
खेकड्याचा रस्सा(काळ्या - खास
खेकड्याचा रस्सा(काळ्या - खास करून खडकाळ भागातल्या पाण्यात सापडणार्या) म्हणजे...अहाहा!!
सर्दी गायब............>> +१
(No subject)
च्च! आता दिवसभर राहून राहून
च्च! आता दिवसभर राहून राहून चिंबोर्यांचे क्रेव्हिंग!
आयला डॉक, तुम्ही हा फोटो
आयला डॉक, तुम्ही हा फोटो द्याल असे वाटले नव्हते
तो ब्लर फोटो होता तेच बरं
तो ब्लर फोटो होता तेच बरं होतं असं वाटतंय आता....
चिंबोरी को बुलाना पडेगा अगले हप्ते......
धन्यवाद बेफ़िकीर, स्वाती२!
धन्यवाद बेफ़िकीर, स्वाती२!
डॉ.कैलास गायकवाड फोटो मस्तच
डॉ.कैलास गायकवाड फोटो मस्तच आहे.
आता फोटोसाठी परत लवकरच चिंबोर्या बनवाव्या लागनार!
शर्मिष्ठा मला वाटते त्यामध्ये
शर्मिष्ठा मला वाटते त्यामध्ये भरपूर पाणी घालून गाळून घ्यावं.अगदी गाळणी ने गाळून घ्यावे नाहीतर खुपच कचकचीत लागते. बाकि चव अप्रतीम.............
रुहि, गाळणीने गाळणे योग्य
रुहि, गाळणीने गाळणे योग्य नाही कारण मग त्यातले फायबर्स येणार नाहीत, ज्यामुळे रस्सा दाट होतो आणि अप्रतिम स्वादही येतो. शक्यतो अगदी बारीक पेस्ट करू नये व भरपूर पाणी घालून चांगले घोळून घ्यावे.