टॅटिंग - रनर

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 5 April, 2012 - 10:19

झालेलं इन्फेक्शन अजून वाढलंय एवढंच म्हणेन Happy

बराकत जिंदाबाद !!

श्रीखंडी रंगाचा दोरा..... पुस्तकातलं आवडलेलं डिझाइन एवढ्या शिदोरीवर केलेली सुरवात.

DSC00541.JPGDSC00544.JPGDSC00552.JPG

पुस्तकातलं डिझाइन तसं छोटं वाटलं पण जसं जसं बनत गेलं....... बर्‍यापैकी मोठं तयार झालं. मला वाटलं टेबल मॅट बनेल पण तयार झालं टेबल रनर. पुस्तकात एकाच रंगात होतं. श्रीखंडी दोरा संपला म्हणून मग मधला भाग जवळ असलेल्या काळ्या दोर्‍याचा बनवला. शिवाय वेगळं वाटायला नको म्हणून बॉर्डर सुद्धा काळीच केली.

DSC00553.JPGDSC00555.JPGDSC00556.JPGDSC00560.JPGDSC00561.JPG

गुलमोहर: 

जयश्रीतै... _____/\_____ तुम्ही ग्रेट आहात. किती पेशन्सचं काम आहे हे!! आणि तुम्ही टेबल रनर बनवलंत.... मानलं तुम्हाला.

धन्यवाद लोक्स Happy

तुमच्या इतक्या छान अभिप्रायांमुळॅ अजून जोमाने काहीतरी करावंसं वाटतं Happy

मानी...... हे शटल ने केलंय. टॅटिंग !!

मनस्विनी, ह्याला १२ दिवस लागले. जसजसं वाढत जातं तसतसा उत्साह पण वाढत जातो त्यामुळे पुढे पुढे स्पीड खूपच वाढतो Wink

नेहमीप्रमाणे मस्तच. तू निवडलेली रंगसंगती नेहमीच सुंदर असते.

पुस्तकाचं नाव सांग ना, मी शिकायचं मनावर घेतेय.

धन्यु Happy

नलिनी..... अगं ते पुस्तक चायनिज भाषेतलं आहे.......त्यामुळे नाव काय ते कळत नाही Happy पण तू युट्युबवर बघ...... तिथे खूप डिझाइन्स आहेत.

खुप छान जयश्री !
मला मुम्बैत शटल काहि मिळाल नाहि , मग नीडल टॅटिंग शिकले. अर्थात त्याचे श्रेय तुम्हाला. धन्स !

खूप खूप धन्यवाद Happy
अपर्णा...... अगं तू चिकाटीने शिकलीस .....त्याचं श्रेय तुलाच आहे गं.... !! तू केलेलं पण टाक ना इकडे.

धन्यवाद Happy

Pages