चिंच
गुळ
मीठ
तांबडं तिखट
जिरेपूड (ऐच्छिक)
काड्या
चिंच निवडून घ्यावी. म्हणजे कडेचे धागे आणि चिंचोके काढून घ्यावेत. यासाठी जरा नवी चिंच वापरावी अगदी काळी जुनी चिंच नको. मग त्यात चवीप्रमाणे गुळ, मीठ, तिखट आणि आवडत असल्यास जिरेपूड टाकावी. हे सगळं चांगलं एक्कजीव होईपर्यन्त कुटून घ्यावं. मिक्सरवर फिरवलं तरी चालेल, मग कदाचित १-२ चमचे पाणी टाकावं लागेल. तयार मिश्रण चाखून पहावं. काही कमी-जास्त वाटल्यास बदल करावा. मग हे मिश्रण काड्यांभोवती चिकटवावं. आता या काड्या (गराच्या बाजूने) मीठ, पीठीसाखरेच्या मिश्रणात घोळवाव्या. आता यानां जरा ऊन दाखवावं.
मस्त उन्हाळ्याच्या दुपारी घरात गारेगार सावलीत बसून पट, सापशिडी किंवा ल्युडो खेळताना याचा आस्वाद घ्यावा.
साहित्याने मला काय दिले ? या प्रश्नाचे हे उत्तर
लहानपणी माठात साठवून ठेवलेली चिंच आम्ही बरेचदा पळवली आहे. मिठ लावलेले ते चिंचेचे गोळे आजही आठवणीत ताजे आहेत. पण जिगळ्या हा प्रकार दुर्देवाने खूप उशिरा कळला.
कॉलेज मधे जेव्हा लंपन भेटला, तेव्हा त्याने या जिगळ्या त्याच्या बालपणासोबत माझ्या मनात कागदी होडी सारख्या सोडून दिल्या. किती तरी वर्ष मी कल्पनेतच त्यांचा आस्वाद घेत होते.
पण आता मुलाच्या निमित्ताने पुन्हा लहान होऊन जेव्हा उन्हाळ्याची सुट्टी अनुभवते आहे तेव्हा या जिगळ्या बनवल्या शिवाय राहवलं नाही.
प्रकाश नारायण संताचे मनापासून आभार.
अम्म्म्म्म्म.. मस्त आंबट-गोड
अम्म्म्म्म्म.. मस्त आंबट-गोड चव आली जीभेवर
खरंच बालपण आठवलं. अजूनही मी
खरंच बालपण आठवलं.
अजूनही मी असले प्रकार खातो. आमच्याकडे गोरखचिंचेचा गर वापरून केलेला असतो तो.
मस्त!! अधिक टीपाही आवडल्या.
मस्त!!
अधिक टीपाही आवडल्या.
आता ह्या जिगळ्या गोळ्यांच्या स्वरुपात प्लास्टीक कागदात गुंडाळून छान नटवून वगैरे दुकानात मिळतात. पण त्या काड्या चोखत खायची गंमतच वेगळी!
स्लर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्
स्लर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्प!
मस्त
मस्त
यात एखाद पाकळी लसूण घालायचं
यात एखाद पाकळी लसूण घालायचं
स्सस्स! तोंपासु!
स्सस्स! तोंपासु!
काड्या कसल्या?
काड्या कसल्या?
किती मस्त आहे हे...तोपांसु
किती मस्त आहे हे...तोपांसु
भयंकर पाणि सुटलं तोंडाला..
भयंकर पाणि सुटलं तोंडाला..
खरच तोंपासु
खरच तोंपासु
मस्त पाककृती. टिपा पण
मस्त पाककृती. टिपा पण आवडल्या.
मस्त कल्पना. ऑफिशियली काड्या
मस्त कल्पना. ऑफिशियली काड्या करण्याची सोय.
साहित्याने मला काय दिले ? >>>> पाककृतीच्या संदर्भाने वाचल्याने डोकं काही काळ भंजाळलं.
मस्त
मस्त