जिगळया

Submitted by _प्राची_ on 3 April, 2012 - 09:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चिंच
गुळ
मीठ
तांबडं तिखट
जिरेपूड (ऐच्छिक)
काड्या

क्रमवार पाककृती: 

चिंच निवडून घ्यावी. म्हणजे कडेचे धागे आणि चिंचोके काढून घ्यावेत. यासाठी जरा नवी चिंच वापरावी अगदी काळी जुनी चिंच नको. मग त्यात चवीप्रमाणे गुळ, मीठ, तिखट आणि आवडत असल्यास जिरेपूड टाकावी. हे सगळं चांगलं एक्कजीव होईपर्यन्त कुटून घ्यावं. मिक्सरवर फिरवलं तरी चालेल, मग कदाचित १-२ चमचे पाणी टाकावं लागेल. तयार मिश्रण चाखून पहावं. काही कमी-जास्त वाटल्यास बदल करावा. मग हे मिश्रण काड्यांभोवती चिकटवावं. आता या काड्या (गराच्या बाजूने) मीठ, पीठीसाखरेच्या मिश्रणात घोळवाव्या. आता यानां जरा ऊन दाखवावं.
मस्त उन्हाळ्याच्या दुपारी घरात गारेगार सावलीत बसून पट, सापशिडी किंवा ल्युडो खेळताना याचा आस्वाद घ्यावा.
1.JPG2.JPG

वाढणी/प्रमाण: 
एका वेळी एकच
अधिक टिपा: 

साहित्याने मला काय दिले ? या प्रश्नाचे हे उत्तर Happy
लहानपणी माठात साठवून ठेवलेली चिंच आम्ही बरेचदा पळवली आहे. मिठ लावलेले ते चिंचेचे गोळे आजही आठवणीत ताजे आहेत. पण जिगळ्या हा प्रकार दुर्देवाने खूप उशिरा कळला.
कॉलेज मधे जेव्हा लंपन भेटला, तेव्हा त्याने या जिगळ्या त्याच्या बालपणासोबत माझ्या मनात कागदी होडी सारख्या सोडून दिल्या. किती तरी वर्ष मी कल्पनेतच त्यांचा आस्वाद घेत होते.
पण आता मुलाच्या निमित्ताने पुन्हा लहान होऊन जेव्हा उन्हाळ्याची सुट्टी अनुभवते आहे तेव्हा या जिगळ्या बनवल्या शिवाय राहवलं नाही.
प्रकाश नारायण संताचे मनापासून आभार.

माहितीचा स्रोत: 
लंपन
आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!!
अधिक टीपाही आवडल्या. Happy

आता ह्या जिगळ्या गोळ्यांच्या स्वरुपात प्लास्टीक कागदात गुंडाळून छान नटवून वगैरे दुकानात मिळतात. पण त्या काड्या चोखत खायची गंमतच वेगळी!

मस्त कल्पना. ऑफिशियली काड्या करण्याची सोय. Proud

साहित्याने मला काय दिले ? >>>> पाककृतीच्या संदर्भाने वाचल्याने डोकं काही काळ भंजाळलं. Proud