४ वाट्या नारळाचं दूध.
१ वाटी कैरीचा कीस (आंबटपणाचा अंदाज यावा म्हणून चाखून बघावी.)
४-६ तिखट हिरव्या मिरच्या
२ पेरं आलं
५-६ लसूणपाकळ्या
१ लहान चमचा जिरं
१ वाटी चणाडाळ
१ मोठा चमचा धणेपूड
१ मोठा चमचा काश्मिरी तिखट
१ चमचा तिखट
१ लहान चमचा हळद
मूठभर कोथिंबीर
चवीनुसार मीठ
चवीनुसार साखर
चमचाभर साजुक तूप
६-७ कढिलिंबाची पानं
तळायला तेल (किंवा गोळे उकडायला / वाफवायला पाणी.)
फळं:
चणाडाळ ४-५ तास भिजत घालावी
भिजलेली डाळ, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, धणेपूड, मीठ, हळद, तिखट एकत्र करून शक्य तितकं कमी पाणी घालून बारीक वाटून घ्यावी.
या डाळीचे सुपारीएवढे गोळे करून तेलात खरपूस तळून घ्यावे. (गोळे फार घट्टं वळू नयेत. वाटलेली डाळ नीट फेटून घेतली आणि अलगदपणे गोळे वळले तर दडस होणार नाहीत.)
तळण टाळायचं तर हे गोळे चाळणीवर १०-१५ मिनिटं वाफवून किंवा उकळत्या पाण्यात शिजवून घेता येतील.
आमटी:
नारळाचं दूध आणि सालं काढून किसलेली कैरी एकत्र करून बारीक वाटून घ्यावं.
कढत तुपात जिरं तडतडवून गोडलिंबाची पानं घालावी.
वाटण फोडणीत ओतून उकळी आणावी. चवीनुसार मीठ (आंबत वाटल्यास साखर) घालून उकळू द्यावं. साराइतपत पातळ करायला थोडं आधणाचं पाणी घालावं.
गोळे आमटीत सोडून आणखी एक उकळी आणावी.
गरम भाताशी ओरपावं.
आमटीतले गोळे अत्यंत झणझणीत होतील. तेव्हा भातावर घेताना पोटाच्या ऐपतीनुसार गोळे फोडून आमटीत कुस्करावे.
आमटीत जितके गोळे कुस्कराल तितकी ती तिखट होत जाणार. जपून खावी. कर्माची फळं...
झणझणीत एकदम. मला कढी विशेष
झणझणीत एकदम. मला कढी विशेष आवडत नाही ( कढीतले गोळे आवडतात ) पण नारळाचे दूध आणि असे वडे म्हणजे काय बिशाद आहे न आवडायची. मस्तच पाककृती
कर्माची फळं >>>>
कर्माची फळं >>>>
इतकी छान रेसिपी, पण नाव का हे
इतकी छान रेसिपी, पण नाव का हे असे? नाव नाही आवडले.
वॉव! एकदम वेगळाच प्रकार!
वॉव! एकदम वेगळाच प्रकार!
हे भर्रीच आहे मला कढी गोळे
हे भर्रीच आहे

मला कढी गोळे आवडतात आणि आता ह्या प्रकारेपण करुन बघणार
इंटरेस्टिंग रेसिपी नक्कीच
इंटरेस्टिंग रेसिपी
नक्कीच करणार ही कर्माची फळं 
मृण्वाक्का, मस्त झणझणीत आहे
मृण्वाक्का,
मस्त झणझणीत आहे हो रेसेपी. या वीकेंडला करते.
मस्त वाटतेय. फोटो का नाही ग
मस्त वाटतेय. फोटो का नाही ग बरोबर?
गोडलिंबाची पानं म्हणजेच कढिपत्ता का?
छान. खा आता कर्माची फळं
छान. खा आता कर्माची फळं
सही!! मोसमात करून बघण्यात
सही!!
मोसमात करून बघण्यात येईल.
भारीये की. आता कैर्या आणून
भारीये की. आता कैर्या आणून करूनच बघावी.
नाव भयंकर आवडलं! मृण टच आहे
नाव भयंकर आवडलं!
मृण टच आहे त्याला! 
मस्त वेगळीच पाककृती आहे. फोटो टाका जमेल तेव्हा.
झणझणीत प्रकार दिसतोय. (मला
झणझणीत प्रकार दिसतोय.
(मला खायला, तिखट पावपटच घ्यावे लागेल.)
मस्त
मस्त
कुणी घरी जेवायला आलं असेल तर
कुणी घरी जेवायला आलं असेल तर मेनू काय या प्रश्नाला "कर्माची फळं" हे नाव भारीये.
कढीगोळेऐवजी कधीतरी करून बघता येइल.
मस्त वेगळीच रेसिपी आहे. नाव
मस्त वेगळीच रेसिपी आहे.
नाव >>
वेगळी रेसिपी आहे, योग्य
वेगळी रेसिपी आहे, योग्य मुहुर्त आला की करुन बघणेत येइल
नाव भारी आहे
फोटो????
फोटो????
भारी रेसिपी आणि भारी नाव! >>
भारी रेसिपी आणि भारी नाव!
>> पोटाच्या ऐपतीनुसार

छान.
छान.
छान रेसीपी! @ सायो- हो.
छान रेसीपी!
@ सायो- हो. गोडलिंब = कढिपत्ता.
फोटो पाहिजे
फोटो पाहिजे
अप्रतिम नाव फोटो पाहिजे
अप्रतिम नाव
फोटो पाहिजे
नाव वाचून वाटलं की हे पण
नाव वाचून वाटलं की हे पण पाकृचे विडंबन आहे की काय
कर्माची फळं काय ग? रेसिपी
कर्माची फळं काय ग?
रेसिपी बाकी चमचमित दिसत्ये. कैर्या आल्या की करणार.
या रेसिपीचा जाहीर
या रेसिपीचा जाहीर निषेध्द..........
मस्त आणि वेगळी रेसिपी.. नाव
मस्त आणि वेगळी रेसिपी.. नाव पण आगळंवेगळं
कस सुचलं हे नाव??
धन्यवाद! फोटो पुढल्या
धन्यवाद!
फोटो पुढल्या आठवड्यात टाकते.
>>कस सुचलं हे नाव??

आवो, आत्ता कसं सांगायचं यान्ला?
आवो, आत्ता कसं सांगायचं
आवो, आत्ता कसं सांगायचं यान्ला?>>>>
ट्रायल बाय फायर, दुसरं काय?
कर्माची फळं.. मस्तय रेसिपी!
कर्माची फळं..
मस्तय रेसिपी!
Pages