सुटे शेर

Submitted by अनंत ढवळे on 1 April, 2012 - 05:17

काही जुने सुटे शेर ..

फाटकी पायात चप्पल जोवरी
तापते रस्त्यात डांबर तोवरच

***
सांगते निर्व्याज हे हसणे तुझे
आपले अस्तित्व नाही बेगडी

***
कसेल त्याची जमीन बाबा
रोड तुझ्या बापाचा नाही !

****
जन्माचा डोंब उठत जाणारा
इच्छांची भूक सतत जळणारी

*******

जग बहुधा पालटून गेले
मी रस्ता चुकलेला नाही.....

अनंत ढवळे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

व्वा व्वा!!

सर्वच शेर आवडले.

कसेल त्याची जमीन बाबा
रोड तुझ्या बापाचा नाही !>>>

हा अजून आधिक समजून घेतो आहे.

अजून असतील तर टाका अनंतजी.

शेर आवडले पण

मला अर्ध्या हायकूंसारखे वाटताहेत.

जसे (जोडकाम माझे)

गुलमोहोराचा रंग जर्द केशरी
जन्माचा डोंब उठत जाणारा
इच्छांची भूक सतत जळणारी

फुलला प्राजक्त एक पाकळी सुटी
सांगते निर्व्याज हे हसणे तुझे
आपले अस्तित्व नाही बेगडी

शेरांवर हायकू सदृष जोडकाम केल्याने आधीच क्षमा मागतो!
(हे हायकू नाहीत याची कल्पना आहे!)

जब्बरदस्त शेर

काही काही पुन्हा ऐकल्याने नवाच आनंद मिळाला

सांगते निर्व्याज हे हसणे तुझे
आपले अस्तित्व नाही बेगडी>>

अप्रतिम

***
कसेल त्याची जमीन बाबा
रोड तुझ्या बापाचा नाही !>>

किती सहज आणि खोल

****
जन्माचा डोंब उठत जाणारा
इच्छांची भूक सतत जळणारी>>>>

जन्माचा डोंब - व्वा

*******

जग बहुधा पालटून गेले
मी रस्ता चुकलेला नाही.....>>

चीअर्स, या शेराला

विजय पाटलांशी सहमत, अजून येऊद्यात

धन्यवाद या मेजवानीबद्दल

आपले शेर वाचणे हा एक आनंददायी अनुभव असतो.
मनःपूर्वक धन्यवाद.