छोटे बटाटे उकडलेले साधारण २०-२५
कांदे ४
लसुण ४-५ पाकळ्या
दालचीनी २-३ मोठे तुकडे
लवंग २-३
काळी मीरी ६-७, तमाल पत्र
गरम मसाला २ चमचे
तेल , तिखट, मीठ,
१. बटाटे उकडुन साले काढावेत व त्यांना टोचे मारुन घ्यावेत
२. हे बटाटे तेलात सोनेरी होइ पर्यंत तळुन बाजुला ठेवावेत, तळल्यावर टीश्यु पेपर वर काढावेत म्हणजे तेल नीथळुन जाईल.
३. आता कांदे चीरुन ( मोठ्या फोडी) मीक्सर मधुन वाटुन घ्यावेत
४. एका कढई मध्ये तेल तापवुन, त्यात मीरी, दाल्चीनी, लवंग तमाल पत्र, घालुन चांगले परतुन घ्यावे ( आच मंद ठेवावी)
५. आता लसुण पाकळ्या ठेचुन ह्यात घालाव्यात
६. वाटलेला कांदा ह्यात घालुन चांगला परतुन घ्यावा.
७. कांदा सोनेरी रंगावर छान तेल सुटे पर्यंत परतावा.
८. आता ह्यात थोडे पाणी घालावे. जरा उकळु द्यावे.
९. आता तळलेल्या बटाट्यांना ह्यात सोडावे
१०. आता गरम मसाला, मीठ, तिखट घालावे
११. मंद आचे वर मस्त उकळी येवु द्यावी
१२. पोळी किंवा परोठ्या बरोबर मटकवावा.
बटाटे उकडुन टोचुन मग तळले की खमंग लागतात
ह्याचा छान घमघमाट सुटतो.
जरा पळीवाढी करावा,
मस्त वाटतेय! करुन बघते. फोटु
मस्त वाटतेय! करुन बघते.
फोटु टाक ना!
छान रस्सा. (हा मसाला वाटायचा
छान रस्सा.
(हा मसाला वाटायचा नाही का ?)
वाटलेला कांदा ह्यात घालुन
वाटलेला कांदा ह्यात घालुन चांगला परतुन घ्यावा.
. कांदा सोनेरी रंगावर छान तेल सुटे पर्यंत परतावा.
. आता तळलेल्या बटाट्यांना ह्यात सोडावे>>
नुसते लिखित वर्णन वाचून भल्या सकाळी ताव मारावासा वाटतोय
शुभेच्छा
चविष्ट वाटतोय! फोटो???
चविष्ट वाटतोय!
फोटो???
थोडा बोंडेचा मसाला घातला तर
थोडा बोंडेचा मसाला घातला तर चालेल का?
मस्त मला तर हा झणझणीत करुन
मस्त मला तर हा झणझणीत करुन तांदळाच्या भाकरीसोबत खायला आवडेन
(हा मसाला वाटायचा नाही का
(हा मसाला वाटायचा नाही का ?)>>>
नाही दिनेशदा... हा खडा मसालाच वापरायचा.... तेलात परतल्या मुळे त्याचा वेग वेगळा स्वाद लागतो. माझे आजोबा ( आई चे वडिल ) फारच फर्मास करायचे. पण खाताना जवळ डोळे पुसायला रुमाल घेवुन बसायला लागायचे. मी लहान पणी ह्या रश्श्याला "आजोबांचा रस्साच" म्हणायचे.
रविवार दुपार... हा रस्सा.... गरम गरम पोळ्या.... नुसत्या कल्पनेने शाळेतले दिवस आठवले.....
आम्हा शाकाहारी लोकांची हीच एक मेजवानी....
तोंपासू एकदम...मला झणझणीत
तोंपासू एकदम...मला झणझणीत बनवून खायला आवडेल...
आजच होऊन जाऊ दे मीरा.....आज
आजच होऊन जाऊ दे मीरा.....आज रविवारंच आहे, आज येऊ का तुझ्याकडे मस्तपैकी ताव मारायला? मुलगी नि मी येतो, कारण वर्षाला आज ऑफिस असतं. बोल.
मस्त! अगदी तोंडाला पाणी सुटले
मस्त! अगदी तोंडाला पाणी सुटले वाचून झणझणीत खायची इच्छा झालिये!
मस्त!
मस्त!