अपॉईंटमेंट घेतल्याशिवाय नाही...

Submitted by ऋयाम on 1 March, 2012 - 23:38
  1. एकाच शहरात राहूनही नातेवाईकांना भेटणं कमी होणं.
  2. नोकरी करू लागल्यावर शाळेतल्या-कॉलेजमधल्या जुन्या मित्रांना भेटणं कमी होणं.
  3. मित्र-मैत्रिणींची लग्न झाल्यानंतर त्यांच्याशी भेटी न होणं.

असे प्रकार हल्ली बरेचदा होताना दिसतात. "भेटूया परत!" म्हणत निरोप घेतला, तरी परत भेटणं महिनोन महिने होत नाही, दिवस निघून जातात.

हल्ली फोन न करता कोणी कोणाकडे फारसं जात नाही. अचानक असं कोणी घरी आलं, तर आश्चर्य वाटतं. पण मग दर वेळेस सोय-गैरसोय पाहिली, त्यामुळेच भेटी होणं कमी होतंय का? लोकांना डिस्टर्ब करायला नको म्हणून एकमेकांकडे जाणं इतकं कमी होणं ही चांगली गोष्ट असावी असं वाटत नाही.

पूर्वी अचानक येऊन उभ्या ठाकणार्‍या माणसांमुळे कधी आनंद तर कधी गैरसोयही होत असे. अर्थात ते येणार्‍या माणसावरही अवलंबून, पण त्यामुळे ही नाती टिकून होती असं वाटतं. 'अपॉईंटमेंट' प्रकार 'अति' केल्याने त्याचा ह्या नात्यांवर परिणाम होतो असं तुम्हाला वाटतं का?? आजकाल आपण गैरसोयीचा 'अति' विचार करतो असं वाटतं का?

* ह्यासाठी कोतबो गट बरोबर नाही बहुतेक. पण योग्य गट न शोधू शकल्याने इथे पोस्ट केलं आहे... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋयाम, यात शहरीकरणाचा मुद्दा खरेच महत्वाचा आहे.
हे बदल गेल्या ६० वर्षातलेच म्हणजे ज्या काळात शहरात ब्लॉक सिस्टीम सुरु झाली
त्याकाळापासून आले.
त्यापुर्वी निदान विहीर, स्वच्छतागृहे सार्वजनिक असायची. इच्छा असो वा नसो, बिल्डींगमधल्या इतर लोकांशी संपर्क यायचाच. समोर आल्यावर विचारपूस व्हायची.

ब्लॉक सिस्टीमम्धे दरवाजे, पडदे, घरातच स्वच्छतागृहे आली आणि मग खाजगीपणाची
कल्पना रुचली. अजूनही आजोळी दरवाजा कधी बंद नसतो, तर मुंबईत कधीच उघडा
नसतो.
मुंबईत हि प्रथा, दादरच्या हिंदु कॉलनी (मलबार हिलला तर स्वतंत्र बंगलेच होते) सुरु झाली. शेजारी कोण राहतय हे आम्हाला माहित सुद्धा नसते, असे अभिमानाने
सांगितले जात असे.
त्याकाळात आतासारखे सार्वजनिक उत्सवही नसत. मुद्दाम आपल्याच ग्रुपमधल्या
लोकांशी संपर्क वाढवण्यासाठी क्लब्ज, जिमखाना वगैरे सुरु झाले. आणि तिथून
या खाजगीपणाच्या कल्पना रुजल्या. थोडासा ब्रिटीशांचा पण प्रभाव होताच.
मला वाटतं, मी तूझ्या प्रश्नाला अनुसरून लिहिलेय....

आजकाल आपण गैरसोयीचा 'अति' विचार करतो असं वाटतं का?>> नाही!

एकाच शहरात राहूनही नातेवाईकांना भेटणं कमी होणं.>> नाती बदलतात!
नोकरी करू लागल्यावर शाळेतल्या-कॉलेजमधल्या जुन्या मित्रांना भेटणं कमी होणं.>> प्रायॉरिटी बदलते.
मित्र-मैत्रिणींची लग्न झाल्यानंतर त्यांच्याशी भेटी न होणं.>> तेच पुन्हा प्रायॉरिटी बदलते.

माझ्या एकदम जिगरी दोस्ताचं लग्न झालं मध्यंतरी आणि आम्ही कधीही त्याच्या घरी जाणारे... वेळी अवेळी चहाचा आग्रह करणारे... कितीही चहा पिणारे मित्र आता मात्र फोन करून जातो. बाहेरून चहा घेऊन जातो. [एक उदा.] ह्यात इतरांना काय वाटेल ह्याचा विचार करणे गरजेचे नाही का? एकदम न कळवता गेलो तर समोरच्या व्यक्तीला काय वाटेल ह्याचा विचार आपण मित्राचे मित्र म्हणून केलाच पाहिजे.

'अपॉईंटमेंट' प्रकार 'अति' केल्याने त्याचा ह्या नात्यांवर परिणाम होतो असं तुम्हाला वाटतं का??>> नाही! अश्या प्रकारांनी नात्यांवर परिणाम होत असतील तर कठिण आहे.

शहरीकरणाचा मुद्दा काय आहे त्यात? मला समजत नाही!
यात्रींचे मुद्दे / उदाहरणं वेगळी आहेत त्याचा इथं काही संबंध आहे असं मला वाटत नाही! [ वैम.]

नताशा +१

स्वतःला थोडी असुविधा झाली, तरीही नात्यांसाठी ती स्विकारावी का?>>> well yes! why not? it depends on your priority isn't it?

अहो ठिक आहे. असेल बीझी ती.. इतकं काय मनावर घ्यायचे तीने अपाँईटमेंट घ्या असे सांगितले म्हणून.

आता काळाप्रमाणे प्रेमाची वाख्या बदलली असेल .. तीची.. हो. बरं आणखी काय म्हणाली कंगना?

इतके कोतबा काय यायचे लिहून.. नाही मायबोलीवर लेख पाडा हो... आम्हाला दु:ख नाही.
(हलकेच घ्या). Proud

>> "अति" ची व्याख्या बदलणार नं माणसाप्रमाणे? कुणाला "फोन करुनच जावं लागतं बॉ त्यांच्याकडे" हे अति वाटेल तर कुणाला त्यात काहीच विशेष नाही वाटणार. <<<
>> इथे अनेकांचा "गावाकडे जास्त आपलेपणा जाणवतो" टाइप सुर आहे त्याच्याशी असहमत. ज्याच्याकडे जातोय त्याच्या सोयीचा विचार करणे यात आपलेपणाचा अभाव नसून त्याच्या वेळेचा/त्या वेळेचं काय करायचं हे ठरवण्याच्या त्याच्या हक्काचा आदर करणे आहे. त्यातून जास्त आपलेपणा दिसतो असं मला वाटतं.<<<
+ १००००००००००००
ऋयाम, तू फोन करून जाण्याला मत दिले आहेस हे वाचले पण मला वरचे मुद्दे पटले म्हणून सहमती दर्शवली आहे. तुझ्यासाठी नव्हे. Happy

>>> 'अपॉईंटमेंट' प्रकार 'अति' केल्याने त्याचा ह्या नात्यांवर परिणाम होतो असं तुम्हाला वाटतं का?? आजकाल आपण गैरसोयीचा 'अति' विचार करतो असं वाटतं का? <<<
नाही वाटत असे. वरती आल्याप्रमाणे 'अति' ची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते हे आहेच. पण अपॉइंटमेंट किंवा आधी ठरवून याच्यामुळे नात्यांवर परिणाम होणार असेल तर ते नातं किती खरं आहे आणि किती औपचारिक हा प्रश्न मनात आल्याशिवाय रहात नाही.

एकाच शहरात राहूनही नातेवाईकांना भेटणं कमी होणं. <<< ठिके की. सारखे पायात पाय कशाला हवेत? एकमेकांच्या गरजेच्या आणि आनंदाच्या वेळेला एकत्र येऊ शकत असू तर खंत करण्यात काय हशील? शेवटी नातेवाइकांची निवड आपण करत नाही ते मिळतात आप्ल्याला. त्यातल्या प्रत्येकाशी 'हार्ट टू हार्ट' नातं जुळत नाही आपलं. ज्यांच्याशी जुळतं त्यांच्याशी आपण आणि आपल्याशी ते व्यवस्थित संपर्क ठेवून असतात.

>>> नोकरी करू लागल्यावर शाळेतल्या-कॉलेजमधल्या जुन्या मित्रांना भेटणं कमी होणं. मित्र-मैत्रिणींची लग्न झाल्यानंतर त्यांच्याशी भेटी न होणं. <<<
आयुष्यातल्या प्रत्येक महत्वाच्या वळणानंतर आधीचे मित्रमैत्रिणी गळणे आणि नवीन बनणे हे घडतच असतं. एकेकाळी घट्ट मैत्री असणार्‍यांचे करीअरचे रस्ते आणि मग त्या अनुषंगाने सगळं जगच बदलून जातं. मग मैत्री आहे म्हणून भेटायचं ठरवलं तरी भेटल्यावरही तुटलेपण जाणवतच रहातं. भेटींमधे निव्वळ जुन्या मैत्रीचं श्राद्ध घालतोय की काय असं व्हायला लागतं. मग कशाला? त्यापेक्षा एकदम ४-५ वर्षांनी भेटावं. मधल्या काळात एकमेकांच्या आयुष्यात काय नाट्यमय किंवा असंही जे काय घडलं असेल त्याची देवाणघेवाण करावी. चहा प्यावा. घरी जावे. पुन्हा ४-५ वर्षांनी भेटावे. यात जास्त मजा असते. Happy

थोडक्यात काय की मित्र असोत वा नातेवाइक मनातून 'मैत्र' जुळलं आणि टिकलं तर औपचारिकता रहात नाही. गरज उरत नाही. मग तिथे अचानक घरी गेल्यावर कुलूप पहायला लागल्याचेही वाईट वाटत नाही किंवा अचानक आलेल्या मित्राचे येणे कुणालाच ऑकवर्ड करत नाही.
अर्थात या सगळ्याला एक मर्यादा येतेच. अनौपचारिकतेची पण प्रत्येकाची वेगळी सीमारेषा असते आणि ती ठेवावी. गंमत रहाते.

तस्मात बा ऋयामा.. जे आपल्या आयुष्यापासून दूर गेले त्यांच्याशी तेवढाच सहवास होता आणि त्यांनी पुढच्या नात्यांना जागा करून दिली असे समजावे व मागेच गुंतून न रहाता पुढे पहावे.

याहून शिरियस नाही होता येणार.. Proud

इतपतच शिरेस होणं हवं आहे Happy

समजलं... फायनली जनमत साधारणपणे असं आहे तर... :: ---

काही रहातील, काहींबरोबर संपर्क तुटेल. ज्यांच्याशी संपर्क रहावा वाटतो, त्यांच्यासाठी आवर्जून प्रयत्न करायलाच हवा. गैरसोय झाली तरी चालेल. इतरांशी जाणूनबुजून संपर्क करण्यात फार काही अर्थ नाही.
-- बरोबरच .. ( फोन बद्दल परत लिहीत नाही Happy )

बाकी.. हे सगळं लिहीण्याची काही कारणं आहेत.
काही काळापूर्वी एका जवळच्या नातेवाईकाचा अकाली मृत्यु झाला (कॅन्सर) . काही वर्षांपूर्वीपर्यंत त्या व्यक्तीशी नियमित संपर्क असे. पण नोकरी वगैरे मुळे संपर्क कमी होत गेला. भेटी नाहीतच. आणि त्यांचे अकाली निधन. पूर्वी कधी वेळ असला, तरी आत्ता थोडं कामही आहे तेव्हा भेटूया नंतर , पुढच्या खेपेला असं बोल्णं होई.. तुम्हीही बिझी आम्हीही बिझी. पण आता कुठे शक्य होणारे??

त्याच्या काही आधी दुसरे एक नातेवाईक काही कामासाठी आमच्या गावाला आले होते. काम झालं, आणि रात्री 'येऊन भेटून जातो' म्हणत फोन करून आमच्या घरी आले. येताना मित्राच्या गाडीवरून आले असल्याने भेटल्यावर मग रात्री मित्राकडे जाऊन, सकाळी त्याच्याबरोबर आपल्या नोकरीच्या ठिकाणी(गुजरात) जाणार होते. आम्ही फार जास्त आग्रह केल्याने ते थांबले. मग घरच्यांबरोबरच्या जुन्या गप्पा वगैरे करत रात्री बराच उशीर झाला. सकाळी ते मित्राकडे गेले.

मित्र एकटा राहतो, म्हणून त्याला फारशी गैरसोय होणार नाही. पण तेच आमच्या घरी तेव्हा घरातले इतर लोक असल्याने आमची गैरसोय वगैरे विचार त्यंनी केला असावा असं मला वाटतं. हा विचार, आमच्या घरच्या लोकांच्या आग्रहामुळे आणि ते नातेवाईकही चांगले Happy असल्यामुळे मोडीत निघाला. सात आठ वर्षांनी ते असे निवांत भेटले.

या दोन घटनांमुळे मनात हे विचार आले..

शहरातल्या प्रवासाची अंतरं (आणि खर्च) पाहता दुसर्‍याकडं जाताना किंवा आपल्याकडं येताना फोनवून गेलं तर बरं. दाराला कुलुप पाहून परतायचे दिवस संपवलेले बरे.;) कधीकधी आपण अगदी घरावजळच दोन मिनिटासाठी गेलो असताना न कळवता आलेल्या लोकांना परत जावं लागू शकतं. सारखा शेजारी निरोप तरी काय ठेवणार??
माझ्या मैत्रिणींची लग्नं होऊन जवळजवळ सगळ्याजणी दुसर्‍या गावांना गेल्या आहेत त्यामुळे क्वचितच भेट होते. त्याबद्दल तक्रार करून उपयोग नाही. वेळ काढून एकमेकिंकडे जाणं फारसं शक्य दिसत नाही.
पूर्वी माणसं न कळवता येत असत कारण फोन इतक्या प्रमाणात नव्हते. परगावाहून येणारेही अगदी अमूक एका तारखेलाच येऊ असे न सांगता दोन ते तीन दिवस सांगायचे. त्यापैकी कोणत्यातरी दिवशी यायचे कारण खेड्यातील गाड्यांची उपलब्धता आणि पाऊसपाण्यामुळे रस्ते बंद असणं वगैरे.
पुण्यात मध्यवर्ती मध्यवर्ती म्हणत आमच्या घरी तर कायमच पाहुणे असत. त्यातून आजीआजोबा अनेक वर्षे अंथरूणाला खिळलेले असल्याने आम्ही बाहेर जायची शक्यता फारशी नसायचीच. कोणीतरी घरी नक्की असायचच. नातेवाईकही सतत असत. आजीआजोबा गेल्यानंतरही नातेवाईकांची सवय जाण्यासाठी दहा एक वर्षे लागली. त्यावेळी तर फोन होतेच. अगदी कधितरी कुठलं प्रदर्शन बघायला, सिनेमाला (किंवा अगदी पुण्यातच राहणार्‍यांकडे श्रावणातली सवाष्ण वगैरे) म्हणून गेल्यावरही दारावर, शेजार्‍या़कडे चिठ्ठ्या असायच्या, येऊन गेल्याच्या. मी कॉलेजला असताना होस्टेलहून सुट्टीत घरी आल्यावर आईबाबांबरोबर वेळ घालवायला मिळत नसे. कोणीतरी सारखे असे. हे माझे लग्न झाल्यावरही चालू राहिले. आईबाबांशी गप्पा मारायला न मिळाल्याचं अजूनही वाटत असतं. त्यापेक्षा समोरच्याला कळवून, त्याची सोय्/गैरसोय बघून गेलं तर बरं असं वाटत आहे.

भारतात तरी मी टाइम ची संकल्पनाच नाही. कोणीही ,अगदी शेजारी सुद्धा, तुमच्या वैयक्तिक वेळावर आक्रमण करत असतात. हे मला पटत नाही. काम, लोकांना भेटणे इत्यादी करून मी घरी आल्यावर मला कोणी उगीच्च डिस्टर्ब केले तर राग येतो. रविवारी दुपारी दोन ला बेल मारणारे लोक, फोन करणारे नातेवाइक पटत नाही. जी कामे/ बोलणे फोन वर होऊ शकते ते तिथेच उरकावे. अगदी गरजच असेल तर वैयक्तिक रीत्या भेटावे. शिवाय कोणी अचानक घरी आले व मी त्यांच्यासाठी स्वयंपाक इ. करावा अशी त्यांची अपेक्षा असेल तर तेही पटत नाही. केले सर्व २५ वरशे. आता माय टाइम इज माय टाइम. Happy

काही काळापूर्वी एका जवळच्या नातेवाईकाचा अकाली मृत्यु झाला (कॅन्सर) . काही वर्षांपूर्वीपर्यंत त्या व्यक्तीशी नियमित संपर्क असे. पण नोकरी वगैरे मुळे संपर्क कमी होत गेला. भेटी नाहीतच. आणि त्यांचे अकाली निधन <<<<
दुर्दैवी घटना तर खरेच पण मला सांग ते होते तेव्हा त्यांना भेटण्यासाठी तू प्रयत्न केलास का? तेवढी मानसिक, भावनिक गरज तुला जाणवली का? ओढ होती का? प्रयत्न करूनही जमले नसेल तर प्रयत्न कमी पडले किंवा ओढ कमी पडली. कुणाचाही मृत्यू संवेदनशील माणसाला हळवं बनवतो या न्यायाने तुला कदाचित न भेटल्याबद्दल गिल्टी वाटतेय. तटस्थपणे विचार केलास तर लक्षात येईल की त्या नात्याचे भागधेय तेवढेच होते. आणि ही वस्तुस्थिती स्वीकारल्याने नात्याला कमीपणा येत नाही.

नमस्कार, मी पण सांगलीची. मायबोलीवर भेटुन आंनद झाला. खरंच ! आजच्या गतीमान काळात एकमेकांची भेट होणे शक्य नाही.पण त्यातुन ही आपण फोन अथवा मेल द्वारे भेटु शकतो.

त्या नात्याचे भागधेय तेवढेच होते>>> अचूक
प्रत्येक नाते स्वतःचे नशिब घेउनच जन्माला येते, वाढवू म्हणता वाढत नाही आणि तोडू म्हणता तुटत नाही, अपॉईंट्मेट घेऊन भेटा अथवा तसेच भेटा फरक पडत नाही!
कोणी मित्र मधेच फोन करतो, आधला मधला काही धागा उरलेला नसतो, मग संवाद नीट होत नाही आणि मित्र म्हणतो, 'तू बदललास' - मला वाटतं याला काही अर्थ नाही. मी बदलणारच की! नाही बदलला तर माणूस कसला?
असले वैताग टाळायला तरी अपॉईंट्मेट बेस्ट!

आमचं सोमण कुटुंब या 'अपॉइंटमेंट' वगैरे प्रकाराला अगदी म्हणजे अगदीच अपवाद आहे. आमच्याकडे रात्री १२ वाजता पण कोणीही टपकू शकतो विदाउट इन्टिमेशन, आणि कितीही वेळ, कितीही दिवस. त्यावर आमच्या घरातल्या लोकांना सुद्धा आक्षेप नसतो उलट झोपलेले सगळे जागे होऊन त्या अवेळी टपकलेल्याशी गप्पा मारत बसू शकतात पुढे २ तास शेवटी तोच कंटाळून म्हणेल की मला आता झोप आली Proud आमचे लोक उठून कोणाकडे जात नाहीत मात्र फोनवर प्रत्येक आप्त-स्वकियाशी संपर्कात असतात. मुळात एकत्र कुटुंब असल्यामुळे घरातलीच १५ माणसं..... त्यामुळे सगळ्यांनी कोणाकडे उठून जाणं हे त्या माणसाला वेडं करण्यासारखं आहे. आओ जाओ घर कभी भी तुम्हारा असं ब्रीदवाक्य असणार्‍या आमच्या घरात अचानक आलेल्या माणसाला चहा-चिवडा (तोही न चडफडता) आणि अगदी कुठल्याही वेळी हसतमुखाने मिळेल. Happy

त्यामुळे निदान आमच्या घरापुरतं बोलायचं झालं तर, ऋयामा, अपॉइंटमेंट शिवाय एनी टाईम Happy

मंजिरी Lol
ऋयाम, मला वाटतं लोक/ आप्त घरी यायची आवड असणारे आणि अजिबात आवड नसणारे दोन्ही प्रकारचे लोक / कुटुंब असतात. पुर्वी अशा प्रकारे कोणत्याही वेळी लोकांचे आदरातिथ्य जमत नसलेल्या लोकांची गैरसोय होतच असणार पण ती बोलुन दाखवायचा / नाराजी दाखवायचा पर्याय उपलब्ध नसावा. आता कम्युनिकेशन साधनांमुळे, सोयी गैरसोयी बघत हे टाळायचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे ज्या लोकांना खरोखरीच आप्तस्वकियांना भेटायची आवड नाही त्यांची सोय झाली. आणि ज्यांना आवड आहे त्यांना पुर्वीसारखेच वागता यायला हरकत नाही किंबहुना बरेच जण तसेच वागतातही असे मला वाटते.

माझ्या मते ह्याला एक वेगळा पैलु आहे. हल्ली कुणाकडे फारसं जाणं होत नाही, कुणी सारखं येत नाही. तेव्हा हे जीव्हाळ्याचे पाहुणे येतिल ( फारा दिवसांनी) तर त्यांचं अगत्यान करायला, तयारीला ( खाण्या पिण्याची खरेदि , स्वैपाकाला) वेळ मिळावा, त्या दिवशी गप्पांना वेळ मिळावा, म्हणुन आधी कळवून ठरवून जाणं अधीक आनंददायी ठरेल.

Pages