
"मस्साला च्या मारी... "
पावणं... असं दचकु नगा... म्या काय वंगाळ नाय बोलत हाय. माज्या रेशिपीचं नावच हाय बघा ह्यो.... "मस्साला-च्या-मारी..."
त्याचं काय हाय बगा, की आमच्या मालकांना.. म्हणजे आमच्या यान्ला 'च्या' लईच आवडतो बगा. आन तो बी मस्साला वाला. आनी नुसताच च्या नव्ह... संगट 'मारी' बिस्कुटच लागतया (डायटवर हायती... खारी नको म्हंत्यात
). तर मी काय म्हंनत व्हते? हां, तर आमचे मालक हरघडी हाका घालतात.... "एSS च्या-मारीSSSS..." रविवारच्याला तर दिवसातुन ६-७ वेळा ह्योच............ "च्या-मारी"..."च्या-मारी"... कंटाळ्ले की म्या. सारखा तो च्या करा.. मसाला कुटा...टोप घासा अन कप धुवा... म्हनल कायतरी आयड्या कराया हवी, जेनेकरुन हे च्या प्रकरन सोप्प करता येइल्ल. मग काय माज्या सुपिक डोस्क्यात वळवळला की हो किडा आन केल्ली की ह्यो नवी रेशिपी...
तर, या रेशिपीसाठी काय काय लागतया?? -
मस्साल्यासाठी:
३-४ वेलच्या, ३-४ लवंगा, दालचिनी तुकडा कुटुन केलेली ताजी भुक्टी - १ छोटा चमचा (टीस्पून)
१ छोटा चमचा सुंठ पावडर
आन ह्यो बी लागतया -
२ मोठ्ठे चमचे (टेस्पून) चहाची पत्ती,
३/४ कप साखर,
२ कप मैदा (गव्हाच पीठ नगाच वापरू .. मज्जा नाय यायाची),
१७५ ग्रॅम मऊ बटर (मीठाबिगर किंवा अमुल पन चालेल),
आता आपन बनवुया "मस्साला च्या मारी"
१. सगळे जिन्नस गोळा करा.
२. तुमच्या मिस्कर म्हंजी फुप्रो मंदी चाळलेला मैदा, सुंठ, च्या ची पत्ती घाला आन जरा फिरवुन घ्या. मग साखर घाला आन परत फिरवा.. मिस्कर..
३. यात आता कुटलेला मस्साला, बटर घाला अन परत फिरवा... सम्द एकत्र येऊन गोळा व्हाया लागलं की फिर्वायच थांबा.
४. गोळा मिस्करातुन बाहेर काढुन कट्यावर एकत्र नीट करा आन त्याला दांडुक्या सारखा आकार द्या. दांडका साधारण मनगटा येव्हढा जाड हवा (दीड इंच व्यास). हा दांडका प्लास्टिकमधे (क्लिंग रॅप) गुंडाळा आन पांढर्या थंड कपाटात ठेऊन द्या घटकाभर.
५. भट्टी (ओव्हन) १५० डिग्रीला तापत ठ्येवा. घटकाभराने दांडका बाहेर काढा. त्यावरचं प्लास्टिक काढा आन कंगोरेवाल्या चाकून त्याच्या गोल गोल चक्त्या कापा.
६. या चकत्या भाजकागद (बेकिंग पेपर) ठेवलेल्या ताटलीमंदी थोड्या मोकळ्या मोकळ्या मांडा.
७. आता द्या ढकलुन ताटली भट्टीमधी - १२-१५ मिंट. चकत्यांची आता बिस्कुट व्ह्याया लागतिल कडा जरा तपकिरी दिसाया लागल्या की काढा बाह्येर.
८. बिस्कुट अजुन नरमच लागतिल हातान्ला पण ५ मिंटांनी ताटलीतुन काढुन यान्ला (बिस्कुटांन्ला वो..) जाळीवर ठ्येवा.
९. "च्या-मारी" झाली की .. काढा प्लेटीत
१०. च्या-मारी आन सोबत टीवी चा रिमोट दिला यान्ला... म्हंन्ल "च्यामारी घ्या....मस्साला च्या मारी"
१. यात शक्यतो चहाची पत्तीच वापरा. पावडर नको. पावडर वापरणार असाल तर २ टबलस्पून ऐवजी १ टेबलस्पूनच घ्या.
२. चहाचे बारीक कण छान कुरकुरीत होतात. मस्त चव येते.
३. सुंठ आणि ताज्या मसाल्याचा स्वाद खुप छान लागतो. विकतचा मसाला शक्यतो नका वापरू यात अजुन बरेच काही घटक असतात.
४. अनसॉल्टेड बटर वापरणार असाल तर अगदी चिमुटभर मीठ घाला. बिस्किटाची गोडी जास्त खुलते.
५. रॅप केलेला तयार दांडुका (रोल) फ्रिज मधे आठवडाभर आणि फ्रिझरमधे महिनाभर ठेऊ शकता. आयत्यावेळेस बाहेर काढुन थोडा थॉ करुन मग बेक करा.
६. बेक करताना साधारण १० मिनीटांनंतर लक्ष असू द्या. कडा लालसर्/थोड्या तपकिरीसर दिसायला लागल्या की बिस्किट लगेच बाहेर काढा. असं वाटतं बिस्किट कच्च आहे पण बाहेर काढल्यावर सुद्धा त्यातल्या हीट मुळे बिस्किट शिजतच असतं. ५ मिनीटांनी बिस्किट जाळीवर काढा. थंड झाल्यावर बिस्किट छान खुसखुशीत होतात.
त टि : आमचे मालक वर्षातुन एकदा चहा पिणार्यातले पण ही च्या-मारी रोज आवडीने खातात
ओक्के लाजो.
ओक्के लाजो.
लाजो. च्या मारी ! कसली
लाजो.
च्या मारी ! कसली भन्नाट रेसिपी शोधली आणि लिवली पण भारीच. 
भारीच सुपीक डोस्कं हाय ओ
भारीच सुपीक डोस्कं हाय ओ तुम्चं लाजोताई! येकदम भन्नाट परकार दिस्तूय ह्यो! झ्याक! आवडलंच!
लाजो, म हा न आहेस गं बाई!!
लाजो, म हा न आहेस गं बाई!! __/\__
लयच भारी..
फारच खुसखुशीत कृती, लेखन अन
फारच खुसखुशीत कृती, लेखन अन फोटोसुध्दा.
नक्की करणार. पण मैद्या पासून नाही. गव्हाच पीठ सपिटाच्या चाळणीने चाळून करेन म्हणते. रन्गाला मार खातील बहुते क 
लईच भारी
लईच भारी
लय भारी लाजो! क्या दिमाग
लय भारी लाजो! क्या दिमाग लगाया हय!!
आर्र ति च्या मारी, एकदम
आर्र ति च्या मारी, एकदम जंक्शन
लई लई भारी
लई लई भारी
लाजो, तुझे चरण कुठे आहेत बाई?
लाजो, तुझे चरण कुठे आहेत बाई? जरा दाखव!
___/\___
बटर च्या ऐवजी फ्रेश क्रीम
बटर च्या ऐवजी फ्रेश क्रीम वापरलं तर चालेल का? रेसिपी लय भारी!! नक्की करनार या रयवारी
चहा पत्ती आणि चहा पावडर
चहा पत्ती आणि चहा पावडर वेगवेगळे असतात का? माझ्याकडे टी बॅग्ज आहेत. त्यातला चहा नाही चालणार का?
आता पुढची रेसीपी "च्या
आता पुढची रेसीपी "च्या मायलो"......

लाजोचं च्या मारी... "मायलो" घातलेल्या दुधात बुडवून खायचं...
च्या मारी... लई बेस!
च्या मारी... लई बेस!
येक्दम भारी...
येक्दम भारी...
ओय ओय. या प्रोफेशनल शेफ ना
ओय ओय. या प्रोफेशनल शेफ ना फाऊल धरा बरं.
लाजोतै- महान.
पाकृ आणि लिहिण्याची पद्धत
पाकृ आणि लिहिण्याची पद्धत दोन्ही भन्नाट! _/\_
मला काही प्रश्न पडले १.
मला काही प्रश्न पडले
१. चहापत्ती नी चहा पावडर मधे काय फरक?
२. चहापत्ती ह्या बिस्किटांमध्ये कडु लागत नाही का? कारण अशीच चहापत्ती (चहाशिवाय) खाण्याचा विचार पण करवत नाही.
धन्यवाद मंडळी - चहा पत्ती
धन्यवाद मंडळी
- चहा पत्ती म्हणजे 'लिफ टी' ज्यात चहाची वाळकी पाने कळुन येतात.
- चहा पावडर/डस्ट यात चहा बारीक भुकटीच्या स्वरुपात असतो.
- चहा पत्ती नसेल तर चहा पावडर चालु शकेल फक्त ती अगदी शेवटी घालावी म्हणजे मिक्सर मधुन फिरवताना त्याचा पार भुगा होणार नाही.
- चहा घातल्याने बिस्किट अजिब्बात कडु होत नाही
@ धनश्री गानू<<< फ्रेश क्रिम चालणार नाही. बटर ऐवजी साजुक तूप वापरु शकता
मस्तच ! तोंपासू.
मस्तच ! तोंपासू.
लाजो, धन्य आहेस _/\_ ! प्लेन
लाजो, धन्य आहेस _/\_ ! प्लेन बिस्किटं श्रूजबरी बिस्किटांसारखी लागतील का ? मसाल्यामुळे ही बिस्किटं तर भारीच लागत असणार
एकदमच वरिजिनल आय्ड्या. I
एकदमच वरिजिनल आय्ड्या.
I guess we have a winner!
वा वा भारीच !! मस्त फोटो आणि
वा वा भारीच !! मस्त फोटो आणि रेसिपी
मस्तय!!
मस्तय!!
अगदी वेगळा प्रकार. छानच.
अगदी वेगळा प्रकार. छानच.
भारीच आहे की च्या मारी मस्तच
भारीच आहे की च्या मारी
मस्तच दिसतायत बिस्कीट.
लै लै भारी!!!
लै लै भारी!!!
मस्साल्याच्या मारी... लै भारी
मस्साल्याच्या मारी... लै भारी ! भारी फोटोसहीत खुसखुशीत रेसिपी पण भारी !
लैच भारी!
लैच भारी!
लाजो एकदम लय भारी बग.
लाजो एकदम लय भारी बग.
Pages