"मस्साला च्या मारी... "
पावणं... असं दचकु नगा... म्या काय वंगाळ नाय बोलत हाय. माज्या रेशिपीचं नावच हाय बघा ह्यो.... "मस्साला-च्या-मारी..."
त्याचं काय हाय बगा, की आमच्या मालकांना.. म्हणजे आमच्या यान्ला 'च्या' लईच आवडतो बगा. आन तो बी मस्साला वाला. आनी नुसताच च्या नव्ह... संगट 'मारी' बिस्कुटच लागतया (डायटवर हायती... खारी नको म्हंत्यात ). तर मी काय म्हंनत व्हते? हां, तर आमचे मालक हरघडी हाका घालतात.... "एSS च्या-मारीSSSS..." रविवारच्याला तर दिवसातुन ६-७ वेळा ह्योच............ "च्या-मारी"..."च्या-मारी"... कंटाळ्ले की म्या. सारखा तो च्या करा.. मसाला कुटा...टोप घासा अन कप धुवा... म्हनल कायतरी आयड्या कराया हवी, जेनेकरुन हे च्या प्रकरन सोप्प करता येइल्ल. मग काय माज्या सुपिक डोस्क्यात वळवळला की हो किडा आन केल्ली की ह्यो नवी रेशिपी...
तर, या रेशिपीसाठी काय काय लागतया?? -
मस्साल्यासाठी:
३-४ वेलच्या, ३-४ लवंगा, दालचिनी तुकडा कुटुन केलेली ताजी भुक्टी - १ छोटा चमचा (टीस्पून)
१ छोटा चमचा सुंठ पावडर
आन ह्यो बी लागतया -
२ मोठ्ठे चमचे (टेस्पून) चहाची पत्ती,
३/४ कप साखर,
२ कप मैदा (गव्हाच पीठ नगाच वापरू .. मज्जा नाय यायाची),
१७५ ग्रॅम मऊ बटर (मीठाबिगर किंवा अमुल पन चालेल),
आता आपन बनवुया "मस्साला च्या मारी"
१. सगळे जिन्नस गोळा करा.
२. तुमच्या मिस्कर म्हंजी फुप्रो मंदी चाळलेला मैदा, सुंठ, च्या ची पत्ती घाला आन जरा फिरवुन घ्या. मग साखर घाला आन परत फिरवा.. मिस्कर..
३. यात आता कुटलेला मस्साला, बटर घाला अन परत फिरवा... सम्द एकत्र येऊन गोळा व्हाया लागलं की फिर्वायच थांबा.
४. गोळा मिस्करातुन बाहेर काढुन कट्यावर एकत्र नीट करा आन त्याला दांडुक्या सारखा आकार द्या. दांडका साधारण मनगटा येव्हढा जाड हवा (दीड इंच व्यास). हा दांडका प्लास्टिकमधे (क्लिंग रॅप) गुंडाळा आन पांढर्या थंड कपाटात ठेऊन द्या घटकाभर.
५. भट्टी (ओव्हन) १५० डिग्रीला तापत ठ्येवा. घटकाभराने दांडका बाहेर काढा. त्यावरचं प्लास्टिक काढा आन कंगोरेवाल्या चाकून त्याच्या गोल गोल चक्त्या कापा.
६. या चकत्या भाजकागद (बेकिंग पेपर) ठेवलेल्या ताटलीमंदी थोड्या मोकळ्या मोकळ्या मांडा.
७. आता द्या ढकलुन ताटली भट्टीमधी - १२-१५ मिंट. चकत्यांची आता बिस्कुट व्ह्याया लागतिल कडा जरा तपकिरी दिसाया लागल्या की काढा बाह्येर.
८. बिस्कुट अजुन नरमच लागतिल हातान्ला पण ५ मिंटांनी ताटलीतुन काढुन यान्ला (बिस्कुटांन्ला वो..) जाळीवर ठ्येवा.
९. "च्या-मारी" झाली की .. काढा प्लेटीत
१०. च्या-मारी आन सोबत टीवी चा रिमोट दिला यान्ला... म्हंन्ल "च्यामारी घ्या....मस्साला च्या मारी"
१. यात शक्यतो चहाची पत्तीच वापरा. पावडर नको. पावडर वापरणार असाल तर २ टबलस्पून ऐवजी १ टेबलस्पूनच घ्या.
२. चहाचे बारीक कण छान कुरकुरीत होतात. मस्त चव येते.
३. सुंठ आणि ताज्या मसाल्याचा स्वाद खुप छान लागतो. विकतचा मसाला शक्यतो नका वापरू यात अजुन बरेच काही घटक असतात.
४. अनसॉल्टेड बटर वापरणार असाल तर अगदी चिमुटभर मीठ घाला. बिस्किटाची गोडी जास्त खुलते.
५. रॅप केलेला तयार दांडुका (रोल) फ्रिज मधे आठवडाभर आणि फ्रिझरमधे महिनाभर ठेऊ शकता. आयत्यावेळेस बाहेर काढुन थोडा थॉ करुन मग बेक करा.
६. बेक करताना साधारण १० मिनीटांनंतर लक्ष असू द्या. कडा लालसर्/थोड्या तपकिरीसर दिसायला लागल्या की बिस्किट लगेच बाहेर काढा. असं वाटतं बिस्किट कच्च आहे पण बाहेर काढल्यावर सुद्धा त्यातल्या हीट मुळे बिस्किट शिजतच असतं. ५ मिनीटांनी बिस्किट जाळीवर काढा. थंड झाल्यावर बिस्किट छान खुसखुशीत होतात.
त टि : आमचे मालक वर्षातुन एकदा चहा पिणार्यातले पण ही च्या-मारी रोज आवडीने खातात
लई झ्याक लिवलि बगा रेश्पी
लई झ्याक लिवलि बगा रेश्पी तुमी मारी भारीच आवडली बरं का
लय भारी लिवलय
लय भारी लिवलय लाजवाक्का!!!
----------^------------ !
'च्या मारी' बी झ्याक वाटुन राह्यलीये!
लाजो काय आयडिया आहे. ग्रेट.
लाजो काय आयडिया आहे. ग्रेट. लई झ्याक बगा.
OMG!!!!!!! ला>>जो...ग्रेट
OMG!!!!!!! ला>>जो...ग्रेट आहेस ...
खुसखुशीत आणी टेस्टी दिस्तायेत्..फोटो ऐसा तो ..???
वॉव
मस्त! .. चहा पितानाच बघितल
मस्त! .. चहा पितानाच बघितल एकदम तोपासु
दोनदा पोस्ट झालं.. लयं आवडलं
दोनदा पोस्ट झालं.. लयं आवडलं
मस्तच ! कृती लिहिण्याची
मस्तच ! कृती लिहिण्याची स्टाइल पण आवडली
फोटू, रेस्पी, लिहिण्याची
फोटू, रेस्पी, लिहिण्याची स्टाइल.. सगळंच एकदम बेष्ट बघा!
लय झ्याक.
लय झ्याक.
ज्याम आवडली बगा ,करुन बघणारच!
ज्याम आवडली बगा ,करुन बघणारच!
अगदी अभिनव कल्पना. पेटंट
अगदी अभिनव कल्पना. पेटंट घ्या.
एकदम वरीजिनल, मस्त.
एकदम वरीजिनल, मस्त.
नेहमीप्रमाणेच...काहिसे "हटके"
नेहमीप्रमाणेच...काहिसे "हटके"
मस्तच!!!!
लई झ्याक हाय बगा तुमचं च्या
लई झ्याक हाय बगा तुमचं च्या मारी !
झकास रेसिपी..धमाल लिहलय..
झकास रेसिपी..धमाल लिहलय..
लई भारी बघा
लई भारी बघा
म्या म्हनत व्हते, या येळंला
म्या म्हनत व्हते, या येळंला शंडेला वाईच आराम करावा.....पन तुमाला त्ये बी काय बघवना जनू???? आता दिला ना वीकांताचा नवा उद्योग लाऊन??? आता करावीच लागंल कारन,आमास्नी लई आवडली बगा तुमची रेश्पी च्यामारी!
खरच लाजो काय मस्त फुललेली
खरच लाजो काय मस्त फुललेली दिस्तायेत ग बिस्किट्स. या प्रमाणात किती बिस्किट्स होतात ?
वॉव लाजो किती क्रिएटिव्ह आहेस
वॉव लाजो किती क्रिएटिव्ह आहेस अगं तु,
लाजो तू लै हिकमती गं. मस्त अन
लाजो तू लै हिकमती गं. मस्त अन आगळीच बिकसिटं बनवलीस की .....
LOL. फोटो लई भारी आल्यात. आणि
LOL. फोटो लई भारी आल्यात. आणि रेस्पी तर त्याहून भारी झाल्या.
लाजोजी, त्रिवार __/\__
लाजोजी, त्रिवार __/\__
मस्साला च्या मारी ... लै भारी
मस्साला च्या मारी ... लै भारी
च्या मारी या
च्या मारी या पाककृतीच्या
म्हन्लं श्यिगाल कायतरी आसंल, जरा सक्काळ सक्काळ मूड यील तर च्या पाजतायत
पन शुभेच्छा
लय ब्येक्कार च्या होनार असा केल्यावं
आमालाबी भावतूय च्या लय, तुमास्नी पारितोषिक मिळ्ल्यावं पाजा आमाला च्या
क्काय?
चहाचे बारीक कण छान कुरकुरीत
चहाचे बारीक कण छान कुरकुरीत होतात>> कडु नाही का लागणार?
क्या बात है लाजो....... लई
क्या बात है लाजो....... लई भारी!!!
सगळं म्हन्जी सगळंच ब्येष्ट बगा
लाजो, सुप्पर मामाय !!
लाजो, सुप्पर मामाय !!
ठांकु बर्का सगल्यान्ला
ठांकु बर्का सगल्यान्ला
@टोकु, या प्रमाणात (आकारानुसार) २५ एक बिस्किटं होतात.
@प्रिती, चहाची कडवट चव अजिब्बात लागत नाही. छान स्वाद येतो
च्या मारी... झ्याक जमलंय
च्या मारी... झ्याक जमलंय बगा!!
नि रेसिपी लेखन पन खुसखुशित एकदम!! लय भारी!!!!!
च्या मारी...लैच भारी!
च्या मारी...लैच भारी!
Pages