गणपती बाप्पा मोरया

Submitted by मनस्विनि on 27 March, 2012 - 10:45

माझी नविन फ्रेम तयार झाली..कशी आहे ते नक्की सान्गा,,DSCN1604.JPG

गुलमोहर: 

खुप सुंदर झाली आहे. मटेरिअल काय घेतलेस? रागाऊ नकोस पण एक सांगु का......फ्रेम छान झाली आहे पण दिवा छोटा दाखवुन गणपती मोठा दाखवला असतास तर जास्त छान झाले असते. गणपती खुपच छान आहे. छोटा असल्याने तेवढा उठुन दिसत नाही. sorry! रागाऊ नकोस हं! रंगसगती छान झाली आहे. कशी केलीस ते हि लिहि ना!

सुरेख !!

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
@ विद्याक मला राग नाही आला..सुचना नविन फ्रेम करताना लक्षात ठेवेन.
फ्रेम कशी केली ते थोडक्यात सान्गायाचा प्रयत्न करते.
साहित्य: प्लायवूड चा पीस, एक्रिलि़क कलर, एम सील्,फेविकोल्,डेन्टा प्लास्ट पावडर,वाळु,हॉट लिक्विड (म्युरल साठी वापरतात).
प्लायवूड वर डिझाईन ट्रेस केले..
बॉर्डर : फेविकोल लावला आणि त्यावर वाळु टाकली.थोड्यावेळ सुकु दिलि.फ्रेम उभी करुन ठेवली म्हणजे जास्तीची वाळु निघुन जाइल.मग डेन्टाप्लास्ट पावडर +फेविकोल्+पाणि हे मिश्रण लावुन केले.टेक्स्चर साठी पेन्सिल वापरली.
एम्सील वापरुन बोर्डर्,गणपती,दिवा..केले.एक्रिलिक कलर वापरून फ्रेम रन्गवली.सगळ्यात शेवटी हॉट लिक्विड लावले.

धन्यवाद मनस्विनी! डेन्टाप्लास्ट पावडर हे काय आहे? कधी भारत फेरी होईल तेव्हा एमसील आणि पावडर आणायला मिळाली तर बघेन. एमसील ऐवजी ईथे अमेरिकेत air-dry clay मिळते, ती वापरुन प्रयत्न केला पाहीजे. बघुया कधी जमते ते.