Submitted by हर्ट on 26 March, 2012 - 04:43
मी ९ वर्षांपुर्वी माझ्या भावाला ६५ हजाराला हिरो होंडा घेऊन दिली होती. ती आता विकायची आहे. गाडी अजून चांगली आहे. एक विचारायचे आहे की विकताना काय काय कागदपत्रे असावी लागतात? म्हणजे ती शोधून तयार ठेवेन. आणि जर ६५ ला घेतली असेल तर ती कितीला विकावी? धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
६५००० ची ९ वर्षापुर्वीची
६५००० ची ९ वर्षापुर्वीची हिरोहोंडा म्हणजे सीबीझेड आहे का?
तीच आहे असे ग्रहीत धरून सांगतो.
तुमच्या बाईकची सर्वकागदपत्रे फार आवश्यक नसतात, बाईक रजिस्टेशनचे पेपर आवश्यक आहे मात्र.
बाईकच्या अवस्थेवरून किंमत ठरवली जाते, पण नऊ वर्षापुर्वीची बाईक म्हणजे विक्री किंमत किमान किंमत २५००० च्या पुढे राहील व ३०००० च्या थोडे खाली
आणि हो, मला बजाज प्लसर १५० सीसी २००३ डिसेंबरचे मोडेल विकणे आहे, त्याची किंमत १६००० रू मी ठेवली आहे. कोणाला हवी असेल तर सांगा
९ वर्षापुर्वीच्या गाडीला ३५
९ वर्षापुर्वीच्या गाडीला ३५ ते ३० हजार?
मला कठिण वाटतंय.
माझी २००७ ची पॅशन मी ३० ला विकली २०१० ला.
बी जास्ती अपेक्षा ठेवू नका.
मला पण बजाज चेतक ( स्कुटर )
मला पण बजाज चेतक ( स्कुटर ) १७ वर्षापुर्वीची विकायची आहे. ( रनींग म्हणाल तर आठवड्याला ६-८ किमी फक्त )
जास्ती अपेक्षा ठेवू नका. >> दक्षे मग माझ्या गाडीची किम्मत काय ठेवावी
मला भंगारात विकणयपेक्षा मी तशीच वापरणे परवडेल 
९ वर्षापुर्वीच्या गाडीला ३५
९ वर्षापुर्वीच्या गाडीला ३५ ते ३० हजार? >>>> दक्षिणाला अनुमोदन.
त्यात सीबीझेड असेल तर अॅव्हरेजही कमी, त्यामुळे फार अपेक्षा ठेऊ नका.
कल्याण-भिवंडी-ठाणे येथे
कल्याण-भिवंडी-ठाणे येथे कुणाला लेडी टू व्हीलर विकायची असल्यास कृपया मला कळवावे. मला हवी आहे.
>>बी जास्ती अपेक्षा ठेवू
>>बी जास्ती अपेक्षा ठेवू नका
हीहीहीही!
हा रस्त्तापेठेतील सध्याचा भाव आहे, आपली ते विकत घेणार असतील तर किंमतीच्या बाबती अपेक्षाभंग होऊन मानसिक आघात देखील बसू शकतो पण ती बाईक तुम्ही काही दिवसांनी विकत घेण्यासाठी गेलात (आपलीच बाईक जी तुम्ही किरकोळ किमतीत विकलेली असते ती) तर त्याची खरेदी किंमत पाहून झीट येऊ शकतो कृपया कांदा जवळ बाळगावा
- (अनुभवी)
विनोद नाही, पण एजंटला बाईक विकू नका !
, मला बजाज प्लसर १५० सीसी
, मला बजाज प्लसर १५० सीसी २००३ डिसेंबरचे मोडेल विकणे आहे, त्याची किंमत १६००० रू मी ठेवली आहे. कोणाला हवी असेल तर सांगा>> तुझ्याकडे किती गाड्या आहेत रे राज्या???
त्यात सीबीझेड असेल तर अॅव्हरेजही कमी, त्यामुळे फार अपेक्षा ठेऊ नका.>> +१
माझी २००७ ची पॅशन मी ३० ला विकली २०१० ला.>> विकलीस पण???
मला भंगारात विकणयपेक्षा मी तशीच वापरणे परवडेल>> जागा असेल पार्किन्गला तर तेच उत्तम अस मी म्हणेन.
बी, तुमची गाडी घेवुन एखाद्या जुन्या गाडी खरेदी विक्रीवाल्याकडे जाउन त्याची अंदाजित किमंत किती येइल ते विचारा. तो जे बोलेल त्यात फारतर अजुन २-५ हजार जास्तीचे मिळु शकतील. फार नाही.
बाय द वे, तुम्ही नवीन दुचाकी घेताना जुनी दुचाकी एक्सचेन्ज करण्याची सुविधार मिळत असेल तर तुमच्या डीलरलाच विका. तो सौदा फायद्याचा होइल. त्याच्याकडे तुम्ही दुसरी नवीन खरेदी करत असल्याने (आणि त्यात तो नफा कमवणार असल्याने) तो बाजारभावापेक्षा ५००-१००० रुपये जास्तीचेच देइल.
मी तर माझी जुनी बाइक भावालाच दिली. उगीच २०-२५ हजारात विकण्यापेक्षा त्याला वापरायला जास्त चांगली आहे ती. एव्हरेज अजुनहि त्याचे ७० मिळतेच.
>>>वर्षा_म बजाज चेतकची
>>>वर्षा_म
बजाज चेतकची विक्री किंमत ठरवलीस की कळव! घ्यायला आवडेल मला ती!
>>तुझ्याकडे किती गाड्या आहेत
>>तुझ्याकडे किती गाड्या आहेत रे राज्या???
हॅ हॅ हॅ!!
१८५७ ची मारूती पण आहे
खरचं गाडीचा नंबर १८५७ आहे व १९९४ चे मॉडेल आहे, नंबर तो आहे म्हणूनच घेतली ३ महिन्यापुर्वी
बजाज चेतक हव्ये का ? आमचीही
बजाज चेतक हव्ये का ? आमचीही विकायची आहे!
आता जुन्या दुचाकी वाहनांना
आता जुन्या दुचाकी वाहनांना फारशी पुनर्विक्री किंमत राहिलेली नाहीये. त्यातच १५ वर्षे पुर्ण झालेल्या वाहनांना पर्यावरण कर या नावाखाली रु.२,०००/- [रुपये दोन हजार फक्त] दर पाच वर्षांकरिता भरावे लागतात. यामुळे बजाजच्या जुन्या स्कुटर्सना तर दोन हजारांहून अधिक विक्रीमूल्य राहिलेले नाही.
जुन्या वाहनांमध्ये चांगली पुनर्विक्री किंमत रॉयल एन्फिल्ड बुलेट व यामाहा आरडी ३५० या वाहनांना आहे.
जुनी चेतक मला पण घ्यायला
जुनी चेतक मला पण घ्यायला आव्डेल. पुराने लोग पुरानी इस्कूटर.
<< जुनी चेतक मला पण घ्यायला
<< जुनी चेतक मला पण घ्यायला आव्डेल. >>
पुण्यात दोन हजारांपर्यंत सहज मिळू शकेल. तुमच्या शहरात देखील चौकशी करा. फारसा फरक नसावा.
दोन हजार?... क्या बोलते
दोन हजार?... क्या बोलते मेरेकु चलाने का है वो इस्कूटर. फ्रेम करके रखनेका नैहै. .... तूर्तास बींची गाडी विकली जावी ह्यासाठी प्रयत्न करावा.
बाइक बरोबर आरटी ओ चे एन ओ सी लागेल. तसेच गाडी फायनान्स वर घेतली असल्यास त्यांचे ही एन ओ सी लागेल. हप्ते भरून झाले की फायनान्स कंपनी ते देते.
आजकाल स्कुटर भंगारात विकतात
आजकाल स्कुटर भंगारात विकतात आणि त्याचे इंजिन काढून रसवंती चालवतात. रॉकेलवर !
अमा, चेतनजी, चेतक पाहिजे ही
अमा, चेतनजी,
चेतक पाहिजे ही काय क्रेझ आहे ? ( मराठी प्रतिशब्द आहे का क्रेझ ला )
बजाज मध्ये काम करुन सुध्दा मला असे वाटत नाही म्हणुन विचारले.
बजाज ७ वर्षे झाली की अधिकृत रित्या सुट्टे भाग बनविणे बंद करते अश्या वेळेला दसर्याला हार घालणे आणि पुसुन ठेवणे इतकीच कार्ये शिल्लक रहातात.
२००० सालची माझ्याकडे स्पिरीट आहे. याचा डिकी लॉक बिघडला आहे. बजाज सर्व्हीस वाले म्हणतात की मिळणार नाही. सुदैवाने ही २ स्ट्रोक गाडी आहे आणि पेट्रोल मध्ये ऑईल मिक्स करावे लागल्यामुळे पेट्रोल चोरी होत नाही.
तूर्तास बींची गाडी विकली जावी
तूर्तास बींची गाडी विकली जावी ह्यासाठी प्रयत्न करावा. >>>>>>>>>>> ऑ?? २०१२ पासुन अजुन गाडी विकली गेली नाहीये???
<< २०१२ पासुन अजुन गाडी
<< २०१२ पासुन अजुन गाडी विकली गेली नाहीये??? >>
हीरो होन्डा हातोहात विकली जाते. फारसा प्रयास करावा लागत नाही.
अमा , माझी चालु स्थितीतिल
अमा , माझी चालु स्थितीतिल चेतक मी ५ महिन्यांपुर्वी भंगारात १६०० ला विकली. मला माहित असते कुणी ओळखीचे वापरणार तर नक्की दिली असती.
मी १८०० रुपयांना बजाज कब
मी १८०० रुपयांना बजाज कब विकली. खरच कुणाला त्याची गरज आहे माहित असत तर तशीच दिली असती.
बी तुमच्या गाडीच अजून थोडी
बी तुमच्या गाडीच अजून थोडी माहिती सांगा ..
जसेकी मॉडेल नक्की कोणते आहे . किती किमी चालली आहे..
गाडीच्या कंडीशन वरून किमतीत बराच फरक पडू शकतो. अचूक सांगणे अवघड आहे..
जमल्यास एखादा फोटो अपलोडा..
त्या काळी हे नव्हते का?
त्या काळी हे नव्हते का?