Submitted by तुषार जोशी on 25 March, 2012 - 00:09
तिला विचारण्यास मन सदैव भीत राहीले
कितीक प्रश्न का असे अनुत्तरीत राहिले?
पुन्हा पुन्हा वळून काल काय पाहिले तिने,
खुळ्या मनास काय जाण? ते खुशीत राहिले
कसे कळायचे तिला तिच्याविना नको जिणे
अबोल चित्त नित्य याच काळजीत राहिले
तिने दिला गुलाब लाल कोणत्या तरी दिनी
सुगंध कोवळे अजून ओंजळीत राहिले
कधीच 'तुष्कि' तू तिला विचारले, न जाणले
तिच्या मनातले गुपीत ठेवणीत राहीले
~ 'तुष्की'
+९१ ९८२२२ २०३६५
२५ मार्च २०१२, ०१:००
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
तिने दिला गुलाब लाल कोणत्या
तिने दिला गुलाब लाल कोणत्या तरी दिनी
सुगंध कोवळे अजून ओंजळीत राहिले>>
मस्त!
मस्त मस्तच मूड आहे गझलभर....
मस्त मस्तच मूड आहे गझलभर....
'तुष्की' खुशी सुंदर
'तुष्की' खुशी सुंदर
क्या बात है! मस्तं ! नानुभाऊ
क्या बात है! मस्तं !
नानुभाऊ
ग्रेटच !! क्या बात है!!
ग्रेटच !!
क्या बात है!!
सर्वांचे अनेक आभार
सर्वांचे अनेक आभार
सुंदर!!
सुंदर!!
सुगंध कोवळे अजून ओंजळीत
सुगंध कोवळे अजून ओंजळीत राहिले
>> अह्हा, सुंदर मिसरा