"इ है,,,इ है बंबई नगरीया तू देख बबुआ...."
त्याने चादरीतुनच हात बाहेर काढला आणि सेलफोन उचलून चादरीच्या आत घेतला. यावेळी त्याला फोन करणार्या दोनच व्यक्ती होत्या एक तर औध्या नाहीतर सतीश.
"च्यामारी पहाटे-पहाटे ९.३० वाजता उठवताना लाज कशी वाटत नाही या लोकांना? बोल बे सुक्काळीच्या... "
कावलेल्या आवाजात शिर्याने आधी फोनकर्त्याला दोन शिव्या हासडल्या. काल रात्री जुहूच्या शेट्टीच्या हॉटेलमध्ये ७०-८० हजार घालवून झाल्यावर वैतागलेला शिर्या पहाटे दोन - अडीचच्या दरम्यान आपल्या लोखंडवालातल्या घरी पोहोचला होता. खिशाला चांगलाच बांबु बसलेला असल्याने तशी रात्रभर झोप नव्हतीच. शेवटी पहाटेच्या सुमारास उद्या कुठ्ल्यातरी बेटींगच्या अड्ड्याला भेट देवून पैसा रिकव्हर करण्याचा निर्णय घेतल्यावर त्याला झोप आली होती. नाहीतरी ते लोक एवढा पैसा घेवून काय करणार होते, त्यातले चार्-पाच लाख शिर्याच्या खिश्यात गेल्याने असा काय फरक पडणार होता. एक दोघांची हाडे मोडावी लागली असती फक्त. तेरी भी चुप मेरी भी चुप. पुढचे काही दिवस अदृष्य व्हावे लागले असते फक्त. पण गेलेला पैसा दामदुपटीने परत मिळवल्याशिवाय त्याच्या जिवाला आराम लाभणार नव्हता. त्यात पहाटे पहाटे साडे नऊ वाजता त्याचा फोन बोंबलायला लागला होता....
"गुड मॉर्निंग ब्रो, आय एम बॅक!" तिकडून आवाज आला आणि फोन ठेवला गेला.
"कोण येडा होता कुणास ठाऊक?" शिर्याने मोबाईल साईड टेबलवर ठेवून दिला आणि काही क्षणातच तो पुन्हा निद्राधीन झाला.....
थोड्या वेळाने पुन्हा फोन वाजला...आणि वाजतच राहीला...
वैतागुन शिर्याने शिव्या देतच फोन उचलला...
"बोल बे भ.........
"कॅप्टन, आय एम बॅक! धिस टाईम आय एम गोइंग टू रॉक. आणि हो यावेळेस येताना तुझ्यासाठी ६० कोटीचे हिरे घेवून आलोय बरोबर, सी यु सुन माय डिअर फ्रेंड !"
हिर्यांबद्दल ऐकताच शिर्याचे कान ताठ झाले.
"ओह थँक्स यार, कुठे भेटुया?"
तशी पलिकडची व्यक्ती सावध झाली.
"कोण आहेस तू? तू कॅप्टन असुच शकत नाहीस. लगता है राँग नंबर लग गया."
पलिकडून क्षणार्धात फोन डिसकनेक्ट झाला आणि शिर्याची झोपही !
शिर्याने लगेच एक नंबर फिरवला.....
"हॅलो...इन्स्पेक्टर रावराणे हिअर !"
"सतीश, शिर्या बोलतोय.... एक नंबर लिहून घे. मला या नंबरबद्दल शक्य होइल ती सर्व माहिती हवी. आत्ता दोन मिनीटापुर्वी दोन वेळा या नंबरवरून फोन येवुन गेला मला. किमान नंबर कुणाच्या नावावर आहे आणि कुठून आला होता ही माहिती हवी."
"तू एवढ्या लवकर उठलास पण? बाय द वे, अरे काय म्हणाला तो? तुला कशासाठी फोन केला होता त्याने?"
"सतीष, तो फक्त एवढेच म्हणाला की मी परत आलोय आणि त्याने फोन डिसकनेक्ट केला."
शिर्याने हिर्यांबद्दल रावराणेंना सांगायचे प्रकर्षाने टाळले. नाहीतर रावराणे आधी त्याच्याच मागे लागले असते.
"दोन्ही वेळा त्याने फक्त "मी परत आलोय" हे सांगायला फोन केला? शिर्या.... काय लपवतोयस? काही नवीन लफडं तर करून ठेवलं नाहीस ना?"
"साल्ला...आला का तुला वास लगेच? अरे म्हणुन तर मीपण थोडा संभ्रमात पडलोय. एकच गोष्ट सांगायला तो दोन दोन वेळा फोन का करेल?"
"टेक इट फ्रॉम मी शिर्या ! तो नक्की राँग नंबर असणार आणि जरी कबुल करत नसलास तरी तू माझ्यापासून नक्की काहीतरी लपवतो आहेस. पण म्हणूनच मी या फोन नंबरचे डिटेल्स शोधून काढणार आहे."
रावराणेंनी फोन ठेवला आणि शिर्याने एक थंड निश्वास टाकला.
"च्यायला पक्का पोलीसवाला आहे, याच्यापासून काहीच लपवता येत नाही. पण कोण असेल तो? साल्याकडे ६० कोटीचे हिरे आहेत."
शिर्याचे हात सळसळायला लागले होते. कालच ७०-८० हजाराला बांबु बसला असल्याने त्याने या प्रकरणात लक्ष घालायचे नक्की केले होते. तसेही त्यांचे अंतर्मन काही वेगळीच ग्वाही देत होते. आयुष्यात काहीतरी सनसनाटी घडणार असलं की अशी फिलींग्ज यायची त्याला. नव्याने येणार्या अनामिक साहसाच्या कल्पनेने त्याचे बाहु स्फुरण पावायला लागले होते. तो आतुरतेने हातातल्या मोबाईलकडे बघत बसला...
थोड्याच वेळात सत्याचा फोन येणार याची खात्री होती त्याला.
आणि फोन वाजला........
"शिर्या, सतीष बोलतोय. हा फोन तूला गुजरातमधून आला होता. गुजरात-पाक बॉर्डरवरच्या एका छोट्याश्या खेड्यातून. फोन कुणा पंडीत रघुवीर शर्माच्या नावावर आहे. पण ते फेक नाव असणार. माझा अंदाज खरा ठरला. काहीतरी मोठी भानगड आहे नक्की. शिर्या, स्पष्टपणे सांग, काय भानगड आहे. नाहीतर नेहमीप्रमाणे कुठल्यातरी संकटात सापडल्यावर तूला माझी आठवण येइल. जर आत्ता काही सांगितले नाहीस तर त्यावेळी मी तुझ्या मदतीला येणार नाही सांगून ठेवतो."
"सत्या, मला पण नक्की काहीच माहीत नाही. एवढेच सांगतो. त्या माणसाला कुणा कॅप्टनशी बोलायचे होते. पण राँग नंबर लागून फोन मला आला. बोलणारा माणुस..., त्याची भाषा...थोडीफार उर्दुची झाक होती त्याच्या बोलण्यात. म्हणूनच मला शंका आली आणि मी तूला फोन केला."
शिर्याने बिनधास्त ठोकून दिले. रावराणेंचा इतक्या सहजासहजी विश्वास बसणार नाही याची खात्री होती त्याला. पण त्यांना नंतर पटवता आले असते.
गुजरात बॉर्डर......?
शिर्याने आणखी एक नंबर फिरवला.
"सलाम अस्लमभाई, कैसे हो?"
"या अल्लाह, सुबह सुबह मैने किसका मुंह देखा था? इस शैतानको मेरी याद कैसे आ गयी?" अस्लमभाईचा मिस्कील आवाज कानावर पडला आणि शिर्या स्वतःशीच हसला.
"मुसिबतके वक्त सभीको अपने भाईबंद याद आते है अस्लमभाई. मग तो माणुस असो वा शैतान."
शिर्याने खुसखुसत वार परतवला तसा अस्लमभाई खळखळून हसला.
"साले..तू सुधरेगा नाही. बोल्....कैसे याद किया?"
"भाई, कुछ काम था, फ्री हो?"
"आजा 'तरन्नुम'पें ! दोन पेग लावू आणि बोलू..........!!"
"तरन्नुम...?" शिर्याने दोनच मिनीटे विचार केला आणि लगेचच होकार दिला.
"ठिक आहे, दोन तासात मी पोचतोच. बेसमेंटला भेटूया 'तरन्नुम'च्या."
"ओह, लगता है कोइ तगडा बकरा फसा है...जो तू 'तरन्नुम'मे आनेकोभी तैय्यार हो गया. मी तर मजाक करत होतो यार, तू सांग्..तू म्हणशील तिथे भेटू या. तो 'सावत्या' घातच लावून बसला असेल तू कधी तरन्नुमला येतोस त्याची. मागच्या वेळेस त्याचं आठ एक लाखाचं नुकसान केलंस तू."
"छोड यार, असल्या सावत्या-फावत्याला शिर्या घाबरत नाही. त्याने बेइमानी केली त्याचं फळ त्याला दिलं मी. आज जर आडवा आला तर कायमचा आडवा होइल तो. मी पोहोचतोच आहे दोन तासात. तिथेच भेटू."
शिर्याने फोन ठेवला. घड्याळ साडे दहाची वेळ दाखवत होतं. बरोब्बर अकरा वाजताच्या सुमारास लोखंडवालामधल्या शिरीन अपार्टमेंतमधून शिर्याची 'झोंडा' सुसाट वेगाने बाहेर पडली. गेटवरच्या वॉचमनने आकाशाकडे बघत हात जोडले.
"भगवान, सबकुछ ठिक ठाक रखना, लगता है आज किसीकी शामत आयी है!"
********************************************************************************************************
"ट्रिंग ट्रिंग....ट्रिंग ट्रिंग....ट्रिंग ट्रिंग....ट्रिंग ट्रिंग.........
बराच वेळ वाजत असलेला फोन शेवटी वैतागुन त्याने उचलला.
"हॅलो डेडशॉट.........................."
"पख्तुनी?"
"या अल्ला, यावेळेसतरी निदान सही आदमी मिळाला."
"मी समजलो नाही..."
"त्याची गरजही नाही, ते तेवढे महत्त्वाचेही नाही. एक क्षुल्लक राँग नंबर लागला होता सकाळी, तुला फोन करताना."
"एनी वेज, आतापर्यंत तू गुजरात सोडला असशील नाही.....?"
"जानता हूं कॅप्टन, बहोत चालाक हो तुम. वैसे तुम्हे ये बात पता नही चला पायी होंगी की फिलहाल मै एक्झॅक्ट कहां हू? पता भी कैसे चलेगा? तुम्हारा वो बंदा, जिसको तुमने मेरे पिछे छोडा था, क्या नाम था उसका...? हा...कुलदिप! वो तो मेरे हातो अल्ला को प्यारा हो चुका है! बंदा बडा ही ढीट निकला, अपने नामके अलावा कुछ नही बताया उसने."
कॅप्टनने एक थंड निश्वास टाकला...
"पख्तुनी, कुलदिपकी मौतका हिसाब तुझसे मै खुद लुंगा! यावेळेस तू परत जाणार नाहीस एवढे लक्षात ठेव. यावेळेसही मागच्यासारखाच पराभव तुझ्या पदरी पडेल तोही तुझ्या मृत्युसकट हे लक्षात ठेव!"
कॅप्टनच्या आवाजात अचानक एक निष्ठुर थंडपणा आला होता.
"छोडो भी डेडशॉट, तुफानकोभी कभी रोक सका है कोइ? और इसबार तो तूमभी फिरभी अकेले हो. तुझा तो कर्नल जावुन बसला डेन्मार्कमध्ये आणि त्याची ती शैतान की खाला, ती हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होवून पडलीय. तू अकेला क्या बिगाड लेगा मेरा?"
"तेरे लिये तो मै अकेला ही काफी हूं पख्तुनी! इसबार तेरी कब्र यही बनायेंगे हम!!"
"छोडो कॅप्टन, ये बाते तो होती ही रहती है और होती ही रहेंगी. ना अब तक तुम मुझे खत्म कर पाये हो....."
"और ना ही आजतक तुम अपना आतंक यहा फैला पाये हो पख्तुनी! प्रत्येक वेळी थोबाडावर आपटला आहेस. तरी अजुन माज जात नाही तुझा."
तसा पख्तुनी खदखदुन हसायला लागला...
"छोड यार कॅप्टन, अपनी ये तु तु मै मै तो चलती ही रहेगी. ये नही जानना चाहेगा, इस बार तेरे मुल्कमें क्युं आया हूं मै?"
कॅप्टन शांतच राहीला, पख्तुनी स्वतःहुनच बोलेल याची खात्री होती त्याला. किंबहुना त्यासाठीच पख्तुनीने फोन केला होता त्याला. एकमेकांना या पद्धतीने खेळवायची दोघांची खुप जुनी सवय होती.
"डेडशॉट, इसबार तेरा कुछ सामान मेरे हाथ लग गया है......
पख्तुनीने अतिशय आनंदाने आपल्या येण्याचा हेतु जाहीर केला...! कॅप्टन शांतच होता.
"डेडशॉट, इस बार मेरे हाथ कुछ हिरे लगे है......!"
हिर्यांचं नाव काढताच कॅप्टन सावध झाला.
"हिरे........?"
"अब आये ना मिया जगहपर! हो.... हिरे!! साठ कोटीचे हिरे.......
"साठ कोटीचे हिरे आणि....?"
"येस डेडशॉट.... आणि, और , अॅंड ! या 'आणि'त तर खरी मज्जा आहे. त्या 'आणि'नेच मला परत एकदा तुझ्या देशात खेचुन आणलय कॅप्टन !"
"डोंट वरी पख्तुनी, इट्स ऑफ नो युज फॉर यु! ते 'आणि' शी संबंधीत जे काही आहे ते त्याच्या मालकाशिवाय, त्याच्याविना दुसर्या कुणालाच वापरता येणार नाही. आणि एक गोष्ट ठामपणे लक्षात ठेव. आजपासून तुझ्यापासून त्या 'आणि'च्या मालकापर्यंत पोहोचणार्या प्रत्येक रस्त्यावर कॅप्टन चैतन्य निंबाळकर नावाची ही अभेद्य भिंत उभी असेल."
तसा पख्तुनी खदखदुन हसायला लागला.
"ट्राय युवर बेस्ट कॅप्टन... जो तुमसे बन पडे करलो, अबकी बार उस बंदेको अपने साथ लेके ही जाऊंगा मै!"
"हम्म्म देखते है......!"
कॅप्टनने फोन खाली ठेवला आणि दोन आठवड्यांपुर्वीचा तो प्रसंग सर्रकन त्याच्या डोळ्यासमोरून परत फिरला....
********************************************************************************************************
सकाळी १०-१०.३० ची वेळ असेल बहुदा. त्याचा ऑर्डर्ली सांगत आला की चीफ साहेबांनी बोलवलेय म्हणुन. चीफ कडे जायचे म्हणले की कॅप्टन चैतन्यच्या अंगावर काटाच यायचा. ब्रिगेडीअर प्रकाश चक्रवर्ती, इंडीयन मिलीटरी इंटेलिजन्सचा चीफ. अतिशय कडक आणि तेवढाच खडुस म्हणुन ओळखला जाणारा हा म्हातारा. त्याचे सोर्सेस प्रचंड होते. त्याला प्रत्येक गोष्टीची खबर असायचीच. कुठलीही कारणे, बहाणे त्याच्यापुढे चालायचे नाहीत. समोरच्याचा खोटेपणा क्षणार्धात पकडणारा खडुस म्हातारा म्हणूनच तो ओळखला जायचा. चैतन्यशी तर त्याची कायम बाचाबाची व्हायची. कारण म्हातारा जुन्या वळणातला... सगळीकडे आपले जुने कायदे, जुन्या पद्धती लागु करायला पाहायचा आणि चैतन्य कायम त्याच्या नियमांना, पद्धतींना पद्धतशीरपणे चुड लावत असायचा. पण कसेही असले तरी म्हातारा चैतन्यवर खुश असायचा कारण चैतन्यकडे एखादी केस सोपवली की पुढच्या क्षणी त्याबद्दल विसरून गेले तरी चालते हे त्याला अनुभवाने पक्के माहीत झाले होते.
नेहमीप्रमाणे चैतन्य परवानगी न घेताच धाडकन दरवाजा लोतून आत शिरला, तसा म्हातार्याने डोळे वटारले. पण चैतन्यवर त्याचा काहीच परिणाम होणार नव्हता, झालाही नाही.
आत गेल्या गेल्या चैतन्यने दोन्ही पाय जुळवून एक कडक सॅलुट ठोकला आणि अदबीने चीफसमोर उभा राहीला.
"मला बोलावलेत चीफ तुम्ही?"
"बोलावू नये का?"
"मी जावु, बरीच कामे पडून आहेत."
"कॅप्टन जरी आपण इंटेलिजन्सवाले असलो तरी मिलीटरीचाच एक भाग आहोत. यु शुड अॅटलिस्ट फॉलो दी आर्मी प्रोटोकॉल!"
तसा चैतन्य शांतपणे खाली बघत उभा राहीला. आत्ता दहा-पंधरा मिनीट म्हातारा त्याचे पेटंट लेक्चर ऐकवणार याची त्याला खात्री पटली. झालेही तसेच. बोलून झाल्यावर चीफने समोरची एक फाईल त्याच्याकडे फेकली.
"सिट डाऊन कॅप्टन... चेक दी फाईल!"
फाईलचे पहिले पान बघताच कॅप्टनने तोंड वाकडे केले. कुठलेतरी दिल्लीतील लोकल वर्तमानपत्र होते. बहुदा फारसा खप नसणारे. नाहीतर असल्या साध्या चोरीच्या बातमीला फ्रंटपेजवर स्थान कसे काय मिळाले असते? साधी नेहमीची चोरीची बातमी होती. एका सुप्रसिद्ध प्रायव्हेट व्हॉल्टमधुन काही किंमती हिर्यांची चोरी झाली होती.
"सो, आता मी माझी कामे सोडून या हिरेचोराला शोधण्यात आपला वेळ घालवावा असे आपले म्हणणे आहे तर."
चैतन्यने तोंड वाकडे केले.
"येस, आय वाँट यु टू फाईंड आऊट धिस थीफ! कॅप्टन साठ कोटींचे हिरे होते. पण मला त्या हिर्यांशी काही देणेघेणे नाही. ते परत नाही मिळाले तरी चालेल. एक गोष्ट तुला म्हणून सांगतोय ते हिरे त्या व्हॉल्टमधून नव्हे तर एका विमानातून चोरीला गेलेत, ते व्हॉल्टमधुन चोरीला गेलेत हे वृत्त केवळ दिशाभूल करण्यासाठी पसरवलेय आम्ही. खरेतर आपलच एक माणुस ते हिरे बरोबर घेवून दुसर्या जास्त सुरक्षीत ठिकाणी ठेवण्यासाठी घेवून जात होता. पण त्या हिर्यांबरोबर त्या वॉल्टमधली आणखी एक गोष्ट गायब झालीय. ती गोष्ट लवकरात लवकर परत मिळणे अत्यावश्यक आहे. ती वस्तू जर चुकीच्या माणसाच्या हातात पडली तर राष्ट्राच्या सुरक्षेला धोका पोहोचु शकतो. "
"काय ? याचाच अर्थ असा की तुमची दिशाभुल करण्याची युक्ती उपयोगी पडलेली दिसत नाही. पण मुळात त्या हिर्यांची चोरी झाली हे जाहीर करण्याची गरजच काय होती. ते हिरे गुपचुप हलवता आले नसते का?"
"ते करावे लागले कॅप्टन. कारण त्या हिर्यांवर कुणीतरी नजर ठेवुन होते अशी आमची खात्री पटली होती."
कॅप्टनच्या चेहर्यावर उभे राहीलेले प्रश्नचिन्ह पाहून चीफनी हलक्या आवाजात बोलायला सुरूवात केली. ते जवळ जवळ अर्धातास बोलत होते. त्यांच्या बोलण्यादरम्यान कॅप्टन चैतन्यच्या चेहर्यावरचे भाव भरा भरा बदलत चालले होते. आधी आश्चर्य, मग कुतुहल मग काळजी असे चेहर्यावरचे भाव बदलत जावून शेवटी पुन्हा जेव्हा त्याच्या चेहर्यावर नेहमीचं खेळकर पण कठोर हास्य रेंगाळायला लागलं.
"सो कॅप्टन, व्हाट्स युवर डिसीजन?"
"ही केस फक्त माझीच आहे सर! लवकरात लवकर ती गोष्ट परत आपल्याकडे असेल."
"एक लक्षात ठेव कॅप्टन. तुझ्यावर दुहेरी जबाबदारी आहे. ती गोष्ट शोधण्याबरोबरच तूला त्या व्यक्तीच्या संरक्षणाचे शिवधनुष्यही पेलावे लागणार आहे. जर चुकून ती गोष्ट चुकीच्या हातात पडली तर त्यांच्या जिवाला धोका आहे हे नक्की."
"तुम्ही काळजी करू नका सर. माझी त्यांच्यावर पुर्ण नजर असेल."
*********************************************************************************************************
आणि आज पख्तुनी सांगत होता की ती वस्तू त्याच्याकडे आहे आणि त्या वस्तुसाठी म्हणून तो त्या वस्तुच्या मालकाला आपल्याबरोबर पाकिस्तानात घेवुन जायला भारतात आला होता.
क्षणभर्...एक क्षणभरच, चैतन्यच्या मनात एक विचार येवुन गेला. कर्नलसाहेब आणि आदिती हवे होते आज. पण कर्नल कुठल्याश्या गोपनीय कामासाठी डेन्मार्कला गेले होते. तर आदिती परवाच्या सतनाच्या जंगलात अतिरेक्यांबरोबर झालेल्या झटापटीत प्रचंड जखमी होवून हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होती. त्याला कर्नलसाहेबांबद्दल प्रचंड आदर वाटला अचानक. पोटची एकुलती एक पोर हॉस्पिटलमध्ये मृत्युशी झगडत असताना तिच्याकडे पाहायचे सोडून हा माणुस देशकार्यासाठी लांब निघून गेला होता.
एक क्षणभरच कॅप्टनच्या मनात, आदितीच्या काळजीने चलबिचल झाली पण लगेच पुढच्याच क्षणी तो स्थिर झाला. त्याचे असे विचलीत होणे त्याच्या आदितीला आणि कर्नलनाही मुळीच रुचले नसते आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्याच्या कर्तव्यनिष्ठुर मनालाच ते पटले नव्हते. अगदी कठोरपणे त्याने आदितीचा विचार मनातून बाजुला काढला आणि पख्तुनीशी दोन हात करायला सिद्ध झाला.
पख्तुनी, कॅप्टन, कर्नल आणि अदितीबद्दल जास्ती जाणुन घेण्यासाठी वाचा "मी परत येइन....!"
*************************************************************************************************
पण पख्तुनी आणि कॅप्टन दोघांच्याही गावीदेखील नव्हते की कर्नल आणि आदिती जरी या केसमध्ये नसले तरी त्यांच्या तोलामोलाची किंबहुना काकणभर सरस अशी एक व्यक्ती पख्तुनीच्या एका चुकीच्या कॉलमुळे या प्रकरणात खेचली गेली होती. आदिती किंवा कर्नल कितीही झाले तरी कायद्याच्या कक्षेत राहून काम करणारी माणसे होती. तर त्याला कसलीच बंधने माहीत नव्हती. इनफॅक्ट कायद्याचे लुपहोल्स शोधून आपला स्वार्थ साधणे हा त्याच्यासाठी निव्वळ पोरखेळ होता. आणि इथे तर साठ कोटींच्या हिर्यांचे आमिष होते. साठ कोटींच्या त्या तथाकथित हिर्यांसाठी तो आपली सगळी ताकद पणाला लावणार होता.
त्याच्या दृष्टीने या केसमध्ये त्याचा प्लस पॉइंट हा होता की त्याला इथे काहीच गमवायचे नव्हते. निदान सत्य माहीत होइपर्यंत तरी.
कॅप्टन चैतन्य निंबाळकर आणि पख्तुनी गेली कित्येक वर्षे एकमेकांशी झगडत, एकमेकावर मात करत आले होते. पण यावेळेस त्यांच्या मार्गात आणखी एक धोंड उभी राहणार होती.
"त्याला त्याचे मित्र कौतुकाने, तर शत्रु अतिशय आकसाने म्हणत......बिलंदर !!
************************************************************************************************************
क्रमशः
विशाल, क्रमशः कथेच्या खाली
विशाल, क्रमशः कथेच्या खाली टाकण्याऐवजी सुरुवातीलाच टाकत जा ना????????? तुझी कथा म्हणुन घाई घाई ने क्रमशः असेल हे विसरुनच वाचायला घेतली...
सुरुवात भन्नाट...
पण कथा लिहिताना काही गोष्टींचं भान ठेवच :
१) भाग पटापट टाकायचे
२) कथा संपवायचीच
३) क्रमशः कमीत कमी वेळा यायला हवं...
या प्रतिसादाकरता तुला मोठ्ठा
विशुभाउ.. सुरुवात मस्त झालीये
विशुभाउ.. सुरुवात मस्त झालीये
चिमुरी+१
पण कथा लिहिताना काही
पण कथा लिहिताना काही गोष्टींचं भान ठेवच :
१) भाग पटापट टाकायचे
२) कथा संपवायचीच
३) क्रमशः कमीत कमी वेळा यायला हवं... >> अनुमोदन.
तुमच्या कथांची पंखा आहे, आणि त्यामुळे वाचल्याशिवाय राहु शकत नाही, क्रमशः असल तरी
भारी सुरवात..
विकु... मस्त सुपर फास्ट
विकु... मस्त सुपर फास्ट सुरुवात...
आता पटकन पुढचा भाग टाक रे
मस्तच !!!. मागील दोन्ही
मस्तच !!!. मागील दोन्ही कथांची सान्गड घालून लागलेला राँग नंबर जबराट
विशल्या... क्षयझ... क्रमशः
विशल्या... क्षयझ... क्रमशः कशाला ते... सलग एकादमात वाचायला पाहिजेत रे अशा कथा...
चिमुरी+१
चिमुरी+१
मस्त रे विशल्या. एकदम सु. शि.
मस्त रे विशल्या. एकदम सु. शि. स्टाईल
चिमुरी+१
पुढ्चा भाग येऊ दे पटापट.
विशाल, या कथेचे काही भाग या
विशाल, या कथेचे काही भाग या आधी वाचलेयत, पुर्ण होण्याची वाट पाहते आहे.
विश्ल्या गोष्ट एकदा वाचल्यावर
विश्ल्या गोष्ट एकदा वाचल्यावर थोडी किचकट वाटलीच.
(सरळसोट लिहिली तर तुझं नावच बदलायला लागेल :फिदी:)
नंतर पुन्हा वाचल्यावर नीट संदर्भ लागले. दुसरा भाग कधी?
आणि आता तु पण चांगला 'रिक्षा' डायवर झालास की.
छान सुरूवात
छान सुरूवात
बिलंदर आणि कर्नल - अदिती -
बिलंदर आणि कर्नल - अदिती - कॅप्टन यांना एका कथेत गोवतोयस
छान सुरुवात. पटापट येउद्या
छान सुरुवात. पटापट येउद्या पुढचे भाग
धन्यवाद मंडळी आणि आता तु पण
धन्यवाद मंडळी
आणि आता तु पण चांगला 'रिक्षा' डायवर झालास की. >>> दक्षे, मात्र माझी रिक्षा फक्त तिच्या अधिकृत ठिकाणीच उभी असते.
कथा आवडली. उत्कंठावर्धक
कथा आवडली. उत्कंठावर्धक सुरूवात
सुपरफ्यांटाबुलस........चुम्मे
सुपरफ्यांटाबुलस........चुम्मेश्वरी कथा फुडचा भाग टाका पटापटा..
सुहास शिरवळकरांना योग्य वारस
सुहास शिरवळकरांना योग्य वारस मिळाला
विशल्या हरभर्याच्या झाडावरुन खाली आलास की पूढचा भाग लवकर टाक.
टोक्स, "चुम्मेश्वरी कथा" म्हणजे काय?
पु.ले.शु......... आता जस्त
पु.ले.शु.........
आता जस्त वेळ लावु नका.
विशल्या, सध्या तरी कथेपेक्षा
विशल्या, सध्या तरी कथेपेक्षा प्रतिसाद चांगले आहेत.
कौतुक
कौतुक
विशाल दादा पुन्हा
विशाल दादा
पुन्हा सांगते
आवडली
विशल्या, सध्या तरी कथेपेक्षा
विशल्या, सध्या तरी कथेपेक्षा प्रतिसाद चांगले आहेत.>>> आत्ता जरा समाधान वाटलं
आणि आता तु पण चांगला 'रिक्षा'
आणि आता तु पण चांगला 'रिक्षा' डायवर झालास की>>>
नुसता चांगला नाही ग दक्षे...एकाच वेळेस स्वतःच्या तीन-तीन रिक्षा चालवण्याएवढा चांगला
विशालदा....सगळ्यांनी सांगितलेलं परत सांगत नाही..पण तिन्ही कथांचा रेफेरन्स दिलाय्स...सगळे संदर्भ लागायला सगळे मुद्दे भरपुर वेळ लक्षात ठेवायची शिक्षा वाचकांना देऊ नकोस
येऊदे पटापट.
जळ्ळं मेल लक्षणं. माझच रे.
जळ्ळं मेल लक्षणं.
माझच रे. तुझी कथा म्हणजे क्रमशः असणार हे गृहितक क्षणभर बाजुला ठेवल हेच चुकल.
पुढचा भाग कधी ?
पुढचा भाग कधी ?
चिमुरी + १ सुरेख..
चिमुरी + १
सुरेख..
yippeeeeeeeeeeeeeeee
yippeeeeeeeeeeeeeeee .........
हे सगळे बरोबर, धम्माल येणार तर
विशल्या, मस्त सुरुवात! जास्त
विशल्या, मस्त सुरुवात! जास्त लटकत ठेवू नको!
दुसरा भाग टाकलाय ताई
दुसरा भाग टाकलाय ताई
दुसरा भाग कुठे आहे???????
दुसरा भाग कुठे आहे???????
Pages