गिरीप्रेमी

Submitted by श्रीकांत काशीकर on 17 March, 2012 - 01:15

शिवसदनासी भगवे तोरण लावण्यास चालला ।
आज शुभेच्छा त्यास्तव देतो वंदुनी गणराया ।।
सह्याद्रीचे पुत्र चालले
शिव आशीष घेण्या
कैलासाचा नाथ आतुरला
शिवभक्ता भेटण्या
हिमालयावर सारे हरहर महादेव बोला ।।
रुद्राचा अवतार शिवाजी
स्वराज्य निर्माता
घेऊनि त्यांचे नाव करावे
वंदन हिमशिखरा
प्रसन्नता शिव सदनी होईल पाहून तुम्हाला ।।
अनुभव तुमचे सारे तिथले
उत्सुक आम्ही ऐकण्या
जीवनातल्या पराक्रमाला
देतील जे प्रेरणा
शिव शंभूचा प्रसाद ऐसे बोल तुम्ही बोला ।।
वारकरी तुम्ही हिमालयाचे
भाग्यवान हो खरे
आशीष तुमच्या संगे असतील
महाराष्ट्राचे सारे
स्वागत करण्या पायघड्या या घालू हृदयाच्या ।।

गिरीप्रेमीच्या पुणे एव्हरेस्ट २०१२ मोहिमेस हार्दिक शुभेच्छा !!!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त शुभेच्छा लिहिल्या आहेत...

गिरीप्रेमीच्या पुणे एव्हरेस्ट २०१२ मोहिमेस हार्दिक शुभेच्छा !!!>>> +२