पेढ्यासाठी:
२५० ग्रॅ. रिकोटा चीज
१/४ कप साखर
वेलदोड्याची पूड आवडीनुसार
दोन चिमूट बेकिंगपावडर
मलाईसाठी :
एक छोटा डबा मास्करपोने चीज ( mascarpone cheese )
चवीनुसार एक-दोन चमचे साखर
केशर
वेलदोडा पावडर आवडीनुसार
सजावटीसाठी बदाम,पिस्ते किंवा साखरेची फुलं,मणी इत्यादी.
अवन १८० डिग्री से. किंवा ३५० फॅ ला तापायला ठेवावा.
एका भांड्यात रिकोटा चीज, साखर, वेलचीपूड आणि बेकिंगपावडर एकत्र करुन घ्यावे.
मफिन पॅनमध्ये एकेक मोठा चमचा मिश्रण घालून अवनमध्ये ३० ते ३५ मिनिटे बेक करावे.
पेढे बाजूने सोनेरी तांबूस दिसू लागले की सुरी घालून पाहावी. ती कोरडी बाहेर आली तर पेढे तयार आहेत.
आता हे पेढे गार करत ठेवावे ( फ्रीजमध्ये नव्हे. )
मलाई बनवण्यासाठी एका भांड्यात मास्करपोने चीज, आवडीनुसार एखाददोन चमचे साखर ( मी थोडे अगोडच ठेवले होते. ) वेलचीपूड, केशर असे सगळे एकत्र ढवळून घ्यावे.
पेढे गार झाले की त्यावर हे मलाईचे मिश्रण लावावे.
वरुन बदाम-पिस्त्याचे काप किंवा दुसरी आवडीची सजावट करावी.
मलाईबहार तयार आहे
मला बंगाली मिठाई अतिप्रिय आहे. मध्ये नेटवर रिकोटा चीजच्या रसगुल्ल्याची रेसिपी मिळाली पण केल्यावर लक्षात आलं की हा प्रकार रसगुल्ल्यासारखा लागत नाही. मग विचार केला ह्याची रसमलाई करुन अपेक्षाभंग होण्यापेक्षा बंगाली मिठाईचाच वेगळा प्रकार करता येईल. त्यातून तयार झाली ही मिठाई 'मलाईबहार'
बेक केलेले असल्यामुळे काही पेढे तांबूस होतात पण त्याने चवीत काहीही फरक पडत नाही. उलट ते छानच लागतात.
मास्करपोने चीज गोडसर सायीसारखे लागते. ते ह्या रेसिपीसाठी वापरायची कल्पना सुचली. ही कॄती करुन उरले तर सायीसारखे भाज्या, डिप्स ह्यात वापरता येते.
करायला एकदम सोपा, झटपट आणि तोंडात विरघळणारा हा पदार्थ करुन बघाच.
हा रिकोटा चीजचा रसगुल्ला नव्हे. बंगाली मिठाईचाच हायब्रिड प्रकार म्हणायला हरकत नाही.
भारतातल्या लोकांनी घरी करायच्या फंदात पडू नये. त्यापेक्षा हलवायाकडून बंगाली मिठाई आणून चापावी
मलाई बॉम्ब एवढे पीसेस झाले
मलाई बॉम्ब एवढे पीसेस झाले म्हणजे एक पाऊंड रिकोटा चीजची केली का ? वरुन साल न काढलेला बदाम किंवा पिस्ते लावले असते किंवा केशर थोडं गरम करुन मास्करपोनेत खललं असतं तर छान पिवळसर केशरी मलाई झाली असती. मग रंग अजून उठून दिसला असता पण वर्ख लावल्यामुळे भारीच दिसतंय एकदम. बदामांच्या कापांचं डिझाईनही कल्पक आहे खरं तर
मानुषी, सुगरण वगैरे काही नाही. सोप्प्या रेस्प्यांच्या शोधात डोकं चालतं असं कधीकधी लेकीला पण आवडेल नक्की.
अगो, फोटो काढेपर्यंत मलाईबहार
अगो, फोटो काढेपर्यंत मलाईबहार शिल्लक राहिली नाही. मस्तच झाली.
५० मिनिटे ठेवावी लागली ओवनात. (टेस्कोचे रिकोटा) टोचून टोचून दोन पेढे मोडले. तर ते मलाईशिवाय गट्टम करण्यात आले.
हो का ? माझ्य अवनमध्ये
हो का ? माझ्य अवनमध्ये पंचवीस मिनिटांतच बाजूने किंचित सोनेरीसर व्हायला लागते. तीस मिनिटांत होतेच होते.
अगो.. आम्हीपण ५० मिनीटे ठेवली
अगो.. आम्हीपण ५० मिनीटे ठेवली होती अवनमध्ये...
केशर घातलं पण ते खालच्या पेढ्यांमध्ये.. पण त्याचा फार रंग नाही आला.. मास्करपोने ढवळल्याने पात्तळ होईल की काय अशी भिती वाटत होती.. त्यामुळे त्यात केशर घातलं नाही.
३० oz रिकोटाचं केलं होतं..
पराग, काय अफाट सुंदर
पराग, काय अफाट सुंदर दिस्ताहेत मलाईबहार गोळे!
पराग, अगो, आशिष, सिंडी आणि प्राजक्ताचे म.ब. फोटो बघून आता मास्कारपोने आणि रिकोटा चीज आणायला जाते.
प्राजक्ता, पराग भारी फोटो
प्राजक्ता, पराग भारी फोटो आहेत. मागच्या पानावरचे अगो आणि सिंडरेलाचे फोटो पाहून ही बर्फी करायची असं ठरवलं होतं. आता तर लग्गेच करावीशी वाटतेय.
ह्या रविवारी केली मलाईबहार. १
ह्या रविवारी केली मलाईबहार. १ पौंड रिकोटा चीझमधे साधारण आकाराचे १६ गोळे झाले. गडबडीत फोटो पाहुणे गेल्यावर काढु ठरवले तर सगळी मलाईबहार अगदी १०मिनीटात गायब मस्त चव आहे ह्या बर्फीची. धन्यवाद!
मी केलेली वीकेंडला.. साधारणतः
मी केलेली वीकेंडला.. साधारणतः तासावर वगैरे ठेवावी लागली (सुरी बाहेर न चिकटता यावी म्हणून)
पण माझी बंगाली मिठाईसारखी लागत नव्हती.. माकाचु?
सोनपरी नानबा, का गं ? मला तर
सोनपरी
नानबा, का गं ? मला तर शाँदेशसारखी लागली ( मी एका बंगाली मैत्रिणीने दिलेले कलकत्याचे एकदम ऑथेंटिक शाँदेश खाल्ले आहेत. पण ते एकदाच. माझी आठवण चुकीचीही असू शकते. )
तरीही बंगाली मिठाईचा प्रकार आहे हे कळतेच. माझ्या मुलाने खाल्ल्या खाल्ल्या 'आई, ही पनीरची मिठाई आहे का ?' असं विचारलं होतं
(No subject)
वा! नम्रता! आणखी एक मस्त
वा! नम्रता! आणखी एक मस्त फोटो!
अगो, फारच मस्त होती मलाई बहार
अगो, फारच मस्त होती मलाई बहार ची क्रुती. मजा आली करायला. माझ्या मैत्रिणीला पण फार आवडला पदार्थ.
माझा जरा जास्त बेक झाला. पण तरी मस्त लागत होता.
नम्रता, छान दिसतेय मिठाई
नम्रता, छान दिसतेय मिठाई
पकुल, तू आहेस होय. मला डिश आणि खालचे कारपेट ओळखीचे वाटले
ही घ्या आमची केशर मलाई बहार.
ही घ्या आमची केशर मलाई बहार. काल ओळखीच्यांकडे जेवायला जाताना घेऊन गेले होते. सगळयांना फारच आवडली.
अरे वा जयंती, मस्तच दिसतेय
अरे वा जयंती, मस्तच दिसतेय
जयंतीच मबा अगदी ग्लो होतेय.
जयंतीच मबा अगदी ग्लो होतेय.
मी आणलंय रिकोटा. या वीकेन्डला
मी आणलंय रिकोटा. या वीकेन्डला करणार.
(मायक्रोवेव्हची भानगड नसल्याने जमेल बहुतेक. :P)
मास्करपोने आणलं का ?
मास्करपोने आणलं का ?
मायक्रोवेव्हची भानगड नसल्याने जमेल बहुतेक >>> म ब बिघडली की काय ?
धन्स शूम्पी, अगो
धन्स शूम्पी, अगो
माझी अॅडीशन म्हणजे रीकोटात
माझी अॅडीशन म्हणजे रीकोटात केशर न घालता रोझ ईसेन्स आणि वेलची घातली. मास्करपोने मधे केशर घातलं. उचलताना मोडत होती. कदाचित १-२ चमचे मिल्क पावडर घातली तर चांगलं बाईंडींग हॉईल.
व्वॉव, बहारदार दिसतायत या
व्वॉव, बहारदार दिसतायत या मलाईबहार
अंजली, मस्त फोटो. सर्व्हिंग
अंजली, मस्त फोटो. सर्व्हिंग डिशही भारीच
रिकोटा कसं आहे त्यावरही अवलंबून असावं. इथलं रिकोटा ( सेन्सबरीत मिळणारं ) अमेरिकेतल्यापेक्षा घट्ट होतं, पाणी अजिबात नव्हतं. अमेरिकेतलं ( मी खाल्लेलं ) जास्त ग्रेनी, रवाळही असायचं रिकोटा.
अगो, शक्य आहे. फोटोतपण
अगो, शक्य आहे. फोटोतपण जाणवतेय.
Pages