इंडक्शन कुकिंग कुणी वापरलं आहे का?

Submitted by अमृता on 16 February, 2012 - 00:58

इंडक्शन कुकिंग रेंज विकणारे हे कुकिंग गॅस पेक्षा स्वस्त पडतं असा दावा करतात. तुमचा काही अनुभव असेल तर प्लिज शेअर करा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंडक्शन कुकिंग अगदी स्वस्त पडते.. वापरायलाही सोपे, सुरक्षित. आम्ही दोघांचा स्व्यपाक चहापाणी सगळं इंसक्शनवर करायचो.. लाइट बिल १०० रु महिना यायचं...

धन्यवाद जामोप्या, शान्तनु
हे सगळ्या जाहिरातींमधे वाचलं होतं पण प्रत्यक्ष वापरलेल्यांचे अनुभव ऐकले नव्हते. आता घेण्यासाठी विचार करायला हरकत नाही.

मलाही थोडी माहिती हवी होती. एकाची किंमत १२००/- आणि एकाची ४०००/- च्या पुढे . नक्की वेगळे काय ते कळेना. electricity consumption मधे फरक नव्हता. त्यामुळे ज्यांनी वापरला आहे त्यांनी कुठला आहे, किंमत किती ते ही सांगा प्लीज.

मी टी टी के प्रेस्टिजचा घेतला. साधारण ३ हजारच्या आसपास, त्यावर तीन भांडी मिळाली, तीच वापरावी लागतात.. हल्ली नवीन आले आहे त्यावर कुठलीही भांडी चालतात असे एका जाहिरातीत वाचले, त्याबाबत काही माहीत नाही. प्रेस्टिजचा चांगला आहे.

मिसुद्धा प्रेस्टिजचाच घेतला आहे. तिन भांडी सोबत मिळालेलीच वापरतोय सध्या..३०००-३२०० ला कि कहिसा घेतला होता. आईने गावाकडे सुरुचिचा घेतला. तो लागलिच २ महिन्यात खराब झाला.

आमच्याकडेही प्रेस्टीजचाच आहे. भांडी कुठलीही चालतात पेक्षा फ्लॅट बॉटम असलेली लागतात. शक्यतो तांब्याची भांडी टाळावीत. Happy

माझ्याकडे आहे, मी वापरले आहे
पण, गॅसवर केलेल्या स्वयंपाकाइतकी छान चव येत नाही इलेक्ट्रीकल हिटींगमधे अन्नाला, हे वैम Happy

गॅसपेक्षाच नाही तर इलेक्ट्रिक हिटींग पॉट्सपेक्षाही स्वस्त पडते. मी इंडक्शन प्लेटाच वापरते माझ्या रोजच्या स्वयंपाकासाठी. त्यासाठी लागणारी भांडी वेगळी आणि डबल किंमतीची असली तरीही इतका फास्ट स्वयंपाक होतो, त्यासाठी मी कितीही किंमत मोजायला तयार असते. हे स्वस्त या अर्थाने, की स्वयंपाक प्रचंड लवकर होतो. नाहीतर त्याच्या वॉट्स मध्ये आणि नॉर्मल इलेक्ट्रिक हिटींग पॉट्सच्या एनर्जी कन्झमशन मध्ये काहीही फरक नाही.

बागे, अगदी अगदी! Happy पण हिटींग अ‍ॅडजस्टमेन्ट्स नीट सिलेक्ट केल्यास तर गॅसची चव सिम्युलेट करु शकशील गं... गिव्ह इट अ ट्राय Happy

आम्ही पूर्ण वेळ वापरत होतो.. गॅस नव्हताच... सध्या इथल्या घरी गॅस आहे.. इंडक्शन बिचारा फक्त शेंगदाणे भाजायला राहिला आहे. Sad

साने, करेन ट्राय
पण नवर्‍यालाही ते इंडक्शन वरचे जेवण नाहीच आवडत, पण एक सांगू का, मध्यंतरी मला सिलेंडर प्रकार डिस्कार्ड करून महानगर गॅसच्या पाईपगॅसची सुविधा इन्स्टॉल करायची होती, ह्या सगळ्या प्रकारात कोऑर्डिनेशन च्या गडबडीमुळे माझ्या घरी दोन दिवस गॅसच नव्हता, अशावेळी मला इंडक्शन कुकरने संपुर्ण सपोर्ट केला, त्यामुळे अ‍ॅज स्टँड बाय, मला उपयोग आहेच Happy

मी पण वापरलीय इंडक्शन प्लेट.सर्वात चांगली गोष्ट म्हणजे टायमर. एकदा उकळी आली कि वेळ अ‍ॅडजस्ट केली कि नंतर बघायला नको. चुकुन चालु राहिला तरी आपोआप बंद होतो,म्हणजे बाहेर गेल्यावर धाकधुक नसते गॅस चालु आहे कि बंद आहे.भांड्याशिवाय दुसरं काहि जळत नाहि.म्हणजे कागद वगैरे.मला चवीत काहि फरक नाहि वाटला. पण भारतात पाईप गॅसपेक्षा स्वस्त आहे का इंडक्शन? तसं असेल तर माझी पसंती इंडक्शनला.

सानी, तु जर्मनीत घेतलीस का भांडी? मला एवढी महाग नाहि वाटली? ईकिया मधला ५ युरोचा (३ कि ४ भांडी) सेट पण चालतो इंडक्शनवर. २-३ भांड्यांचा अपवाद वगळता बाकिची सगळी भांडी चालतात.त्यामुळे मला इंडक्शनसाठी वेगळी भांडी घ्यावी लागली नाहित.

माझ्याकडेही आहे. मी साधारण एक महिना त्यावर स्वयंपाक केलाय. फक्त चपात्या करता आल्या नाहीत. त्याचा वेगळा तवा मिळतो का ते माहित नाही. भारतात वापरणार असल्यास तुमच्या भागात लाईट जाण्याची शक्यता वगैरे पाहुन मग वापरा, कारण नेहेमीच लाईट जात असले तर उपयोग नाही.

माहिती उत्साहवर्धक आहे Happy पण आमच्याकडे वीजमंडळाचे खाजगीकरण झालेले असल्याने (ahmedabad electricity board _>torrent power) वीजबील महाराष्ट्राच्या तुलनेत जास्त येते तेव्हा इकडही इं.कु. कुणी वापरलाय का ते बघू. Happy

फक्त चपात्या करता आल्या नाहीत. त्याचा वेगळा तवा मिळतो का ते माहित नाही>>>>>> माझ्याकडे लोखंडाचा तवा आहे ,तो चालतो. नॉनस्टिक तवा वापरुन बघितलाय का? . मला वाटतं त्या भांड्याच्या तळाला मॅग्नेट चिकटतं ते भांडं चालतं.

भान, मी रियालमधून घेतलीत बरिचशी भांडी. माझी इन्डक्शन प्लेट फार चूझी आहे. बर्‍याच तव्यांना, भांड्यांना नाकारते! Proud तिला फक्त महागडे पॅन्सच चालतात... तुझी साधी भोळी गरीब दिसतेय, मिळेल ते पदरात पाडून घेणारी. Lol

टी टी के प्रेस्टिजचा घेतला. साधारण ३ हजारच्या आसपास, त्यावर तीन भांडी मिळाली, तीच वापरावी लागतात.. हल्ली नवीन आले आहे त्यावर कुठलीही भांडी चालतात असे एका जाहिरातीत वाचले,>>>> कुठला ब्रँड/ मॉडेल?? scratch-head01-idea-animated-animation-smiley-emoticon-000414-large.gif

नवरा कधीपासून मागे लागला आहे प्रेस्टिज चे इंडक्शन घेऊ म्हणून.. पण त्याची वेगळी भांडी सांभाळावी लागतात तसेच साधा एक कप चहा करायचा तरी त्याचीच भांडी वापरावी लागतात असे ऐकले आहे. प्रेस्टिजच्या सेल्समन ला विचारले तेव्हा विनोद किंवा तत्सम फ्लॅट सँडवीच बॉटमचा कुकरही चालत नाही असे समजले. नक्की काय आहे ? माझ्याकडे एकच सिलेंडर असल्या मुळे गॅस गेल्यास गडबड होते आणि वेळेत दुसरे सिलेंडर आल्यास दर वेळेस न संपलेला सिलेंडर देऊन टाकावा लागतो.. मला वाटत होतं की आधी मायक्रोवेव्ह घ्यावा.. पण गॅस नसताना मायक्रोवेव्ह मधे पूर्ण स्वयंपाक होणार नाही.. तसेही इथे दिवे जातात त्यामुळे मी दुसरा सिलेंडर घेण्याच्या मागे होते पण इथे सातशे आठशे चे सिलेंडर तेवढ्याचीच रिसिट देऊन साडेतीन हजारापर्यंत विकतात.. नवरा ते करायला तयार नाही. बरोबरही आहे ते म्हणा.. पण गॅसवर अवलंबून रहाण्याची जी सवय झाली आहे त्याचा परिणाम आहे बहुतेक.. माहेरी पाईप गॅस होता त्यामुळे कधी काळजी करावी लागली नव्हती.. मायक्रोवेव्ह आणि इंडक्शनची युटिलिटी वेगळी असल्याने काय घ्यावे आणि काय घेऊ नये ह्यात गोंधळ आहे. गॅस असताना इंडक्शन बंदच राहिल बहुतेक.. काय करू समजत नाहीए..
बरं घरातली भांडी सगळी गोल बुडाची असतात. फक्त झिरो ऑइलची जाड सपाट बुडाची भांडी (कोल्हापूरला मिळणारी) आहेत. तीही चालतील का? माहित असल्यास प्लीज सांगा की कोणती भांडी चालतील हे ठरवण्याचा नेमका निकष कोणता ? धन्यवाद.. Happy

प्रेस्टीजच्या कुकरवर फक्त काही स्पेसिफिक भांडीचालतात.. दुसरी भाअंडी सपाट बुडाची असली तरी चालत नाहीत.. त्यामुळे भाताचा प्रेशर कुकर चालणार नाही... पण बरोबर मिळालेल्या भांड्यात भात करता येतो.... तुमची क्वांटीटी मोठी असेल तर मोठी भांडी घेऊ शकता जास्ती पैसे देऊन.. पण गॅस मिळेपर्यंतच्या काळात एक दोन दिवसाठी हा चांगला पर्याय आहे.. तसेही त्यानंतरही वापरला तरी चालेलच.. Happy

तसेही इथे दिवे जातात त्यामुळे मी दुसरा सिलेंडर घेण्याच्या मागे होते पण इथे सातशे आठशे चे सिलेंडर तेवढ्याचीच रिसिट देऊन साडेतीन हजारापर्यंत विकतात. >>> सोनचाफा आधी चौकशी करा आणि जर गॅस डिलर जास्त पैसे मागत असेल तर सरळ HP/ भारत जो कोणी असेल त्यांच्या वेबसाईटवर तक्रार नोंदवा , डिलर घरी येऊन दुसरं गॅस सिलिंडर देईल.

धन्यवाद जा.मो.प्या. आणि श्री ! एकूण खूप त्रासदायक आणि कठीण नाहीए तर इंडक्शन कुकिंग.. विचार करते.. अचानक इंडक्शन कसे हवे लागले असं विचारणार नाही तर नवरा आता.. Happy

नुकतंच माझ्याकडे घेतलय, पण "अर्थिन्ग" नीट नसल्याने अजुन वापरायला सुरुवात केली नाहीये.
एकन्दरीत बर्‍यापैकी सुरक्षित वाटते आहे. Happy

गुगलवर शोधले तर ६ महिन्यानी नीट चालत नाही हा कूकर अशा प्रतिक्रिया दिसल्या.
कोणी किती काळ वापरताय?

गुगलवर शोधले तर ६ महिन्यानी नीट चालत नाही हा कूकर अशा प्रतिक्रिया दिसल्या.
कोणी किती काळ वापरताय?>>>
मी गेली दोन वर्षं प्रेस्टिजचा ईन्डक्शन कुकर सातत्याने म्हणजे अगदी जवळपास रोज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज वापरतेय. एक गास्केट खराब झाले, पण दुसरे मिळालेले होतेच, ते रिप्लेस करुनसुद्धा आता सहा महिन्यांच्या वर झाले असतील.

मी इन्ड्क्शन कुकिंग गेले जवळ जवळ २.५ वषे वापरत आहे. मला तरी चांगला अनुभव आहे. पाणी १ मिनिटात उकळते. आणि त्या भांड्याखाली कागद ठेवला तरी तो जळत नाही. माझा नवरा cooking range नविन आणली होती तेव्हा सगळ्याना हा प्रयोग करुन दाखवायचा. थोडक्यात यात सगळी उष्णता त्या भांड्यात transfer होते. शिवाय भांडे ठेवले नसेल तर आपोआप range बंद होते. त्यामुळे बरेच सुरक्शित आहे.

मी Ikea मधुन काही भांडी आणली आहेत, ती चालतात. ज्या भांड्याना माग्नेट चिकटते ती सगळी भांडी चालतात. साधारणपणे ह्या भांड्यांवर मागे ती कुठल्या cooking range वर चालतात याचे चित्र दिलेले असते, त्यावरुन समजते.

महाग आहे ! दोन्ही वेगळेवेगळे असलेले परवडले.. याच्यात एक बाद झाले की दुरुस्तीला सगळेच द्यावे लागणार. Happy

माझ्याकडे बजाज आहे. उत्तम चाललाय. गेल्या महिन्यात सिलेंडरने दगा दिला. बुक केल्यावर दीड महिना उजाडला यायला. मधले तीन आठवडे रोजचा चारीठाव स्वैपाक - पोळ्यांसकट - इंडक्शन वर केला. बरीचशी स्टीलची फ्लॅट बॉटम भांडी, फ्लोरा सारखी कोटिंगची भांडी, पूर्वी कधी आहेरात वगैरे आलेली ब्लॅक कोटिंग असलेली भांडी हे सगळं सगळं त्यावर चालतं. (फक्त निर्लेपच नाही चालली - अगदी खास इंडक्शन कुकिंगसाठी असलेली कढाई आणली होती तीपण. ब्रॅन्डचा काही संबंध आहे का? Proud )

मस्त बाफ आहे हा. आमच्या ऑफीसमध्ये २ वर्षापासून ३ वेळा चहा आणि मॅगी ई. साठि आहे. नोवा कंपनीचा मस्त चालतो आहे.

६ सिलेंडरच्या बातमीमुळे Happy घरी हल्लीच जास्त क्षमतेचा इंडक्शन कुकिंग रेंज घेतला आहे. त्यावर २ वेळेचा स्वयंपाक या महिनाभर करुन वीजेच बिल किती येतय हे पहायचय. जर सिलेंडरच्या किमतीपेक्षा जास्त बिल असेल तर मग इंडक्शन कमी वापरणार.

पण पाणी, अंडी, दूध उकळणे या प्रक्रिया लवकर चटकन होतात. पुढच्या महिन्यात feedback सांगेन.

मला मैत्रिणीने फिलिप्सचा इंडक्शन कुकर भेट दिलाय. महिना झाला वापरतेय. एकदम फास्ट कुकींग. १ ली दुध ४ मि मधे तापवून होते. गणपतीत पनिरची भाजी वगैरे पण त्यावरच केली. त्याच्या बरोबर एक नॉन स्टिक पॅन मिळालाय त्यात फोडण्या, परतणे, पराठे, डोसे करुन झालेत. एक मोठी कढई खास इंडक्शन कुंकींग साठी घेतलीय. बिग बाजार मधे जाड स्टिल मधे चांगली रेंज आलीय खास इंडक्शन कुंकींग साठी. बाकी सगळी स्टिलची भांडी चालतात.

चला गॅस चे वांदे होणारेत. एक पर्याय तर समजला. भारतात लोड शेडींग असते पण शहरात जरा कमीच. एकंदरीत या टेक्नोलोजी मध्ये एनर्जी ट्रान्स्फर अतिशय कार्यक्षमतेने होते तर.

अर्चना मेस्त्री | 18 October, 2012 - 03:16 >>> वीज बीलाचा फीड बॅक द्याहो जरा. आमचे पण चालले आहे आणायचे. थेअरी वाचुन कळाले की ज्याला मॅग्नेट चिकटते अशा तळाची कोणतीही भांडी चालतात. आता कुकर पण तसा प्लेट लावलेला मिळतो.
अजुन कोणी वापरला असेल आणि काही प्रॉब्लेम (ब्रँड इत्यादी) असतील तर प्लिज शेअर करा. Happy
अजुन एक शंका, पातळ स्टील्ची भांडी असल्यामुळे दुध / भाजी वगैरे करपते का?

निवांत, बिल काही जास्त येत नाही कारण कुकिंग फास्ट होते. आणि भाजीला भांडी थोडी जाड बुडाचीच घ्या. पातळ भंडी फक्त हिटींगला ठेवा. चहा, दूध वगैरे. स्लो कुक ऑप्शन पण अस्ते. पण वरदा म्हणतात तसे निर्लेपची स्पेशल भांडीच दगा देतात. त्यातसुधा तवा चांगला आहे.

अल्युमिनियम, व खास करून हिन्डालियमची भान्डी चालत नाहीत असे विक्रेत्याकडून सान्गण्यात आले.
डेमॉस्ट्रेशनच्या वेळेस वापरलेले पातेले स्टिलचे गोलसर तळ असलेलेच होते, तर ते चालले, फक्त मग उर्जा/वेळ जास्त खर्च होऊ शकते म्हणून चपटा तळ हवा
हल्ली ग्यासच्या प्रश्नाने आम्हासही ग्यासवर ठेवले असल्याने, व रॉकेल भारीच महाग/अपुरे मिळत असल्याने मला वेळेस इंडक्शन वापरण्यावाचून पर्याय नाही. तरीही अजूनही तो कोराच्च्या कोरा बॉक्स मधे ठेवला आहे.
(बहुधा वेळेस लिम्बी थोरलीच्या रुखवतावरच मान्डेल असे दिस्तय Proud )
बायदिवे, वयस्कर विस्मृती असणार्‍यांकरता हे वरदान आहे. जळणे/वाया जाणेची भिती नाही, टायमर सेट असेल तर बाकी भिती नाही. सबब हा आईला वापरायला द्यायचा विचार चालू आहे, मात्र भान्डी नविन आणणे व कनेक्शन घेणे याकारणाने बेत लाम्बणिवर पडतो आहे.
असो.
ज्यान्नी घेतला आहे, त्यान्ना जराही वाईट वाटून घ्यायची गरज पडत नाही असे हे उपकरण आहे हे निश्चित.

ईंडक्शन कुकिंग टॉपमधे तांब्याच्या कॉईलमधुन अल्टरनेट करंट पास होताना oscillating magnetic field(डोलणार चुंबकीय क्षेत्र) तयार होत. या चुंबकीय क्षेत्रात आलेल्या लोखंडाच्या भांड्यात करंट निर्माण होतो. लोखंडाच्या रेझिस्टीव प्रॉपर्टीमुळ भांड गरम होत. oscillating magnetic field मुळ सपाटबुडाच लोकंडाच भांड असेल तरच भांड्यात करंट निर्माण होऊ शकतो.

अहो लिम्बुटिम्बु (हे कॉम्बो जरा विनोदि आहे Lol सॉरि रागवू नका.. मजा केली. ) स्टीलचीच लागतात भान्डी किन्वा मग स्पेशल इन्डक्शन कुकिन्गसाठी बनवलेली. चपटा तळ हवा हे पण बरोबर आहे.

Pages