इंडक्शन कुकिंग कुणी वापरलं आहे का?

Submitted by अमृता on 16 February, 2012 - 00:58

इंडक्शन कुकिंग रेंज विकणारे हे कुकिंग गॅस पेक्षा स्वस्त पडतं असा दावा करतात. तुमचा काही अनुभव असेल तर प्लिज शेअर करा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुशांत_ | 14 December, 2012 - 15:26
.................या चुंबकीय क्षेत्रात आलेल्या लोखंडाच्या भांड्यात करंट निर्माण होतो. लोखंडाच्या रेझिस्टीव प्रॉपर्टीमुळ भांड गरम होत. oscillating magnetic field मुळ सपाटबुडाच लोकंडाच भांड असेल तरच भांड्यात करंट निर्माण होऊ शकतो
निवांत पाटील | 13 December, 2012 - 20:34
..................थेअरी वाचुन कळाले की ज्याला मॅग्नेट चिकटते अशा तळाची कोणतीही भांडी चालतात. आता कुकर पण तसा प्लेट लावलेला मिळतो.

यावर एक शंका -
जर एक जाड लोखंडी प्लेट घेऊन ती इंडक्शन कुकर वर ठेवली व त्यावर आपली नेहमीची कॉपरटॉप असलेली भांडी ठेवली तर चालू शकेल का ? येथे पहिल्यांदा प्लेट गरम होईल आणि कॉपर टॉप मुळे भांडे देखील लगेच गरम होईल असे मला वाटते. अर्थात माझ्याकडे इंडक्शन कुकर नसल्यामुळे मी हा प्रयोग करू शकत नाही.

हरीहर तस करु शकतो पण त्यात इंडक्शन च मुळ होणारी उर्जा बचत होऊ शकणार नाही आणि ऐकंदरीत हिटींग खुप स्लो होईल.

माझ्या कडे ईन्डकशन कुकर आहे
त्यात हलवा कसा करायचा
आणी काय काय करता होईल त्यात
plz link aaseel tar ethe share karaa

me Mayboli varil pratisad vachun Prestige cha Induction cooker ghetala. tyacha khup upyog hotoy mala. Pan yache kahi said-effects ahet ka?

छान आहे... मागेही मी कदाचित लिहिले असेल पण घरी एकच सिलिंडर असल्याने गॅस गेला की दुसरं सिलिंडर येइ पर्यंत सगळ्यासाठी मी इंडक्शन वापरते. कुकर मी घेतला नाहीए.. दुधासाठी एक पातेलं, बरोबर मिळणारी तीन नॉन-स्टीक भांडी इतर छोटे बाउल्स वगैरे वापरून काम भागतं. ओगले ची जुनी भांडी चालतात ह्यावर.. त्यामुळे तूप वगैरे कढवता येतं.
कुकर नसल्याने डाळ (वरणासाठी) शिजवायला जरा त्रास वाटतो.. वेळ जास्त लागतो आणि एकावेळी एकच काम होउ शकत असल्याने तो वेळ महत्वाचा वाटतो. ह्याला उपाय म्हणुन गॅस जायची वेळ आली की मी जरा दोन दोन दिवसांची डाळ एकदम उकडून ठेवते. तसेही वर्षातून अशी वेळ सात-आठ वेळाच येते म्हटल्यावर तेवढे जमू शकते.
भात तेव्हा साधा न करता परतून करायच्या रेसिपीज वापरते..
सद्ध्या पाण्याच्या गिझरच्या बिघडण्यामुळे गेले तीन महिने मी त्यावर रोज अंघोळीचे पाणीही तापवत आहे. पंधरा मिनिटात एक मोठे पातेल भरून पाणी कढत तापते. ज्यात भर घालून माझी व लेकाची अंघोळ होते. थर्मोस्टेट आहे ह्या नावाखाली तास न तास गिझर ऑन रहाण्याचे प्रकार व त्यामुळे वाया जाणारी अतिरिक्त वीज दोन्ही वाचते. तसेच येताय नळातून हवे तेवढे गरम पाणी म्हणून होणारा पाण्याचा अपव्यय सुद्धा कमी झाला आहे. असो हे विषयांतर ओघानेच आले.
एक नक्की की इंडक्शन मुळे स्वयंपाक लवकर होतो पण भांड्यात जास्तीच पाणी असावे लागते नाहीतर भाजी करपू शकते.
चहा मला तरी इंडक्शन वरचा जास्त आवडतो तसेच तो जास्त वेळ गरम रहातो.
भाकरी व पापड आणि भरीतासाठी वांगे भाजता येत नाही त्यामुळे तेवढेच दोन पदार्थ गॅस नसल्याच्या काळात बनवता येत नाहीत. रच्याकने, आप्पे व ईडल्याही होत नाहीत.
खरं तर गॅस गेला की आम्ही खूष असतो कारण नवर्‍याच्या मते घरच्या जेवणाला हक्काने बुट्टी मारता येते.. पण तरीही शक्यतो सगळच इंड्क्शन वर जमत असल्याने फार काही अडत नाही. Happy

अमा, घरात किती ते कुकर सांभाळायचे ? म्हणून घेतला नाहीए इंडक्शन चा कुकर..
काउ, पापड भाजले होते एकदा मीपण.. पण जास्त आवडले नाहीत घरी.. Sad

induction cooker जर रोजच्या स्वयम्पाकाला वापरला तर वीज बीलात किती फरक पडतो?

माझा अनुभवः
पाणी असलेल्या भाज्या करणे, चहा, पाणी उकळणे, कुकर इ. कामे चांगली होतात इंडक्शन वर. बरेचदा दोन्ही गॅस कामाच्या वेळी व्यस्त (एकावर पोळ्या एकावर भाजी) तेव्हा कुकर लावता येतो. पोळ्या कधी करुन पाहिल्या नाहीत. याला फक्त सपाट बुडाची भांडी चालतात आणि घरात आधीपासून असलेली ८०% भांडी खालून बहिर्वक्र आहेत त्यामुळे इंडक्शन साठी ची दोन भांडी एक मोठे आणि एक खूप लहान, याने होतील तितकीच कामे त्यावर केली जातात. कुकर इंडक्शन ला चालेल असा घेतला आहे.
दूध एक दोन वेळा तापवले होते. पण त्याचे डिफॉल्ट शक्तीमान चालू केल्यावरचे १३०० वॅट आहे त्यामुळे एकदा दूध खालून करपले होते. शक्ती कमी करता येते, पण तो प्रयोग करुन दूध तापवण्याची ईच्छा शक्ती कमी आहे. चहा करताना ६०० वॅट वापरले तर काही वेळ चालू काही वेळ बंद असे चालते आणि चहा उतू जात नाही छोट्या भांड्यात पण. एकदा वॅट कमी करुन किती वॅटला दूध न करपता पण तरी चटकन तापते हे बघायचे आहे.
एकदा कोणत्या पदार्थाला किती वॅट वर उत्तम रिझल्ट मिळतात हे प्रयोग केले की इंडक्शन हे घाईच्या वेळी वरदान आहे. तळणी आणि सुक्या भाज्या इ. जरा रिस्की आहेत करणे. खूप लक्ष द्यावे लागेल.

गुंजन प्लग काढुन नंतर गरम पाण्यात किचन क्लोथ भिजवुन पिळून त्याने स्वच्छ करावा (ही माझी पद्धत, अजुन सल्ले येतीलच)

धन्यवाद प्रीती. मी कपड्यानेच साफ करते पण इन्ड्क्शन प्लेट वर ब्राउन असा थर आलाय तो कसा साफ करावा कळत नाही . चाकुने काढला तर चरे पडतील ना?

धन्यवाद प्रीती. मी कपड्यानेच साफ करते पण इन्ड्क्शन प्लेट वर ब्राउन असा थर आलाय तो कसा साफ करावा कळत नाही . चाकुने काढला तर चरे पडतील ना?

दूध तापवताना खरोखरच काळजी घेतलेली बरी. सुरुवातीला सवय नसताना पटकन तापले आणि इतक्या झटकन पातेलीतून उसळी मारून बाहेर आलं की नंतर त्यावर खूप विचार करून मार्ग काढला.

शक्यतो दूध तापवताना तिथून फार दूर न जाता आसपासच काम करते. तसच सुरुवातीला (अर्धा लिटरसाठी ) ८०० वर चार ते पाच मिनिटे झाली की चक्क कीप वॉर्म सेटिंग वर पाच मिनिटे मंद तापू देते. त्याने दूध अर्ध कच्चं रहात नाही. तसं राहिले तर दूध खराब होण्याची भीती असते. माझे दूध तापवायचे पातेले चांगले असेल कदाचित तळाला पण दूध कधी करपलं नाही त्यात उतू गेलं तरी..

प्रत्येक इंडक्शन ची सेटिंग्ज (एकाच ब्रँडची दोन मॉडेल्स असली तरीही) वेगळी असतात. नणंदेकडच्या मशीन ला दुध, चपाती, भात अशा साठी सेटिंग्ज आहेत (मी मशीन पाहिलेलं नाही पण ऐकीव माहिती) आणि माझ्याकडे बॉइल, फ्रायिंग, सॉते अशी सेटिंग्ज आहेत.. तिच्याकडे दूध सेटिंगला दूध तापवून नंतर ते नासत होतं. तेव्हा तिला माझ्या पद्धतीने दूध तापवायला सांगितलं.. आता नासत नाही.. शेवटी अनुभव घेऊन बरच शिकता येतं. मलाही इंडक्शन हा प्रकार आवडतो.. Happy

वीज बिलात फार काही फरक वाटला नाही, रोज पाणी तापवत्येय तरीही..

सफाई माझीही पद्धत ओल्या फडक्याने ग्लास क्लीनर वापरून.. चॉकलेटी थर (थर नही अगदी पण रंग म्हणा) माझ्याही ग्लास सरफेस ला आहे.. कसा काढू विचारच केला नाही.. Happy

आज बजाज मधून एकजण डेमो देण्यासाठी आमच्या सोसायटीत आले होते. स्कीम चालू आहे म्हणे इंडक्षन कूक्रवर...
२०० किंवा ५०० रुपये भरून आज बुकिंग करायचं, ३ महिन्यापर्यंत कधीही प्रॉडक्टची डिलिवरी पूर्ण पैसे भरून तुमच्या सोयीने घेऊ शकता. जर नाही घ्यावंसं वाटलं तर बुकिंगचेही पैसे परत मिळतील. आणि वस्तू वापरून न आवडल्यामुळे वगैरे १ महिन्यात परत केली तर संपूर्ण पैसे परत. आज बुकिंग केलंय. प्रिंटेड किंमत ५९९०/- होती, स्कीममधे ४७९०/- ला मिळायची आहे. ५००/- च्या बुकिंगमधे इंडक्षनची भांडी, एक पॉवर सेवर(संपूर्ण घराचं वीजबील कमी करायला) अशी एकूणात ८ गिफ्ट्स आहेत.

तर, या किंमती ऑनलाईनच्यापेक्षा कैच्या कै दिसतायत मला...
इथे

मला गिफ्ट्सबद्द्ल जरा शंका आहे, घ्यावीत/नकोत, कारण आज आमच्याकडच्या साध्या स्टीलच्या पातेल्यात पाणी तापवायचा डेमो मिळालाय. साधी भांडी चालतील म्हणतायत.
सल्ला हवा आहे.

टोचा <<<माझ्याकडे तांब्याचा तळ असलेला स्टीलच्या टोपांचा सेट आहे त्यातले मोठ्या मापाचे टोप चालतात माझ्या इंडक्शनवर

Pages